कविता

माझ्या अस्तिवावर
जेव्हा;
दिशाभूलीच सावट पसरत,
तेव्हा;
प्रत्येकदिशेला मी
दुभाजात राहते
तर्क अतर्कच्या चाळणीत.
दिशाभूलीचा प्रदेश ही भेदरलेला...
अस्थिर आणि अपरंपार असतो.
एखाद्या अणूचा केंद्रकच डळमळवा
तसा हा
चक्क्काचूर,
विस्कटलेला प्रदेश !
ढवळून टाकतो आपलं मन....आपले निर्णय...
आणि मतं सुद्धा...
अश्या वेळी बऱ्या वाईट साऱ्याच आठवणींचा पुंजका
मी त्या प्रदेशाच्या वेशीवर टांगून देते....
मी सर्वस्वी रिती होते
मुक्त हस्ताने ...
नव्या जन्माच्या स्वागताला !!!

स्वरूपा चव्हाण

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता मनाची दोलायमान स्थिती उत्तम मांडते. सुरुवातीच्या शुद्धलेखनाच्या प्राथमिक चुका वगळता " प्रदेश ही भेदरलेला" आणि "मुक्त हस्ताने" हे मला अनावश्यक किंवा ज्यादाचे वाटले. विशेषत: भेदरलेला दिशाभूलिचा प्रदेश की मी हे मिसळलेय बहुदा.
"माझ्या" मनात चाललेल्या दिशाभूलिच्या प्रदेशापासून "मी" म्हणजे माझे आत्मभान वेगळे, वरचढ आणि निर्णायक आहे हे सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे हे आवडले. अणुकेंद्रकाची कल्पना देखील चांगली आहे, जर मॉडर्न कल्पनांचा वापर आव आणण्यासाठी केला नसेल, सुचलेली सहज उस्फुर्त उपमा असेल तर मी स्वागतच करतो. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0