सुतक आणि सोयर

सुतक आणि सोयर

मागच्या दोन पिढ्यांचे दुष्काळ
पाहिले आहेत कोरड्या ठक्क विहरीने
त्या विहरीसमोर बसून राहते 'ती' अखंड

कुणीतरी वर्तवली आहे भविष्यवाणी
दहा दिवस दहा रात्र अखंड अविरत
संततधार पावसानेच भरेल विहीर

ती अखंड बसून आहे विहिरीसमोर
ती' रडली नाही जन्मल्यापासून
आश्रित आहे कोणत्यातरी दुःखाची
जणू जगण्याची एकमात्र भोळी आशा

वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली
दहा दिवस दहा रात्र पाऊस कोसळला
विहीर भरली ,ती धाय मोकलून रडली

वेदने --
तू कुणाचे सुतक पाळत होतीस
म्हणून तुझ सोयर केल नाहीस मला ?

अनुरागा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

कवितेमागची कल्पना जरा वेगळी आहे - आवडली
शब्दयोजनेत अधिक नेमकेपणा आवडेल.

अजून असेच येत राहु द्या
ऐसीवर लिहिते झाल्याबद्दल आभार नी स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!