चित्रपट-चिवडा

विकेन्ड्ला जोडून आलेली दिवाळी. मग जीवाची दिवाळी करायला वेळच वेळ.
"चित्रपट पाहूया? मी ही येतो." इति बाबा(महाराज)
"काय बाबा चित्रपट काय ? वेडपट चा भाऊ वाटतो" कन्या
"वेडपट ना मग शहारुखचाच बघूया"
"नाही आपल्याला प्रकाश आमटे बघायचाय केव्हाचा" मी.
अश्या सगळ्या चर्चा उपचर्चा झाल्यावर स्वार्‍या बाहेर पडल्या.
"आमटेंचे आजचे दोन्ही शो हाउसफुल. " हे ऐकल्यावर हॅपी न्यू ईयरची तिकीटं काढली. शाहरुख, सैफ वैगेरे म्हटलं की "तुम्ही जा दोघी. मला काम आहे; मला रियाज करायचाय." इत्यादी सबबी सांगणार्‍या बाबांना हा सिनेमा बघायला लागणार म्हणून मुलगी फुल्ल आनंदात.

सिनेमाच्या सुरुवातीलाच 'चारचौघांचा' इन्ट्रो. शाहरुख; त्याच्या गळ्यावरल्‍या सुरकुत्य़ांशी स्पर्धा करणारे पोटावरले पॅक्स, त्याची दर्दभरी कहानी. त्याला बदला घ्यायचाय वैगेरे. आईला कोणी काही म्हटलं की चवताळणारा सोनू सुद. ज्याच्या पाठीमागे बायका लागतात (कश्यासाठी आणि काय बघून देव जाणे) असा बोमनबाळ . आणि "भारि" हॅकिंग करणारा विवान आणि केव्हाही ओकू शकणारा (काय झेप आहे प्रतिभेची !!!!) नंदू म्हणजे अभिषेक. हे सगळॆ नाचर्‍या दिपीकाला बरोबर घेऊन वर्ल्ड डान्स कॉम्पिटीशन मध्ये भाग घेतात. कशाला म्हणजे काय? हिरे चोरायला. हिरे कशाला चोरायचे? अरे, बदला घ्यायला. मग चोरीचा आळ ज्या़चा बदला घ्यायचाय त्याच्यावर घालणार नाही का? एवढं कळत नाही. अर्थातच ते यशस्वी होतातच. हिरे चोरण्यात, बदला घेण्यात आणि डान्स्मध्ये नंबर काढण्यात देखील . नाचाचे शेंगदाणॆ, रोमान्सचे काजू, आचरटपणाचे खोबरे इत्यादी घालून केलेला हा जुनाट पोह्यांचा चामट चित्रपट-चिवडा आम्ही तीन तास खर्चून बघितला एकदाचा.

दुसरा दिवस आमटेंचा. "मस्तय, बघाच एकदा. मुलीलाही दाखवा " इत्यादी सल्ले आमच्यासारखेच अनेकांनी प्रामाणिकपणे ऐकले असावेत. कारण " पाचचा शो फुल, दहाची फक्त स्टॉल उपलब्ध. " सिनेमाची सुरूवात आशादायक वाटली. निसर्गचित्रण सुखद. नाना पाटेकर- सोनाली कुलकर्णी सारखे अभिनेते. पण जसं जसा सिनेमा पुढे सरकू लागला तसं लक्षात आलं या दिवाळीत आज हा दुसरा चित्रपट चिवडा आपल्या वाट्याला आलाय. सिनेमा आहे की डॉक्युमेंटरी अशी शंका येण्यासारखी निवेदनातून उलगडणारी कथा. निवेदनाचं स्वातंत्र्य घेऊनही "लाल सलाम वाले कोण?" "डॉंक्टरांनी जंगली जनावरे का पाळलीत? " इत्यादी प्रश्नांची उत्तरं ज्यांना माहित नाही त्यांना देण्यात हा सिनेमा सपशेल फसला आहे . मुदलात हा सिनेमाच फसलेला आहे.आदल्या दिवशीच्या चित्रपटात हिरे चोरायचं काम जेवढ्या सहज झालं होतं, तेवढ्याच सुलभतेने इथे डॉक्टर हेमलकसा वसवताना दिसत होते. किंबहुना कष्ट, हिंमत, संकटं, जिद्द, चिकाटी हे गुण दाखवणार्‍या कुठल्याही प्रसंगाचा प्रभाव पडावा असा विचारच केलेला नाही. चित्रपट संपतानाही तो "हे काय ? संपला? नक्की काय झालं? काय केलं त्यांनी? " हे प्रश्न कोणालाही पडावेत. मुळात बक्षिस मिळावं ही काही या लोकांच्या कामाची प्रेरणा नव्हे मग हे असे सिनेमा सुरुवातीला आणि शेवटालाही फक्त बक्षिसाचीच भाषा करत असतील तर बोध काय घ्यायचा? स्क्रीन्प्ले, पटकथा, संवाद , दिग्दर्शन अ्श्या अनेक जबाबदार्‍यांचं शिवधनुष्य ज्या बाईंनी उचललय. ते न झेपल्यांनं चित्रपट पार झोपलाय. चित्रभाषा म्हणून सिनेमाशी संबधीत काही भाषा असते. तिचा जराही अभ्यास न करता केवळ विषयावर चित्रपटाला चांगलं म्हणावं लागतं. "हरिच्चंद्राची फॅक्टरी" याचा विनोदाचा बाज असूनही फाळकेंनी केलेले कष्ट मनाला भिड्तात. सिंधुताई सपकाळांनी आपल्या वाटेला आलेल्या क्लेशांचं करुणेत कसं रुपांतर केलं हे बघताना जीव कासाविस होतो. इथे मात्र विनोदी प्रसंग म्ह्णून जे होतं त्याला हसू येत नव्ह्तं की आमटे-दांपत्याचे कष्ट मनाला भिडत नव्ह्ते. सुखद निसर्ग ही एकमेव जमेची बाजू पण तो सिनेमाला मारक ठरलेला. कारण त्यामुळे डॉक्टरांचं डोंगराएवढं काम लुटुपुटूचं वाट्तय.त्यांना मंदाताईंनी दिलेली खंबीर साथ कुठेच दिसत नाही. एखादं वाक्यं बस्स. निसर्गातील भयावहता, त्यावर अवलंबून असणार्‍यां आणि ते अवलंबन नाकारणार्‍या शहरीकरणामध्ये पिचलेला आदिवासी चित्रपटाच्या चकचकाटात हरवून गेलाय. चित्रपटाला तरुण वर्ग भरपूर दिसत होता . अगदी ग्रुप्सही आलेले. "खाउन रस्त्यावर रॅपर टाकणे, सिग्नलला न थांबणे, बस कंडक्टर तिकीट विचारतोय तरी भान हरपून फेसबूक,गेम नाहीतर गाण्यात मग्न रहाणे " अश्या ‘मॅनर्स’ असणारा, आदिवासींना नाचातच पाहिलेला हा वर्ग या सिनेमाकडून कुठली सामाजिक जाणिव आणि ती कशी शिकले असतील ह्याचंच मला जाम कुतुहल वाटतंय. पडद्यावर काय चाललय ते आणि आपण ही पूर्ण दोन वेगवेगळी विश्व आहेत असं वाटायला लावणारा हा सिनेमा. एका महान कार्याचे मूळ पोहे, नको त्या माल मसाल्यात हरवून बसलेला हा या दिवाळीतला दुसरा चित्रपट-चिवडा .

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

चिवड्यांचे परीक्षण आवडले.
मला ओशांओ खरोखरच फार आवडलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला म्हणजे फराळ उत्तम झाला तर! Wink

लेखन प्रचंड आवडले, त्यातही "काय झेप आहे प्रतिभेची!!" ला फुटलो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन्ही चिवडे आवडले! अजून लिहा हो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रकाश आमटे हा चित्रपट अतिशय आवडला, न आवडन्याचे मुद्दे फारसे पटत नाहीत,दोन अडिच तासासाठी अजुन कशी स॑हिता लिहता येइल ?

काही चा॑गले पर्याय असतिल तर नक्कीच ऐकयला अवडेल !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ह्याप्पी न्यू इयर - फराह खान, शिरिष कुंदर, (त्याचा + इन जनरल) साला साजिद खान ह्यांना कधीही पैसे न दिल्याची प्रतिज्ञा केल्यामुळे हा चित्रपट पाहीन असं वाटत नाही. पण भा.पो. तुमच्या दु:खात सहभागी आहे. अभिषेक बच्चनच्या नैसर्गिक खुबीचा वापर कौशल्याने करून घेतलाय असं दिसतंय! विवानला बहुतेक बाबांनी सांगितलं असावं- सात खून माफ वगैरे ठीक आहे, पण आता तू तुझं कमाव. मी तुला पोसणार नाही.

@प्रकाश आमटे- चिक्क्क्क्कार कवतिक झालेलं आहे सिनेमाचं. बरेच जण भारावून बाहेर पडतात आणि फेबुवर्,व्हॉट्सअ‍ॅपवर कूल प्वाईंटस मिळवतात. काय कल्पना नाही- पण पोरेताईंचा पहिला चित्रपट "मला आई व्हायचंय" पाहिलाय मी थोडा, त्यामुळे एक चित्रपट म्हणून अपेक्षा मिनिमल आहेत. ट्रेलरही तसा भिशक्यावच होता. आता वाट पहातोय.. कधी बघायला मिळेल...
बाकी

चित्रभाषा म्हणून सिनेमाशी संबधीत काही भाषा असते. तिचा जराही अभ्यास न करता केवळ विषयावर चित्रपटाला चांगलं म्हणावं लागतं.

हे एवढ्या कमी शब्दांत अचूक मांडलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0