खिसा

दोन बटणाने सावरलेला सदरा.
शाईचे आणि मातीचे डाग.
ओझ्याने ओघळलेला,
कड उसवलेला खिसा.
आणि खिशात,
न सामावणारा खजिना . . .

खडूने भरलेले हात.
एक नाक पुसायला,
दुसरा चड्डी सावरायला.
मळलेली चड्डी
आणखीन खाली ओढणारा
तुडुंब खिसा.
आणि खिशात,
न सामावणारा खजिना . . .

भोवर्याच्या अरीने
खिशाला पडलेलं भोक.
अर्धी खिशात आणि
अर्धी बाहेर लोंबणारी दोरी.
ओल्या मातीचा वास लागलेल्या गोटया.
दांडू खिशात ठेवायची सोय नाही
म्हणून फक्त विट्टी.
खेळून खेळून फुटलेली आंब्याची कोय.
छापा काटा करायला एखादं नाणं.
भिंगरी सोबत
दोन गोट्या, भोवर्याची दोरी, चार चिंचोके
बाहेर काढणारा
गोंधळलेला खिसा.
आणि खिशात,
न मावणारा खजिना . . .

शाई पिऊन निळा झालेला खडू.
न उमटणार्या तेलकट खडूचे तुकडे.
मांडीला टोचणारा कर्कटक.
पेन्सिल, रबर, गळक्या पेनची निब.
चुरगळून बोळा झालेली प्रश्न पत्रिका.
कागद जाळणारे भिंग.
दोन टाचण्या चिकटलेल चुंबक.
उगाचच
अभ्यास करतोय
असं दाखवणारा खिसा.
आणि खिशात,
न सामावणारा खजिना . . .

वाकडे तिकडे चिंचांचे आकडे
अर्धी कच्ची बोरं
भाजलेल्या शेंगांचा खरपूस वास
वाटून खाल्लेली लिमलेट ची गोळी,
सगळ्या खिशाचा मळ
पुसून घेतलेला पेरू
तळाला,
टरफल, बिया, चिंचोके, फुटाण्याची सालं.
वर्ग सुरु असताना
आवश्यक रसद
पुरवणारा खिसा.
आणि खिशात,
न संपणारा खजिना . . .

गोट्या खेळताना भांडण,
'मातीत लोळ्वेन तरच खरा'
मनोमन घेतलेली शपथ.
देवा सगळ्यात जास्त चिंचा
माझ्याच कडे असुदेत.
झाडाच्या शेंड्याचा पेरू,
कोणा-कोणाला दिसू नये.
एकदा तरी विट्टी
टाकल्या मास्तरच्या
डोक्यात बसावी.
प्रगती पुस्तकावर
पोरांचीच सही असावी.
स्वतःची शाळा काढून परीक्षाच,
बंद करणार.
सगळे तास खेळाचे असणार.
वस्तूं सोबत
स्वप्न पण घट्ट जपणारा खिसा.
आणि खिशात,
न सामावणारा खजिना . . .

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

चांगले स्मरणरंजन
मात्र कविता पाल्हाळिक झालीये. इतकी लांबवली नसती तर अधिक प्रभाव पडला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता तिच्या लांबीसहित आवडली. दोन ओळीत शिवाजीचा सारा इतिहास आटोपणा-या हरणटोळ दामले मास्तरांच्या अवतारांकडे (ते संपादक असले तरी) दुर्लक्ष करा..

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली. या खिशाचं रूपक बालपणाच्या आठवणींशी निगडित असलं तरीही ते व्यापक आहे. तारुण्य, आठवणी, प्रेम, नातेसंबंध... या सगळ्याच आयुष्याच्या पैलूंना हा फाटका खिसा सामावून घेतो. अजून अशाच सकस कविता येऊद्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खिशातला हात थेट बालपणात च पोचला की , आठवणींचा कर्कटक टोचु लागला तुमची कविता वाचुन
अप्रतिम कविता
नितळ पाण्यासारखी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आठवणींचा कर्कटक' हा शब्दप्रयोग विशेष आवडला. कवितेबद्दलही सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस..

बादवे वुई शुड नॉट अन्डरएस्टिमेट कर्कटक.. पाऊण इंच जाड डेस्कच्या लाकडाला आरपार भोक पाडण्याची शक्ती त्यात आहे. भले त्यासाठी पूर्ण शैक्षणिक वर्ष का लागेना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हळवं केलंत गवि. आता घरी गेल्यावर शाळेत जाऊन ती बाकडी पाहणे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त आहे कविता. आवडली. गवि म्हणतात त्याप्रमाणे पूर्ण लांबीसकट Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह!!! दर्जेदार कविता....
बालपण डोळ्यासमोर उभ राहीलं. अजून येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0