समोर हिरवंगार जंगल

(पूर्वप्रकाशित)

कोण चूक कोण बरोबर काय न्याय काय अन्याय कसले हिशेब कसले जाब कसले जबाब -
दे सगळे हलकेच सोडून
नि पाहा समोर पसरलाय अथांग वैराण प्रदेश
दगडधोंड्यांचा नि उन्हातान्हाचा
नि सपाट उजाड माळरानांचा
नि लालबुंद सोनेरी सूर्यास्तांचा
आपल्यासाठी -
एकेकट्या असलेल्या आपल्यासाठी.
छातीत दाटून गच्च झालेला तो भीतीचा नि दुःखाचा हुंदका हळूहळू -
अगदी हळूहळू सैल करत ने,
पाहा,
माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना
की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता,
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.
त्या सगळ्या प्रश्नांना सापडू देत अजून काही प्रश्न,
मग निघून जातील ते एकमेकांच्या सोबतीनं इथेच कुठेतरी.
मग आपण उरू
आणि हे सारं उरेलच तरीही.
एकटे असू आपण दुकटे असूनही.
पण आता संध्याकाळीतली हुरहूर जाईल निवून.
हातात एक घामेजलेला हात असेल
आणि समोर हिरवंगार जंगल.

field_vote: 
3.833335
Your rating: None Average: 3.8 (6 votes)

प्रतिक्रिया

भारी आहेस गं तू..

खूप भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्टेन्स अन मनस्वी आहेस. लिहीत जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली. हिरव्यागार गवतावर रक्त सांडण्यातली निरर्थकता जाणवते. घाव भरून येतील, गवत कात टाकेल, आणि पुन्हा हिरवाई भरून राहील अशी आशा करायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा! सुंदरच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अथांग वैराण प्रदेश आणि हिरवगांर जंगल या कॉन्ट्रास्ट प्रतिमांचा कुशल कलात्मक वापर करुन दर्शवलेली बदलत जाणारी मनस्थिती आवडली.
इथे जिवलगा ची उपस्थिती कल्पिलेली आहे की तो आहे प्रत्यक्षात ते काही कळलं नाही मात्र
कविता सुंदर आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुमच्या भावना समजू शकणार्‍याची सोबत असेल तर समोरचं वैराण वाळवंट हिरवंगार भासू लागतं. मस्तय कविता.

इन्टेन्स अन मनस्वी आहेस. लिहीत जा.

असंच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दे सगळे हलकेच सोडून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एका वाचनात काहीच झेपलं नाही :-(. परतपरत वाचतेय. कळेल कधीतरी बहुतेक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना
की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता,
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.

हा भाग आवडला. लई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0