पिशी मावशीची निवडणूक

ढण् ढण् ढण् ढण् टण् टण् टण् टण्
निवडणुका त्या जाहिर झाल्या
उमदे घोडे दूर पळाले
खेचरांस अन् किमती आल्या ||1||

दिसते कोठे ‘रक्त’ ‘स्थिरावे’
दिसते कोठे ‘रक्त’ ‘दुरावे’
कुणास ये धर्माचा पुळका
कुणी ‘ जात तर दुय्यम ’ शिकवे ||2||

स्मरण कुणा होई प्रगतीचे
झाले नाही जे जे त्याचे
येत्या खेपी करुन दावतो
ढोल वाजवुन म्हणती सांचे ||3||

हापिसांतुनी पक्षांच्या त्या
फड कुस्त्यांचे रंगु लागले
‘फड’ वालीच्या केसांनी अन्
प्रतिस्पर्ध्यांचे गळे कापले ||4||

खुर्चीवर बसता जनतेची
वस्त्रे ‘जी जी’ फेडुन नेली
त्यातिल वाटुन थोडी थोडी
सभ्यपणाची शाल ओढली ||5||

तालुक्यास मग पिशिही गेली
छद्मवेष तो धारण करुनी
अर्ज भरुन तो उमेद्वारिचा
परतुन आली मनी खिदळुनी ||6||

आज भि माडी, कल भी माडी
मत द्या देइन रोजच माडी
दुसरा म्हणतो ‘उंची’ देइन
तिजा देइ नोटांची गड्डी ||7||

बाइक रॅली, वरती झेंडे
उडवित धुरळा गाड्या फिरती
असह्य त्यांचे भोंगे ऐकुन
काही बुढ्ढे गप्कन् मरती ||8||

गदारोळि त्या नाही दिसले
पिशिचे कोणी चमचे चेले
हरेक गावी स्मशानावरी
पिशिचे पोस्टर मात्र झळकले ||9||

गावोगावी सभा जाहल्या
बहु पक्षांच्या ‘बहू’पक्षांच्या
मात्र पिशीचा ‘पडका वाडा’
व्यथा ऐकतो वनवाशांच्या ||10||

मतदानाचा दिवस उगवला
देवदर्शना नास्तिक गेले
अव्वल सारे कामचुकारहि
कार्यकलापीं नितांत रमले ||11||

पहाटेपासुन रात्र होइतो
आणि वेठिला धरले शिक्षक
सरकाराचे जणू मजुर ते
त्यांचे कोणा सोयर सूतक? ||12||

उनें तापली ओस बूथ ते
उमेद्वारही पार हबकले
ट्रक अनेक भाड्याने घेउन
चेले चमचे सुसाट सुटले ||13||

मते द्यावया किती आणले
मरणासन्नहि गरिब बिचारे
कुणी भुकेले आठ दिसांचे
ते तर नोटच चघळत आले ||14||

‘मशिन’बंद ती नशिबे झाली
महापूर चर्चांचे आले
निवडणूक कोणीही जिंको
गब्बर झाले चॅनलवाले ||15||

मोजणिचा तो दिवस उगवला
अवघ्यांचा उत्साह शिगेला
तालुक्यात पण इये पिशीच्या
गहजब झाला गहजब झाला ||16||

मतदान पंच्याण्णव टक्के
मते बहात्तर प्रत्येकाला
बाकी सगळी मते खाउनी
‘पडका वाडा’ निवडुन आला ||17||

मिरवणूक मग तिची निघाली
अवती भवती चॅनल वाले
‘मंत्राहुनही यंत्र भयङ्कर’
पिशिने एकच उत्तर रटले ||18||

हर्ष स. परचुरे (अविचारी)
hsparchure@gmail.com

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान! आवडली.
ऐसीवर आणि मराठी आंतरजालावर स्वागत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे टॅग करणे हा फंडा नाही दिसतेय.
काही जणांना सांगायचं झाल्यास मेसेज करायचा का ?
की आणखी काही मार्ग आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

व्यक्तिगत निरोप पाठवायचा. नाहीतर त्या माणसाच्या खरडवहीत जाऊन खरडायचं. खरडवही सगळे जण पाहू शकतात बरं का पण. व्यनि फक्त त्यात अंतर्भूत असलेल्या लोकांनाच मिळतो. इथे टॅगिंग नाही अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद मेघना ...
सरावेन थोड्या दिवसात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

आवडली. समर्पक आहे.

खुर्चीवर बसता जनतेची
वस्त्रे ‘जी जी’ फेडुन नेली
त्यातिल वाटुन थोडी थोडी
सभ्यपणाची शाल ओढली

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. ऐसीवर स्वागत!

अवांतर: अनुस्वाराजागी अनुनासिक वापरणे हा कोण्या विशिष्ट शाळेचा संस्कार दिसतो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा हा
मी शाळेत गेलो हे शाळेचे नशीब ...
बाकी संस्कार बिंस्कार कुछ नही.
मी अविचारी आहे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

स्वागत देवा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

व्वा! पहिल्या चेंडूवर षट्कार!

खुर्चीवर बसता जनतेची
वस्त्रे ‘जी जी’ फेडुन नेली
त्यातिल वाटुन थोडी थोडी
सभ्यपणाची शाल ओढली

वगैरे मस्तच

लिहिते झाल्यावर पुन्हा एकदा ऐसीवर स्वागत करतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते कडवं दोघांना विशेष आवडलेलं दिसतंय !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

जबर्‍या प्रकार आहे. एकूणच पिशीमावशी अन तिने 'स्पॉनवलेल्या' अवतारांमध्ये वेगळीच मज्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मतदानाचा दिवस उगवला
देवदर्शना नास्तिक गेले

मस्त.

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'विक्षिप्त धन्यवादां'चा स्वीकार व्हावा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

झक्कास. सायबा, शॉल्लिड चीज बनवलियेत ही.

... ‘पडका वाडा’
व्यथा ऐकतो वनवाशांच्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.