छंदमुक्त

एका कवड्याच्या
मानगुटीवर बसलेल्या छंदमुक्त पिशाच्चाच्या
पांढर्‍या निळ्या बारिकशा
लांब लचक शेपटीच्या
शेवटी
काव्याच्या निपचित पडलेल्या देहावर
राहतो केवळ बिभत्स रस !

कवीच्या आणि घटनेच्या शृंगारातून
होते सुरवात प्रत्येक काव्याची
तरी त्याचा शेवट मात्र हाच !

आणि तो शेवट होतो सुरवातीलाच !

काव्य लिहून संपताच
पडतो बाहेर त्‍यातून कवीने ओतलेला प्राण
आणि सुटतो पछाडत ज्याला त्याला जिला तिला
वाचू म्हणणार्‍या प्रत्येकाला.

जातातही झपाटले हे वाचक काही वेळासाठी
आणि मग त्या भुताला टाकून एकटे
स्वतःचे अस्तित्व कुरवाळीत
अध्ये मध्ये त्या काव्याचे श्राद्ध घालून
त्याची भाजणीवडापार्टी करीत

बसतात खिदळत दाखवून
व्यंजनांचे दात
मिसळत स्वरांची लाळ
आणि
मांडत यमका-मात्रांची गणिते.

तसेच राहते हे भूत झपाटत
वर्षानुवर्षे
अभ्यासकांना ...
पण कवी ती कविता प्रसवून कधीच
सिद्ध झालेला असतो,
पुढल्या काव्यप्रणयासाठी !

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सॉलिड!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!