आनंद विरुद्ध कार्लसन - डाव २

पहिला डाव बरोबरीत सुटला. दुसऱ्या डावात काय होतं पाहूया.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डावाची सुरूवात कार्लसनने रुय लोपेझ ओपनिंगने केली. ही अत्यंत आकर्षक सुरूवात आहे. वरच्या व्हिडियोत त्याविषयी चर्चा झालेली आहेच. काळ्याची वजीराच्या बाजूची प्यादी काहीशी आडनिडी होतात. त्यावर उपाय म्हणून आणि घोड्याला थोडी मोकळीक मिळण्यासाठी आनंदने उंट मागेे घेतला. कार्लसनने ए४ प्यादं पुढे करून त्या उंटावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आनंदला ए५ खेळण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. उंटाचा काटा काढण्यासाठी कार्लसेनने घोडा-उंट अशी अदलाबदल केली. आणि काळ्याचा वजीराच्या बाजूच्या तीन प्याद्यांचा तिढा सुटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेराव्या खेळीनंतर दोघांचीही आपापल्या बाजूंनी आक्रमण करण्याची सुरूवात झाली. आनंदने वजीर सी७ वर आणून ठेवला. त्याच्या तीन प्याद्यांच्या फळीला जोर देण्यासाठी, आणि त्याचवेळी पांढऱ्या राजाच्या जवळ एच२ वर नेम धरण्यासाठी. कार्लसेनने डावीकडचा हत्ती वर आणला, आणि उजव्या बाजूला आणण्याची तयारी केली. कार्लसेन आक्रमणासाठी अधिक तयार आहे, आणि आनंदचं आक्रमण तयार होईल असं वाटत नाही. कार्लसेन आपला घोडा आणि वजीर एच फाइलमध्ये आणून ठेवणार, आणि हत्ती जी फाइलमध्ये आणून ठेवणार हे उघड आहे. बचावासाठी आनंदकडे घोडा वजीर आहेत, आणि हत्ती ७ व्या ओळीत आणण्याची तयारी आहे. पंधराव्या खेळीत मधल्या प्याद्यांची अदलाबदल करून कार्लसेनने आपले सगळे मार्ग खुले करून घेतले. आनंदच्या आक्रमणाचा मार्ग मात्र त्याच्याच इ५ प्याद्यामुळे अकडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकोणिसाव्या खेळीपर्यंत कार्लसेनने आपला इरादा स्पष्ट केला आहे. हत्ती, घोडा, आणि वजीर काळ्या राजाच्या किल्ल्यासमोर आणून ठेवलेले आहेत. आपल्या जागेवरून उंटही आता बीएच६ खेळीनंतर हल्ल्यात भाग घेऊ शकतो. विसावी खेळी एच४ - प्यादं पुढे करून तिकडे सैन्यबळ वाढवलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की आनंद आपल्या तटबंदीचं रक्षण करू शकेल का? आनंदला अर्थातच त्याबद्दल आत्मविश्वास वाटतोय. त्याच्याकडे बचावासाठी दोन हत्ती एक घोडा, एक उंट आहेत. त्यामुळे चिंतेची बाब नाही. मात्र या आक्रमण बचावाचा धुरळा खाली बसेल तेव्हा कोणाची स्थिती बळकट असेल, हे अजून स्पष्ट नाही. आत्ता तरी कार्लसनचं पारडं किंचित जड वाटतं. कारण त्याचे दोन्ही हत्ती आणि वजीर मोकळे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसाव्या खेळीपासून या बचावासाठीचं युद्ध सुरू झालं. काळा उंट व पांढरा घोडा बाहेर पडले. नंतर आनंदने आपला घोडा एफ४ सारख्या मोक्याच्या ठिकाणी ठेवत वजीरावर हल्ला केला. यावर अर्थातच कार्लसेनला उंटाने तो मारून प्याद्याकडून उंट गमावण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा रीतीने काळ्या राजावरचा हल्ला परतवलेला आहे. मात्र आनंदचं एक प्यादं एफ ४ वरती ताटकळत आहे. तसंच कार्लसनचं एक प्यादंही एफ५ वर आहे. ही दोन प्यादी तशी गेल्यातच जमा आहेत. पण यापुढचा खेळ प्रत्येकी दोन हत्ती आणि वजीर यांच्या सहाय्याने एकमेकांची प्यादी काबीज करण्याचा आहे. तेव्हा पहिला हल्ला आणि बचाव या प्याद्यांचा होईल. आपल्या तीन मोहऱ्यांचा वापर करून राजावर हल्ला यशस्वी करत दुसऱ्याला प्याद्यांपेक्षा राजाच्या बचावावर लक्ष केंद्रित करायला लावणं असा प्रयत्न दोघांचाही असेल. २९ व्या खेळीत कार्लसेनने आपले तीनही मोहरे एका कॉलममध्ये आणून ठेवले आहेत. अशी रचना समोरच्यासाठी कायमच धोकादायक असते. तेव्हा आनंद ही फळी कशी फोडतो हे पहायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंत तुल्यबळ असलेला, कदाचित कार्लसेनला किंचित अॅडव्हांटेज असलेला डाव एका प्रचंड चुकीच्या खेळीने आनंदने गमावला! एकदा पांढरा वजीर आणि हत्ती सातव्या आडव्या पट्टीत आले की त्यांना थांबवणं अशक्य होतं. तेव्हा आपला वजीर डी२ वर आणून पांढऱ्याचं एफ२ प्यादं खाण्याची भीती दाखवत पांढऱ्या वजीराला मागे रोखणं हा एकच पर्याय होता. एच५ ही मूव्ह काहीच साध्य करत नव्हती. इतक्या जवळ प्राणघातक आक्रमण आलेलं आहे हे न दिसणं आनंदसाठी फारच दुर्दैवी आहे.

पहिल्या दोन्ही डावांत कार्लसेनचा खेळ सरस होत असल्याचं दिसलेलं आहे. काळे घेऊनही आक्रमण करत शेवटी पांढऱ्या सोंगट्या असलेल्या आनंदला ड्रॉ शोधावी लागणं आणि या खेळात सतत खेळाचा ओघ आपल्या ताब्यात ठेवणं या दोन्हीतून कार्लसेनने आपली शक्ती दाखवली आहे. आज आनंदचा खेळ या शेवटच्या खेळीपर्यंत चांगला झालेला होता. हा खेळ पुन्हा कार्लसेनच्या बाजूला किंचित झुकलेला असला तरी ड्रॉ होणं अशक्य नव्हतं. अंतिम खेळात एका ड्रॉऐवजी एक विजय मिळवणं हा निर्णायक फरक ठरू शकतो. आनंदच्या हातून अशा चुका झाल्या तर परिस्थिती बिकट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा पॅटर्न पूर्वीही पाहिलेला आहे. मद्रासमधल्या चॅँपियनशिपच्या वेळीही निर्णायक डावात एक ढळढळीत चूक करून आनंद हरला होता. पण हरकत नाही. सध्या 'ऐअ'वर चाललेला राष्ट्रवादाचा निषेध वाचून माझं हृदयपरिवर्तन झालेलं आहे, त्यामुळे मी कार्लसनच्या पक्षात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ग्रॅन्डमास्तर अलेक्झान्डर ग्रिश्चुकचा अत्यंत मार्मिक शेरा -

I believe this match will be more interesting than in Chennai. I am totally not convinced that Anand’s A-game is inferior to Carlsen’s A-game, but obviously Carlsen plays his A-game much more often. Therefore in this match a lot more depends on Anand than on Carlsen. If Anand plays his best chess, it may become one of the best matches in the history of chess, close to the second Kasparov-Karpov match at least.

— Aleksander Grischuk

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0