कल्पनेतल्या डोक्याच्या दह्याने ... - भाषेची दौर्बल्ये

कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल.

----------------------------
हे वाक्य दिडेक वर्षापासून ऋषिकेशच्या सहीत रोज दिसते. या वाक्याचा साहित्यिक अर्थ तज्ञांना स्पष्ट आहेच. पण इथे ते उदाहरण घेऊन भाषेची दौर्बल्ये मांडत आहे. (माझ्या स्वतःच्या लेखनातही भाषेची अनेक दौर्बल्ये आहेत/असणारच. पण विषय तो नाही.)
---------------------------
पायरी १: "कल्पनेतल्या" म्हणणे चूक आहे. कल्पना एक संकल्पना आहे नि तिला मिती (म्हणून आत / बाहेर असे प्रकार )नसतात. परंतु रिलेशन असते. तेव्हा कल्पनेच्या असे म्हणायला पाहिजे. (भाषेत षष्ठी विभक्ती फक्त संबंध दाखवते म्हणून ती अचूकपणे बिनधोक वापरता येते. कारण आपल्याला वस्तूंमधे कोणता तरी एक संबंध आहे इतकेच सांगायचे आहे तेव्हा ही विभक्ती सेफ आहे.)

पायरी २: धूपदीप हा धूप आणि दीप असा द्वंद्व समास आहे. पण धूपदीपांनी म्हणतात १. धूपाने नि दीपाने कि २. धूपाने नि दीपांनी कि ३. धूपांनी नि दीपाने कि ४. धूपांनी नि दीपांनी पैकी नक्की काय हे ठामपणे सांगता येत नाही. म्हणून ते वेगवेगळे लिहिलेले बरे.

पायरी ३: आता "कल्पनेच्या धूपांनी आणि दीपांनी" (समजा दोहोंचे अनेकवचन असे अपेक्षित आहे) म्हटले. पण इथे दीप हे कल्पनेतले आहेत कि कोठले तरी वेगळे, बाहेरचे, कल्पनेचा संबंध असलेले कि नसलेले हे कळत नाही. म्हणून कल्पनेच्या शब्द दोनदा लिहायला लागेल. आता "कल्पनेच्या धूपांनी आणि कल्पनेच्या दीपांनी" असे म्हणू.

पायरी ४: १. कल्पनेच्या धूपांनी आणि २. कल्पनेच्या दीपांनी मधे "आणि" चा वापर संदिग्ध आहे. देव नक्की केव्हा खुष होतो? दोहोंनी सवत्यासवत्याने कि दोघे एकत्र असताना यापैकी एक ठाम अर्थ काढता येत नाही. म्हणून सुधारून "कल्पनेच्या धूपांनी आणि कल्पनेच्या दीपांनी या दोहोंनी एकत्र" असे करू.

पायरी ५: पुलंचे हे वाक्य वाचताना सबब "खुष होण्याची कल्पना (प्रक्रिया नव्हे)" देवाचीच का, त्याच्याच स्वतःच्या डोक्यातली का असे मधे मधे वाटते. त्यामुळे तिथे "मनुष्याची कल्पना" असे लिहिणे गरजेचे आहे. मग ते "मनुष्याच्या कल्पनेच्या धूपांनी आणि मनुष्याच्या कल्पनेच्या दीपांनी या दोहोंनी एकत्र" असे होईल. पण "मनुष्याच्या कल्पनेचा धूप" कि "मनुष्याच्या धूपाची कल्पना"? बहुतेक "मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना" याचा अर्थ व्यवस्थित होतो.

पायरी ६: "कल्पनेतल्या धूपदीपांनी" म्हणताना १. देवाला धूपदीप प्राप्त झाल्यावर किंवा २. माणसाच्या मनात केवळ त्यांची कल्पना आहे म्हणून असे दोन अर्थ होतात. नक्की काय ते शेवटपर्यंत कळत नाही. आपण प्राप्त होणे गृहित धरू.

ती कल्पना पोरगी आहे कि संकल्पना हे देखिल नीट स्पष्ट व्हायला हवे. म्हणून आपण "मनाचे" हा शब्द घालू. (पुलंना मनोबा माहित असायची शक्यता न के बराबर.).मग ते वाक्य असे दिसते:

जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर ...

किंबहुना मूळ वाक्यातील कल्पना हा शब्द, जो त्या वाक्याचे क्रक्स/सौंदर्य आहे, तो रिडंडंट वाटत आहे. कारण त्याचा काही अर्थ निघत नाहीय. "धूप आणि दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर ..." इतकेच अर्थपूर्ण आहे.

पायरी ७: पुढे "कल्पनेतील सज्जनपणा"बद्दल. आतापर्यंत येथल्या सार्‍या कल्पना ज्या मनुष्याच्या संदर्भात हे वाक्य आहे त्या मनुष्याच्या आहेत. पण तो सज्जनपणा हा मोठा लोचा आहे. १. इतरांच्या कल्पनेतील मनुष्याचा सज्जनपणा २. मनुष्याच्या कल्पनेतील इतरांचा सज्जनपणा ३. कोणाच्याही कल्पनेतला कोणाचाही कोणताही सज्जनपणा असे त्याचे तीन अर्थ निघू शकतात.

मग ते वाक्य असे दिसते:

जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर अशा मनुष्याच्या मनाच्या इतरांच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे त्याने तृप्त राहायला काय हरकत आहे?

पायरी ८: प्रक्रिया अ (धूपदीप मिळणे) मुळे ब (देव) स्थिती क (खूष) मधे जात असेल तर प्रक्रिया ड (इतरांचा काल्पनिक सज्जनपणा) मुळे ई (मनुष्य) स्थित फ (तृप्तता) मधे जायला पाहिजे असे अजब लॉजिक इथे आहे. कशाचा कशाला अर्थाअर्थी संबंध नाही. पण त्याचा नी भाषेचा संबंध नाही.

पायरी ९: हा प्रश्न आहे कि हरकत नसावी असा विचार आहे हे कळत नाही.

पायरी १०: यात मनुष्य शब्द तीनदा आणि कल्पना हा शब्द पुन्हा तीनदा आला आहे. इथे तिन्ही ठिकाणी तोच मनुष्य अभिप्रेत आहे, जेव्हा कि तिन्ही ठिकाणी कल्पना हा शब्द वेगवेगळ्या कल्पनांना आहे. प्रत्येक वेळी आलेला हा मनुष्य तोच आहे हे निसंदिग्धपणे कसे सांगावे?

या पायर्‍या बर्‍याच पुढे नेता येतील पण सध्याला असो.

-------------------------
तर (या सगळ्या पायर्‍या टाळून, इफ अप्लिकेबल) तुम्ही इथे आलेले आहातच तर खालचे दोन गंमतशीर खेळ खेळू:
१. पुलंचे वाक्य तोच आणि एकच आशय देत अचूक शब्दांत मांडणे. त्याचे दोन किंवा जास्त अर्थ निघाले नाही पाहिजेत.
२. मूळ वाक्याचे (नको ते) शक्य तितके अर्थ काढणे.

field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (8 votes)

प्रतिक्रिया

अजो, तुम्हांला गोडेलियन लॉजिक लय आवडेल अशी खात्री झालीय हा लेख वाचून. त्यात शब्दाच्या अर्थाचा इतक्या खोलवर कीस पाडलाय की हा कंडु नक्की शमेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे
कल्पनेतल्या विद्या बालन ने
कल्पनेतल्या सनी लियोन ने
कल्पनेतल्या पापलेटाने
कल्पनेतल्या घासलेटाने
कल्पनेतल्या मदिरेने
कल्पनेतल्या चखण्याने
कल्पनेतल्या गायनाने
कल्पनेतल्या वादनाने
कल्पनेतल्या चाय ने
कल्पनेतल्या हाफ फ्राय ने
कल्पनेतल्या नोबेल ने
कल्पनेतल्या पुलित्झर ने
कल्प्नेतल्या विडंबनाने
कल्पनेतला कवितेने
कल्पनेतल्या डिग्रीने
कल्पनेतल्या भिंगरी ने
कल्पनेतल्या नोकरी ने
कल्पनेतल्या छोकरी ने
कल्पनेतल्या हिंदुत्वाने
कल्पनेतल्या राष्ट्रवादाने
कल्पनेतल्या च आय डि ने
कल्पनेतल्या च स्वाक्षरी ने
कल्पनेतल्या अनंत बोगद्या ने
कल्पनेतल्या च खोदकामाने

माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पनेतल्या धूपदीपांनी......

पण ही दीपा कोण ते कळलं नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या अल्ला, मार डाल.
अजो.. काय हे? मम वाचकाचे दौर्बल्य...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0