धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १

आजवर कामाच्या स्वरूपामुळे अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. अजूनही येतच आहे, पायाला चक्र लागलंय कधी थांबणार माहिती नाही. ताकद आहे तोवर फिरतोय, घरट्याची ओढ वाढलीये, भरारीची झेपही. नवीन मुलूख बघतोय, अनवट वाटा शोधतोय, नवीन माणसं धुंडाळतोय. चालूच आहे माझा शोध आणि ‘माझा’ शोध.

माझे सगळे प्रवास तसे लहानसे असतात, दहा-पंधरा-वीस दिवस फारतर एक महिना. आतापर्यंतची सगळी भ्रमंती, सगळे प्रदेश तसे नेहेमीच्या पठडीबाहेरचे, इंग्लंड अमेरिकेत आम्हाला कुणी बोलावत नाही. तिथे जाण्याची तीव्र इच्छा एकेकाळी होती तशी आता जाणवत नाही, तिथे जायचं नाहीच असेही नाही. (‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी ) अजूनही खूप भ्रमंती होणार आहे, सुरुवातीचा ‘लाजते पुढे सरते, फिरते’ चा काळ आता गेलाय. आता मजा वाटतेय... चष्मा काढून बघितलं तरी धूसर नाही दिसत आता.

जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. असो, पाल्हाळ आवरतो नाहीतर रूपक होऊन जायचं.

आजच्या टंकनकळा आहेत, एका नवीन रंगपेटीसाठी. निमंत्रीत प्राध्यापक म्हणून आफ्रिकेतील एका विश्वविद्यालयात यायचा योग आहे. मला त्यांच निमंत्रणपत्र आलेलं, मुद्दाम कुणा मित्रांना दाखवलेलं नाहीये, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे त्यावरचे कुत्सित कटाक्ष, आणि हलकट्ट हास्य, हे कुणाचाही आत्मविश्वास गमावण्यासाठी पुरेसे आहेत. तर ते एक असो. मी ह्या विश्वविद्यालयात तात्पुरता का होईना पण प्राध्यापक म्हणून दाखल झालो आहे.

आफ्रिकेतला गरीब देश असल्यामुळे विजा, अर्ज, विनंत्या वगैरे भानगड नाही, अगदी ‘येवा, टांझानिया आपलाच असा’ हा घोष सुरुवातीपासूनच ऐकू येतोय. इथे या, साधा अर्ज भरा, सही करा, थोडे डॉलर द्या, लगेज विजा. त्या इमिग्रेशन वाल्या महिला अधिकाऱ्याने, गोड हसून ‘वेलकम’ म्हणाल्यावर डोळे अंमळ पाणावले. कुठल्याही गणवेशधारी अधिकाऱ्याला, सामान्य जनतेकडे बघून हसताही येतं ही भारतात केवळ अफवाच. थोडक्यात काय, तर जगाकडे बघून आपलं ते सुंदर मोहक आफ्रिकन हास्य करत लोकं स्वागताला उत्सुक आहेत.

१०-१२ तासाचा कंटाळवाणा प्रवास करून गेल्यावर, नेहेमीचे कंटाळवाणे सोपस्कार करायला अगदी जीवावर येत होतं. सामान वगैरे शोधाशोध झाल्यावर, स्थानिक चलन घ्यायला गेलो आणि पहिला सुखद धक्का, टांझानियन शिलीन्गाची भलीमोठी गड्डीच घेऊन बाहेर पडलो, चक्क साडेसात लाख शिलिंग मिळाले अवघ्या पाचशे डॉलरला. अगदी खरं लक्षाधिश झाल्यासारखं वाटलं काही क्षण.

बाहेर येऊन विमानतळावर जरा शोधाशोध करतो तर कुणीच माझ्या नावाची पाटी घेऊन दिसेना. मी हल्ली या प्रकाराला वैतागणे सोडून दिले आहे, तरी जरा अचंबाच वाटला. सगळ्या जपानी नावांच्या पाट्या, दोनचार अमेरीकन, ओळखीचे काहीच दिसेना.

त्यातल्यात्यात एका ओळखीच्या पाटीकडे नजर गेली, चांगला हसतमुख कार्यकर्ता होता, बहुतेक त्याने माझा फोटो आधी बघितला असावा किंवा माझ्या चेहेर्‍यावर केवळ ड्रायवर, रिक्षावाले यांनाच ओळखू येणारा, एक यडबंबु सारखा भाव गोंदून ठेवला असावा. पण तो लगबगीने माझ्याजवळ येऊन पाटीकडे बोट करू लागला. नीट वाचलं आणि दचकलोच. माझा नकळत का होईना पण एवढा मोठा सन्मान बघून मला शब्दच सुचेनात. मनात दणकून खुश झालो, म्हणालं चला सुरुवात तर चांगली झाली. आता ह्या देशात कुणाची माय व्यालीये माझ्या वाटेला जायची.

धक्का ओसरल्यावर मी विचारलं, ही पाटी कुणी लिहिलीये, तेव्हा त्यानं मला अत्यानंदानं आणि अभिमानानं माझ्या तिकीटाची प्रत दाखवली, त्यावरच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या विमानतळाचं नाव त्यानं माझंच नाव समजून अगदी न चुकता पाटीवर लिहून आणलं होतं. मी निरुत्तर. हे बघा काय ते...


ही लेखमाला इतरत्र पुर्वप्रकाशित आहे, याच्या पुढचे काहि नवीन भाग इथे प्रकाशित करायचे आहेत, संदर्भाकरता इथे पहिल्यापासुन प्रकाशित करत आहे.
बोर्डावर फक्त माझ्याच लेखांची गर्दी होउ नये म्हणुन रोज एकच भाग टाकेन.

व्यवस्थापकः फोटो देतेवेळी width="" height="" असे टॅग्ज टाळावेत किंवा अवतरणचिन्हांत रोमन आकडे द्यावेत. काही न्याहाळकांमध्ये अशी चित्र दिसत नाहीत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हान तेजायला .... झक्कास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान झाली आहे सुरुवात. आवडला हा भाग व शैली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील भाग लवकर लिहा. क्रमश जरा लांबवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तावनेत '२२१ बी, बेकर स्ट्रीट' वाचूनच 'जमतंय यांच्याशी आपलं...' असा उमाळा आला होता. वाचल्यावर पक्का झाला!

पण मी धर्मराज मुटके साहेबांशी सहमत आहे बरं का. हे फारच तोकडं झालंय. 'क्रमशः' लांबवा राव. हवं तर थोड्या अंतराअंतरानं टाका भाग. पण जरा वाचल्यासारखं वाटू द्या की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा भाग आधी वाचला होता, पण नंतर पुढे सगळी मालिका वाचायची राहून गेली. आता संपूर्ण मालिकाच येते आहे हे पाहून बरं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए बाबा.. होतास कुठे इतके दिवस असं झालं

सुरवातीलाच "(‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी )" वाचल्यावर तुला आम्ही कितीही आखडू वाटोत, आम्हा काकाकुवांच्या कळपात तुला मनोमन सामील करून घेतले Wink

बाकी सारी व्यवधाने सांभाळून भटकंती करायला मिळणे यासारखे सुख नाही.

लिहिण्याची शैलीही कमाल!

वाट बघतोय पुढिल भागाची!

आज ऐसीवर एकाच दिवशी दोन मुक्त भटकंतीच्या लेखमालांची सुरूवात बघुन माझे मन बागडू लागले आहे! धमालच्चे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाणा तेज्या मारी. आफ्रिकन सफरींची वर्णने कधीच वाचायला मिळत नाहीत, नव्याच वर्णनाबद्दल आभार!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छत्रपती शिवाजी Biggrin
मुजरा घ्या महाराज!!
कसलं भारी. ग्गोड खरंतर. आवडलं.
मस्त लेखनशैली. पु भा प्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खास !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा. तुमचं आफ्रिकेतलं नामकरण मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मस्त! शिवाजी महाराज की जय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्यांव!