पैसे उकळण्याचे धंदे
शनिवारी दुपारी relaxed खातपीत -वाचत-झोपत असताना ७१५-३९५-१३७१ (हा खरच शेरीफ चा नंबर आहे) नंबरवरुन एक फोन आला व पुढील संभाषण झाले -
बेल वाजली>
मी - हेलो
समोरची व्यक्ती- अतिशय कडक आवाजात व जोरात> मी अमक्या अमक्याशॆ बोलू शकतो काय?
मी- हो बोलतेय
स. व्य.- मी शेरीफ बोलतो आहे. आमच्याकडे तुमच्या अटकेचा warrant आहे. मायकेल Black नावाच्या ऑफिसर ला तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. त्याला तुम्ही पुढील नंबरावर फोन करा अन तो तुम्हाला काय ते सांगेल.
मी.- पहिल्या झटक्यात या लोकांचा accent कधीच कळत नसल्याने.... :D> हेलो नाही मी यावेळेला रक्तदान करू शकत नाही. माझ्याकडे वेळ नाही.
स. व्य.- भंजाळून अधिकच कडक आवाजात ...> मी काय सांगतोय ते नीट ऐका, मी Superior , WI चा शेरीफ बोलतो आहे. आमच्याकडे तुमच्या अटकेचा warrant आहे. मायकेल Black नावाच्या ऑफिसर ला तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. त्याला तुम्ही २०६-५१२-1480 नंबरावर लगेच फोन करा. तुम्हाला तो काय ते सांगेल. लगेच फोन करा नाही तर आम्हाला येऊन अटक करावी लागेल.
मी.- आता मनस्वी हादरून की हे काय लचांड > अहो पण काय तक्रार आहे? खरं तर माझ्याविरुद्ध कोणाला काय तक्रार असू शकते? :(
स व्य.- ते ऑफिसर Black च तुम्हाला सांगतील.
मी.- जरा सावरुन अन सावधतेने> तुम्ही खरच शेरीफ आहात का?
स व्य.-
मी.- बरं. त्या ऑफिसर ला फोन करते.
असं कसंबसं म्हणत फोन ठेवला. मी जाम हादरले होते. मग गूगलला सांकडं घातलं न तो मायकल Black चा नंबर शोधला. तर अनेक लोकांनी टाकलेल्या कमेंटस मिळाल्या की त्यांनाही तसे call आले होते व हे कोणा Nigerian लोकांचे नवीन fraud धंदे आहेत. अन हे लोक लोकांना क्रेडिट कार्ड डिटेल्स मागत होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
या निमित्ताने मनात असलेला एक
या निमित्ताने मनात असलेला एक चर्चाविषय.. चर्चाविषय म्हणण्यापेक्षा एक एव्हरग्रीन धागा (काय वाचलंत, काय पाहिलंत, कुठे खाल्लं या चालीवरचा) कुठे कसे फसलो किंवा फसण्यापासून वाचलो.. ऊर्फ स्पॅमविरोधी इषाराधागा असा सुरु करता येईल का?
स्पॅमर्स, स्कॅमर्स, फिशर्स हे सर्वजण दररोज नवीन प्रकारे कंटेंट आणि मार्ग घेऊन उगवतच असतात. खालीलपैकी एक ढोबळ अंतिम ध्येय असतं:
१. काहीही करुन अटॅचमेंट डाउनलोड करायला आणि उघडायला लावण्याचा प्रयत्न ("तुमची ऑर्डर डीटेल्स सोबत जोडली आहेत", "ओहो, तू या व्हिडीओत हे काय करतोयस?", "शॉकिंग पिक्चर्स" इ इ इ इ)
२. व्यक्तिगत माहिती उघड करायला थेट अथवा स्टेप बाय स्टेप भाग पाडणं. सीरियातली श्रीमंत विधवा छाप ईमेल्स. किंवा रीडर्स डायजेस्ट / कोकाकोला ज्याकपॉट इ इ
३. पासवर्ड फिशिंग: "तुमचा अकाउंट कन्फर्म करण्यासाठी या लिंकवर क्लिक करुन अकाउंड डीटेल्स (यूजरनेम पासवर्ड मुख्य) "वेरिफाय" करा अन्यथा अकाउंट बंद.
४. कोणीतरी तुम्हाला शोधत आहे.. कोणीतरी तुम्हाला खर्रSSSच भेटू इच्छितो... कोण ? इथे क्लिक करुन तुमची डीटेल्स आधी भरा
५. तुमचा क्रेडिट स्कोअर आत्ताच चेंज झाला. कश्यामुळे .. इथे क्लिक करुन तुमची डीटेल्स आधी भरा
६. तुमचे क्रिमिनल रेकॉर्ड .. इथे क्लिक करा आणि पैसे भरा.. फक्त एक डॉलर इ इ.
काही हजार वेगवेगळ्या मार्गांनी हे येतच राहतात. सर्वसाधारण बुद्धी शाबूत असलेली व्यक्ती बहुधा याकडे दुर्लक्ष करते, पण तरीही कधीकधी देखावा इतका नवीन आयडियेचा आणि बेमालूम असतो की टेम्प्टेशन आवरता न येऊन कोणी ना कोणी फसतोच.
आपण किमान अश्या नवनव्या गळांचे अमिष काढून टाकण्यासाठी इतरांना सावध करु शकतोच. तेव्हा आपल्याला अनुभव आलेल्या स्पॅम ईमेल्स किंवा फोन्स किंवा एस एम एसविषयी इथे शेअर करता येईल.
हल्लीचे एक लेटेस्ट म्हणजे आम्हाला एक प्रेत मिळाले असून त्याच्या खिशात तुमचा काँटॅक्ट मिळाला आहे. सदर अटॅचमेंटमधील फोटो पहा. (ती झिप फाईल असते आणि त्यात असेच आणखी प्रेतस्पॅम आपल्या ईमेलवरुन पाठवणारे मालवेअर) आहे की नाही डेडली ? ;-)
अहो Superior, WI चा शेरीफ असा
अहो Superior, WI चा शेरीफ असा उल्लेख केलाय की.
इतकी वर्षे मराठी आंजावर काढल्यावर अमेरिकेतल्या सर्व स्टेट्सचे शॉर्टफॉर्म पाठ असणं अपेक्षित आहे हो.
अमेरिका आणि पुणे या दोन ठिकाणचे लोक स्थानोल्लेख विशेष करत नाहीत. ते स्वतःच्या ठिकाणांना "बाय डिफॉल्ट" मानतात.
"इथे रताळी महाग आहेत" किंवा "इथे सध्या थंडी आहे" किंवा "इथे ग्रोसरीला गेले असताना" असे काही वाचले की पुणे किंवा अमेरिका हे समजून जायचे.
अहो Superior, WI चा शेरीफ असा
अहो Superior, WI चा शेरीफ असा उल्लेख केलाय की.
मला वाटलं Superior म्हणजे पुण्याबद्दल विषय आहे का काय!
---
मला अधूनमधून असले फोन बरेचदा येतात. (किंवा मीच एक अतिउत्साही, असले फोन उचलते.) दोन प्रकारचे फोन ठरलेले असतात :
१. तुमच्या गाडीची वॉरंटी संपत आलेली आहे. हा आमचा शेवटचा फोन कॉल आहे. आत्ता हो म्हणा आणि वॉरंटी वाढवून घ्या (नाहीतर बसा बोंबलत). मी दोन-चार वेळा "नक्की ना शेवटचा कॉल?" असं विचारलं. त्या (अमेरिकन =)* शुंभांसमोर खवचटपणा फुकट गेला. हल्ली तर मला आवाजातून खवचटपणा दाखवता येत नाही याची खात्रीच पटली आहे. गेलं दीडेक वर्षं असले फोन येत असतील.
२. तुमचं क्रेडीट लिमिट वाढवून देऊ शकतो म्हणून फोन येतात. मी एकदा नेटाने कंप्यूटरचे अडथळे पार करून एका माणसापर्यंत पोहोचले. हाय-हॅलो केल्यावर, "त्याचं काये ना, माझ्याकडे क्रेडीट कार्ड नाहीये, मला नोकरी नाहीये, या देशात नोकरी करायची परवानगीही नाहीये. पण तुम्हीच एक माझे त्राता आहात म्हणून मला क्रेडीट कार्ड द्या" असं म्हटलं होतं. तो फोन बंद झाला, पण असले फोन येतच राहतात. आजच एक आला होता. पहिल्या चार सेकंदात फोन ठेवला, त्याच-त्याच खोड्यांचा कंटाळा येतो हो.
एकदा खरंच बँकेचा फोन आला होता, क्रेडीट कार्ड बदलून देत आहोत म्हणून. पत्रातून खरोखर नवं कार्ड येईपर्यंत मला तो सुद्धा स्पॅम कॉल वाटला होता.
मध्ये एक मजेशीर फोन आला होता -
सुरुवातीचं हाय-हलो झाल्यावर त्या बाईने विचारलं - Can I speak with the man of the house?
Me - Why do you want to talk with the man of the house?
The woman - I will call some other time. Is that okay?
Me - NO.
The woman - Thank you. Bye bye.
* उगाच
<<मला वाटलं Superior म्हणजे
मला वाटलं Superior म्हणजे पुण्याबद्दल विषय आहे का काय!>>>
नाहीतर काय, मला सुद्धा पुण्याचाच उल्लेख वाटला तो. मग मी लगोलग मनातच फरासखान्याचे हवालदार हा शब्द कसा उच्चारतील याचा अंदाज करून पाहीला. पण खुप प्रयत्न करुनही अंदाज करता न आल्याने नाद सोडून दिला ;)
?
"इथे रताळी महाग आहेत" किंवा "इथे सध्या थंडी आहे" किंवा "इथे ग्रोसरीला गेले असताना" असे काही वाचले की पुणे किंवा अमेरिका हे समजून जायचे.
हे फारच जनरल झाले.
"सध्या इथे बदाबदा बर्फ कोसळत आहे - माझ्या ड्राइव्हवेवर दीड फूट साचलाय! आता हा कोण माझा काका साफ करणार?" हे वाचल्यावर ही नक्की सदाशिव पेठ (आणि असल्यास घर नंबर किती), की मारिकोपा कौण्टी, एझी, हेही पिनपॉइण्ट करून सांगता आले पाहिजे.
नाहीतर मग तुमची तर्क- की निरीक्षण- कोठली ती शक्ती 'एलेमेंटरी'च्या इयत्तेपुढे कधी गेलीच नाही, असे कोणी का म्हणू नये?
अहो तिमा, संस्थळावर नियमित
अहो तिमा, संस्थळावर नियमित वावर असलेल्यांना एकमेकांच्या रहाण्याच्या ठिकाणापासून ते राशीपर्यंत सर्व माहीत होते हळू हळू. आता तुमची चंद्ररास "कर्क" का नाही? बोला? ;)
हाहाहा...... नाही ठिकाणाचा उल्लेख व्यवस्थित करायला हवा होता तो झाला नाही याबद्दल दिलगिर आहे :)
पंधरा दिवसांपूर्वी मला एक
पंधरा दिवसांपूर्वी मला एक फोन(मोबाईल नंबरवरून) आला "मी टाटा स्काईमधून बोलते .तुमचं नाव अमुक ,पत्ता अमुक ?"" हो."तुमचा डिजिटल बॉक्स तुम्ही वापरत नाही तो टाटा स्काईची प्रॉपर्टी आहे ,कंपनीला रिटर्न करायचाय ,माणूस येईल."" बरं काढून ठेवतो काय काय रिटर्न करायचंय?"" फक्त बॉक्स कार्ड आणि रिमोट दोन दिवसांनी फोन करते." मी लगेच टाटा स्काईच्या कॉल सेंटरला फोन केला. रजिस्टर्ड नं असल्यामुळे लगेच कम्प्युटरने रिचार्ज डिटेल्स सांगितली. मग ऑपरेटरला बॉक्स रिटर्नचे विचारून घेतले. असली काही स्कीम नाही हे कळले. दोन दिवसांनी तो फोन आला. मी विचारले किती रुपये देणार? तर "फुकट नेणार आणि रिसीट मिळेल " मी म्हटले रिसिटची काय लुंगी कराचीय का चौदाशे रूपये द्या आणि घेऊन जा. मग भडकली ती बाई. लीगल नोटीस पाठवेन वगैरे. ज्या दुकानातून बॉक्स घेतला होता तयाने सांगितले फेक कॉल आहे काही किंमतीला कोणी घेत असेल तर ठीक आहे फुकट देऊ नका.कारण या डब्याच्या बदल्यात एचडीप्लस बॉक्सचे चौदाशे रुपये कमी करतात.
फेक
शुचि, हा कॉल फेक आहे.
अमेरिकेत (हो हो अगदी विसकॉन्सिनातसुद्धा!) सरकारी डिपार्टमेंटस अशी फोनवरून धमक्या देत नाहीत.
वॉरंट बजावायला स्वतः पोलीस येतील जर खरोखरचं गंभीर वॉरंट असेल तर. गंभीर कारवाई नसेल तर सरळ यु एस पोस्टाने नोटीस पाठवतात.
यात शेरीफ, आय आर एस, आय एन एस, सगळे आले.
उगीच कुठे कॉल करत बसू नकोस. आणि विशेषतः त्यांनी पे-पॅल वगैरेद्वारे दंड म्हणून रक्कम मागितली तर अजिबात देऊ नकोस.
(बाय द वे माझा गेसः तुमचा लॅन्डलाईनचा फोन तुझ्या नांवावर आहे ना?)
Scamsters pose as RBI chief
NEW DELHI: Taking bank lottery scam to a new level, scamsters are using the name and picture of RBI chief Raghuram Rajan to lure gullible people into making a cash deposit of Rs 15,500 to get a winning amount of Rs 5.50 crore.
The "lottery" amount that they promise to credit into the account of those giving an "approval fee" is claimed to be part of funds given to RBI by the British government.
----
द सेलेब्रिटी इकॉनॉमिस्ट !!!
अशा अनेक प्रकारच्या घटना
अशा अनेक प्रकारच्या घटना पाहून त्या साधू आणि घोड्याच्या गोष्टीसारखा कानाला कायमचा खडा लावलेला आहे.
एकदा एक कॉल आला आणि "तुमच्या क्रेडीट कार्डवर दुसर्या राज्यात (अनधिकृत) खरेदी होत आहे, सिक्युरिटी डिटेल्स व्हेरिफाय करा" असे म्हणाला. त्याला म्ह्णालो मी तुला अथवा या क्रमांकाला ओळखत नाही. सिक्युरिटी डिटेल्स सांगणार नाही. त्यावर वैतागून कार्ड ब्लॉक करावे लागेल असे म्हणाला. त्याला सांगितले, "उत्तम. तसच कर."
मग बँकेत फोन केल्यावर कोणीतरी कार्ड खरेच वापरल्याचे कळले. झीरो फ्रॉड लायबिलिटी असल्याने खरेदीची चिंता नव्हतीच आणि यथावकाश दुसरे कार्ड आले.
बाकी या बँकांच्या algorithm बद्दल शंका आहे. मी स्वतःच खरेदी करत असताना अनेकदा खरेदी थांबवली गेली आहे (मी राहत असलेल्याच शहरात, क्रेडिट लिमिटच्या ५ - १०% बॅलन्स असताना, वेगवेगळी कार्डे वापरूनही). मग check out च्या रांगेतून बाजूला होउन, कस्टमर केअरला फोन करायची योगसाधना केल्यानंतर कुठे तो ब्लॉक काढला गेला आणि खरेदी झाली. असे असताना तशाच अमाउंटला चोरांना कशी बिनबोभाट खरेदी करू दिली? (Murphy's law?)
चावी बनवणाऱ्यांचा चलाखपणा
चावी बनवणाऱ्यांचा चलाखपणा पाहिल्यावर मी आता क्रे कार्ड चोरांची कल्पना करू शकतो. एकदा ड्यु चावी बनवणाऱ्या फुटपाथवरच्या माणसाकडे गेलो. याची चावी करायची आहेका असं विचारून त्याने माझी चावी लगेच मांडीखाली ठेवली. जुडग्यातल्या न कापलेल्या चाव्यांपैकी एक घेऊन चिमट्यात पकडून घासून त्या चावीने पाच मिनीटांत कुलुप उघडून दाखवले परंतू नवी चावी एकदाही मूळ चावीशी जुळवून पाहिली नाही इतके त्याच्या डोक्यात चावीचे डिझाईन लक्षात होते.
मागच्या महिन्यात क्रे कार्ड आणि इतर इमेल वगैरे एका पत्रकाराचे सर्व अकाउंटस हैक करून टीव्हीवर दाखवले.
क्रमश: आहे का?
क्रमश: आहे का?