ग्लु वाईन

नमस्कार मंडळी.. गेले काही दिवस आंतरजालापासून दूर असल्यामुळे ऐसी अक्षरे चे सदस्यत्व घेतल्यावरही लिहायचा मुहूर्त लागला नव्हता.
सध्या ख्रिसमसमय माहौल आहे, फ्रांकफुर्टचे ख्रिसमस मार्केट आणि त्यातील चॉकलेट्स, गरमागरम चेस्टनट्स, ब्राटवुर्ष्ट, राकलेट, फाँड्यु आणि ग्लुवाइनचे स्टॉल्स भरभरुन गर्दी करत आहेत.ग्लु वाइनच्या जोडीला चेरी, रास्पबेरी, प्लमच्या वाइन्सही वाफाळत आहेत.खास मुलांकरता आणि अल्कोहोल न पिणार्‍यांकरता नॉनअल्कोहोलिक ग्लु वाइन्सचे स्टॉल्सही आहेत. त्यात आज शेवटचा रविवार! दोन चार दिवसातच मार्केट बंद होणार ते पुढच्या नाताळापर्यंत.. पण ग्लु वाइनची मजा घरीही घेता येईलच की! म्हणूनच ही पाकृ: (ग्लु वाइन मधील अनेक व्हेरिएशन्स पैकी हे एक - जर्मनीतल्या मार्केटात ग्लु वाइन आणि ग्लु वाइनचा स्पेशल मसाला मिळतो , परंतु तो सगळीकडे उपलब्ध नसतो. म्हणून ही दुसरी पध्दत देते आहे.)
ग्लु वाइनला (Glühwein) म्युल्ड वाइन (Mulled wine) असेही म्हणतात.
साहित्य- १ लिटर साधीशी रेड वाइन (उगाच महागडी रेड वाइन नासायची गरज नाही.ती नुसती पिता येते.)
३/४ लवंगा,२ वेलदोडे, १ बोटभर दालचिनीचा तुकडा,लिंबाची किसलेली साल २ टी स्पून,
४ ते ५ टेबलस्पून साखर (अधिक गोड हवी असेल तर अजून २ चमचे साखर घाला)
आणि कडाक्याची थंडी! साहित्यात हा पदार्थ नसेल तर ग्लु वाइनला मजा नाही!
कृती- अगदी सोप्पी आहे.
दालचिनी,वेलदोडे, लवंगा, लिंबाची किसलेली साल ह्या सर्वाची मिक्सरमधून पूड करा रेड वाइनमध्ये ही पूड आणि साखर घाला व गरम करत ठेवा,उकळू नका. पुरेसे गरम झाले की गाळून कपातून प्या.
ग्लु वाइन कपातूनच पितात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आणि कडाक्याची थंडी! साहित्यात हा पदार्थ नसेल तर ग्लु वाइनला मजा नाही!

एकदम बेश बोललात. आमच्या कडे सध्या हा इन्ग्रेडियंट भलताच जोर धरून आहे. कोणाला हवा असेल तर आमच्याकडून घेऊन जा, हवा तेवढा.

थंडीत साकेदेखील गरम करून मस्त लागते. किंवा भरगच्च जेवण झाल्यावर गरम कोन्याकचे घुटके. हा मसाला-वाईन प्रकार करून पाह्यला पाहिजे. ग्रोसरीच्या यादीत एक वाईनची बाटली ऍडवलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा!
स्वातीतै ब्याक विथ ब्यांग!! Smile
ते "नॉनअल्कोहोलिक ग्लु वाइन्सचं काय म्हणतेयस? ते कसं करायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थंडीच्या दिवसांतलं माझं आवडतं पेय. साखरेऐवजी मध घालूनसुद्धा चांगली लागते आणि इतर मसाल्यांमध्ये जायफळ, सुंठ किंवा ज्येष्ठमध यांची पूड घालूनही आवडते. सर्वप्रथम ही मॅक्स म्युल्लर भवनमध्येच चाखली होती. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वातीताई, हे प्रकरण भलतंच रोचक दिसत आहे. पण आता थंडी कोणत्या दुकानात मिळणार? Wink
-- राक्षसकथेतील पाशवीकुमारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साखर मात्र सांगितल्याप्रमाणे लागते असे कळले. कमी घालून चांगली लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोवर इथे माफक थंडी आहे, तोवर हा ग्लु वाईनचा प्रयोग करून पहावा म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि कडाक्याची थंडी! साहित्यात हा पदार्थ नसेल तर ग्लु वाइनला मजा नाही!
अगदीच! साँय्क साँय्क करणारं गळकं नाक नि थंड्गार पडलेली कानशिलं हेदेखील त्या मसाल्याइतके महत्त्वाचे घटक आहेत!

घरी करू शकतोच पण माझ्यामते ख्रिसमस मार्केटांतच त्या गरमागरम Gluhwein ची खरी मजा असते! हे म्हणजे आंगणेवाडयेच्या जत्रेक वालावलकराच्या नायतर गावड्याच्या हाटिलात हादडलेल्या चय नि भजयेची सर घरच्या भजयेक येणा नाय ना.. तसल्यातलीच गत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0