झटकून टाका ती भिडस्तपणाची राख...!!

जो बोलत नाही त्याचे ऐकून घेतले जात नाही.
जो बोलतो त्याचेच ऐकले जाते.
जो देत राहातो त्यालाच मागितले जाते.
जो देत नाही त्याला मागितले जात नाही.
जो घाबरतो त्यालाच जास्त घाबरवले जाते.
जो घाबरत नाही त्यालाच सगळे घाबरतात.
जो हक्क गाजवतो, त्याचे कर्तव्य विसरले जाते.
जो कर्तव्यच करत राहातो, त्याचे हक्क विसरले जातात.
जो टीकाच करतो त्याचेवर कुणी टीका करायला धजावत नाही.
जो प्रशंसाच करतो त्याचेकडून टीका ऐकण्याची सवय राहात नाही.
तुम्ही फक्त हसतच राहाल तर लोक तुमचे रडणे ऐकणार नाहीत.
तुम्ही फक्त रडतच राहाल तर लोक तुम्हाला कधीच हसू देणार नाहीत.
तुम्ही भिडस्त राहून लोकांना तुमचा फायदा घेवू देऊ नका.
तुम्ही काहीच बोलत नाही, काहीच घेत नाही, नेहेमी घाबरतात, कधीच मौजमजा करत नाही, फक्त कर्तव्यच करतात अशी सवय लोकांना लावू नका.
नाहीतर नेहेमी तुम्हाला फक्त लोकांचे ऐकत, लोकांना देत, लोकाना घाबरत, काम करत, कर्तव्य करत, रडत जीवन जगावे लागेल.
त्यापेक्षा ऐका पण बोलासुद्धा.
द्या पण घ्या सुद्धा.
घाबरा पण घाबरवासुद्धा.
कर्तव्य करा पण तुमच्या हक्काची जाणीव सुद्धा करून द्या.
काम करा तशी मौजमजा पण करा.
टीका करा पण प्रशंसा सुद्धा करा.
रडा आणि हसा सुद्धा.
जीवन हे फक्त कर्तव्यासाठी नाही, उपभोग घेण्यासाठी सुद्धा आहे!
झटकून टाका ती भिडस्तपणाची राख...!!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडले. माझ्यासारख्याला परफेक्ट लागू होते. पण याचाच विस्तार -
जगात चांगले-वाईट नसते. असतो तो फक्त dominance किंवा अधिसत्ता. मग ती तथाकथित चांगले काम करुन/न करुन मिळेना का तथाकथित वाईट काम करुन/न करुन मिळेना.
असापण करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

आवडले. तथ्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुझी न्युईसन्स व्हॅल्यु वाढव’ असा फार वर्षांपूर्वी एका सहकारी वारंवार सांगायचा ते आठवलं ( ते अजूनही जमलेलं नाहीच Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसते नीट बोलले तरी या सर्व समस्या कम कुचंबणा नष्ट करता येतात. पण त्या नीट, शांत बोलण्यामागे शक्तीचे अधिष्ठान पाहिजे हेही सत्य.

भरपूर ताकद आणि भरपूर नम्रपणा हे कॉम्बिनेशन सर्वात दुर्मिळ असलं तरी सर्वात प्रभावी आहे. आणि ताकदच नाही म्हणून नम्र हा सर्वात वाईट भाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या भिडस्तपणाच एक उदाहरण-
मागच्या आठवाड्यात मी एक फळविक्रेती बाई ४५-५० ची तिच्या पोराबरोबर बघितली. अननस घ्यावसं वाटलं. मी गेलो. कितीला म्हणून विचारलं 50 रु. बरं बाबा 50 रुपये तर 50 रूपये. मी भाव वगैरे करु शकत नाही. कारण कमी केले तर तिला गंडवल म्हणून वाइट वाटतं अन् महाग पडलं तर आपण लुबाडले गेलो म्हणून. असो. एक अननस निवडलं. तीच म्हणाली कापून देऊ का? मग माझ्या लक्षात आले की कापायचे पण आहे म्हणून. म्हटलं द्या. 30-35% अननस माझ्या डोळ्यासमोर खराब निघाला. आता काय करावे? ती बाई थोडी भितीने(नवीन द्यावे लागेल की काय म्हणून) माझा अंदाज घेउ लागली. तरीपण तिचं कापणं चालूच. शेवटी मीच म्हटलं मावशी खराब निघालयं की हो. मग कसनुसं हसत ती म्हणाली थोडसचं निघालय. मी थोडा गरीबी/हताश चेहरा घेऊन पँकिंग संपण्याची वाट बघत बसलो. शेवटी तिला दया आली? की गिल्ट आला तिच्या मनात? कोणास ठावूक? जे काही असेल ते मी complete surrender केल्यामुळंच होतं. मग तिने तिच्या पोराला विचारल (नेहमी ही एकटी बाईच सगळ साम्भाळते पण आज पोराला विचारले) ह्याचं अननस खराब निघाले , काय करायच? पोरगं म्हटलं किती ? ती म्हटली थोड जास्तच निघालयं. बर मग दहा रुपये कमी कर. आता तिच्या चेहऱ्यावर justice has been done टाईप आनंद परतला. पण रात्रीची वेळ , सुट्टे दहा नव्हते, त्यामुळे एक संत्र गळ्यात मारलं(जे आंबट निघालं).
--------
आणी लोक म्हणतात अत्याचार शारीरिकच(उदा. रेप, मारहाण) असतो मानसिक(दबाव, blackail,dominance) वगैरे skills (?) develop करावी वगैरे लागतात. करा आमच्याच डोक्याचा भुगा.
-------------
मग असलेली आयुधे वापरुन domina
te/authoritize/lead केला तर काय वाईट?
1. राजकारण्याने जनतेला भुलवून(?)- स्वप्न दाखवून /आश्वासन देउन/ काही काम करुन- काही काम बुडवून जनतेची मते घेतली तर काय वाईट? मोदीनी कोणत्याही माणसाला निवडून आणताना तो कामे करेल की नाही हा विचार केला असेल की तो निवडून येईल का? हा विचार केला असेल. उदा. मोदी,मायावती,सोनिया सगळेच. 2. गि.कु. आपल्या अग्रलेखात आठवड्यात सहापैकी सरासरी 1.5 वेळा "करलो दुनिया मुठ्ठी मे" करतात. ते काय म्हणून ब्वा. लायसेन्स राजात रि-अलायन्सने केल असेल काहीतरी(?) मग दुसर्यांच्यात दम/कॉन्फिडन्स/ मर्दानगी नव्हती? आता कुठं काय करतेय? उगीचच ie च्या रामनाथ गोयंकाची फँमिली(express family) दुश्मनी पुढच्या पिढीत व मराठी आवृत्तीत पण बघायला मिळावी? शेतकर्यानी जशी धंद्यात रिस्क घेतली पाहिजे तशी संपादकानीसुद्धा झालं गेलं विसरुन पुढं बघायला शिकावं. 3. एखादा महानायक येतो 2५% जमातीला वर नेतो(आरक्षण देतो). Obviously सगळी equations change होणारच. संख्यात्मक ताकद(लोकशाही म्हणतात ती यालाच) वापरुन dominant झाला हा समाज(अर्थातच थोडेच लोक top ला पोहोचणार. उच्चवर्णीयातसुद्धा सगळेच पुढं (?) नाहीयेत. पण त्यांच्या मागासपणाच प्रतीक म्हणून तळातल्यांकडेच का बोट दाखवायचे? Bjp ला पाठिम्बा देणारा उच्चवर्णीय/ उच्चवर्गीय का पाठिम्बा देतोय? सामाजिक न्यायाच्या पांचट सबबीखाली/उदात्त धोरणाखाली बळी कुणाचा गेला? संधी नव्याने निर्माण केल्या गेल्या का? ह्यांच्या तोंडचा घास काढून दुसर्याला दिला गेला का? त्या individual ची संधी हिरावून घेतली, मग त्याने पुढे काय केले? त्याने ते accept केले? मनापासून की मारून मुटकून? सरकारी नोकरीत आरक्षण म्हणजे पोटापाण्याची सोय असा समज निर्माण तर झाला नाही ना? 4. Obc नी फक्त संख्याबळ वापरुन सगळ्यांनाच मूर्ख बनविले. रपारप सगळी समीकरणं बदलली. ज्याने आपल्या जातीचा कधीच उल्लेख केला नव्हता. तो(PM)स्वतःला obc म्हणाला. Obc हा नवा उच्चवर्ण आहे किंवा होत आहे. मोदी-संघ/bjpच नात दोघांच्या सोयीचच आहे. पण उद्या फाटलच तर obc+काही sc/st+ इतर ह्यांच्यापुढे संघ-बिंघ टिकणार नाही.
5. इतर. Who should have dominance in marital relationship? breadwinner or homemaker? It goes without saying that money-maker will be dominant. But what about trophy wife or for that matter trophy children? I mean they are the real beneficiaries. In exchange for sex/food/good behaviour/obedience or all or nothing whatsoever(This happens. Someone can have affection for their darlings just because they 'belong' to them). Then dominance of sexual reationship/money making/caste/religion/class should be used without any kind of guilt.
6. As said earlier numerical dominance of caste can topple all equations. This applies to religion too. So crusade against two of minorities of this country but majorities in world i.e. Muslims and christians should be welcomed, I think. But buddhist(SC s15%) can not be touched because 13% muslim+3.5%christian+ 15% SCs will be too large to handle. 7.5% SCs do not care to which religion they belong? So all this is a sham to control or 'convert' others. I should join them but do I really matter to them? Are they gonna give me some share of dominance? Well, they are offering common hatred against a group of people without any kind of regret/guilt. Thank god(?) I do not belong to 'those religions' and I have a choice to make? Or do I?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

५व्या मुद्द्याशी सहमत आहे. trophy wife, children सोबतच parents, siblings यांनापण टाकून द्या. म्हंजे 'एकंदरच माजलेली कुटुंबसंस्था, माजलेल्या ट्रॉफ्या आणि breadwinner च्या जीवाला घोर' असे उचीत वर्णन होइल ;-).
homemaker म्हणा नाहीतर housewife म्हणा; ते प्रोफेशनच डेरोगेटरी आहे; फक्त शब्द बदलून काय होणार...

'आपल्या तोंडचा घास काढून दुसर्याला दिला गेला', 'संधी हिरावून घेतली' असे फक्त त्यांनाच वाटते ज्यांना डोकं कमी असतं किंवा डोकं वापरायचे, अभ्यास करायचे सोडून उंडगेपणा करत फिरत होते. हे मान्य करता येत नाही मग फोडा खडे आरक्षणाच्या नावाने. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात १६% ब्राह्मण, २४% मराठा आहेत. ओपनमधे अजून कोणकोण येतं? आता ४०% लोकसंख्येसाठी ५०% जागा ओपन ठेवल्या आहेत ना? त्यातूनही जागा मिळत नसेल तर झोल आपल्यातच आहे हे मान्य करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आपल्या तोंडचा घास काढून दुसर्याला दिला गेला', 'संधी हिरावून घेतली' असे फक्त त्यांनाच वाटते ज्यांना डोकं कमी असतं किंवा डोकं वापरायचे, अभ्यास करायचे सोडून उंडगेपणा करत फिरत होते. हे मान्य करता येत नाही मग फोडा खडे आरक्षणाच्या नावाने.
>>>>> अरेरे. निदान हे तरी म्हणू नका हो.'आपल्या तोंडचा घास काढून दुसर्याला दिला गेला', 'संधी हिरावून घेतली.' या दोन मंत्रांचा कोटीजप होउन आणी केवळ दहा वर्षासाठी ठेवा, आपल्या दुष्कृत्यांची भरपाई करा असे emotional blackmail करुन तर आरक्षण मिळाले. महानायकाने स्वतंत्र मतदारसंघाची भिती दाखवून/दबाव आणून (म्हणजे ब्रिटिशांच्या अंतर्गत स्वतंत्र वसाहतच की हो) आरक्षित मतदारसंघांची मागणी मान्य करवून घेतली. -------- ------------- आरक्षण विरोधात किंवा बाजूने भरपूर लिखाण झालेल आहे. (उदा. हा मिपावरचा धागा http://www.misalpav.com/node/29755).
उंडगा असेल तर तो त्याच्या कर्माने जाईल. पण मी हिंदू धर्माला,पितृसत्ताकाला,जातपात,हुंडा यात मला परंपरेने व आपोआप आणी 'उंडगा' असतानाही सहज मिळणारे फायदे व संरक्षण लाथाडतोय. जात तर सोडाच धर्म वगैरें पण 'गर्व से' म्हणत नाहीये.
पण केवळ घटनेत तरतुद नसताना केवळ संख्याबळावर OBCनी 'अचानक' मिळालेले आरक्षण परत हातातून निसटू दिल नाही.(1990ला). 50% आरक्षण लिमिट - राजकारण्यानी "निदान जनाची नाहीतर निदान मनाची तरी" या नात्याने पाळावी म्हणून कोर्टाने jurisprudence/judicial activism चा वापर करवून घातली आहे. तोपर्यंत आरक्षण विरोधात किंवा बाजूने दंगा झाल्याने हे तर सिद्ध झाल होत की OBC आरक्षण माग घेतल जाउ शकत नाही (54% संख्याबळ).मग हे नैतिक असो वा नसो हे सत्य आहे.म्हणजे उंडगेगिरी कोणाकडून झाली ते स्पष्ट होईल. असो. माझा मुद्दा आहे की dominance-subservience मध्ये चांगल वाईट काही नसतं. सामाजिक न्यायाच्या नावाने घेतलं तरी ते misnomer आहे. मोठ्या भावानी समजूतदारपणा दाखवायचा अशी समजूत काढणं किती पांचट आहे हे मला सांगायचय.

तसेच मी प्रस्थापितविरोधी विचारात का जावे?
माझ्या हिंदू(83%) असण्याने मला इतर धर्मीयाच्या भावना दुखावता येत असतील/त्यांच्या लैंगिकतेबद्दल कमेंट पास करायला मिळत असतील तर मी का करू नये. मला माझ्या उच्च जातीमूळे हूंडा/मान/उच्चवर्ण-वर्ग सर्कल मिळत असेल तर तो मी का घेऊ नयै. पुरूष असल्याने मला घरी कधी काम लावली गेली नाहीत तर मग या 'मर्द'पणाचा वापर का करु नये? टँक्स illegally वाचवता येत असताना legally का भरावा? आणी एवढ करून मग मी जात मानत नसेन तर माझा सगळीकडूनच तोटा की हो? मी जात मानावी का नाही हे स्पष्टपणै सांगा. स्पष्टपणे माझा फायदा कशात आहे ते सांगा.मग ते नैतिक असो वा नसो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

पण मी हिंदू धर्माला,पितृसत्ताकाला,जातपात,हुंडा यात मला परंपरेने व आपोआप आणी 'उंडगा' असतानाही सहज मिळणारे फायदे व संरक्षण लाथाडतोय. जात तर सोडाच धर्म वगैरें पण 'गर्व से' म्हणत नाहीये. >> खरंच का? बरं मग इतरांनी काय करावं असं म्हणणं आहे?

कोणी कितीही 'तोंडचा घास, संधी, emotional blackmail, भिती दाखवून/दबावतंत्र वापरून, misnomer, समजूत काढणं किती पांचट' वगैरे म्हणत राहीले तरी कोणतेही आरक्षण मागे घेतले जाउ शकत नाही. मग तुमच्यापुढे दोनच पर्याय राहतात: एक्सेप्ट इट अॅज अ matter of fact किंवा किरकीर करत रहा. whatever suits you.

इतर धर्मीयाच्या भावना दुखावणे, लैंगिकतेबद्दल कमेंट पास करणे, हूंडा/मान/उच्चवर्ण-वर्ग सर्कल, 'मर्द'पणाचा वापर, tax illegally वाचवणे आणि जात मानणे >> अरे बापरे बरीच मोठी लिस्ट झाली की.

स्पष्टपणे माझा फायदा कशात आहे ते सांगा. >> ह्ये ह्ये ह्ये. ते मी कसं सांगणार? तुम्हाला जे ठीक वाटेल ते करा. परीणाम तुम्हाला आणि तुमच्या नजिकच्यांना भोगावे लागणार आहेत. नैतिकता सापेक्ष असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे हिंदु/पुरुष/उच्चवर्गीय/ऊच्चवर्गीय/पहिला मुलगा असणे हीसुद्धा matter of fact च आहे. आणी त्याचे 'परिणाम भोगणे' असली काही परिस्थिती आलेली नसून त्याचे वट्ट फायदे मी 'enjoy' करत आहे. तरी काळजी नसावी.
मला फक्त आरक्षणाला टार्गेट करायचे नव्हतेच. पण ते कोणाला व कसे दिले गेले आहे याचा 'फेरविचार' मला सुचवायचा आहे. तुम्ही तुम्हाला फायदा मिळत असताना त्याचा फेरविचार करणे अपेक्षित नाही पण थोडा वेळ निदान एकांतात तरी विरूद्ध बाजूने विचार करायला काय हरकत आहे. पण मी पुरुष/straight असूनदेखील feminist/LGBT वाल्यांना पाठिंबा देतो. फक्त माझ्या घरातील सदस्यासाठी नाही. मागच्या पिढीतल्या सुधारकाना सतीबंदी निरर्थक वाटत होती. त्याना काय गरज होती समाजविरोधात जायची? महानायकाने सशक्त होईपर्यंत आरक्षण सुचवल होतं. पण सशक्तची व्याख्या म्हणजे दूसर्याने निमूटपणे सगळ्या अटी मान्य कराव्यात असे नाही. परिस्थिती असताना क्रिमी लेयरमधून सुट घेणारा तितकाच दांभिक म्हटला पाहिजे जितक तुम्ही लाच/हुंडा/पत्नीकडून सेवा घेणार्याला म्हणता.

आरक्षणातल loophole हे आहे की महानायकाने त्या वेळेसच्या बंदिस्त जातीनुसार अख्ख्या जातीलाच आरक्षण लागू केल. त्यावेळेसदेखील महानगरातून/शहरातून जात वगैरे एवढ फेमस नव्हत, पण majority लोकसंख्या ग्रामीण भागातील असल्याने हे mass operation चालून गेलं. Induvidual पेशंटला तपासलं गेल नाही. काही मर्यादा घातल्या का? नाही. शिक्षणात आरक्षण ठेवलं असताना नोकरीत कशाला? त्यांच्या चरितार्थाची तजवीज ही अशी करायची? नोकरी देउन? मग नोकरी म्हणजे केवळ चरितार्थच होईल. जे काही लोक सरकारी नोकरीत राहून त्याला सेवा मानतात, त्याना खाज सुटलीये असच म्हणाव लागेल.
Reservation म्हणजे APMC कायद्यासारखं केलय. शेतकर्याच्या कल्याणासाठी म्हणायच अन् गब्बर शैतकरी फायदा घेतात.(थोड्याफार गरजू शेतकर्याना पण फायदा होतोच. अन त्यांच्या नावाखाली हे फायदे घेतात. वरून सान्गायच आपली union आहे त्या दुसर्या दलाल/मारवाड्याकड जाउ नको. 'ते' लई वाइट असतात.) गरजू बसलेत ग्रामीण भागात. अन् कोणत्याही बाबतीत practical असणारे , सगळ्या सुविधांचा यथेच्छ उपभोग घेणारे शहरी किंवा ग्रामीण सुस्थितीत असणारे तथाकथित मागासवर्गीयच याचा maximum लाभ घेतात. ------------
आरक्षणामुळे किती फायदा झाला? 1991 च उदारीकरण, सगळ्याकड आलेले laptop,computers,fridge,motorcycle,familarity with modern world,television,news,internet याचा किती फायदा झाला? उत्तर महानायकाच्या विरोधात जात असलं तरी ते आहे आरक्षणाच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त. बाजारपेठ संस्कृती अस्तित्वात आल्याने तो कोणत्या जातीचा आहे हे मला काय करायचे आहे? म्हणून व्यापारी जात/धर्म at least विकण्याच्या बाबतीत तरी पाळत नाहीत. रहिवासी किवा लग्नाच्या बाबतीत पाळले तरी आपल काही जात नाही. आता आपण ह्या जमान्यातलेव्यापारी बघू. गल्लीबोळातले मोबाइल,कापड,हॉटेल,किराणा दुकानवाले इतके झालेत, की competition मुळे जात नावाची चीजच at least वस्तू विकत घेण्यात तरी उरली नाहीये. ती उरलीये फक्त लग्नात आणी केवळ ग्रामीण भागातील वसाहतीमध्ये. शहरात flat विकताना जात पाळणे किती आतबट्ट्याचे आहे हे सांगणे नकोच. Public transport (local trains/ PMT/Buses) यात travel करताना त्याच्या नको नको त्या गोष्टी नाका तोंडात जाताना अस्पृश्यता कशी पाळली जाईल? कॉलेजात झक् मारत हॉस्टेल रहाव लागत. एकमेकांच्या तोंडातले घास काढून खाल्ले. सलग आंघौळी न करण्याचे रेकॉर्ड , BP बघणे, 'दुसर्या धर्म-प्रदेशातल्या' पोरींवर कमेंट मारणे , दुसर्याचे नको ते अवयव दिसणे याच्या पलीकडे जात संपुष्टात येणे म्हणजे काय?पण दुसर्या दिवशी collegeची fee त्याला संपुर्ण return मिळते तर माझ्या खिशाला 70-80 हजाराचा फटका. ढुंगणाला ढुंगण घासत अभ्यास केल्यावर सारखेच मार्क मिळणार मग नोकरी पात्रतेत 5-10% सवलत का? हे मुद्दे माझ्या लेखी तरी गौण आहेत. 70-80 हजारानी किवा टक्क्यानी कोणी खाली-वर जात नसते. आणी माझ पण उत्तमच चाललय. पण प्रश्न हा आहे की यामुळे 'जात' खाली जातेय का वर? ह्या घडीला जात उच्चवर्णीय नाईलाजाने पाळतायत. तर जातीचे फायदे मिळवणारा मागासवर्गीयातला उच्चवर्गीय समाज त्याच समाजातल्या इतर खर्याखुर्या मागासाला दाबत- आश्वासन देत 'जात' टिकवून आहे. निदान हे तरी ओळखण्याचा प्रयत्न व्हावा.
-------------
ह्याला parallel उदाहरण आहे गोरे-काळे हा भेदभाव. हा तेवढा वादग्रस्त नसेल त्याचे फायदे-तोटे पण limited असतील तरी मानसिकता सेम आहे. गोरे आणी खासकरुन स्त्रिया आपली आपल्या धवल कांतीमुळे अधिकचे स्त्री दाक्षिण्याचा लाभ घेतात. उदा.लग्नाच्या वेळेस जास्त मागणी व इतर general ठिकाणी. (पण 'गोरं'पण जपण किती त्रासदायक आहे , पुरुषाकडून सार्वजनिक ठिकाणी न्याहाळल जाण हे काही जणाना हवहवस वाटत असेलही बापडे. पण बहुतांशी महिला याच्या विरोधातच आहे.) मुळ काळ-सावळे असलेले काजोल-शाहरुख छाप cosmetics च्या जाहिराती करुन गोरेपणाला एक अधिष्ठान प्राप्त करुन देतात. पुरुषी वर्चस्वामूळे काळे पुरुष खपतातसुद्धा पण महिलाना लग्न बाजारात settlement करावी लागते. काळा आहे म्हणून ओबामाने पावडर लावावी असे तर शाहरुख सांगत नाही ना. बाकी शाहरूखच्या व काजोलच्या कांतीत तरी DDLJ पासून HNY पर्यंत बराच फरक पडलाय.
टोच्या 1- अगर किसी चीज को दिल और शिद्दतसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुट जाती है अस कोण्या संतान म्हणून ठेवलय. लोकांच्या चेहर्यातले तिमिर जावो याची इच्छा अगदी मनातसुद्धा काही काळबेरं न ठेवता केल्याचे फळ रसाळ नसली तरी गोरी-गोमटी आली आहेत.
टोच्या 2- उडदामागे काळे गोरे फरक न करण्याची संस्कृती आपली. अमेरिकेत/इंग्लंडमध्ये आशियनाना काळे-गोरे गटात न ढकलता केवळ काळे एशियन या क्याटेगरीत ढकलतात. असे कोणीतरी म्हटले होते म्हणे बहुधा. जाणकारांनी आपला 'उजेड' पाडावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

माझे हिंदु/पुरुष/उच्चवर्गीय/ ऊच्चवर्गीय/पहिला मुलगा असणे हीसुद्धा matter of fact च आहे. आणी त्याचे 'परिणाम भोगणे' असली काही परिस्थिती आलेली नसून त्याचे वट्ट फायदे मी 'enjoy' करत आहे. तरी काळजी नसावी. >> माहितीसाठी अनेक आभार. फारच उत्सुकता होती तुमच्याबद्दल आणि काळजीदेखील. आता कसा जीव अगदी भांड्यात पडला.

तुम्ही तुम्हाला फायदा मिळत असताना त्याचा फेरविचार करणे अपेक्षित नाही पण थोडा वेळ निदान एकांतात तरी विरूद्ध बाजूने विचार करायला काय हरकत आहे. >> _/\_ पाया पडते. एकांतात आराक्षणाचा विचार करावा हे सुचलच नव्हतं आतापर्यंत. मी आपली अँजेलीना ज्योली, अर्जुन रामपाल यांचाच विचार करत बसले होते.

70-80 हजारानी किवा टक्क्यानी कोणी खाली -वर जात नसते. आणी माझ पण उत्तमच चाललय. >> मग का एवढं टेंशन घेताय?

------
बादवे एक कायतरी बोला, घास नक्की कोणाच्या तोंडचा पळवलाय? तुमच्या की त्यांच्याच जातीतल्या गरीब, ग्रामीणांचा?
आणि हो नोकरीतले आरक्षण फक्त सरकारी नोकरींसाठी आहे. माझ्या माहितीनुसार एकूण नोकरींच्या फक्त २% नोकर्या सरकारी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक दिली आहे. श्रेणी प्रतिसादातल्या अन्य मजकुराला नसून एकांतात ज्योलीबाई आणि रामपालबाबा यांचा (एकत्र किंवा सुटासुटा) विचार करणे या संकल्पनेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविशेठ, तुमच्याही डाव्या खांद्यावर तीळ नाहीयेका हो?

'रामपालबाबाचे समजू शकतो, पण ज्योलीबाईसुद्धा?', असा एक प्रश्न आमच्याही मनःपटलावर तरळून गेला खरा (बट वॉज़ अफ्रेड टू आस्क).

...................

प्रेरणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तुम्ही 'न'वी बाजू अन आम्ही 'ग'वि बाजू.

एकमेकांसारखे विचार मनात यायचेच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून एक जुना सरदारजी-विनोद उगाचच आठवला.

एकदा संतासिंग स्वतःकरिता रेल्वेचे रिझर्वेशन करावयास जातो. फॉर्मवर नाव, वय याचबरोबर 'सेक्स' असा जो रकाना असतो, त्यात 'फाइव्ह टाइम्स अ वीक' असे भरतो. (टीप: एवढ्याशा रकान्यात एवढे सगळे कसे लिहितो, अशी फालतू शंका काढू नये. हा विनोद आहे.)

खिडकीपाशी पोहोचल्यावर रिझर्वेशनक्लार्क त्यास सांगतो, "सरदारजी, असे नाही, त्या रकान्यात 'मेल' किंवा 'फीमेल' असे लिहावयाचे. जा, दुसरा फॉर्म नीट भरून घेऊन परत या."

संतासिंग पुन्हा नवीन फॉर्म भरतो. या वेळेस 'त्या' रकान्यात लिहितो: 'प्रेफरेबली फीमेल'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रामपालबाबाचे समजू शकतो, पण ज्योलीबाईसुद्धा?', असा एक प्रश्न आमच्याही मनःपटलावर तरळून गेला खरा (बट वॉज़ अफ्रेड टू आस्क१).

कुठे गेली तुमची 'न'वी बाजू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहितीसाठी अनेक आभार. फारच उत्सुकता होती तुमच्याबद्दल आणि काळजीदेखील. आता कसा जीव अगदी भांड्यात पडला.
>>> प्रत्येक विरोध करणार्याला पांचट बोलून भटकवण्याची technique टिंकू वापरत आहेत हे 'मार्मिक' श्रेणी देणारे विसरले की काय?
1) यावरुन आठवले, ढसाळ,ढाले यांच्या आत्मक्लेश दर्शवणार्या लेखन -
विधान - आम्हाला गावकुसात ठेवले.
पांचट प्रतिसाद - तुमचच वाक्य -"माहितीसाठी अनेक आभार"
2) राईट टू पी वाले -
विधान - आम्हाला 'पी' पण करायची प्रायव्हसी नाही
पांचट प्रतिसाद - तुमचच वाक्य -"फारच उत्सुकता होती तुमच्याबद्दल आणि काळजीदेखील"
3) LGBT वाले
विधान - आम्हाला अनैसर्गिक ठरवणारे कलम 377 परत लागू केले हो.
पांचट प्रतिसाद -तुमचच वाक्य -" आता कसा जीव अगदी भांड्यात पडला."
-------------
मी आपली अँजेलीना ज्योली, अर्जुन रामपाल यांचाच विचार करत बसले होते.
>>> एकाच वेळी अँजेलीना ज्योली, अर्जुन रामपाल व तेही एकाच वेळी म्हणजे आपल्या एकांतातल्या आवडी-निवडीची कल्पना थोडी बहूत आली. पण मुळ मुद्दा आहे की एकांतात नेहमी फ्यान्टसीच विचारात घ्यावी असे कुठयं. माझे म्हणणे- सार्वजनिकपणे आपल्या काही गोष्टी/मते/धोरणे चूक वा बरोबर कोणत्याही हालतीत defend कराव्या लागतात. उदा. चरित्र,जात,धर्म,ड्रिकिग, मुंबई-इंडियन(निदान महाराष्टीयांसाठी) or in your case अर्जुन रामपाल. मग तुम्ही बाहेर कितीही सांगा की तुमचा 'रामू' जगातला bestest/handsomest actor आहे पण स्वतःला तरी हे माहीत हव की रामू however harsh it may sound आपला आर्जु is not the bestest/handsomest.
-------------
बादवे एक कायतरी बोला, घास नक्की कोणाच्या तोंडचा पळवलाय? तुमच्या की त्यांच्याच जातीतल्या गरीब, ग्रामीणांचा?
>>> मी स्पष्टपणे उदाहरण देउन सांगितलंय की open असणार्या जागा/घास गरीब मागासवर्गीयांना द्यायच्या म्हणून घेतल्या गेल्या. व बहुतांशी श्रीमंत/शहरी गब्बर मागासवर्गीयानी घेतल्या.
-------------
आणि हो नोकरीतले आरक्षण फक्त सरकारी नोकरींसाठी आहे. माझ्या माहितीनुसार एकूण नोकरींच्या फक्त २% नोकर्या सरकारी आहेत.
>>>https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&ei=82eUVOTDCYvbuQSZ8o...
2008 मधील संघटित क्षेत्रात 2.75 कोटी पैकी 1.73 कोटी सरकारी क्षेत्रात आहेत. म्हणजे 65%.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

open असणार्या जागा/घास गरीब मागासवर्गीयांना द्यायच्या म्हणून घेतल्या गेल्या. व बहुतांशी श्रीमंत/ शहरी गब्बर मागासवर्गीयानी घेतल्या. >> तात्यांनु जागा ओपनच्या होत्या हे तुम्हाला कोणी सांगितल? जागा फक्त होत्या. शिक्षणव्यवस्थेचे अभिःसरण उच्चजातींमधे जास्त असल्याने त्याकाळी त्या क्षेत्रात त्यांचे प्राबल्य दिसायचे; म्हणजे काय त्या जागा त्यांच्या 'मालकीच्या' होत्या असे नव्हे. नंतर आरक्षण आले आणि एकूण जागांची जात्याधारीत लोकसंख्येनुसार वाटणी झाली. त्यात गरीब/श्रीमंत, शहरी/ग्रामिण असा काही भेद नव्हता. तुम्हाला असे वाटत असेल की श्रीमंत-शहरी मागासवर्गीयानी गरीब-ग्रामिण मागासवर्गीयांच्या संधी हिरावून घेतल्या; तर श्रीमंत-शहरी उच्चजातीयदेखील गरीब-ग्रामिण उच्चजातीयांच्या जागा हिरावूनच घेतात की.

संघटित क्षेत्रात 2.75 कोटी पैकी 1.73 कोटी सरकारी क्षेत्रात आहेत. म्हणजे 65%. >> फक्त संघटीत श्रेत्राचा विचार का करताय? 120 कोटींमधले फक्त 2.75 कोटी लोकंच नोकरी करतात किंवा पैसा कमवतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त संघटीत श्रेत्राचा विचार का करताय? 120 कोटींमधले फक्त 2.75 कोटी लोकंच नोकरी करतात किंवा पैसा कमवतात का>>>
कारण आरक्षण फक्त संघटीत क्षेत्रापुरत मर्यादित आहे. आणि असंघटित क्षेत्रासाठी sc st ना लोन दिल जात. पण मला st (wholly) व sc (तील कधीही आरक्षण न मिळालेले बद्दल काही बोलायच नाहीये. त्यांची condition genuinely खराब आहे. OBC व गब्बर sc यांच्याबद्दलची खरी परिस्थीती मला दाखवायची आहे.
-------------
उच्चजातीयदेखील गरीब-ग्रामिण उच्चजातीयांच्या जागा हिरावूनच घेतात की.>>>
अगदी बरोबर. पण ते गरीब-ग्रामिण उच्चजातीयांच्या नावावर काहीही मागत नाहीयेत. म्म्हणून ज्या जागा काही कारण नसताना obc ला देण्यात आल्या त्या तरी निदान परत मिळाव्यात.
-------------
V p singh नी जागा दिल्या त्याला पण नाही विचारत obc वाले. महानायकाच नावही घेत नाहीत . Sc नी तेवढं महानायकाला जिवंत ठेवलय. ST इंदिरा बाईंच नाव घेतात.
-------------
अवांतर- वरच्या प्रतिसादाला तुम्हीच निरर्थक श्रेणी दिली आहे काय?
-------------
इथ जागा कमी पडतेय म्हणून नवी कमेंट टाकतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

बाकीच्या प्रतिसादाला नंतर उत्तर देते. सध्या फक्त अवांतराबद्दल: नाही. मी ऋण श्रेणी फारफारच क्वचीत देते.
-----
Sun, 21/12/2014 - 05:09 हा प्रतिसाद वाचून चर्चा चालू ठेवण्याचा विचार रद्द केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यावाद. मी पण कंटाळलो होतो निरर्थक चर्चेला.काहीपण फायदा झाला नाही. जाउदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

भरपूर ताकद आणि भरपूर नम्रपणा हे कॉम्बिनेशन सर्वात दुर्मिळ असलं तरी सर्वात प्रभावी आहे.

सहमत आहे. नम्रपणा/त्या शक्तीचा विधायक उपयोग वगैरे दुर्मिळ आहेच.

आणि ताकदच नाही म्हणून नम्र हा सर्वात वाईट भाग.

नै कळले. यात वाईट असे काय आहे?

उलट असलेल्या कमी/अधिक ताकदीचा गैरवापर करणे सर्वात वाईट ठरू नये काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ताकद नसल्याने नम्र असणे हे "गैर" किंवा "अयोग्य" नव्हे. ते वाईट आहे असं म्हटलंय. आपापतः असे असणे वाईट, अनिष्ट इ.

नम्र असण्याची शक्ती आणि किंमत माझ्यामते नम्र नसण्याची पुरेपूर संधी असूनही नम्र असण्यात आहे.

पोमेरियनचे आपल्यावर केकाटणे आणि ग्रेट डॅनचे शांत बसून नुसते आपल्याकडे पाहणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पटलय. पण खोडसाळपणा म्हणून विचारतो, मग ती पावर कमावायचीच कशाला. फक्त स्वरक्षणासाठीच ना. मग डिफेंन्सिव खेळावे लागेल. पण offence is best defence. मग बुवा. आता आपण सल्लुभाई strategy वापरु- मेरा defence ही इतना तगडा है की मुझे offence की जरुरत ही नही पडती.(hello brother). पण यातपण एक गोची आहे मी फक्त defence करेन म्हटल की शत्रूला माझी strategy कळेल अन् defence weak होइल. त्यामुळे फार्फारतर(at its best) मनात आणी कृतीत defence पण दाखवायला/घाबरवायला offence अस कराव लागेल. पण अर्थातच this is not the best available and affordable strategy. नुसत defence करून गप बसलो तर offencer ला deter कसे करणार. उदा. रजपुत शरण आलेल्याना मारीत नसतात अस किंवा तत्सम म्हणून पृथ्वीराज चौहाननी घोरीला पराभव करुन, पकडून सोडून दिलं. परत अस करु नको म्हणून. मग पुढच्या वर्षी घोरी पृथ्वीराजला मारताना -
prithiviraj- But you promised...
ghori- yeah.well did I?
prithiviraj- off course. In fact Rajputs never lie or go back on their promises.
ghori- well ghories do. and we lie too. surprise,surprise. prithiviraj-लेकिन ये गर्दन नही झुकेगी
ghori-शिपुर्ड्यानो कापा र ती मान.आक् थू.
-------------
अन् त्त्याच्या शौर्याचा आदर करा म्हणून सांगतात आपल्या पुस्तकात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

पोमेरियनचे आपल्यावर केकाटणे आणि ग्रेट डॅनचे शांत बसून नुसते आपल्याकडे पाहणे.

"speak softly and carry a big stick; you will go far," - हे आवडीचे वाक्य आहे
....कारण जमत नाही अन ७ जन्मात जमेलसं वाटत नाही. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै कळले. यात वाईट असे काय आहे?
उलट असलेल्या कमी/अधिक ताकदीचा गैरवापर करणे सर्वात वाईट ठरू नये काय?
>>> गैरवापर म्हणजे? पावर गैर असते का? Do power(ring-one ring to rule them all Lol has its own mind.
लोकपाल चांगल्या चरित्रवाला पाहिजे. पण तोच जर 'बदलला' तर? त्याच्यावर कोण अंकुश ठेवणार? जनजनलोकपाल?
त्यामूळे पावर नसताना नम्र होण्याचा फालतूपणा करू नये. पावर असेल तरच नम्र होता/दाखवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

तात्यांनु जागा ओपनच्या होत्या हे तुम्हाला कोणी सांगितल? जागा फक्त होत्या. शिक्षणव्यवस्थेचे अभिःसरण उच्चजातींमधे जास्त असल्याने त्याकाळी त्या क्षेत्रात त्यांचे प्राबल्य दिसायचे; म्हणजे काय त्या जागा त्यांच्या 'मालकीच्या' होत्या असे नव्हे. नंतर आरक्षण आले आणि एकूण जागांची जात्याधारीत लोकसंख्येनुसार वाटणी झाली. त्यात गरीब/श्रीमंत, शहरी/ग्रामिण असा काही भेद नव्हता. >>>>>>
अहो मामा(की मामी), जागा कुणाच्याच नव्हत्या. तर तुम्ही जातीच्या आधारावर कस काय मागीतल्या.
चित्रपटव्यवस्थेचे अभिःसरण 'खान-कपूर-बच्चन' मधे जास्त असल्याने आजही त्या क्षेत्रात त्यांचे प्राबल्य दिसते; म्हणजे काय त्या जागा त्यांच्या 'मालकीच्या' आहेत? मंग येंवुद्या आरक्षण हामच्यापतूर बी. हान तेच्या मारी. आन् ह्या टायमाला वर्ण(म्हणजे काळेच गोरे नको),कमी उंचीचे(ह्याना नको सगळे खान बुटके आहेत),नकटे ह्याना आरक्षण देउ. अन ह्याच्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवल्याने तुम्हि व्हा नवीन महानायक.
-------------
शेवटचा टोच्या- तथाकथित मागास जातीत "मै दलित की बेटी हुं. अगर मुझे CM बनाया जाता है तो सबको CM बनाया जाता है","मी हाफ चड्डीत(म्हणजे हवालदार) होतो म्याडमनी मला वर(कडेवर?) घेतले म्हणजे सगळ्यानाच वर घेतले टाईप म्हटले जाते. पोलिओमुक्ती चालवीत असताना ह्यानाच आधी लस पाजल्यास आपोआप सगळीकडे लस पोहोचेल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.