संयोजकानो जरा इकडे लक्ष द्या!

संयोजकानो जरा इकडे लक्ष द्या!

आपल्याकडे शास्त्रीय संगीताचे जे सर्वत्र कार्यक्रम होतात त्यात वर्षानुवर्ष एक आचरटपणा अव्याहतपणे चालु आहे. तो म्हणजे कार्यक्रम सुरु होण्या अगोदर वाद्ये आणि ध्वनियंत्रणेच्या जुळवाजुळवीसाठी पडदा पाडलेला असतो. हे सर्व होई पर्यंत श्रोते/प्रेक्षक प्रेक्षागृहाबाहेर ताटकळत उभे ठेवलेले असतात. वास्तविक त्यांना प्रवेश देऊन बसवायला काहीही हरकत नसते.

मी वापरलेला आचरटपणा हा शब्द अनेकाना खटकेल याची मला खात्री आहे. पण जरा विचार करा...

एकही संगीताचा कार्यक्रम असा होत नाही की ज्यात एकदा जुळवलेली वाद्ये कार्यक्रम चालु असताना परत जुळवली जात नाहीत. तबले, तानपुरे आणि ध्वनियंत्रणा गाणे किंवा वादन चालु असताना मध्येच थांबुन जुळवली जातात. ध्वनि नियंत्रकाला सूचना देणे, त्याने मध्येच उडी मारून स्टेजवर चढुन माईक ऍडजस्ट करणे हे नेहेमीचेच असते. मग तेव्हा पडदा पाडुन लोकांना प्रेक्षागृहाच्या बाहेर का पाठवत नाहीत?

बरं, अनेक हॉल असे असतात की तिथे पडदाच नसतो. लोक येतील तसे बसवुन घेतले जातात कलाकार मंचावर आले की जुळवाजुळवी केली जाते आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते. हे सगळे श्रोत्यांसमोरच होते...

मग फक्त थिएटरमध्येच पडदा पाडुन लोकांना बाहेर ताटकळत ठेवायची शिक्षा का दिली जाते?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरं आहे. अत्यंत गहन प्रश्न आहे हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. अजून एक प्रकार म्हणजे वेळेवर सुरू करणे आणि प्रत्येकाने ठराविक वेळेत संपवणे.
गेल्याच आठवड्यात नेहरु सेंटरला ईंदियन म्युझिक फेस्ट मध्ये प्रत्येक दिवशी ३ कलाकार कार्यक्रमची वेळ ६.३० ची सुरू व्हायचा २०-२५ मिनिटं उशीरा. पहिले दोन कलाकार तब्येतीत सादरीकरण करणार आणि उरलेला तिसरा पाउण तासात कसाबसा उरकणार.
संकेताप्रमाणे लोकप्रिय आणि श्रेष्ठ कलाकार शेवटी असतो . त्यामुळे त्याला ऐएकायला येऊनही या प्रकारामुळे निराशा पदरी पडते. रशिदखान आणि परवीन सुलताना या दोहोंच्याही बाबतीत हाच प्रकार . हाईट म्हणजे परवीन सुलताना गायला बसल्याच १० नंतर त्यात संयोजकांची रसभरीत इन्ट्रो वैगेरेमुळे सुरुवान १०.३० ला आणि ११.१० पर्यंतच वेळ मिळाला त्यांना. त्यांनी "मुझे हमेशा कम समय मिलता है " अशी तक्रारही केली स्टेज वरून. वेळेवर सुरू करण आणि वेळेचं बंधन आधीच्या कलाकारांना घालणं कठीण जात असेल तर तीन तीन कलाकार चार तासात बसवावेच कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद रंजक आहे. सध्या "कलाकार बसवणे" या वाक्प्रचारावर विचार करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin हा हा ! घाईत लिहीलं . मलाही आता मजा वाटतेय त्या वाक्याची. पण बाकी प्रतिसादात काय रंजकता दिसली ते काही कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैफिलीचे चित्र डोळ्यासमोर आल्याने रंजक वाटला बाकी काही नाही. (खवचट श्रेणीकडे लक्ष देऊ नये).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी निवेदक्/संयोजक गप्पा मारतात मग कलाकार स्वतः गप्पा मारतात. २० मिनिटांची खराबी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमी वेळात जास्त कलाकार कोंबू पाहण्याचा अनुभव सवाईतपण येतो. जरा कुठे गायक/वादक स्थिरस्थावर होतोय, तोवर घड्याळं बघायला/दाखवायला सुरुवात होते.

केवळ वाद्य जुळवायला म्ह्णून थेट्राबाहेर ताटकळत ठेवल्याचा अनुभव मला अजून यायचाय.

बाकी, कार्यक्रम चालू असताना मधेच होणारी वाद्यांची जुळवाजुळव (थोडीफार, जास्त लांबली नाही तर) मला आवडते समहाऊ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, असाच प्रकार २००८ च्या वंसतोत्सव मधे अनुभवला होता. किशोरीताई अमोणकर वेळेवर पोहचल्या होत्या पण त्या आधी सादर होणार्‍या कार्यक्रमातले कलाकार उशिरा आल्याने किशोरीताईंच्या कार्यक्रमाला उशिर झाला. जरा कुठे मैफील जमत होती तर तेवढ्यात रमणबाग परिसरातल्या लोकांनी तक्रार सुरु केली की कार्यक्रम बंद करा वेळ संपली आहे (त्याचंही बरोबरच होतं म्हणा) त्यामूळे किशोरी ताईंना कार्यक्रम अक्षरशः अर्ध्यावरच उरकावा लागला. आधीचे कलाकार वेळात आले असते तर रसिकश्रोत्यांना किशोरीताईंच्या कार्यक्रमाला मुकावं लागलं नसतं. (ईफ आय अ‍ॅम करेक्ट देन, राहूल देशपांडे मुळेच पुढच्या कार्यक्रमांना उशिर झाला होता. अजोबांचाच उत्सव आहे म्हंटल्यावर हा नातू गात सुटला होता. अगदी नाना पाटेकर अता थांब बाबा म्हणत होते तरी हे देशपांड्यांचं शेंडेफळ काही थांबत नव्हतं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही फिल्मी आणि काही रोमेंटिक आयडीयाज घेऊन कव्वालीचा कार्यक्रम प्रथमच अनुभवला तेंव्हाची गोष्ट .एका विस्तीर्ण पटांगणात स्टेज आणि व्हीआयपी साठी मुबलक जागा ठेवून मागे आमच्यासाठी उंच सखल मैदानात खच्चून खुर्च्या मांडलेल्या होत्या .खुर्चीवर बसले कि खड्ड्यात पडल्यासारखे होऊन फक्त समोरची रेमी डोकी दिसत होती . बाजूला स्क्रीन वगैरेच्या सोयी करायला ते सोयीस्कर विसरले होते . त्यामुळे स्टेजवरचे नाट्य जर काही झाले असेल त्याची गंधवार्ता आम्हाला नव्हती .
सातच्या कार्यक्रमाचे audio टेस्टिंग पावणे आठपर्यंत सुरु होते . साडेआठला दुसरी पार्टी आली तिने नऊवाजेपर्यंत audio तपासला . दहा वाजेपर्यंत बाहेर कार्यक्रमाची मुभा असल्याने कव्वाल्याऐवजी audio टेस्टिंग हा मेन आयटम
पदरी पडला . खालीस उर्दू मध्ये पहिल्या कव्वाल मुनव्वर मासूमने जी काही एके ४७ चालवली त्याने आमचे मुडदे बशिवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच कदाचित कुणी लै डोक्याला शॉट दिला की अमरावतीत " बन (बंद) कर बे तुया कव्वाल्या " असं म्हणत असावेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एक कळत नाही. पाश्चात्य संगीतात सिम्फन्यामध्ये जी व्हायोलिनकुळातील आणि इतर तंतुवाद्ये वाजवतात ती अशी मध्येच सिम्फनी थांबवुन जुळवली आहेत असे होत नाही. फक्त भारतीय वाद्यांचेच असे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती वाद्य बहुतांशी गज घासून वाजवायची असतात, उदा. व्हायोलिन, चेलो वगैरे. यांत तारांवर फार जोर पडत नाही. आपली बहुतांशी सर्व वाद्य तारा छेडून/ओढून्/आघात करून वाजवायच्या प्रकारातील आहेत, उदा. तानपुरा, सरोद, संतूर वगैरे. त्यामुळे तारांवर जोर पडून ट्यूनिंग बिघडत असावं. शिवाय व्हायोलिन वगैरे मध्ये तारांची लांबी कमी असते, सबब त्यावर तापमानातील/हवेतील बदलांचा तितकासा परिणाम होत नसावा. याउलट च्यायला तानपुरे कधी कधी साधा पंखा लावला तरी सुराला हलतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला या संगितातलं काहीही कळत नाही परंतू असले घोळ ऐकले की वाटतं प्रत्यक्ष कार्यक्रम चांगल्या रीतीने सादर करावेत. यात तीन गटांचा गोंधळ असतो असं वाटतं १)संयोजकांवर असणारा कलाकारांचा अहंकाराचा दबाव २)कलाकारांचा मलाच काय ते गाणं येतं बाकीचे केकाटतात हा समज ३)वाद्यवृंदातला एखादा जण ऐनवेळेला दुसऱ्या कार्यक्रमाला जातो आणि इतरांना गोत्यात आणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉइंट (= तथ्य) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तबलजी कडे एक स्टीलची हातोडी असते त्याने तो तबल्याच्या वादीला वरुन खाली कधी खालून वरती अलगद ठोके मारतो. अस करताना तो बोटाने तबला वाजवतो. काय भानगड असते हो ती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तबला जुळवायची/लावायची पद्धत आहे ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे प्रश्न खरे पण इथे कोणी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे संयोजक आहेत काय ? शिवाय एवढे मोठेमोठे कलाकार (इथे दोन्ही कानाला हात लावायची स्मायली कशी द्यायची ?) स्वतःला या पद्धतीत कोंबून घेतात तर बापुड्या प्रेक्षकांनी काय करावे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संयोजकाने हातात चाबूक ठेवावा. अमक्याला ठरवले की तू सात ते साडेसात याच वेळात काय ते तुझे कसब दाखवायचे आणि एवढे तुझे मानधन. साडेसातपर्यँत हातोडी मारत बसलात तर रिकामे पाकीट देईन. तरच हे कलाकार ताळ्यावर येतील लाड हट्ट अजिबात खपवायचे नाही.
संयोजक हा संगीताचा जाणकार हवा असं नाही तो फक्त चांगला कडक मास्तर हवा.
गुरु शिष्य पद्धतीनेही कलाकारांचा अहं वाढवला जातो ती टुकार परंपरा संगिताला मारक ठरली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टुकार परंपरा?! आर यू सिरियस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टुकारबद्दलचे मत गायकांनी(शिष्य) सांगितलेल्या गोष्टीवरूनच बनवावे लागले आहे. गुरुलोक भाव खातात काही दिवस शिकवतच नाहीत वगैरे. कार्यक्रमात माझे नाव सांगितलेच पाहिजे, दुसरा पुढे जाऊ नये म्हणून अंगठा काप इत्यादी.
फारतर असे सांगावे 'अमुक एक दहा राग प्रत्येकी चारवेळा गाऊन दाखवेन त्याचे एवढे मानधन' किती आत्मसात करायचे ते तुझे तू बघ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह!
पण तुम्हाला 'गुरुशिष्य' परंपरेऐवजी, 'गुरुकुल' पद्धत म्हणायचे होते का मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर्कतीर्थ यांच्या मताशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकात गुरुकडून गंडा बांधून घेतात आणि गुरुकुलात गुरुगृही राहून बरेच जण शिकतात सध्या गुरुकुले कमी असावीत असे वाटते नालंदा सारखी विद्द्यापिठे नंतर झाली नाहीत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0