नक्की किती पैसे पुरेसे?

नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.

तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे

आपल्या "पाना"त कायकाय घटक येतात त्यावर खर्चाचे प्रमाण बरेच बदलू शकते.

कोंकणातल्या खेड्यात राहात आहात असे लिहीले आहे. अर्थातच निवृत्तीनंतर हल्लीच गेला असणार असं वाटतं. खेडेगावातली राहणी, वातावरण लाँग टर्ममधे तुम्हाला चालणार आहे का? आठवड्याची निसर्गरम्य खेड्यातली सुट्टी आणि गावगाड्यातलं रोजचं राहणं यातला फरक पचनी पडणार आहे ना? हे सर्व आधीपासून सवयीचं असेल तर प्रश्नच नाही, पण बहुतांश वेळा असे खेड्यात जाऊन राहण्याचे प्रयत्न अल्पजीवी ठरतात आणि शहर का भूला शहेर वापस आ जाता है.

अगदी तसं नसेल तरी वाढत्या वयानुसार एखादीजरी व्याधी त्रास देऊ लागली तर खेडेगावापेक्षा वैद्यकीय सुविधांसाठी शहर बरं असं वाटून शहराकडे परत येणं होऊ शकतं.

असं झालं तर मात्र खर्चात बराच फरक पडेल आणि सोळा हजारात दोघांचा महिना नक्कीच निघणार नाही..

त्यामुळे सध्याच्या सर्व लिव्हिंग कंडिशन्स आहेत तशाच राहतील किंवा कसे याचा पुन्हा विचार करुन मगच पैसा पुरेल किंवा नाही हे ठरवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोळा हजार आज पुरत असतील. पण दरवर्षी त्या खर्चात १०% वाढ पकडा, महागाईच्या साधारण दराएवढी. तुम्हाला व्याज १६०००च मिळत राहील पण असलेला खर्च, त्याच गरजांसाठी, १० टक्यांनी वाढेल दर वर्षी. हाही विचार करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्ही स्वेच्छा-निवृत्ती घेण्याआधी यावर काहीच विचार केला नव्हतात? मी हे खरोखर गंभीरपणे विचारतेय कारण मी यावर गेले वर्षभर विचार आणि calculations च करतेय. (मी अतीविचार करतेय की काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अतीविचार करतेय की काय?

मला नाही वाटत. आयुष्यास मोठ्ठी कलाटणी आहे तेव्हा जपूनच अन विचारपूर्वकच निर्णय घे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षे तरी रोजगार करावा. कमी पगाराचा मिळाला तरी चालेल ही भूमिका घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मल्टिनॅशनल मध्ये काम केले त्याअर्थी पगार चांगला असावा. त्यामुळे खर्चिक जीवनशैलीची सवय लागलेली असू शकेल.

मागे उपक्रमावरील एका चर्चेत निवृत्तीच्या वेळी २ कोटी रुपये शिल्लक हवेत असा हिशेअ निघाला होता. तेव्हा बघा....

हातपाय धड असेपर्यंत काही ना काही काम करीत रहावे. त्याने आजारपण लांब राहते. शिवाय रिकामा वेळ म्हणजे खर्चाला वाटा.
अजून १० ते १५ वर्षे काम करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अबब २ कोटी :O
शक्य आहे ...... निवृत्ती हे मृगजळ आहे रे बाबा मृगजळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचा.....

http://mr.upakram.org/node/2601#comment-41152

सगळा धागाच वाचण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अतिशय माहितीपूर्ण चर्चा झाली आहे उपक्रमावर ,दुव्याबद्दल धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

ऐसीवरही याबद्दल चर्चा झालेली www.aisiakshare.com/node/2962

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओकिनावा ह्या जपानी शहरात बोलल्या जाणार्या भाषेत म्हणे निवृत्ती हा शब्दच नाही. पण तिथले सरासरी आयुर्मान १०० वर्षे इतके आहे. लोक 'रिटायर' होत नाहीत.ऑफिसातून निवृत्त होणे ज्याला आपण म्हणतो त्याला त्या भाषेत 'आयुष्याचे ध्येय बदलणे' असे काहीसे म्हणतात. आपल्या शक्तीनुसार, आवडीनुसार, आणि उपलब्ध संधीनुसार काहीतरी करत राहायला हवे. सध्या २ कोटी ध्येय ठेवू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारण ८० वर्षे वयानंतर मुला-बाळांनी भरलेल्या घरातही माणसाला कंटाळा येतो असे निरीक्षण आहे.
किती वय झाल्यावर प्राणघातक वगळता इतर आजारांवर उपचार करायची गरज नाही याची कल्पना नाही. म्हणजे समजा ७० वय झाल्यानंतर एक डोळा किंवा एक किडनी निकामी झाली तरी चालेल असे काही कॅल्क्युलेशन लोक करतात का?
लाईफस्टाईल अनकॉम्प्रमाईजेबल असते का? (बापूजी केवळ सूतकताई करून जगले).
फायनॅन्शियल अ‍ॅनालिसिस आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट शिकत असताना रिटायर्मेंटला आलेल्या लोकांसाठी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कशी करावी ते वाचले. ज्या क्लायंटचा कॅशफ्लो "डिझायर्ड" लाईफस्टाईलसाठी पॉझिटिव्ह आहे तो "वेल टू डू" हा कॉमन सेन्स झाला पण त्याला दोन बाजू असूनही दुसर्‍या बाजूबद्दल फार कमी बोललं जातं.
म्हणजे गरजा इच्छा कशा कमी करता येतील किंवा शरीर थकणं स्वाभाविक आहे पण म्हणून रोगग्रस्त झालंच पाहिजे असं नाही. रोग झाल्यावर औषधे घेण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काय काय करता येईल याचीही चर्चा व्हावी असं वाटतं.

असो. जोपर्यंत शरीर भरपूर अ‍ॅक्टिव्ह आहे तोपर्यंतच रिटायर होण्यात मजा आहे. त्यादृष्टीने ५० हे योग्य वय वाटते. योग्य वे़ळी रिटायरमेंट घेतल्याबद्दल अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारण ८० वर्षे वयानंतर मुला-बाळांनी भरलेल्या घरातही माणसाला कंटाळा येतो असे निरीक्षण आहे.

कंटाळा येणं इज अ डिफरंट थिंग आणि संसाराचा, त्यात गुरफटण्याचा, आपला प्रत्येक गोष्टीत "से" असण्याचा आणि सर्वांसोबत एकत्र असण्याचा मोह (?! की इच्छा) सुटणं ही पूर्ण वेगळी गोष्ट. ते सुटत नाही शंभरीतही असंच निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मासिक प्राप्ती आणि खर्चाची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे हे उत्तमच आहे.
आता त्या नुसार गरजा अ‍ॅडजस्ट करा की काही प्रश्न येणार नाही.

अडिअडचणीला एफ्डी आहेच. शिवाय गेल्या ५० वर्षात गरजेला धावून येणार चार माणसं जमवली असतील, तर सुशेगाद रहा!
शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चीजपफ +१
गावाकडचा शेतकी जीवनातला माणूस सावकाश पिकलंपान होतो. शहराकडचे आक्रसताळेपणा फार करतात सर्वच बाबतीत. हातपाय धड असतांना यांना काही सुचत नाही ते नंतर काय उजेड पाडणार ध्येयबदलवगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>गावाकडचा शेतकी जीवनातला माणूस सावकाश पिकलंपान होतो.

म्हणजे काय हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.