कार्टून्स आणि कॉमिक्स

… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती .

"काकू नितीन आहे ?"

"हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . "

मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती .
"आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत .

……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .

…… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत .
मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती .

……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत .

कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (6 votes)

प्रतिक्रिया

अतिशय संवेदनशील मनातून आलेला लेख.. जिओ..

आयडी शोभत नाही अश्या जिंदादिल व्यक्तिमत्वाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@गवि - दिलदार प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मस्तं लिहिलय. खूप आवडलं!
जर तुम्ही डोगाचे फ्यान असाल तर एक खुशखबर आहे. डोगावर सिनेमा येणार आहे, बहुदा फुडल्या वर्षी... कश्यप साहेब काढणार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

@ढेरे साहेब , डोगा पण आवडता आणि कश्यप तर अति आवडता . डबल धमाल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

कोण आहेत हे लोक?

आम्हाला लोथार, मॅण्ड्रेक, फॅण्टम हे ऐकून आणि स्पायडरमॅन, नॉडी, बॉब द बिल्डर, टॉम, जेरी, मिकी, डोनाल्ड, पॉप-आय हे पाहून माहिती आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमच्या ओबेलिक्सला तोड नाही.

(कोणी 'माहितीपूर्ण' नाही देणार काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडकाऊ दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आपले उपकार मी आजन्म विसरणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅस्टेरिक्स-ओबेलिक्स माझेही प्रचंड आवडीचे आहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<जाहिरात मोड>गॉलला जाऊन, अ‍ॅस्टेरिक्स नि ओबेलिक्सला भेटून, अ‍ॅस्टेरिक्सशी हस्तांदोलन करून नि अ‍ॅस्टेरिक्स आणि ओबेलिक्सबरोबर (ओबेलिक्सला मिठी मारलेल्या पोज़मध्ये) फोटो काढवून घेऊन, इम्पेडिमेण्टाचा हात हातात घेऊन तिला झुकून अभिवादन करून, आणि क्याकोफोनिक्साला पोराची ओळख "हासुद्धा व्हायोलिन वाजवतो बरे का, काय समजलास?" अशी करून देऊन (पुढची "तुझ्यासारखाच कर्कश्श आवाजात; तुला कॉम्पिटीशन आहे!" ही वाक्ये अर्थातच स्वगत) आलेलो आहे, आहात कुठे?</जाहिरात मोड>
...................

त्या पॅनेकियाने मात्र (बहुधा आमच्या त्या एकंदर अवताराकडे पाहून असावे) आमच्याकडे पाहून नाक मुरडले, ते काही झेपले नाही. बोले तो, तिचे अगोदरच (त्या ट्र्याजिकॉमिक्साबरोबर) ठरलेले आहे, हे कळल्यावर ओबेलिक्साचा कसा प्रेमभंग झाला होता, अगदी तस्सा तिने नाक मुरडल्यावर त्या क्षणी आमचाही (तात्कालिक) प्रेमभंग झाला. (तो ट्र्याजिकॉमिक्स मात्र लेकाचा कुठे दिसला नाही. बहुधा सीझरने पुन्हा पकडून कुठल्यातरी युद्धावर धाडला असावा. मूर्ख लेकाचा! आणि ही भवानी मात्र इथे ऑफ ऑल द पीपल क्याकोफोनिक्साबरोबर गावभर उंडारत होती. ज़माना बदल गया है, आणखी काय? ५० बी.सी. विरुद्ध २०१३ ए.डी., इतका फरक तर चालायचाच! असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओये होये क्या बात है! सुंदर नबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्याची तमन्ना होती ती! (अर्थात, "आता आम्ही मरायला मोकळे!" असे इतक्यातच म्हणणार नाही - आयुष्याच्या आणखीही बर्‍याच तमन्ना अजून पुर्‍या व्हायच्या बाकी आहेत - पण तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा खरय.
हझारो ख्वाहीशें ऐसी के हर ख्वाहीश पे दम निकले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉगम्याटिक्स् होता काय तिकडे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्हता. Sad

दिसला नाही कुठे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्तच आवडलं. एक नंबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुंदर. खुप छान लिहीलयत.

आमचं लहानपण कार्टून फिल्म पेक्षा अमर चित्र कथांनी भारलेलं होतं. टॉम-जेरी कधीतरी, प्ण गुंगून जाउन बघायचे . माझ्या लेकीच्या लहानपणची सोबत म्हणजे नॉडी, ऑसवाल्ड, पिंगू, कीपर ही अतिशय आवडती कार्टून्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूप आवडला. शाळेनंतर कार्टून्स बघणं सुटलं ते सुटलंच. अर्थात आपल्या वेळी फारसे अ‍ॅनिमेशन आणी कार्टून्स चे प्रोग्रॅम्स नसायचेच. हि-मॅन, गायब-आया, मिकी-गूफी-डॉनल्ड मनापासून आवडायचे. खूप वर्षांनी नंतर छोट्याबरोबर पुन्हा कार्टून्सशी संबंध आला. (कधी कधी तो नसतानाही चॅनलसर्फिंग करता करता क्युरियस जॉर्ज किंवा बॉब-द-बिल्डर दिसला की थांबून बघत बसतो).
रच्याकने: कार्टून्स बघणं खरंतर सगळ्यांनाच आवडत असावं. म्हणूनच अजून हमशकल्स, हिम्मतवालासारखे पिच्चर निघतात आणि चालतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

लेख आवडला. विशेषतः पहीले २ प्रसंग फार टचिंग आहेत Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे फेवरैट्ट स्पायडरम्यान, डक टेल्स आणि टॉम अँड जेरी किड्स. मला जेरी कधीच आवडला नाही. नविनमधे डोरेमॉन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेखन.
------------
लोक साले मोठेपण लादतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोक साले मोठेपण लादतात.

हाहाहा खरय Smile
परवा सिंडी, डॉना अन मी कॉफी प्यायला चाललो होतो. सिंडी म्हणाली कधीकधी मी एखादी ४५-५० शीची स्त्री पहाते अन मनात म्हणते ह्म्म ही म्हातारी दिसतेय अन थोड्या वेळाने माझ्या लक्षात येते अरे मी याच मकाम वर आहे की. मीच आहे की तशी ROFL
हाहाहा आम्ही तीघी इतक्या हसलो. आपल्या मनात आपण कुठेतरी २० शी तच असतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लादून घेऊ नका! सोपे आहे.

(बाकी, बाकीच्या इतक्या गोष्टींत इतके इनकॉरिजिबल आहात, तर नेमक्या याच बाबतीत इनकॉरिजिबिलिटी कुठे केळी खायला जाते?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनकरोजिबल हे अनादरयुक्त विशेषण आहे. जनरली वारंवार चुभूद्याघ्या करणारे तुम्ही इतके बेधडक कसे झालात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'इनकॉरिजिबल' - अ‍ॅज़ इन वन हू कॅनॉट बी करेक्टेड - यात अनादरात्मक असे नेमके काय आहे?

(मी स्वतः अनेक बाबतीत इनकॉरिजिबल असू शकतो. महात्मा गांधीसुद्धा होते. (किंबहुना, गांधींबद्दल आदर याच कारणाकरिता वाटतो.))

जनरली वारंवार चुभूद्याघ्या करणारे

ओह, ते होय!, द्याट, आय याम जष्ट बीइंग जनरस. जष्ट अ कॉमन कर्टशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनकरोजिबलला मराठीत अडेलतट्टू म्हणता येईल म्हणून म्हटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकि तुमची मोठे पनाचि व्याख्या काय आहे ते पण मह्त्वाचे आहे ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

कोणे एके काळी कार्टून्सवरती केलेले खंडकाव्य आठवले. घरच्या रद्दीत कुठे पडले आहे कोण जाणे. निंजा रोबोट्सवरच्या आर्या तर परवापरवापर्यंत दिसत होत्या. असो, पहाव्या लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निंजा रोबोट्सवरच्या आर्या

हे फ्युजन भलतंच आहे! सापडतात तर बघा जरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्सार, नक्की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लहानपणी मला अफिकेच्या जंगलातला फँटम तेवढा वाचल्याचे आठवते. त्याचे कॉमिक मी वाचनालयात अवश्य वाचे. भलाथोरला लोथार, जादूगर मँड्रेक, आणि चाचा चौधरी माहित आहेत. पण जास्त आवडले नाहीत आणि आठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी सगळे लोक (ही/सुपर्/स्पायडर मॅन) वगैरे तर बघायचोच, पण हे कार्टून प्रचंड आवडलं. डीडी वर लागायचं कधीतरी.
बाकी सगळ्यांपेक्षा सर्फर वेगळा होता. एकतर त्याला पृथ्वीचं बंधन नव्हतं- तो अवकाशात कुठेही कसाही संचार करू शके. आणि त्याच्याकडे असलेला पॉवर कॉस्मिक काहीच्या काही पॉवरफुल होता.
दुसरं म्हणजे त्यातले दुष्ट लोक वेगळ्याच पातळीवर होते. त्यांचे उद्देश आणि महत्त्वाकांक्षा ह्या वैश्विक होत्या! उदा. गॅलॅक्ट्स हा दुष्टात्मा केवळ भूक लागली म्हणून एकेका ग्रहाचा फडशा पाडी. त्याला त्यावरील जीवसृष्टीशी काहीच देणंघेणं नसे. आणखी एक दुष्टात्मा थॅनोस ह्याचा उद्देश होता पूर्ण विश्वाचा संहार.

हे असे कार्टून्स लहान मुलांसाठी नव्हते. त्यातल्या कल्पना आणि व्यक्तिचित्रं खूप प्रगल्भ होती.
सांगायचा मुद्दा असा की -

आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती

हे अनेक पातळीवर पटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पीकिंग ऑफ सीरियस कार्टून्स- इथे कुणी बॅटमॅन दि अ‍ॅनिमेटेड सेरीज़ नामक कार्टून सेरीज़ पाहिलीये का? ती प्रेक्षक व टीकाकार या दोहोंनी मुक्तकंठाने गौरवली आहे. इतके डार्क आणि सीरियस कार्टून आजवर नाही पाहिले. त्यामुळे लैच खोलवर आवड रुजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस्सार.... आयाम द व्हेन्जन्स, आयाम द नाईट, आयाम ब्याट्म्यान!!!

जस्टिस लीग पण भारी होती राव... विशेषतः त्याचे टायटल म्युझिक....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

CERTIFICATE

To whomsoever it may concern.
This is to certify that, I have examined Mr. अजो and find that he has not grown up at all.

sd/-
aadkittaa

खुश? झालं समाधान?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

खुश तर आहेच.
====================
पण बाकी ऐसीकरांची प्रमाणपत्रं कुठं आहेत? लोक काही माझ्या एकट्याचेच दुश्मन (जे काय ते) आहेत म्हटलं नै मी. सेल्फसर्टिफाय करा पैले आणि समद्याला पर्मानपत्र धाडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेखन ठीक.
हल्ली मुंबई, बंगळूरूसारख्या महानगरांमध्ये "कॉमिकॉन्स" होत असतात नी त्याला भरपूर प्रतिसादही मिळतो. कॉमिक्स हे "लहान मुलांचे चित्रांचे पुस्तक" याहून अधिक काही आहे याची जाणीव हळुहळू पसरत आहे हे ही नसे थोडके.

बाकी कोणाचे व्यंगचित्रांसाठी (व एकुणच कोणत्याही कलेद्वारे अभिव्यक्त होताना) कोणतीही गोष्ट, चित्रीकरण, रुपके, प्रतिमा वर्ज्य नसतात ही बाब लोकांत रूजू लागेल तो सुदिन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लागेल तो सुदिन!

आमच्या असं निदर्शनास आलं आहे कि तुम्ही खूप प्रकारच्या सुदिनांची वाट पाहत असता. हे होइल तो सुदीन , ते होइल तो सुदीन असं आपलं नेहमी चाललेलं असतं. आता मोदी आल्यावर सुदिनांचं वेळापत्रक पुरोगाम्यांना ५ ते १० वर्षे पोस्टपोन करायचं आहे. संघनन कँप तर आज निघाला नै ना, मिळवली म्हणत दिवस काढायचे.
माणसाचे सगळे दुर्गुण उत्क्रांतीजन्य आहेत आणि आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्तीचं व्यंग काढलं तर इगो हर्ट होतो, राग येतो हे नैसर्गिक आहे. हे जीन्समधे आहे, ते जाईल कसं नि सुदिन येईल कसा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रतिसादासाठी २१ तोपों दी सलामी दा ठ्ठो बनता है.

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

ठ्ठो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं