पेमा शॉदरॉन - "Be grateful to everyone"

पेमा शॉदरॉन यांच्या "Start where you are" पुस्तकातील एक उत्तम प्रकरण "Be grateful to everyone" वाचनात आले. अतिशय आवडले कारण त्याच्याशी रिलेट होऊ शकले.

"Be grateful to everyone" या स्लोगनचा अर्थ असा नाही की गुंडांनी मारहाण केली तरी तुम्ही त्यांच्याशी कृतज्ञ रहा. तर या स्लोगनचा अर्थ आहे की कटु अथवा गोड, प्रत्येक प्रसंगातून काही शिकण्यासारखे मिळतेच. आपल्याला आवडणार्‍या व्यक्तींबद्दल आपली काहीच तक्रार नसते पण न आवडणार्‍या व्यक्ती देखील कदाचित आपल्या आयुष्यात काही एक मूल्य शिकवण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी आलेल्या असतात. बरेचदा या व्यक्ती जवळच्या नात्यात असतात अन त्यांच्यापासून सुटका अशी नसते, Almost every day, all the time they push our buttons. मग तो कधी नवरा असेल, कधी बायको-बहीण-वडील-मुलगी-बॉस. बरं आपण काय भोगतो अन आपली कशी चिडचिड होते ते कोणाला सांगता येत नाहीच पण सांगीतलं तर कळतही नाही.

पेमाच्या मते जेव्हा अशी चिडचिड होते, तेव्हा तुम्हाला आरशात बघण्याची गरज असते. तुम्हाला, अंतर्मनात डोकावून हे जाणण्याची गरज असते की जो गुण-विशेष तुम्हाला इतका त्रास देतो आहे, तो तुम्ही स्वतःला नाकारत आला आहात. उदा- जेव्हा मला माझा नवरा अति गभीर, उदास अन नेहमी मयत झाल्यासारखा चेहरा करुन वाटतो तेव्हा मला हे जाणून घेतले पाहीजे की मी स्वतः पुरेशी गंभीरतेने गोष्टी बघत नाही कारण मी तो एक दोष मानून त्या गुणविशेषाला नाकारते.

जेव्हा मला माझी बहीण अति भावनाप्रधान अन cry-baby वाटते तेव्हा माझ्या लक्षात हे येत नाही की मी स्वतः नीरस अन शुष्क आहे, रुक्ष आहे, मी भावनेला कःपदार्थ मानते अगदी हवे असते त्या ठीकाणीही भावनेचे योग्यसुद्धा प्रदर्शन टाळते. मी काहीतरी नाकारते अन तोच गुण इतर लोक माझ्यावर "कर्म" म्हणून प्रक्षेपित करतात.

आशिता नावाच्या एक बुद्धीस्ट टीचर सांगतात, की जर सगळच hunky dory असेल तर मनुष्याला खाचाखळगे, blind spots दिसत नाहीत अन मग मनुष्य पडण्याचा अधिक धोका असतो तेव्हा हे annoy करणारे लोक ही आयुष्यातील एक गरज आहे. आशिता या तिबेटला जाणार होत्या अन त्यांनी ऐकले की तिबेटीयन लोक हे अतिशय आतिथ्यशील, मनमिळाऊ व प्रेमळ आहेत अन त्यांना अज्जिबात कसलीही तोषिस पडणार नाही. त्यावर त्यांना वाटाले की हे काही बरोबर नाही कोणीतरी buttons push करणारं हवच म्हणून मग त्यांनी एका बंगाली, चहाच्या टपरीवरील कीरकीर्‍या, चिरचिर्‍या मुलास बरोबर घेतले. पण तिबेटला गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की अरे हे लोक तर सर्वसामान्यच आहेत अन इतकेही मनमिळाऊ वगैरे नाहीत Smile तेव्हा त्या मुलाची काही गरज नव्हती .... पण असो, तो झाला वेगळा भाग.

तर हा जो बंगाली चहाविक्रेता असतो तो मनुष्य कसा असतो तर आपण मारे त्याला, घराचं पुढचं दार सताड उघडून आत घ्यावं, स्वागत करावं अन तो जातो थेट basement मध्ये किंवा माळ्यावर अन अडगळीच्या आपण दृष्टीआड केलेलली प्रत्येक वस्तू घेऊन येतो अन आपल्याला दाखवतो, विचारतो - ही वस्तू तुमचीच आहे ना? तर असे हे annoy करणारे आपले नातेवाईक-बॉस-मित्र. जेव्हा सगळे तुमचं कौतुक करतायत, तुमच्याशी सहमत होतायत, सगळं कसं दृष्ट लागावी असं चाललं आहे तेव्हा हे लोक खुसपट काढतात, निंदा करतात, अडथळे आणतात.

२० व्या शतकात गुर्जिएफ नावाचे एक टीचर होऊन गेले. एक वेगळच अवलिया व्यक्तीमत्व होतं ते म्हणजे. He liked to tighten the screws of his students. म्हणजे जर शिष्य म्हणाला की त्याला महाविद्यालयातील प्राचार्य व्हायला आवडेल्/आवडले असते तर मुद्दाम त्या शिष्याला जुन्या कार विकायच्या कामावर ठेवणार असे होते गुर्जिएफ. तर पॅरिसला एका मॅनोर मध्ये ते शिकवत. त्या समाजात एकदम विचीत्र अन चिरचिरा एक माणूस होता. प्रत्येक लहान गोष्टीचा बाऊ करायची त्याला सवय होती. Throwing tantrums तर त्याच्या हाडामासी मुरलेले होते. तक्रारखोर अन एकदम annoying स्वभाव असलेल्या त्याच्याशी सगळेजण जपूनच असत. कोणी फारसं त्याच्या नादी लागत नसे.

एकदा हिरवळीवर काही कागद म्हणा काहीतरी कापून दुसरीकडे ठेवायचे काम त्याला व काही लोकांना दिलेले होते. त्याच्याने ते होईना अन तो इतका वैतागला की last straw on camel's back न्यायाने तो, तो समाजच सोडून तिरमिरीत निघून गेला. हे ऐकून लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, लोकांनी पार्टीच करायची बाकी ठेवली.पण जेव्हा गुर्जिएफ ना कळले की तो निघून गेला आहे तेव्हा ते इतकेच म्हणाले की "ओह नो!" अन ते स्वतः त्याला शोधायला बाहेर पडले.

३ दिवसांनंतर दोघे परतले.त्या रात्री गुर्जिएफ एकटे असताना, त्यांच्या वाढप्याने जेवण वाढत त्यांना विचारले, "गुर्जिएफ, तुम्ही त्या क्रॅक माणसाला परत का बोलावले?" यावर गुर्जिएफ एकदम हळू आवाजात म्हणाले, "हे बघ तू कोणाला सांगणार नसशील तर सांगतो, मी त्याला इथे रहाण्याचे पैसे देतो ;)"

सांगायचा मुद्दा हा की हे शत्रू नाही म्हणता येणार पण minor annoyance ने जीवन कठीण करणारे लोक, जीवनात आवश्यक असतात.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला आणि पटला. भाड्याने क्रँकी माणसं ठेवणार्‍या या लोकांचं लग्न झालेलं नसावं हा माझा एक अंदाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा आय स्वेअर!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला, कळला, पटला . :bigsmile:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा माझीही तीच गत झाली होती Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख आवडला. प्रत्येक सरकारी कार्यालयात असे लोक असतात. त्यांना काम सांगण्याचा मूर्खपण कोणीच करत नाही, आणि कोणी त्यांना काम सांगणारा असेल तर त्याची फिरकी घेण्यात ही मस्त आनंद मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेमा यांचा पुस्तकातील लेख आवडल्याचे वर सांगीतलेच आहे.लेख आवडला आहे, पटला आहे. पण ..... पण व्यावहारीक पातळीवर कसा राबवायचा ते कळत नाही ब्वॉ!!
Sad
हे स्वतः बुद्धीस्ट मॉन्क, नन्स अन टीचर्स सन्यास घेऊन , मस्त मजेत एकटे राहून, आपल्याला आसपासच्या व्यक्तींबरोबर जुळवण्याचा सल्ला देत बसतात, ही मोठी विसंगतीच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा . अपुली-गपुली, हेच म्हणायचं होतं मला वाचल्या वाचल्या. (पण मी ते मनातल्या मनात म्हटलं) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण का नाही बोललीस, मला या विषयावरच चर्चा हवी होती. काही मांडलं की त्यावर फक्त अंजारणारी-गोंजारणारी, त्या लेखाच्या प्रो , इगो सुखावणारी मते हे ब्लाईंड-स्पॉटस आहेत.
गवि बहुसंख्य वेळा विरोधी मतही मांडतात म्हणूनच तर मी कुठेतरी म्हटले होते - he doesn't suffer fools gladly.
____
बायका बरेचदा "Least resistance" चा पाथ घेतात. कारण विरोधात energy जातेच वर खाली गविंनी म्हतल्याप्रमाणे मत ऋण होऊन बसतं. पण इथे ऋण-धन इमेज बनवायला तर आपण येत नाही. आपण एक brain-storming करायला इथे जमतो असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.

पण याचाच एक आणखी भाग मला अगदी खरा वाटतो. आपण सर्वजण.. किमान मी आणि माझ्या पाहण्यातले सर्वजण, जरादेखील टीका सहन करु शकत नाही. माणूस टीकेने बदलत नाही. उलट आणखी डिफेन्सिव्ह बनतो. अधिक अधिक दुखावला जातो.

मी हा लेख बोगस आहे असं म्हटलं (हे केवळ उदा. आहे) तर भले मी स्वतः कितीही बोगस मनुष्य का असेना, तुम्ही काही दिवस तरी दुखावलेल्या राहणार आणि त्यावर अधेमधे विचार करणारच. शिवाय माझ्याबद्दल दीर्घकालीन ऋण मत बनवणार.

कोणीही कितीही जहरी टीका केली तरी किमान एकदा त्या व्यक्तीला तसं का वाटलं असावं असा विचार करावा असं माझं हल्ली, बर्‍याच वर्षांनंतर मत झालं आहे. एकदाच विचार करावा पण पूर्ण मोकळेपणी.

आणि केवळ व्यक्त होण्याच्या पद्धतीमुळे त्या व्यक्तीचं असं मत झालं असेल तर ती पद्धत बदलावी असंही मत झालं आहे. आपली विचारसरणी बदलणं हे आणखीच अवघड काम. बहुतांश वेळा बहुतांश लोकांना ते शक्य नसतं. पण तेही वेळ पडली आणि मनाला पटलं तर जरुर करावं.. "याददाश्त न खोता" पुनर्जन्माचा लाभ होऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद मस्तच आहे.
___
परत एका प्रकरणात पेमा म्हणतात - तुम्ही आता जसे आहात तसे "enough" आहात. अज्जिबात हे हवं, असे गुण हवे, तसे शरीर हवे असे करायची गरज नाही.
मी फार खूष झालेले ते प्रकरण वाचून.
अन मग २-३ प्रकरणे गेल्यावरती पेमा म्हणतात - जास्त मेडीटेशन करा, अधिक gentle व्हा अमकं करा न तमकं करा
अरे क्या चल क्या रहा है? एकाच पुस्तकात थीम अशी नाहीच.... विरोधाभासच.:(

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेडिटेशनचा हेतू जे आहे तसे स्वीकारण्याचा आहे. अमकं करा - तमकं करा मध्ये नक्की काय सांगितलंय ते कळलं नाही. पण मेडिटेशन करा आणि जसे आहात तसे ठीक आहात या दोन गोष्टींमध्ये विरोधाभास जाणवला नाही.

यासंदर्भातले खालील कार्टून फार प्रसिद्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेट कार्टून आहे Smile
अतिशहाणा, तुमचं अगदी बरोबर आहे- मेडिटेशन = आहे ते जसेच्या तसे स्वीकारणे.
उम्म्म मी वाचून सांगते ती काय टाका म्हणते ते. May be I am interpreting wrongly. अन तसं असेल तर मी फार खूष होईन कारण पेमा चे काही व्हिडीओस मला आवडले होते. I wish to look up to someone to guide me & she is one topmost candidate, other being ahjan Chah.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0