प्लूटो चा घोळ

अगदी 21व्या शतकात देखील वैज्ञानिक अन शास्त्रज्ञांची गणिते अन कयासदेखील चुकू शकतात हे सिद्ध झाले . 7/8 वर्षापूर्वी प्लूटो या ग्रहाचा सूर्यमालिकेतील ग्रहाचा दर्जा रद्द करण्यात आला होता, त्यानुसार जगभरातील भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातून प्लूटो संबंधी माहिती वगळण्यात देखील आली, आणि कालच पुन्हा एकदा तो ग्रह असल्याचे सिद्ध झाले. आता मधल्या काळात चुकीचे विज्ञान शिकवले गेले त्याला जबाबदार कोण ?

http://time.com/3429938/pluto-planet-vote/

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

मधल्या काळात चुकीचे विज्ञान शिकवले गेले त्याला जबाबदार कोण ?

ROFL भारी वाक्य आहे! बाकीचं शिकवलं जाणारं सगळं अचूक आणि अपरिवर्तनीय आहे असं तुम्हाला म्हणायचंय की काय?

(बादवे, चुकीचे असो की बरोबर पोरांना पूर्ण मार्क्स मिळाले म्हणजे झालं. प्रत्यक्षात प्लुटोला ग्रह किंवा लघुग्रह म्हटल्यामुळे कोणाचे नुकसान होत असेल असे वाटत नाही.)

Hope is NOT a plan!

शास्त्रज्ञांना नि वैज्ञानिकांना काही म्हणजे काही कळत नाही.

(वास्तविक पाहता, रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे खरे नवग्रह. पण आपल्या पूर्वजांनी सांगितलेले चांगले सोडून त्या कोठल्याशा पाश्चात्यांच्या खुळचटपणामागे लागून हे असले काहीतरी चुकीचे खगोलशास्त्र शिकवून वर्षानुवर्षे आमच्या नि आमच्याअगोदरच्या नि आमच्यानंतरच्यासुद्धा पिढ्यांना नासवत आलेले आहेत. आता याला जबाबदार कोण?)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

Harvard scientists want Pluto to be a planet again - and if they get their way it could mean new school text books for everyone

Back in the game? Harvard-Smithsonian want Pluto to be a planet again
Scientists at Harvard University have argued that Pluto is, in fact, a planet, after being downgraded to the status of 'minor planet' by the IAU in 2006.

In a move that will have high school science teachers throughout the world worrying if they'll have to order ANOTHER new set of text books, the Harvard-Smithsonian Center for Astrophysicists have argued that the current classification is baffling (and they're an authority on the matter - geddit?!).

http://www.mirror.co.uk/news/world-news/pluto-planet-again-apparently---...

Mandar Katre

अरुणजोशी आणि मी कधीपासून तेच तर म्हणतोय. तथाकथित विशेषज्ञांच्या मते सिद्ध झालेले सत्य कधीही पलटी मारु शकते.

प्लुटोवर नेहमीच संक्रांत असते Sad
अतिशय लहान , सूर्यमालेतील अतिदूरवरचा शीतग्रह आहे हा. आधुनिक ज्योतिषात मंगळाचे कारकत्व "वृश्चिक" राशीकडून काढून प्लुटोस बहाल करण्यात आले आहे.

काय हो, फलज्योतिषशास्त्र एखाद्याने का मानावे? कि तो* सुद्धा बोडसांच्या दाव्यासारखा एक दावा आहे?

-------
* तो म्हणजे ज्योतिषात राम आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

वैयक्तिक चयन (चॉइस)

हे चयन काय असते हा प्रश्न दूरदर्शनचे बुद्धावरील अ‍ॅनिमेशन बघितल्यापासून पडत होता. आज कळले. Smile

हाहाहा. Smile
माझी देखील खात्री नाही की तोच अर्थ आहे पण ज्या व्यक्तीने तो शब्द वापरला होता तो चॉइस या अर्थीच वापरला होता Smile

आधुनिक काळातील खगोलशास्त्रज्ञांच्या बेजबाबदार घोडचुकीमुळे आणि आपल्याला ज्यात काही कळत नाही अशा बाबतीत तोंड घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे जगबुडी जवळ आलेली आहे. प्लुटो ह्या ग्रहाला त्यांनी उपग्रह असे म्हणून त्याचे डिमोशन केले त्यामुळे तो वक्री झाला असून लवकरच पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला ह्याचा दुष्परिणाम भोगावा लागणार आहे. जगभर महापूर येऊन सर्व जीवसृष्टि त्यात बुडून नष्ट होईल असा होरा सर्व ज्योतिर्मार्तंड सांगत आहेत. तथाकथित खगोलशास्त्रज्ञ ह्यामुळे चक्रावून गेले असून दिङ्मूढ झाले आहेत आणि ह्यातून वाचण्याचा एकहि मार्ग त्यांना दिसत नाही

सुदैवाने भारतापाशी ह्यावर आता एक उपाय आहे. भारद्वाज नावाच्या द्रष्टया मुनींनी अतिप्राचीन काळी रचून ठेवलेल्या 'ग्रहविज्ञानसरणी' ह्या दुर्मिळ ग्रंथामध्ये अशा वेळी काय करावे ते आधीच लिहून ठेवले आहे. ते उपाय असे:
१) गावोगावी सर्वग्रहशांतियज्ञ केले जावेत.
२) घरोघरी पूजेतील मूर्ति पाण्यात घालून ठेवाव्यात.
३) प्रत्येक गावी सत्पात्र ब्राह्मणांना शतगोदाने द्यावीत.
४) अनिष्ट टळेपर्यंत प्रत्येक सज्ञान ब्राह्मण पुरुषाने साबूदाण्याची खिचडी आणि धारोष्ण दुग्ध असा सात्त्विक आहारच घ्यावा. रजस्वला स्त्रियांना रज:कालात असूर्यपश्या अवस्थेत ठेवावे. कलियुगात ब्राह्मण सोडून अन्य सर्व शूद्र झाल्यामुळे त्यांनी घराबाहेर पडू नये.
५)'प्लूटोमाहात्म्यस्तोत्र' नामक स्तोत्राचे अखंड पारायण गावोगावी केले जावे. हे स्तोत्र भारद्वाजांनीच ह्याची आवश्यकता पडणार आहे हे दिव्य दृष्टीने जाणून रचून ठेवले होते, जरी त्यांच्या वेळच्या यादीमध्ये प्लूटो ग्रह नव्हता.

पूर्ण श्रद्धेने आणि चिकित्सक शंका उत्पन्न न करता हे सर्व केले तर जग वाचण्याची शक्यता आहे.

पण ही एक इष्टापत्ति असेहि तिच्याकडे पाहता येते आणि ह्यातून एक संधि भारताला उपलब्ध होणार आहे. सर्व जगाला भारतीय प्राचीन ज्ञान वापरून वाचविण्याची अमूल्य शक्यता ह्यामुळे निर्माण झाली असून भारताने जगाला प्राचीन काळापासून विमानविद्या, अणुशास्त्र, रसशास्त्र अशासारख्या केवढया अनमोल देणग्या दिल्या आहेत हे सर्व जगाला कळेल आणि भारतीय परंपरेचे श्रेष्ठत्व ह्यापुढील सर्व भविष्यासाठी जगाच्या पुढे राहील.

तेव्हा भारतीयांनो, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत...

आधुनिक काळातील खगोलशास्त्रज्ञांच्या बेजबाबदार घोडचुकीमुळे आणि आपल्याला ज्यात काही कळत नाही अशा बाबतीत तोंड घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे जगबुडी जवळ आलेली आहे

कोल्हटकर साहेब, तुमचं (विज्ञानावर भाष्य करायला जितकं लागतं त्यामानानं) वाचन फार कमी आहे. दुर्दैवानं ते इतकं जास्त कमी आहे कि अगदी ऐसीवर आपण प्रतिसाद दिलेल्या धाग्यात एकूण काय काय चर्चा झाली आहे हे देखिल लक्षात घेत नाही आहात. या खगोल शस्त्रज्ञांनामुळे खरोखरच जगबुडी आली हो!!! आहात कुठे?

मागे लिहिलेला एक प्रतिसाद पेस्ट करत आहे.
------------------------------------------------
------------------------------------------------

फक्त न्यूनगंडातून भारतीय विधानांना जास्त हिन लेखू नये इतकेच म्हणतोय. विमाने होतीच वा नव्हतीच यापैकी माझे काही म्हणणे नाही. आजच्या ज्ञानानुसार दाव्यांत तथ्य नाही हे ही मला मान्य आहे. पण आजचे पुरावे आणि ज्ञान यांना मर्यादा असू शकते असेही मला वाटते. बोडसांचा काँफिडन्स थोडा जास्त आहे तेव्हा तुम्ही रिस्पेक्टफुली डिसअ‍ॅग्री करा. पण "रिस्पेक्टफुली" असं करायचं नसेल तर हा बोडसांना मूर्ख ठरवतानाचा उत्साह वैज्ञानिक वर्तुळांत जगभरात महान महान शास्त्रज्ञांकडून महान महान विधाने येतात तेव्हा कोठे गेलेला असतो हा मला पडलेला प्रश्न आहे.

स्टीफन हॉकिंगचे घ्या. हिग्ज बॉसोनच्या प्रयोगात एक व्हॅक्यूमची लाट निघून सारे ज्ञात जगत त्यात नष्ट होईल असे ते म्हणाले. त्यांची री ओढणारे तो बबल अलरडी निर्माण झाला आहे असे म्हणू शकतो आणि विश्व नष्ट होणार हे अटळ आहे पण इतक्यात घरदार विकू नका असंही म्हणत आहेत.

http://www.livescience.com/47737-stephen-hawking-higgs-boson-universe-do...

Stephen Hawking bet Gordon Kane $100 that physicists would not discover the Higgs boson. After losing that bet when physicists detected the particle in 2012, Hawking lamented the discovery, saying it made physics less interesting. Now, in the preface to a new collection of essays and lectures called "Starmus," the famous theoretical physicist is warning that the particle could one day be responsible for the destruction of the known universe.

Hawking is not the only scientist who thinks so. The theory of a Higgs boson doomsday, where a quantum fluctuation creates a vacuum "bubble" that expands through space and wipes out the universe, has existed for a while. However, scientists don't think it could happen anytime soon.

"Most likely it will take 10 to the 100 years [a 1 followed by 100 zeroes] for this to happen, so probably you shouldn't sell your house and you should continue to pay your taxes," Joseph Lykken, a theoretical physicist at the Fermi National Accelerator Laboratory in Batavia, Illinois, said during his lecture at the SETI Institute on Sept. 2. "On the other hand it may already happened, and the bubble might be on its way here now. And you won't know because it's going at the speed of light so there's not going to be any warning." [Doomsday: 9 Real Ways Earth Could End]

...
...
इ इ
---------------
हिग्ज बॉसॉनवर स्टिफन हॉकिंग काय म्हणतो हे देखिल तुम्ही फॉलो करत नाही आणि माझ्याशी निकराचा प्रतिवाद करता.
टिंगल करायची मस्ती यावेळेस कुठे गेली होती? या बबलवर अधिकृत विज्ञानाची काय पोझिशन आहे याबद्दल कल्पना?

यापुढे जाऊन सर्नच्या प्रयोगात सापडले ते हिग्ज बॉसॉनच होते का याबद्दलच्या बातम्या वाचल्यात?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

हा प्रतिसाद केवळ वरच्या प्रतिसादास निरर्थक श्रेणी देणारांस उद्देशून आहे.
----------------------
हॉकिंग म्हटले कि फाटते आणि बोडस म्हटले झोडायचा कंड उठतो असा दुटप्पीपणा का होत असावा?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

मी धन श्रेणी देऊन प्रतिसाद उघडा ठेवायचा प्रयत्न केलाय.

धन्यवाद.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

बाय द वे, जगबुडीच्या वेळी गायीम्हशी विकायला वेळ पण असणार नाही कारण या प्रयोगामुळे येणारी जगबूडी ही १. प्रकाशाच्या वेगाने आणि २. आता कधीही येईल असे म्हणणारे देखिल शास्त्रज्ञ आहेत.
-------------------------------
जगातल्या विख्यात (हॉकिंग तर जीवंत असलेले सर्वश्रेष्ठ शिवाय तुमच्याच क्लबातले - इति पुरोगामी - शास्त्रज्ञ आहेत.) शास्त्रज्ञांनी (आता खगोल, अणू आणि भौतिक ही शास्त्र फारच जवळ आली आहेत.) काहीही बरळावं, तिथे तुम्ही मुग गिळून गप्प - कोणतंही मोठं नाव घेतलं कि - मग ती बरळ काही का असेना - बुद्धी नसल्यासारखं टाळ्या पिटायच्या आणि बिचारा कोणी त्यातली त्यात रिजनेबल बोलला त्याला जास्त मूर्ख समजायचे याला काही लॉजिक आहे का?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

पूर्ण श्रद्धेने आणि चिकित्सक शंका उत्पन्न न करता हे सर्व केले तर जग वाचण्याची शक्यता आहे.

अगदी अगदी! प्रश्न ज्योतिषात देखील ही अट असते. शिवाय जातक व ज्योतिषी यांची कुंडली जुळावी लागते तरच भाकीत बरोबर येते.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आता मधल्या काळात चुकीचे विज्ञान शिकवले गेले त्याला जबाबदार कोण ?

प्लुटो!

*********
आलं का आलं आलं?

मी जरा बोलू का ?विज्ञानात फ्रेम ऑफ रेफ्रन्स /आधारभूत चौकटीत सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि बऱ्याचदा ती चौकट काय आहे तेच आपण विसरतो. बरीच उदाहरणे देईन. बरोबर चूक इत्यादी तात्पुरते असते. ढगात गडगडले की म्हातारी दळतेय हे लहानपणी पटले ,मोठेपणी नाही पटले ,आता मुलांना हेच पटवतोय. जाऊ द्या.

Smile

हा धागा अजोंना बाकी सर्वांना फटके मारायचा चान्स मिळावा म्हणुन काढल्या सारखा वाटतोय.

पण अजोंनी ह्या संधीचा पुरेपुर उपयोग केलेला नाहीये Smile

अनुजी,
मी बाकी सर्वांना* फटके वैगेरे मारण्याच्या मूडमधे नसतो. माझा स्वतःचा धरून सर्वांचा कोणत्याही गोष्टीला विरोध हा रिजनेबल असावा असं माझं मत आहे. ती रिजनॅबिलिटी क्रॉस केली कि मी विरोध करतो. मी स्यूडो लोकांचा विरोध करत नाही.
बाकी ऐसीवरचे बहुसंख्य सदस्य स्वतःला पुरोगामी इ इ म्हणवतात, पण मी मांडलेल्या मुद्द्याचा प्रतिवाद करत नाहीत. अगदी इथे देखिल हॉकिंगच्या जगबूडीबद्दल सगळे चिडिचूप आहेत. "मला बोडस मूर्ख वाटतो तर मला हॉकिंग सुद्धा मूर्ख वाटतो." असे म्हणायची हिंमत कोणात नाही. मग हे लोक स्यूडो आहेत का? स्यूडो लोक (एक प्रकारचे) स्वार्थी असतात आणि मला त्यांच्याशी देणंघेणं नाही. माझा विरोध मेनस्ट्रिम, जन्विन विचारधारेला असतो. माझं असं निरीक्षण आहे कि ऐसीचे सदस्य स्यूडो नाहीत. शिवाय दुटप्पी पण नाहीत. म्हणून मला त्यांचेशी बहस** करायला आनंद वाटतो.

---------------------------
* फक्त न्यूनगंडग्रस्त, आधुनिककालश्रेष्ठतावादी, पुरोगामी, वैज्ञानिकदृष्टीकोणवादी, उत्क्रांतीवादी, महास्फोटवादी, स्त्रीवादी, समलैंगिकतावादी, अनिश्वरतावादी, अपरंपरावादी, शहराभिमानी, असम्यकतावादी, मोदीद्वेषवादी, धर्मद्वेष्टे, इ इ
** हॉकिंगच्या मुद्द्यावर तीनदा लिहूनही ते उचकले नाहीत. नक्की काय करायला पाहिजे याचा विचार करतोय.
-------------------------------------
---------------------------------------

पण अजोंनी ह्या संधीचा पुरेपुर उपयोग केलेला नाहीये.

अहो आजकालची फॅशन आहे. भट* सव्वा रुपया दक्षिणा घेऊन पळाला कि त्याच्यामागे धावून सव्वा रुपया वापस हिसकाउन तर घ्यायचाच पण अन्याय झाला म्हणून त्याचे धोतरही फाडून टाकायचे. पण तेच फेडरल रिझर्व बँकेच्या चुकीच्या नितीने देशच्या देश देशोधडीला लागले, अर्थव्यवस्था बुडाल्या तर त्याला "व्यवस्थेची इतकी त्रुटी तर असणारच" म्हणून विसरायचे. आधुनिक संस्थांतील कोणाकोणाच्या कोणकोणत्या कृती (म्हणजे चूकीने) एकूण काय काय परिणाम होतात याच्या किती याद्या द्यायच्या. फॅशन भटे, मुल्ले यांना बडवण्याची आहे. त्या भटाचे धोतर फाडण्याच्या गजरात स्वतःचे धोतर फाडले चालले आहे याचे कोणाला भान नसते. शास्त्रज्ञांच्या छोट्या छोट्या गोष्टींची प्रचंड आर्थिक, सामाजिक, कधी कधी भावनिक किंमत असते. ती नाही किंवा तिचे काही करता येत नाही किंवा तिच्याबद्दल रोष ठेवता येत नाही असे लोकांचे ब्रेनवॉश झालेले आहे.
----------
* प्रतिकात्मक शब्द.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

हॉकिंगची टिंगल जिथे करायची तिथे केलेली आहे (चुकुन तिथे हॉकिन्स असे टायपले होते ते सोडा). पण तेव्हा तुम्हाला काही विरोध, सहमती दाखवावी वाटली नाही याची नोंद घ्यावी.

Hope is NOT a plan!

http://www.aisiakshare.com/node/3066#comment-67749 हा माझा तिथला प्रतिसाद पुनश्च वाचावा. तिथे तुमच्याशी माझ्याइतकी सहमती दुसर्‍या कोणी दाखवली आहे?
-----------------
हॉकिंगला आपण WTF म्हणाले आहात, आपणांस बोडसांवर टिका संपूर्ण नैतिक अधिकार आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

नैतिकतेची सर्टिफिकिटे वाटण्याचा तुम्हांला कोई हक्क नाही कारण तुम्ही असत्य विधाने करता. तुमचे बिग बँग व एव्होल्यूशन या विषयांतील वाचन अगदी पूर्ण आहे याला पुरावा काय आहे ते द्या की अगोदर. कधीपासून विचारतोय पण या प्रश्नाला उत्तर देऊ शकलेला नाही तुम्ही कधीच.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

पण पण पण.. वाचन पूर्ण आहे याला पुरावा कसा काय दाखवणार बुआ?

जर पुरावा दाखवता येत नसेल तर दावा करावाच कशाला मग?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

बॅट्या, विधान करताना (सबळ, संपूर्ण, इ इ ) पुरावा लागतो हे पुरोगामी तत्त्वज्ञान आहे. ते मला मान्य नाही. इतिहास पुरावे ठेवत घडलेला नसतो. पुरावा मागणे नि तो पटला तरच विधान मान्य करणे हे तुझे तत्त्वज्ञान आहे. समोर आलेल्या विधानांचे लॉजिकल कंपॅरिजन करणे ही माझी पद्धत आहे.
------------------
आणि महास्फोट वा उत्क्रांती बद्दल मी वाचन केले आहे याचे पुरावे तुला द्यायला त्या इतिहासाचं रेकॉर्डिंग झालं नाही. गवि म्हणतात त्यात पॉइंट आहे. शिवाय हा पुरावा तुला द्यायला तुझे देखिल माझ्यापेक्षा जास्त वाचन हवे. अगोदर त्याचा पुरावा दे.
--------------
नैतिकतेचे सर्टिफिकेट वाटायचा अधिकार कोणाला आहे? माझी सर्टीफिकेटे मीच वाटणार ना? का त्यालाही अगोदर तुझी सही लागेल?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

अच्छा. म्हणजे पुराव्याविना अंदाधुंद कशीही विधाने करणे हेच तुमचे लाडके तत्त्व आहे तर. नै म्हणजे अगोदर समजले होतेच पण साक्षात तुमच्या तोंडून ऐकायला मिळाले. धन्यवाद!

बाकी, जे लोक दावे करतात त्यांचीच जबाबदारी असते पुरावे द्यायची. रोचक दावे करता तुम्ही, सबब पुरावे द्या तुम्ही.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हो. तुझ्यामते अंधाधुंद. माझ्यामते सुयोग्य. पुरावा सगळं काही नसतं. माझा बाप माझा बाप आहे याची डीएनए टेस्ट केलेली नसताना देखिल मी लोक ज्या माणसाला माझा बाप म्हणतात त्याला मी बाप मानतो. पुरावा विचारत नाही. मला जगातल्या अनंत गोष्टींबद्दल विचार करायला, श्रद्धा ठेवायला पुरावा लागत नाही. I am not evidence centric.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

मुद्दा भरकटवण्याचे कौशल्य रोचक आहे. म्हणजे कोणीही काहीही बोलले तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार तर. उदगीरमधल्या सर्व लोकांचे ब्रेनवॉशिंग झालेले आहे असे विधानही तुम्ही मान्यच कराल मग, नै Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

उदगीरमधल्या सर्व लोकांचे ब्रेनवॉशिंग झालेले आहे असे विधानही तुम्ही मान्यच कराल.

करायला हरकत नाही. शिवाय मानवी संस्कृती इतकी पुढे गेलेली आहे कि कोणाचे ब्रेनवॉशिंग कसे झालेले आहे सांगायला पुरेसे ब्रेनवॉशिंग न झालेले लोक जगात आहेत का याबद्दल मला आशंका आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

तुमची आशंका ही नुसतीच कुशंका आहे अशी लघुशंका आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तुम्हांला? तो अनुस्वार कोणी पाहायला आत काढून टाक. Wink

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

................कारण तुम्ही असत्य विधाने करता.

नैतिकतेची प्रमाणपत्रे वाटण्याचा आम्हाला अधिकार नाही, पण (इथे काही एक न वाचता, न कळता म्हणणे, असे असले तरी, अनावश्यक आहे) सत्यासत्यतेची प्रमाणपत्रे वाटण्याचा अधिकार मात्र तुम्हाला आहे!!!
-------------
नैतिकानैतिकता अवैज्ञानिक तत्त्वज्ञानाच्या अखत्यारीत येते म्हणून अशी प्रमाणपत्रे ऑफिशियली वाटता येतात. (तुम्हा) वैज्ञानिकांना मात्र अजून एकही सत्य गावलेले नाही तरीही प्रमाणपत्रे वाटण्याचा इतका उल्लास.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

थोडक्यात आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कारटे. तुम्ही बाब्यासेंट्रिक आहात. त्यामुळे ते सायन्सवादी आणि तुम्ही यांत फरक काहीच नाही. मेले मे बिछडे हुए भाई आहात दोघेही. एकजण काँग्रेसी झाला तर दुसरा भाजपीय आणि एकमेकांची मारायचा प्रयत्न सुरू आहे. पण दोघांच्यातला जुनून आणि ढोंगीपणा तोच आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

त्यामुळे ते सायन्सवादी आणि तुम्ही यांत फरक काहीच नाही.

असं म्हणता येईल. भौतिकजगाची ध्यास घेऊन सत्यं उलगडणार्‍या सगळ्या शास्त्रज्ञांचा मला खूप अभिमान आहे. तसेच मानवी तत्त्वज्ञान आणि मूल्ये, ज्यांचा स्रोत विज्ञानात सध्याला तरी घेता येत नाही, मांडणारांचा आहे.
"माझा व्यक्तिगत" आक्षेप फक्त दोहोंतले "माझ्या मते" काहीही न कळता उगाच समोरच्या पार्टिच्या लोकांना उणेदुणे बोलणार्‍या, दोन्हीकडच्या, अनुयायांना आहे. ऐसीवर त्यातले एकाच प्रकारचे बायस्ड लोक आहेत म्हणून माझे प्रतिसाद एकांगी वाटतात हे मान्य आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.