राधा कृष्ण

राधा कृष्ण
राधा आणि कृष्णाचं नातं काय? या प्रश्नाबद्दल बरेच वाद आहेत. कुणी म्हणतात, राधा केवळ कृष्णाची भक्त होती. कुणी म्हणतात ती केवळ त्याची प्रेयसी होती. पण राधा-कृष्ण हे पती-पत्नी असण्याबद्दल बर्याच शंका-कुशंका आहेत. थोडक्यात काय तर राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती आणि याचे संदर्भ बर्याच ग्रंथात सापडतील. कृष्णाची पत्नी कोण हा प्रश्न समोर आला तर उत्तरादाखल पुढील नावं येतील – रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजित्ति, लक्षणा, कालिन्दि, भद्रा आणि मित्रवृन्दा. तशा कृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी होत्या.
पण कृष्ण-राधा हे पती-पत्नी नव्हते, मग त्यांचं नेमकं नातं काय? ते कितपत योग्य? त्यांच्या नात्याला नेमकं काय म्हणावं? निदान त्याला नातं तरी म्हणता येईल का? जर त्यांच्यात नातं आहे आणि लोक भक्तिभावाने त्यांची पूजा करतात, तर मग त्यांच्यातल्या नात्यातलं पावित्र्य कसं टिकून राहिलं? नात्यातलं पावित्र्य म्हणजे तरी नक्की काय? का नात्यापलीकडले असे काही त्यांच्यात ऋणानुबंध होते? निनावी प्रेम होतं का त्यांचं? प्रियकर, प्रेयसी, प्रेम आणि नातं यांची नेमकी सांगड काय? असे आणि अशासारखे अनेक प्रश्न. या सगळ्या भुतकाळाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं आजच्या काळात म्हणजेच वर्तमानकाळात मिळवता येतील का आणि उत्तरं मिळाली तर ती भविष्यकाळात किती चपखल बसतील? शोध घेणं गरजेचं वाटतं.
नातं. नात्यांची थोडक्यात विभागणी करायची म्हटलं तर नाती दोन प्रकारची असतात. रक्ताची नाती (उपजत) आणि बांधलेली नाती (परिस्थिती आणि गरजेनुसार निर्माण झालेली). आईवडील, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी इत्यादी नाती ही रक्ताची किंवा उपजत नाती या प्रकारात मोडतात. नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी इत्यादी नाती ही बांधलेली नाती किंवा निर्माण झालेली नाती या प्रकारात मोडतात. पण नाती कुठलीही असोत नातं म्हटलं की बंधनं आली, नियम आले, जबाबदारी आली, इच्छा-आकांक्षा आल्या, गरजा आल्या, सवयी आल्या, शिस्त आली, मानसिक आणि शारीरिक आकर्षण आलं मग ते एक व्यक्ती म्हणून असेल किंवा व्यक्तिमत्त्व म्हणून असेल. थोडक्यात गरज, सवय, आकर्षण आणि या सगळ्यांना मिळालेली भावनांची जोड जिथे असते तिथे नातं निर्माण होतं. त्यालाच बांधलेली नाती किंवा निर्माण झालेली नाती म्हणतात.
प्रेम = सवय + गरज + आकर्षण
प्रेम = सवय + आकर्षण + गरज
प्रेम = गरज + सवय + आकर्षण
प्रेम = गरज + आकर्षण + सवय
प्रेम = आकर्षण + सवय + गरज
प्रेम = आकर्षण + गरज + सवय
(प्रत्येक व्यक्तिसाठी क्रम वेगळा असू शकतो पण परिणाम एकच.)
प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको या नात्यांमध्येदेखील नियम, बंधनं, इच्छा-आकांक्षा किंवा आशा-अपेक्षा याांसारख्या अनेक बाबी असतातच. पण प्रत्येक व्यक्तिला स्वतःच्या आयुष्यात आणि स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये नावीन्य हवं असतं. आयुष्याकडून आणि आयुष्यातील प्रत्येक नात्याकडून सतत काही नवीन मिळावं ही प्रत्येक व्यक्तिची गरज असते. ही एक प्रकारची भूक आहे. नियम, बंधनं अशा बाबी या नावीन्याला अडथळा आणू शकतात. जर नात्यामधली ही भूक भागत नसेल किंवा नात्यामध्ये नावीन्य नसेल तर त्या नात्यात एक पोकळी निर्माण होते. एक प्रकारचा एकटेपणा व्यक्तिला जाणवतो. व्यक्तिला तात्पुरता का होईना पण आधाराची गरज भासते, असा आधार जो ती पोकळी भरून काढेल. प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यात निर्माण झालेली ती पोकळी ही स्वतःची व्याप्ती वाढवून भरून काढणं कधीही योग्य. पण मनःस्थिती कुंठित झाल्यामुळे तसं करणं शक्य होत नाही. अर्थातच अशी व्यक्ती तात्पुरत्या आधाराची मदत घेते. पण कधी कधी त्या आधाराच्या मोहात पडून ती व्यक्ती कायमचा आधार हिरावून बसू शकते आणि पुन्हा एकाकीपणा येऊ शकतो. तात्पुरता आधार हा तात्पुरता आहे याचा विसर पडतो आणि पुन्हा नात्यामध्ये पोकळी निर्माण होते. समाजात प्रतारणा हा शब्द किंवा यासारखे शब्द या सगळ्या बाबतीत वापरले जातात आणि त्याचे परिणाम किती भयंकर आणि वाईट असू शकतात याची अनेक उदाहरणं समाजात सापडतात. मग या सगळ्यातून मार्ग काय? उपाय काय? यांची उत्तरं म्हणजे राधा-कृष्ण.
प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात एक तरी नातं असं असावं जे नातं नसावं किंवा ते नात्यापलीकडे असावं. लोकांनी किंवा समाजाने त्याला कितीही नावं ठेवली (प्रियकर-प्रेयसी, भक्त, नियमबाह्य इत्यादी) तरी प्रत्यक्षात ते निनावी असावं, ज्याची स्पष्ट व्याख्या नसावी. कुठलेही नियम नसावेत. कुठलीही बंधनं नसावीत. जबाबदारी असावी पण कुणीही जबाबदार नसावं. इच्छा-आकांक्षा, आशा-अपेक्षांचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावं. मोकळेपणा असावा. प्रेम, आपुलकी, काळजी, राग, आनंद, दुःख, समाधान या सारख्या अनेक भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही मी नसावा. राधा आणि कृष्ण यांच्यातील संबंधामध्ये या सगळ्याची पूर्तता होते. स्वतःच्या आयुष्यात किमान अशी एक तरी व्यक्ती असावी जिच्याशी राधा किंवा कृष्णाप्रमाणे निखळ, निर्मळ आणि निःस्वार्थी प्रेम असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सर्वमान्य असलेल्या नात्यांमधले नियम, बंधनं आणि समाजाचा एक पारंपरिक ढाचा असा विचार, कृती करण्यास अडथळा निर्माण करतो. तशी ही समाजव्यवस्था चुकीची नाही. पण अशा निनावी नात्याबाबतीत प्रत्येक व्यक्ती मर्यादा पाळेलच किंवा पावित्र्य सांभाळेलच याची खात्री नसते आणि त्यामुळे समाजाचा पारंपरिक आणि प्रतिष्ठित ढाचा बिघडण्याची शक्यता निर्माण होते.
आता प्रश्न आहे तो मर्यादेचा, पावित्र्याचा. मर्यादा, पावित्र्य सांभाळणं म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. ज्या व्यक्तिंना स्वातंत्र्य आणि स्वैराचार, मोकळेपणा आणि भरकटलेपणा यांमधला फरक कळतो त्यांना मर्यादा आणि पावित्र्य सांभाळणं अवघड नाही.
ज्या व्यक्तिंना या मर्यादेचं भान असतं त्यांच्या आयुष्यात कधीही दीर्घकाळ पोकळी निर्माण होऊ शकत नाही आणि सगळी नाती (उपजत, बांधलेली आणि निनावी) सांभाळतादेखील येऊ शकतात. ज्यांनी मर्यादा पाळली, त्यांच्याबाबतीत समाजाने आणि एकंदरीत सगळ्यांनी त्याचा आदर राखणं देखील गरजेचं आहे. तसं झालं तर त्यामुळे समाजात त्याला मान्यता मिळू शकते आणि त्याचं महत्त्व, पावित्र्य जपलंही जाऊ शकतं.
तात्पर्य, काय तर प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी राधा असतेच आणि प्रत्येकीच्या आयुष्यात किमान एक तरी कृष्ण असतोच किंवा असं असावं अशी किमान इच्छा तरी प्रत्येकाची/प्रत्येकीची असते. केवळ ते मनात, कुठेतरी मनाच्या एका कोपर्यात दडवून ठेवलेलं असतं (मग ते स्वतःच्या, आप्तेष्टांच्या किंवा समाजाच्या भीतीपोटी का होईना). असो, कारणं अनेक असोत पण अशा प्रेमाचा आदरपूर्वक सन्मान करता आणि जपता आला पाहिजे हीच काळाची गरज आहे आणि हीच खरी राधा-कृष्णाची भक्तिपूजा.
शिरीष फडके
कलमनामा - १९/०१/२०१५ - लेख १३ - राधा कृष्ण
http://kalamnaama.com/radha-krishna/राधा कृष्ण

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला.

पण सर्वमान्य असलेल्या नात्यांमधले नियम, बंधनं आणि समाजाचा एक पारंपरिक ढाचा असा विचार, कृती करण्यास अडथळा निर्माण करतो

बरेचदा आपले "शॅडो व्यक्तीमत्व" च अडथळा बनते. उदा- मत्सर, अपेक्षा आदिंचे ओझे त्या नात्यावर लादले जाते व नाते पार जीर्ण होऊ लागते. वाळू जितकी घट्ट धराल तितकी निसटते, अन तेच प्रेमाचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरब्यात दंगशी राधा
राधेस आवडे मौज
राधेस आवडे नृत्य
ज्यामध्ये दिसती शारीररंग

असं म्हटलं तर लोक कविता म्हणतीलही कदाचित. पण त्याऐवजी जर -
Radha on the dance floor
Radha likes to party
Radha likes to move that sexy Radha body
असं सरळसोट विंग्रजीत म्हटलं तर चीप म्हणतात लोक.
तेव्हा राधेला खरोखर काय आवडत होतं किंवा राधा कशी होती आणि तिला कृष्णाबद्दल काय भावना होत्या - ते लोकांनीच तिच्यावर लादलं आहे.
साध्या सोप्या आकर्षणाला/प्रेमाला उदात्ततेचे आणि भक्तीचे रंग दिले असावेत. (त्यात काही चूक नाही)
नातं नक्की कसं होतं ते राधेलाच ठाऊक. आणि कृष्णाबद्दल कल्पना नाही, त्याकडून किती खरं उत्तर मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरळसोट विंग्रजीत म्हटलं तर चीप म्हणतात लोक.

लोक गेले खड्ड्यात. चीप काये त्यात? हिंदी सिनेमातली गाणी लोकसंगीताचा वारसा खर्‍या अर्थानं चालवतात. त्यातही राधा अवतरली, हीच मोठी मजेशीर बाब आहे. मग नसेनात का संस्कृतप्रचुर तथाकथित काव्यात्म शब्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हिंदी सिनेमातली गाणी लोकसंगीताचा वारसा खर्‍या अर्थानं चालवतात.

लोकसंगीत इतकेही वाईट नाहीये हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरं मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असे हुकूमशाही प्रश्न तुमच्याकडून येतीलसं वाटलं नव्हतं हो. आम्ही फक्त आमचे मत मांडले. वाटतं तर मांडूही नये काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हुकूमशाही और मैं? कॉब्भी नै!

मांडा हो ब्याटेश्वर, हव्वं तितकं हव्वं ते मांडा... आमच्या (असं एकदा म्हटलं, की समोरचा आपॉप परका-उपरा-तथाकथित हुच्चभ्रू वगैरे होतो, ही एक भारीपैकी सोय झाल्ये बॉ! ;-)) सिनेसंगीताला उगाच मोडीत काढलंत म्हणून भावणाताई अंमळ दुखावल्या, इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चीप काये त्यात?

सेक्सी म्हणजे संभोगनीय किंवा विशेष संभोगनीय. हा शब्द चीप आहे. इंदिरा गांधी वर विकिपान लिहिताना माहिती म्हणून त्या "विशेष संभोगनीय" होत्या वा "विशेष संभोगनीय" नव्हत्या असे मुद्दाम लिहाल का? भक्तिक्षेत्रात राधेचा उल्लेख करताना एक मर्यादा नको का पाळायला?
-------------
बाय द वे, लोक खड्ड्यात जात नाहीत, खड्ड्यातून येतात. किमान हिंदूंत तरी.
-----------------
संस्कृत शब्दांमुळे भक्तिरसाला, अध्यात्मरसाला एक फ्लेवर येतो. इथे मराठी बाणा (रिड - घमंड) मधे आणायची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संस्कृत शब्दांमुळे भक्तिरसाला, अध्यात्मरसाला एक फ्लेवर येतो. इथे मराठी बाणा (रिड - घमंड) मधे आणायची गरज नाही.

नै पण...गीतगोविंद नामक संस्कृत ग्रंथ प्रचंड फेमस आहे. त्यात राधेचं वर्णन कसं केलंय ते पहावं असं सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा ग्रंथ राधा कृष्ण नात्याचं अधिकॄत व्हर्जन आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा ग्रंथ किमान ५००-६०० वर्षे जुना आहे. आणि याची पापिलवारिटी अख्ख्या उत्तर भारतभर होती. संस्कृत सोडून अन्य भाषांतही याचे रूपांतरण इ. झालेले आहे. त्यामुळे त्यातली वर्णने इतरांना माहिती नव्हती वगैरे अर्ग्युमेंटे चूक आहेत. जुन्या काळात आणि खेड्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या परिचयाची वर्णने होती. त्यामुळे हा ग्रंथ आयसोलेटेड केस वगैरे अर्ग्युमेंट इथे लावता येत नाही. शिवाय या ग्रंथावर कधी कुठे बंदी घातल्याचेही ऐकिवात आलेले नाही.

त्यामुळे गेली शेकडो वर्षे लोकांना जे चालले ते आत्ता का न चालावे इतकाच प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा ग्रंथ राधेवरचं पॉर्न आहे असा त्याचा सूर आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? पॉर्न लेखकाची स्वतः एंजॉय करायची एक विकृत शैली असते ती त्यात आहे आणि अशी असणं सामान्य आहे आणि असावं इ इ ????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यात सेक्शुअल छाप वर्णने आहेत आणि ती सरळ उघड आहेत. त्या वर्णनांकडे विकृत नजरेने पाहिल्यास विकृती दिसेल, नपेक्षा दिसणार नाही. सेक्शुअल वर्णने म्हणजेच कैतरी वैट्ट इ. मत वाटले म्हणून म्हणालो इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकांना चीप वाटलं तर वाटू दे हा मेघनाचा जो मूर्धन्य अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी पावित्रा होता त्याच्या अनुषंगाने मी म्हणालो. लैंगिक अवयव शरीराचा भाग आहेत. लैंगिकता जीवनाचा भाग आहे. त्यांचे उल्लेख येणारच. लैंगिक भावनांची जीवनातील जी तीव्रता आहे ती देखिल साहित्यात सुगोग्यपणे प्रकट होणे गरजेचे आहे नि होते. पण एका विशिष्ट स्थानी ती दूर ठेवावी असा लोकमान्य संकेत आहे. उद्या संसदेत सोनिया गांधी किंवा स्मृती ईराणी कशा सेक्सी, हॉट होत्या/आहेत हे सांसद अधिकृतपणे बोलू लागले तर लोकांना चीप वाटलं तर वाटू दे म्हणणार का? लोकाचार, आदरस्थान म्हणून काही असतं का नाही?
राधा आणि कृष्ण हे भारतीयांचे देव आहेत. सत्कृतदर्शनी त्यांचे लैंगिक संबंध नव्हते असे लोक मानतात. मी तरी असंच पाहत आलो आहे. शुद्ध भक्ती (राधेची कृष्णावर आणि लोकांची दोघांवर) असा माहौल आहे.
----------------
लोकांना काहीही वाटलं तर वाटू देत, आम्ही तेवढे शहाणे आहोत, आम्ही कोणत्याही भावना दुखवू, त्यासाठी काहीही वेडंवाकडं लॉजिक देऊ, भावनांचं रिजनिंग करू, शेवटी सगळ्यांना खड्ड्यात घालू ही कसली विचारसरणी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आता राधाकृष्णाच्या नात्यात "पावित्र्य" येणार तर... रामकृष्ण हरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पावित्र्य नाही तर पॉर्न येणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वेल..तसंच बोलायचं तर मग लग्नबाह्य नात्याला लोक गौरवूच कसे शकतात, असाही प्रश्न पडायला पाहिजे, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाहिजे ना. नाही कोण म्हटलं. पाहिजे तो प्रश्न पाडून घ्या. पण ईश्वरांत पावित्र्य पाहायचं नाही आणि लोकभावनांचा आदर करायचा नाही (मेघनाने, तुम्ही नव्हे) हे काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते आता काय माहिती नै बॉ. कारण आम्ही सर्व वर्णने करतो, पण त्यात कै विकृत आहे हेच पटत नाही आम्हांला. ही सगळी विकृती ब्रिटिशांनी घुसवलेली आहे. आणि अजो, अ‍ॅज़ मच अ‍ॅज़ यू लाईक टु डिनाय इट, तुम्हांलाही तो जो आक्षेप आहे त्याचं मूळ ब्रिटिश मूल्यांच्या आरोपणातच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजो, राधा कृष्ण वगैरे क्षणभर बाजूला ठेवू. जर उदया एखादं erotic चित्र किंवा प्रणयदृश्यांची वर्णनं करणारी कादंबरी कुणी लिहीली तर तुम्ही त्याला सरळ पॉर्न समजून मोकळे व्हाल.
भक्ती नंतर डायरेक्ट पॉर्न? मधे काही नाहीच? बॅटमॅनाने म्हटल्याप्रमाणे "आम्हाला" सग्ग्गळं आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Stop watching porn & do yourself a favor

या शास्त्रज्ञाने पोर्न किती वाईट आहे हे सिद्ध केलय. प्लीज तो व्हिडिओ सर्वांनी पहाच Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय कटकट आहे च्यायला. आज म्हणतोय पॉर्न बघू नका. उद्या हस्तमैथुन आणि परवा संभोगही करू नका म्हणेल. या लोकांना लै शीर्यसलि घेण्यात कै अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीप्रमाणे पॉर्नचाही अतिरेक टाळावा हे समजायला या शास्त्रज्ञाची बाकी गरज ती काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे नाही त्यांचे म्हणणे ऐक ना- की व्यसन हा एक भाग झाला.
पण मेंदू वायर्डच होतो- जग हे एक सेक्श्युअल फील्डच वाटू लागते. जगात किती नानाविध व्यवहार चालतात पण आपल्या डोळ्यांना पीत रंगच, एकच रंग दिसू लागतो. शिवाय हार्मोन्स वगैरेबद्दलही बोललेत ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिसग्री.

बॉईज़ होस्टेलमध्ये असे अनेक पोर्नप्रेमी पाहिलेत- हू टर्न्ड औट क्वाईट वेल इन दि एंड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुळात लोकांना काय वाटायचं हे मी सांगतोय. त्यावर जजमेंट पास करत नाहीये. तुमच्या मतापेक्षा वेगळं काहीतरी लोक अगोदर ऐकून घ्यायचे हेच तुम्हांला पटत नाही तेव्हा चर्चा व्यर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेमकं लोकांना (गीतगोविंदकार आणि श्रोते यांना) काय वाटायचं हे तुम्ही सांगीतलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते एंजॉय करायचे ही वर्णनं. चोरीछुपे वाचण्यापैकी हा ग्रंथ नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे पॉर्न म्हणून एंजॉय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नैसर्गिक क्रियेचे सहज सुंदर वर्णन म्हणून. त्याला पॉर्न म्हणून झिडकारणं हे आजच्या काळातील सडक्या मूल्यारोपणाचं फलित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नैसर्गिक क्रियेचे सहज सुंदर वर्णन म्हणून.

हांगं अशी. आता ही नैसर्गिक सहज सुंदर क्रिया " हे खड्ड्यात जाणारे लोक" आपल्या जीवनात करतच नाहीतच कि काय? अर्थातच नाही. त्यांना देखिल त्या क्रियांबद्दल तितकाच आदर आहे.

प्रश्न असा आहे कि अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून अशा वर्णनाचे साहजिकत्व, सुंदरत्व नष्ट केले तर जनक्षोभ होतो. एकतर तुम्ही (म्हणजे जनरल पुरोगामी) देवधर्म मानत नाही, त्यातल्या कोणत्याही पात्राबद्दल तुम्हाला आदर नसतो, वर कशाचाही सत्यतेवर प्रचंड शंका असते. मग तुमच्यासाठी हे लोक केवळ कथेतली पात्रे उरतात. बहुसंख्य भाविक लोकांसाठी ही खरी पात्रे असतात. त्यांच्याशी पवित्र भावना निगडित असतात. मग कोणतीही श्रद्धा नसताना सरळ काल्पनिक कथापात्र समजून इतरांच्या संवेदनांना ठेच पोचवणे कितपत योग्य आहे?
संवेदना, लोकभावना महत्त्वाच्या नाहीत कशा? त्या कितीतरी गोष्टींनी प्रभावित होतात (कोणी, काय, कूठे, केव्हा, कसे, इ इ). अहो, इथे पुरोगामी आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हिरीरीने पुर्स्कार करणार्‍या ऐसीवर सत्य मांडून डार्विनला मूर्ख असे विशेषण दिले तर खटाखटा (न वाचता) कितीतरी खोडसाळ श्रेण्या पडतात. विवेकी पुरोगाम्यांची ही हालत आहे तर भावनिक धार्मिकांची काय असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून अशा वर्णनाचे साहजिकत्व, सुंदरत्व नष्ट केले तर जनक्षोभ होतो.

अर्थातच.

संवेदना, लोकभावना महत्त्वाच्या नाहीत कशा? त्या कितीतरी गोष्टींनी प्रभावित होतात (कोणी, काय, कूठे, केव्हा, कसे, इ इ). अहो, इथे पुरोगामी आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हिरीरीने पुर्स्कार करणार्‍या ऐसीवर सत्य मांडून डार्विनला मूर्ख असे विशेषण दिले तर खटाखटा (न वाचता) कितीतरी खोडसाळ श्रेण्या पडतात. विवेकी पुरोगाम्यांची ही हालत आहे तर भावनिक धार्मिकांची काय असेल?

डार्विनला मूर्ख म्हणणे हे वायझेड आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. पण यातल्या भावनेशी सहमत आहे. एकदम बलीवर्दनेत्रभञ्जक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण लोकांना काही ही चीप वाटतं मग काय त्यांच्या मतानुसार जात बसायचं का? आणि असे विचार पटत नसतील आणि खात्री असेल की ते त्यांचे विचार कधी बदलणारच नाहीत तर गेले खड्ड्यात (असे विचार, प्रत्यक्ष लोक नव्हे) अश्या विचारसरणीत काय चुक आहे? जे एका समुहाला चीप वाटतं ते दुसर्‍या समूहाला चीप वाटत नाही, हे साहाजिकच आहे ना? की मग लोकमान्य आहे, समाजमान्य आहे म्हणून आपल्याला काहीही वाटो ' हो हो चीप आहे हे बर का' असं म्हणायचं ?
आणि लोक गेले खड्ड्यात हे म्हणण्यामागे एवढी मोठी कारणं (लोकांना काहीही वाटलं तर वाटू देत, आम्ही तेवढे शहाणे आहोत, आम्ही कोणत्याही भावना दुखवू, त्यासाठी काहीही वेडंवाकडं लॉजिक देऊ, भावनांचं रिजनिंग करू,) असतील असं वाटत नाही - माझं वैयक्तिक मत तरी.. इट्स जस्ट, "डो़कं लावायचं नाहीये - पटत नसेल तुझे विचार तुला प्रिय, माझे मला - लोभ नसावा" संपलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना काहीही चीप वाटत नाही. दादा कोंडकेचे एवढे द्वयर्थी डायलॉग असलेले पिच्चर लोकांनी हिट केले. चीपपणा योग्य तिथे लावा ना. लोक काही म्हणत नाहीत. लोकांचे श्रद्धास्थान चीडवण्याची खाज का?
--------------
फ्रान्सच्या त्या चार्लिमहाराराजाने जगात हाहाकार माजवून दिला आहे. सगळ्या युरोपात मुस्लिमविरोधी वातावरण झाले आहे. आणि मुस्लिम बहुल देशांत फ्रान्सविरोधी. "लोक खड्ड्यात गेले" म्हणणं कितीला पडलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आयला! मला शार्लोच्या पंगतीला बसवून माझ्या खुनाचं भाकीत होतंय की काय इथे? भारावून गेल्ये मी. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

यी ल्लो पुरोगामी हाराकीरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यात एक मूलभूत प्रॉब्लेम आहे.

श्रद्धास्थाने चिडवण्याची खाज असलेले हुसेनसारखे वायझेड लोकही आहेत आणि त्याचबरोबर जुन्या हिंदू परंपरेत सेक्स इ. चे अगदी उघड वर्णनही आहे. तेव्हा उघड वर्णन म्हणजेच श्रद्धास्थाने चिडवण्याची खाज असे साधे समीकरण मांडणे चूक आहे. इतर बर्‍याच गोष्टी बघितल्या पाहिजेत त्याकरिता. नुसत्या एका गोष्टीवरून असे म्हणणे चूक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच सुंदर ललित
झ्याक एकदम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधा कृष्णा पेक्षा वयानी बरीच मोठी होती म्हणे ( कदचित यशोदे च्या वयाची ) आणि तिला नवरा पण होता.
वर ती कृष्णाच्या गाव ची पण नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटला नाही लेख.
म्युच्युअल आकर्षण असेल तर मर्यादा पाळता येणं शक्य आहे का?
का पाळाव्यात?
सध्याच्या नात्यात सेटीस्फाइड नसल्यासच ती कमी भरून काढण्यासाठी दुसर्याकडे आकर्षीत होतो? की सेटीस्फाइड असूनही दुसर्याकडे आकर्षीत होऊ शकतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्युच्युअल आकर्षण असेल तर मर्यादा पाळता येणं शक्य आहे का?

आहे. कारण आकर्षण हे मानवाचे सर्वोच्च मूल्य नाही. सत्व, स्वत्व, ममत्व, इ इ यांची मूल्यांमधे अशी किंवा काही वेगळी एक ऑर्डर आहे. मूळात मर्यादा पाळण्यातच मानवता आहे.
१६ व्या वर्षी व्हायचे लग्न आजकाल ३२ व्या वर्षी होत आहे. त्या दीर्घकाळात तीव्र लैंगिक भावनांना आवर घालता घालता लोकांना नाकी नऊ येते. म्हणून मर्यादा पाळणे असंभव आहे असे वाटू लागते. असे वाटणे एका अनैसर्गिकतेचा परिणाम आहे.

का पाळाव्यात?

For the sake of social order.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अपघातानं आज समोर आलेलं एक चित्र -

अठराव्या शतकात जम्मूच्या एका चित्रकाराने काढलेले राधा-कृष्ण (फिलाडेल्फिया म्यूझियम ऑफ आर्ट)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडासा risqué आणि non-veg म्हणता येईल असा हा ११व्या शतकातील श्लोक पहा.

राधा पुनातु जगदच्युतदत्तचित्ता
मन्थानमाकलयती दधिरिक्तपात्रे।
यस्या: स्तनस्तबकचूचुकलोलदृष्टि-
र्देवोऽपि दोहनधिया वृषभं दुदोह॥

अच्युतावर दृष्टि खिळलेली आणि दही नसलेल्या भांडयामध्ये ताक घुसळणारी राधा तुमचे रक्षण करो - जिच्या स्तनांच्या फुलोर्‍याच्या चूचुकांकडे लुब्ध डोळ्यांनी पाहणारा कृष्ण बैलाची धार काढत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्लोकाची अजून माहिती कृपया द्यावी. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'सुभाषितरत्नभाण्डागार' ह्या ग्रन्थातील माहितीप्रमाणे लीलाशुक नावाच्या ११ व्या शतकातील कवीची 'कृष्णकर्णामृत' अशी कृष्णभक्तिपर रचना आहे त्यामधून हा श्लोक घेतला गेला आहे. जालावरून दिसलेल्या माहितीनुसार ही रचना १३०५ साली केली असल्याचेहि दिसते. ही रचना विशेषतः दक्षिण भारतामध्ये अधिक प्रचलित असून चैतन्य महाप्रभूंबरोबर ती दक्षिणेत आल्याची माहिती दिसते. रचनेचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे हजारो श्लोक आहेत. पण असे श्लोक रचणारे हे राधा आणि कृष्णाचे भक्त होते. ते त्यांना ईश्वर मानत.
पण नास्तिक हेच वर्णन करू लागले तर ते शुद्ध पॉर्न आहे. कारण "राधा तुमचे रक्षण करो" या भागावर नस्तिकांची श्रद्धा नसते. मग त्यांचेकडून अगदी वेगळ्या प्रकारचे रसग्रहण होते. हे धार्मिक लोकांसाठी असंवेदनशील आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"Radha on the dance floor" लिहिणारी व्यक्ती आस्तिक आहे.
----------
अहो तेच तर म्हणायचंय - राधा कृष्णाच्या नात्याला लोकांनी पवित्र वगैरे समजलंय. त्यांचं प्रत्यक्ष नातं काय होतं कुणास ठाऊक? त्या दोघांना.
तेव्हा त्या नात्याला भक्तीचं लेबल लावणं जेवढं बरोबर तितकंच प्रणयाचं/शारिरीक आसक्तीचं लेबलही योग्यच आहे की- वर म्हटल्याप्रमाणे तेवढी मोकळीक आपल्या पूर्वग्रंथात घेतलीच आहे.
----------
शिवाय तुम्हाला पॉर्न म्हणजे काय हे नक्की माहिती नाही असं दिसतंय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय तुम्हाला पॉर्न म्हणजे काय हे नक्की माहिती नाही असं दिसतंय

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कधी जपानिज बीडीएसएम पाहिलं आहे का? स्त्रीला सगळीकडून मशिनने आवळून योनीद्वारात आणि गुदद्वारात एकदाच रॅपिड फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकेटर घालून व्हिडिओ बनवतात. त्यालाही पॉर्नच म्हणतात. आपल्या जवळच्या कुणाची अशी कल्पना करा म्हणजे कळेल पॉर्न म्हणजे काय असते.
===================
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. हुसेन पण म्हणतात कि मी नग्नतेत पावित्र्य पाहतो. भक्ती, पावित्र्य ही धर्माची मेन थीम आहे. ती कोणी कशीही प्रकट करो. नग्न चित्रांनी वा शृंगाररसाने. पण स्वतः नास्तिक असताना, पात्रांचे ईश्वरत्व अजिबात मान्य नसताना, ईश्वरांचा शुद्ध लैंगिकतेचा आनंद घेण्यासाठी म्हणून वापर करणे धार्मिकांची भावना आहत करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चला, म्हणजे तुम्हाला पॉर्न काय असतं त्याची एक्स्ट्रीम केस तरी साधारण ठाऊक आहे. शाबास! (विषयच असा की अभ्यास वाढवा म्हणायलाही पंचाईत!)
पुढला स्व अभ्यास -
१. शृंगारिक किंवा erotic ह्याबद्दल माहिती मिळवा (१० मार्क)
२. शृंगारिक चित्रं आणि कवितेचे एक उदाहरण शोधून त्याचा अर्थ लावा. (२ मार्क)
३. पॉर्न आणि इरॉटिक ह्यातले ५ फरक लिहा (४ मार्क)

बोनस प्रश्न - राधेचे वर्णन ज्यात शृंगारीक पद्धतीने केले आहे असं काव्य ह्या धाग्यात शोधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोर्न ची बदनामी थांबवा!!! ROFL

देवा कारे धनु राशीत इतके ग्रह टाकलेस, नको तिथे बडबडल्याशिवाय दिवस जात नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वला ! माहिती जमा करण्याला १० मार्क आणि त्याचे विश्लेषण करण्याला फक्त २-४ मार्क ? बहूत ना इन्साफी है ! जग माहिती तंत्रज्ञानाचे आहे, ज्ञानाचे नाही हेच खरे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile