ऐसीवर दिसून येणाऱ्या काही प्रवृत्ती

'आमचा ब्राह्मणांना विरोध नाही, तर ब्राह्मणी प्रवृत्तीला आहे' अशा प्रकारची विधानं आपण ऐकलेली आहेत. यात अर्थातच व्यक्तिगत, जातीविषयक रोख नाही असं म्हणत तेच नाव वापरण्याची सोय असते. ऐसीवर जरी ब्राह्मणी प्रवृत्ती दिसत नसल्या तरी इतर अनेक अशा प्रवृत्ती दिसतात. त्यातल्या बहुतांशी ऐसीसाठी हानिकारक आहेत. त्यांचा विरोध करण्यासाठी त्या आधी समजून घेण्याची गरज आहे. तसंच या डॉमिनेट करणाऱ्या प्रवृत्तींना तोंड देण्यासाठी काही मोजक्या सुष्ट प्रवृत्ती कार्यरत आहेत. त्यांचीही माहिती करून घेतल्यास ऐसीचा बचाव करणं शक्य होईल. म्हणून मी काही प्रवृत्ती इथे मांडतो आहे.

चिंजीय प्रवृत्ती - एकेकाळी सर्व प्रकारच्या पुरोगामीपणाला सरसकट चिंजीय प्रवृत्ती असं नाव होतं. आता हळूहळू पुरोगामीपणाच्या प्रॉब्लेमांचे वेगवेगळे पदर दिसून येत आहेत. पुरोगाम्यांचं ऐसीवर डॉमिनेशन असल्यामुळे अर्थातच चिंजीय प्रवृत्तीही ऐसीवर डॉमिनेट करते. चिंजीय प्रवृत्तीचे लोक अधार्मिक, नास्तिक, सेक्यूलर, पुरोगामी, स्वतःचा सोडून दुसर्‍याचा धर्म जास्त समजून घेणारे, कामापेक्षा जास्त सहिष्णू, अहिंसावादी इ इ असतात. असल्या प्रवृत्तीपोटीच सेक्युलरिझमच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचं ऑप्रेशन होतं. या प्रवृत्तीच्या लोकांना गीता आणि शिक्षण याचा काय संबंध आहे हे बिलकुल लक्षात येत नाही. सुदैवाने असल्या चिंजीय लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठीच मोदी सरकार आलेलं आहे. जनतेने चिंजीय लोकांच्या चिंध्या व्हाव्यात असाच कौल दिलेला आहे.

ऋषिकेशीय प्रवृत्ती - संतुलनाचा अत्याग्रह म्हणजे ऋषिकेशीय प्रवृत्ती. ऐसीवर डॉमिनेट करणाऱ्या पुरोगामी लोकांपैकी अनेकांत ही दिसते. ही फारच गहन प्रश्नांनी बुजबुजलेली आहे. जर कोणाला असंतुलित वागायचं असेल तर या प्रवृत्तीच्या लोकांना अकारण प्रॉब्लेम निर्माण होतो. मग ते संघामध्ये स्त्रियांना स्थानच नाही वगैरेबद्दल तक्रार करतात. आता पुरुषांनी एकत्र येऊन आपापल्यात झक मारली तर काय बिघडलं? स्त्रियांनी एकत्र येऊन पुरुषांशिवाय झक मारावी की! आता फक्त पुरुषांनी आणि फक्त स्त्रियांनी आपापल्यात जी झक मारली तीही एका मर्यादेपर्यंतच असावी, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होतो, हेही या ऋषिकेशीय प्रवृत्तीवाल्यांना समजत नाही. शिवाय एका दुटप्पीपणाबद्दल तक्रार करून इतर बाबतीत दुटप्पीपणा रेकमेंड करायचा हा मेटा-दुटप्पीपणा ही तर या प्रवृत्तीधारकांची ख्यातीच.

घासकडवीय प्रवृत्ती - सत्य म्हणजे विदा आणि विदा म्हणजेच सत्य असं आंधळेपणाने मानणाऱ्या लोकांची प्रवृत्ती म्हणजे घासकडवीय प्रवृत्ती. भारताचा भूतकाळ हा तेजस्वी होता, आत्ताच्या काळाच्या कैक पटीने चांगला होता हे उघड सत्य नाकारण्यासाठी ते डोळ्यांवर विदा-आलेख-सारिणींच्या पट्ट्या बांधून बसतात. इतिहासात गार्गी मैत्रेयी होत्या, सुवर्णयुग होतं, नालंदासारखी विद्यापीठं होती, उघड्यावर रत्नांचे बाजार भरवण्याइतकी सुबत्ता होती हे माहीत असूनही भारताची खरी प्रगती कशी गेल्या शंभरेक वर्षांतच झालेली आहे अशी धूळफेक ते लोक काहीतरी आकडेवारीच्या आधारे करू पाहतात. चिंजीय आणि ऋषिकेशीय प्रवृत्तींना ते या रीतीने तात्त्विक पाया देतात.

अदितीय प्रवृत्ती - जिकडेतिकडे विनाकारण स्त्रीवाद आणणाऱ्या व्यक्तींची प्रवृत्ती ही अदितीय प्रवृत्ती. पुरुषांनी काहीही म्हटलं की ते स्त्रियांच्या विरोधातच कसं आहे हे सिद्ध करून दाखवण्याची अदितय प्रवृत्तीवाल्यांना सवय असते. स्त्रिया भलतेसलते कपडे घालून पुरुषांना बलात्कार करण्यासाठी उद्युक्त करत नाहीत वगैरे भोळसट कल्पनांवर अदितीय प्रवृत्तीचे लोक विश्वास ठेवतात. संघात स्त्रियांना स्थान नाही याबद्दल तक्रार करण्यात त्या ऋषिकेशीय प्रवृत्तीचे हात बळकट करतात. बहुधा संघात जाण्याची बाळपणापासूनची सूप्त मनीषा कधीच पुरी होऊ न शकल्यामुळे अशांचा संघावर राग असतो आणि वेळोवेळी त्या तो दाखवून देतात.

अजोईय प्रवृत्ती - वर मांडलेल्या चिंजीय, ऋषिकेशीय, घासकडवीय आणि अदितीय प्रवृत्तींपासून ऐसीकरांचं रक्षण करण्यासाठी दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या नाइट इन शायनिंग आर्मरवाल्यांची प्रवृत्ती म्हणजे अजोईय पद्धती. अशा प्रवृत्तीचे लोक एकांडे शिलेदार असतात, आणि त्यांना बिचाऱ्यांना इतर प्रवृत्तींचं डॉमिनेशन सहन होत नाही. म्हणून वारंवार आवाज उठवण्याची त्यांना गरज वाटते. असं झालं की चिंजीय प्रवृत्तीचे लोक त्यांना 'तुम्हीच जास्त बोलता तेव्हा तुमचंच डॉमिनेशन नाही का?' असे खवचटपणाखाली व्यक्तिगत टिप्पणी दडवत विचारतात. भारताचा आधीच उज्ज्वल असलेल्या इतिहासावर आणि तेजस्वी संस्कृतीवर फ्लॅशलाइट टाकून ती ऐसीकरांना स्पष्टपणे दाखवण्याचं काम अजोईय प्रवृत्तीचे लोक करतात.

हा झाला काही प्रवृत्तींचा वरवरचा आढावा. वाचकांनी या प्रवृत्तींचे बारकावे अधिक स्पष्ट करावेत, तसंच इतर प्रवृत्तींची (जसे की थत्तीय, मेघनीय, बॅटीय...) यात भर घालून सम्यक चित्र निर्माण करायला मदत करावी असं मी आवाहन करतो.

field_vote: 
3.57143
Your rating: None Average: 3.6 (7 votes)

प्रतिक्रिया

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फक्त चिंजं आणि ऋषिकेश यांच्या नावाच्या प्रवृत्ती निघाल्याचं सहन न झाल्याने मारून मुटकून इतर प्रवृत्तीना जन्म देणार्‍या गुर्जींच्या बैलाला होऽऽऽऽ

==

सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक्रमात फक्त चिंजीय व ऋषिकेशीय प्रवृत्तीला स्थान मिळेल
-हुकूमावरून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेशीय प्रवृत्ती तर आत्ता आत्ता आयडेंटिफाय झाली आहे. चिंजीय प्रवृत्तीबद्दल चर्चा गेले काही आठवडे सुरू आहे. पण घासकडवीय प्रवृत्तीचा सर्वात आधी - कित्येक महिन्यांपूर्वी मेंशन झाला होता हे मी दाखवून देऊ इच्छितो. अदितीय प्रवृत्तीला ते नाव दिलं गेलं नव्हतं, पण त्याविरुद्ध तक्रार कायमच होत राहिलेली आहे. तेव्हा तुम्हीच लायनीत सर्वात मागे उभे राहा मुकाट्याने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्यास वाढवा गुर्जी! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा हा हा, अभ्यासाशिवाय मी बोलत नसतो, समजलेत काय? हे घ्या, इथे घासकडवीय प्रवृत्तीविषयी वर्णन आहे. तारीख बघ, तारीख बघ, घाबर घाबर. त्यानंतरही कोणीतरी (कोण बरं असेल?) घासकडवी प्रवृत्तीविषयी लिहिलं होतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.aisiakshare.com/node/2159
अदितीय प्रवृत्ती शब्द हा देखिल फार जुना आहे.
------------------------------------------
लोक गंभीरतापूर्वक निवडणूकीची चर्चा करत असताना बाईसाहेब मी २३ क्रमांकाच्या उमेदवाराला, मनात एक रँडम नंबर आवडला म्हणून, मत देऊन आले असे म्हणाल्या होत्या. त्या विक्षिप्तपणाच्या वागण्यावरून ती प्राचीन संज्ञा वापरात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हॅ तीही प्रवृत्ती नैये फक्त अदितीय मतदान असतं.
प्रवृत्ती दोनच पुढे आल्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हॅ.. तिथे निव्वळ एका घासकडवीय फंक्शनविषयी लिहिलंय. तोही ओझरता उल्लेख. त्यानंतर त्यावर अभ्यास वगैरे कै नैये. आणि एका फंक्शनवरून अख्ख्या प्रवृत्ती विषयी काहीच सांगता येणार नाही. कारण मुळात अशी प्रवृत्ती अस्तित्त्वातच नव्हती. काल झालेल्या जळफळाटानंतर ती जन्माला घालण्याचा हा कुटील अट्टहास आहे!

ऋषिकेशीय प्रवृत्तीवर जूनपासून मंडळींचा प्रकट सखोल अभ्यास चालु झाला आहे (त्याआधी गुप्तपणे अभ्यास होत होता ते सोडाच). त्यानंतर काही खाजगी व जाहिर कट्ट्यांमध्ये ऋषिकेशीय प्रवृत्तीवर तासा-तासाचे परिसंवाद झालेत. असा अभ्यास ६-७ महिने केल्यावर कुठे काल त्याला थोडीश्शी डिफाईन करण्यात कसंबसं शक्य झालंय (ती डेफिनेशन किती योग्य आहे ते गुलदस्त्यातच आहे ते सोडून द्या) !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेशिय प्रवृत्ती मध्ये प्रत्येक गोष्टीत आधीच शंका घेणे आणि सावधपणे वागणे(घाईत आहे आणि चपखल शब्द पटकन सापडत नाहीयेत, ऋ ला मला काय म्हणायचंय हे समजलं असेल अशी अपेक्षा) हे का नाहीय गुर्जी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

हो हो. मोदी सरकार सत्तेत आल्यावर मुसलमानांची कापाकापी करण्यासाठी जर्मनीसारखी संघनन केंद्रे भारतात उघडतील ही त्यातली एक एपिक भिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्हीच शहाणे, जगाचे आकलन आम्हालाच झाले आहे.आम्ही जे सांगतो तेच विवेकी व सत्य असून बाकी सगळे अविवेकी व असत्य आहे. बाकीच्यांना हे जर समजत नसेल तर त्या त्यांच्या आकलनाच्या मर्यादा आहेत.
या प्रवृत्तीला काय म्हणावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अहो ही वेगळी प्रवृत्ती कसली? ही तर रीती आहे. सगळ्यांनाच जर हातपायकाननाकडोळे असतील, तर 'या वेगळ्याच अवयवाला काय म्हणावं?' असा प्रश्नच येत नाही.

सगळेच जण ही भूमिका घेतात आणि वर 'आम्ही ही भूमिका घेतच नाही, इतरच घेतात' असंही म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं काही नाही. प्रत्येकाकडे थोडीफार नम्रता असते आणि आपापल्या मर्यादांची जाणिव असते. आडकित्ता, नाईल आणि अदिती (नॉट अगेन) या प्रवृत्तीसाठी चांगले कँडीडेट आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही प्रवृत्ती नाही. हे ऐसीवर यायचे मिनिमम क्वालिफिकेशन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही जे सांगतो तेच विवेकी व सत्य असून बाकी सगळे अविवेकी व असत्य आहे.

मी हे विकीसत्य असे वाचले आणि क्षणभर गोंधळात पडलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्तीय आणि बॅटीय प्रवृत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रवृत्तीच्या व्यक्ती या आपल्यातल्या आहेत असं वाटू लागावं तोच त्या असे काही प्रतिसाद देतात की शंका वाटावी. [थत्तीय आणि वॅटीय या एकाच स्पीशी मध्ये टाकायला हरकत नाही].

म्हणजे हा मनुष्य स्त्रीवादी आहे असं वाटायला लागावं तर तो एकदम विरुद्ध प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो. [अशा लोकांना मराठीत व्हिम्झिकल म्हणतात].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थत्तेचाचा व्हिम्झिकल आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रॅशनल लोक व्हिम्जिकलच असतात. प्रत्येक शाखेतलं बरंच काही मान्य करण्यासारखं असतं आणि एका मर्यादेपलिकडे प्रिय शाखेची विचारसरणी देखिल असमर्थनीय वाटते. मग हे लोक इगो साठी तेच तेच राग आळवत नाहीत. म्हणून अस्थानी भाजपद्वेष, संघद्वेष सोडला तर थत्ते बरेच संतुलित आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला रॅशनल आणि संतुलित म्हटल्याबद्दल तुम्हाला एक पार्टी लागू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्हाला शाखेतल्या काही गोष्टी मान्य असतात असही म्हणतायत ते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शाखेतले नियम मान्य असतातच.......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घासकडवींनी 'तारतम्यावर भर असतो' म्हटल्याबद्दल त्यांना खोडसाळ श्रेणी आणि अरुण जोशींनी संतुलित म्हटल्याबद्दल पार्टी?? अशा प्रकारे थत्तेचाचांनी आपण कुठल्या गटात आहोत ते दाखवून दिले आहे! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता याबद्दल तुम्हांला कुठली श्रेणी द्यावी हे कळेनासे झालेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला रॅशनल आणि संतुलित म्हटल्याबद्दल तुम्हाला एक पार्टी लागू.

मधे कट्ट्यावर कोणीतरी रामदासकाकांना बेरकी म्हटलं होतं असं चर्चेतून दिसलं. मी रामदासकाका बेरकी नाहीत असं म्हणायला तयार आहे. मलाही पार्टी लागू होईल का ? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१००

मार्मिक श्रेणी देऊन समाधान होईना म्हणून प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाचा व्हिम्झिकल आहेत.

ते तर ते स्वतःच म्हणून राहिलेत... यात तुम्ही नवीन काय सांगितलेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात तुम्ही नवीन काय सांगितलेत?

काही नाही.
तुम्हाला हा प्रश्न का पडला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काही विशेष नाही, फक्त, 'पुण्यात सूर्य पूर्वेस उगवतो' हे आजतागायत अखिल मानवजातीपासून (बोले तो, पुणेकरांपासून) काही कारणास्तव दडून राहिलेले गुपित फोडल्यासारखे भासले, म्हणून म्हटले. (अर्थात, तुमचा तसा उद्देश नसेलही, पण तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅ.. दोन्ही प्रवृत्ती वेगवेगळ्या आहेत.
दोन्ही व्हिम्झिकल प्रवृत्ती असल्या तरी तो व्हिम्झिकलपणा सारखाच अज्जिब्बातच नैय्ये Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भिन्न भिन्न प्रकारच्या सुदिनांची वाट पाहणे देखिल ऋषिकेशीय वृत्तीत येते. उदा. बायकांवर* ओरडू नये (च्यायला काय माफक अपेक्षा आहे.) हे ज्या दिवशी भारतीय मस्तावलेल्या पुरुषांना कळेल तो सुदीन.

* 'प्रत्येकाने आपापल्या बायकोवर' चे अनेकवचन. च्यायला, भाषेची दौर्बल्ये फार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL
जबरी लेख...
गब्बरीय वृत्तीपण आहे की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://www.aisiakshare.com/node/3109?page=1
वर गब्बरीय संकल्पना हा शब्द वापरण्यात आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गब्बरीय वृत्ती - लिंकांचा भडीमार करणे, प्रत्येक गोष्ट (जड = फ्लाईट मधील recliner space अथवा संदिग्ध = फ्लाईटची सुरक्षा) पैशात मोजणे, पैसेवाल्यांची/कंपन्यांची /उद्योजकांची तळी सदैव उचलून धरणे अशा काही वृत्ती गब्बरीय वृत्तीचे कॉर्नरस्टोन आहेत.
Not getting worked up, अर्थात शांतपणे (taking own sweet time) प्रत्युत्तर देणे ही संतुलित प्रवृत्ती त्यात येते.
हां अजुन एक - समोरचा नंतर काय बोलणार आहे याचे विश्लेषण आधीच स्वतः करुन ते मांडून समोरच्याची बोलतीच बंद करण्याची (कन्या राशीय* - ओव्हर-अ‍ॅनॅलिसिस) प्रवृत्ती Wink

* गब्बरची रास कन्या आहे अथवा नाही हे माहीत नाही. तेव्हा आडाखे/निष्कर्ष-उड्या (jumping the conclusion) मारु नयेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजीमहाराजांची रास कन्या होती असे वाचल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा!! श्रीरामाची कर्क अन श्रीकृष्णाची वृषभ होती असे मी ऐकले आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृष्णाची रास वृषभ? हे बाकी रोचक आहे. वर्णने उपलब्ध आहेत त्यांवरून त्याची स्वभाववैशिष्ट्ये तशी वाटत नाहीत. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे शुक्राची रसिक अन डिप्लोमॅटिक रास, रियल इस्टेट्/स्टॉक (द्वारका) मध्ये लकी. वाटतं की वर्णन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांशी, इन्क्लुडिंग कट्टर विरोधी प्रतिसाद, तात्काळ सहमत होणे आणि झडझडून एकदाही न भांडणे या प्रवृत्तीला अपुलीय प्रवृत्ती म्हणावे.
वरीलपैकी सर्वांशी तत्काळ सहमत होण्याचा भाग वगळून उरलेल्या प्रवृत्तीला गवीय प्रवृत्ती म्हणावे.

असे सुचवून पाहतो.

शिवाय चिंजीय प्रवृत्तीमधे निरीक्षणप्रियता (काही असंस्कृत लोक याला गालातल्या गालात हसत तमाशा पाहणे असे म्हणतात.. ) हा गुण नोंदवण्याचे राहून गेलेय तेही करतो. Wink

नवीबाजू ही प्रवृत्ती मात्र डिफाईन करण्यास सर्वात अवघड आहे. कारण मुळात 'न'वी बाजू याचे यान्त रुप 'न'वीबाजूय होते नवीबाजीय की अन्य काही, हे स्पष्ट नाही. म्हणजे आयडी घेण्यातच चतुराई अन दूरदृष्टी दिसतेय..

शिवाय ते रोज प्रवृत्तीचा फ्लेवर बदलता ठेवण्यात यशस्वी असल्याने नेमके चिमटीत सापडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो शब्द नवीबाज्वीय असा हवा. अजोईय पण चूक आहे, अज्वीय असं हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शिवाय चिंजीय प्रवृत्तीमधे निरीक्षणप्रियता (काही असंस्कृत लोक याला गालातल्या गालात हसत तमाशा पाहणे असे म्हणतात.. पण ते असंस्कृत असल्याने लक्षात घेण्याचे कारण नाही) हा गुण नोंदवण्याचे राहून गेलेय तेही करतो.

प्रचंड सहमत!

- (गालातल्या गालात हसणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्काळ सहमत होणे

ज्जे बात Smile गोग्गोड!! Least resistance Smile
___
स्वतःच्या धाग्यावर जास्त प्रतिसाद्संख्या दिसली की धागा उघडेपर्यंत टीकेच्या, भीतीने पोटात गोळा येणे - ही इतरांना न दिसणारी, सुप्त वृत्ती ही अपुलीय आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही आमच्या इंजिनियरींगच्या वायवा (मराठीच आहे हा शब्द. हो.) साठी परिक्षक म्हणून यायला हव्या होतात हो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile मस्त!!!
खरच लहानपणापासून आम्ही भित्रट लोकांत गणलेलो आहोत. एक मुलगी जाम bully होती अन ती मला रोज डब्यातलं लोणचं वगैरे मागायची. काही दिवसांनी मी तिला आपणहून आधीच लोणचं देऊन टाके ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहव्वा! गुर्जींना कोणीतरी अभ्यास वाढवा असे सांगितले जाण्याचा सुदिन पाहणे नशिबात होते तर! ऋषिकेशीय प्रवृत्तीची विजय असो! Smile

अभ्यास वाढवा असे का? तर अदितीय प्रवृत्तीमधे बलात्काराचा उल्लेख आणि त्या संदर्भात फक्त कपड्यांचाच आलेला उल्लेख अभ्यास कमी पडल्याचे द्योतक आहे. बलात्कारित स्त्री आणि तिचे दारु प्यायलेले असणे ह्याचा अन्योन्य संबंध जोडणार्‍या प्रवृत्तींवर केलेले घणाघाती लत्ताप्रहार यांचा उल्लेख नसल्याने त्या प्रवृत्तीला योग्य न्याय दिला गेला नसल्याचे नम्रपणे नमूद करतो.

- (नम्र प्रवृत्तीचा) सोकाजी

--------------------------------------------------------
इथे अबला असा शब्दप्रयोग वापरणार होतो पण तो अदितीय प्रवृत्तीचा व्यत्यास असल्याणे टाळून त्या प्रवृत्तीचा अभ्यास असल्याचे नम्रपणे नमूद करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंजीय प्रवृत्तीला मराठी आंतरजालावर ऑलरेडी शब्द असूनही नवीन शब्द पाडणार्‍या "न्यूस्पीक"चा निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोणता ?
कोणता बरे तो शब्द ?
विचारवंत तर नव्हे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विचारवंत नव्हे नव्हे ... विचारजंत(तू) ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

चिंज प्रामाणिकपणे मोदी सरकार फडतूसांचे कल्याण करील याबद्दल आशावादी आहेत असे म्हणाले आहेत. त्यामुळे आकस, पूर्वग्रहदोष, द्वेष इ इ निर्दिष्ट करणारा चिंजीय प्रवृत्ती हा शब्द मी माझी धारणा तशी राहीपर्यंत मागे घेतो. सात्विक विरोधी भूमिका असेल तर तिचे स्वागत करायला हरकत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोदी सरकार आल्यामुळे झालेल्या जळजळीनंतर या अपप्रवृत्ती बळावल्या आणि म्हणून अजोंना दंड/शड्डू ठोकून उभं रहायला लागलं याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो.

===
-शमनातूर कंडू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Smile
*
चला; आपण कुठं ह्या धप्पाकुट्टीत अडकलो नाहित ते बरच आहे म्हणायच मनोबा
*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्या इष्टाईलीला वृत्तींत स्थान न मिळाल्याने झालेला जळफळाट अप्रत्यक्षपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न रोचक आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एकुणात मस्तच.
पहील्या काही प्रवृत्तींना माइल्ड करुन लिहीले आहे ( तेही गुर्जींच्या प्रवृत्तींना साजेसे आहे ).

अजोंच्या प्रतिक्रीयांना "निरर्थक" किंवा "अवांतर" श्रेणी देणारी कुठली प्रवृत्ती हे कळले असते तर चांगले झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींचं सरकार आलं तेव्हा भलतं काही आक्रित झालं आहे, भारत एक अंधःकारमय भविष्याच्या गर्तेत फसला आहे, म्हणून एक प्रस्थापित अँटीमोदी संस्थळ म्हणून इथे माय मेल्यासारखी रडारडा अखंड चालू राहावी यासाठी प्रयत्नशील लोकांचे सुखही ३-४ मोदीच्या फॅन लोकांनी हिरावून घेतले आहे. या लोकांचे मोदी सरकारने काही चांगले केले तर तोंड कधीच उघडत नाही. मात्र कुठे काही खाट् झालं कि लगेच कावकाव चालू होते. ती कावकाव देखिल मी सुखाने करू देत नाही. म्हणून हे काँगी-सेक्यूलरी-पुरोगामी-न्यूनगंडी आळीपाळीने, मी काहीही लिहिलं तर, समजून न घेता, काहीही श्रेण्या देत असतात. ही प्रवृत्ती यांच्यापैकी कोणाच्याही नावाने खपावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मात्र कुठे काही खाट् झालं कि लगेच कावकाव चालू होते. ती कावकाव देखिल मी सुखाने करू देत नाही.

ROFL ह्या वाक्याला टाळ्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो ROFL

अगदी अगदी!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भन्नाट Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरामखुर्चित बसून सुपारी कातरत विडा रंगेपर्यँत भारदस्त विषयांत मुद्देसूद विरोधीमतखंडनावगुंठीत लेख ठोकणाऱ्यांना आणि अधुनमधून डोकावून अचरट प्रश्न विचारणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास समाजाची आणि विज्ञानाची अधोगती निश्चित आहे. पंचवीस हजार वोल्टच्या धोक्याच्या सुचनेच्या सहीकडे दुर्लक्ष करून तारेजवळ कोळसा करून घेण्याची प्रवृत्ती समाजात का बरे {वाईट} बळावत आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक प्रवृत्ती (नाव तुम्ही द्या) : मला कश्शातलंही काहीही कळत नाही; मी अमका लेखक वाचलेला नाही किंवा तमक्या चित्रकाराची चित्रं पाहिलेली नाहीत; मी कसल्याही विधानाच्या पुराव्याखातर काहीही विदा देणार नाही; फक्त ज्यात त्यात शेरेबाजी करण्याचा माझा हक्क मात्र जन्मसिद्ध आहे आणि तो मी बजावणारच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आचार विचारांचा संबंध जोडू पाहताय का जंतू तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा हा हा, अगदी अगदी!!!!

तसा जोडू पाहत असतील तर 'त्यांच्याच प्लेयरने' त्या कल्पनेची रेवडी उडवलेली आहे तेव्हा हा नोबॉल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका दगडात दोन पक्षी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सगळ्यातलं सगळं कळून घेऊन, बरेच लेखक वाचून, चित्रे पाहून, समीक्षा करून, पुरावे देऊन , इ इ यातलं काहीही न करता हे कसं निरर्थक आहे हे यशस्वीरित्या मांडता येतं.
बाकी हा भला न्याय आहे. तो गब्बर म्हणतो - प्रचंड श्रीमंत असा, ज्ञानी असा नैतर आम्ही तुमची कत्तल करू. त्यातलाच प्रकार आहे हा.
ज्ञानसंपादनाचे कोणी किती कष्ट घेतले याला का मार्क्स असावेत? फायनल आर्ग्यूमेंटचे मेरिट काय हे आहे हे पहा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणखी एक प्रवृत्ती (नाव तुम्ही द्या) : मला कश्शातलंही काहीही कळत नाही; मी अमका लेखक वाचलेला नाही किंवा तमक्या चित्रकाराची चित्रं पाहिलेली नाहीत; मी कसल्याही विधानाच्या पुराव्याखातर काहीही विदा देणार नाही; फक्त ज्यात त्यात शेरेबाजी करण्याचा माझा हक्क मात्र जन्मसिद्ध आहे आणि तो मी बजावणारच!

१) मतदान करणे हे शेरेबाजीत मोडते काहो, चिजं ?

२) एक व्यक्ती एक मत - व त्यावर आधारित मतदान - हे केंद्रसरकारच्या अनिकविध अ‍ॅक्टिव्हिटीज बद्दल असते. केंद्रसरकार अक्षरशः दोन तिन डझन अ‍ॅक्टिव्हिटीज करते. मग मतदान करणे हे "ज्यात त्यात" शेरेबाजी करणे होते का ओ ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त टोला आहे.
==========
आमची अजून एक शेरेबाजी- चिंजंनी आपल्या समीक्षकपदाचा राजीनामा दिला पाहिजे. जो माणूस देशाचे पंतप्रधान कळकळीने स्त्रीभ्रूण हत्या करू नकात म्हणून भाऊक होऊन भीक मागताना कुत्सिततेने हसतो तो अशा निष्पक्षता आवश्यक असणार्‍या पदी विराजमान असणे योग्य आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ठराविक काळाच्या अंतरात स्वतःचे लेख टाकून, अन्य कोणाच्याही कोणत्याही लेखाला प्रतिसाद देण्याचे कष्ट न घेण्याची देखील एक प्रवृत्ती आहे - पैचान कौन कौन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या तर नाड्याच थंड झाल्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मित्रा, नाड्या शेकोटीवर धर असे सुचवते Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असल्या प्रवृत्तीपोटीच सेक्युलरिझमच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचं ऑप्रेशन होतं.
<<
तुमचं "ऑप्रेशन" झालंय का? हा प्रश्न सहसा 'संततीचं ऑप्रेशन' या अर्थाने विचारला जातो. तेव्हा भारतीय संस्कृतीची नसबंदी सेकुलरिझमच्या नावाखाली होते हा रोचक शोध गुर्जींनी कसाकाय लावला याचा बराच वेळ विचार केल्यानंतर ते ऑप्रेशन कोणतं, ते डोक्यात आलं.

रच्याकने :
१. चिच्चांच्या सहीतल्या गुलाबी रंगावर भुलून त्यांच्याबद्दल व
२. आमच्याबद्दलही, नाईट इन शायनिंग आर्मरने लिहिणे म्हणजे भारीच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रवृत्तीची गाडी व्हाया (मार्गे) {मेगा हाइवे} राशी जातेय हे एक बरं झालं. त्याचा फार जवळचा संबंध आहे प्रसिद्ध अथवा पौराणिकांच्या राशी माहीत नाहीत. कन्या राशीकर साहजिक आणि व्यवहारी विचार करतात. त्यांच्याकडे विनोद आणि आनंद गाळण्यासाठी (वेगळे करण्याची)एक गाळणी असते त्यातून सर्व गोष्टी गाळून उरलेल्या गोष्टींचा विचार करतात त्यामुळे यांचा बैँक बैलन्स सतत वाढत असतो.Costing अथवा Cost analysis वगैरे यांना फारच मानवते.चिवडा मिळाल्यास त्यातले काजू बेदाणे शेंगदाणे इत्यादी गाळून उरलेल्या मसाला मीठ जिरेपावडरचा कसा उपयोग करता येईल या विचाराने एक आठवडा निघून जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची प्रवृत्ती पहिल्यांदा शोधली. ती न सापडल्याने पुलंचे "मुंबईकर, पुणेकर की नागपुरकर" हे वाचताना नाशिक, कोल्हापूर वा सोलापुर करांना जसे वाटत असेल तसे तूर्त वाटून घेत आहे. बाकी प्रतिक्रिया नीट वाचून देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची प्रवृत्ती पहिल्यांदा शोधली. ती न सापडल्याने पुलंचे "मुंबईकर, पुणेकर की नागपुरकर" हे वाचताना नाशिक, कोल्हापूर वा सोलापुर करांना जसे वाटत असेल तसे तूर्त वाटून घेत आहे.
+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'ऐसी'वरची प्रत्येक व्यक्ती ही एकेक प्रवृत्तीकारक आहे. ऐसीवर जितक्या व्यक्ती म्हणजे जितके आय्डी, तितक्या प्रवृत्ती.
(अपवादात्मकरीत्या,)अर्थात समान प्रवृत्ती राखणारे काही आय्डी आलेगेले, त्यांना गपुलीय प्रवृत्ती म्हणावे काय?
नाममात्र, बॅनमात्र, प्रतिसादमात्र अश्यांना मात्रीय प्रवृत्ती म्हणावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे ही आंजावरील एक प्रवृत्ती आहे. ऐसी अक्षरे रसिके लोळवीन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

इतकी सारी बकबक होऊनही जालावर सर्वप्रथम येणे अपेक्षित असणारा प्रतिसाद अजूनही न आल्याने एक जालकर म्हणून शरम वाटली. घासुगुर्जींच्या माथा आळ लागे असाच प्रकार आहे हा. असो. मीच देऊन टाकतो आता.

'हुं कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी काढलेला धागा'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de