पोपटी

हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते. कुटुंबाची, मित्र-मैत्रीणींची, कट्यावरच्या ग्रुपची, ऑफिसच्या कलिग्जची व अशा वेगवेगळ्या ग्रुप्सची पोपटी पार्टी ठरते.

ग्रुपमध्ये पोपटीसाठी लागणार्‍या तयारीची वाटणी केली जाते. त्यात भाज्या आणणे, मडके आणणे, लाकडे गोळा करणे, भांबुर्ड्याचा पाला आणणे, वाटण बनवणे, बसण्याची जागा साफसुफ करणे अशी कामे वाटली जातात. सगळे ग्रुप मेंबर्स जमले की पोपटी लावायची सुरुवात होते. सोबतीला खेळ, मनोरंजन चालू असते.

पोपटीसाठी आवडीनुसार भाज्या, मांसाहारी असतील तर मटण/चिकनही आणले जाते. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतले जाते. वालाच्या, मेदळाचा, तुरीच्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन घेतात. बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.

पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.

पोपटी करण्यासाठी लागणार्या वालाच्या, मेदळाचा, तुरीच्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात. जर कोणी शाकाहारी असतील तर मटण्/चिकन साठी दुसरे मडके लावले जाते.

ह्या मौसमात भांबुर्डा ही वनस्पती ओसाड जागी, शेतांच्या बांधावर उगवलेली असते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो. त्या वनस्पती किंवा त्याचा पाला काढून धुवुन घेतात. मडक्याच्या तळाला हा भांबुर्डा टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.

आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.

त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते. मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.

साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत ग्रुप्सचे मनोरंजनाचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. कुटुंबाच्या पोपटी पार्टीत थंडीने कुडकुडणारे आजी-आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपडतात. चर्र असा विसिष्ट आवज आल्यावर पोपटी झाल्याची घोषणा केली जाते. पोपटीचा गरमागरम वाफळता आस्वाद घेण्यासाठी सगळे एकत्र बैठक मांडून बसतात.
मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणले जाते.

बैठकीच्या मधोमध एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते. ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते. दंगा मस्ती करणारे असतील तर हात भाजण्याची पर्वा न करता मडक्यातील खमंग भाजक्या भाज्या काढण्यासाठी जमलेले तुटून पडून आनंद लुटतात. एक काळोख्या थंड रात्रीत शेत-माळव्यासारख्या वास्तुंच्या निसर्गमय सानिध्यात पोपटीचा शेकत शेकत उबदार आस्वाद घेतला जातो.

हे लेखन २८ डिसेंबर २०१४ च्या लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

भन्नाट असतो हा प्रकार. आम्ही पेणजवळ एका विकांतघरी केलेल्या पोपटी-पार्टीची आठवण जागवलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती अनवट ...किती मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकृ (पाकृतील चीज नव्हे.) रीसायकल्ड आहे काय?

अगोदर पाहिल्यासारखी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान माहिती. चित्र बघून उंधियोची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्यांदाच ऐकतेय हा प्रकार. रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0