धर्म कसा बुडवावा

एका 'धर्मवीर' मित्राने स्वतःचा धर्म कसा बुडवावा यावर सल्ला मागितला होता. त्याच्यासाठी हा फुकटचा सल्ला.
---
बुडवायचा असेल तुला जर धर्म
तर जा देवळात किंवा मशीदीत
यात राहिला ना चर्चचा उल्लेख
'त्यांना सांगा की' असे बजाव मला
येताजाता वाजव ऐकव संस्कृतीची पुंगी
रोज एक विमान उडव पुराणातले
आणि बराचसा खयाली पुलाव पकव
आपल्या प्रत्येक अवगुणासाठी
इतरांच्यात कारणे शोधायला शीक
पिवळ्या लंगोटाबाबत लाज नको
त्याहून अधिक पिवळा लंगोट शोध
त्याकडे बोट दाखवून म्हण
माझा अजून तितका पिवळा नाही
मग 'जितं मया' चा शड्डू ठोक
परंपरेची भांग घोटून एक गोळी चढव
नि मग्न हो धर्माच्या जयजयकारात
मगच बुडेल तुझा धर्म

विनासायास...

- शर्मवीर रमताराम

field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आले धर्मद्रोही पाखंडी, यासगळ्याचा कुठेतरी जाब द्यायला लागणार आहे हे विसरू नका.
- जय श्रीराम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका 'निधर्मवीर' मित्राने स्वतःचा निधर्म कसा बुडवावा यावर सल्ला मागितला होता. त्याच्यासाठी हा फुकटचा सल्ला.
---
बुडवायचा असेल तुला जर निधर्म
तर जा संसदेत किंवा न्यायालयात
यात राहिला ना कार्यालयांचा उल्लेख
'त्यांना सांगा की' असे बजाव मला
येताजाता वाजव ऐकव लोकशाहीची पुंगी
रोज एक थेरी मांड विश्वसृजनाची
आणि बराचसा उत्क्रांतीचा पुलाव पकव
आपल्या प्रत्येक अवगुणासाठी
इतरांच्यात कारणे शोधायला शीक
काळ्या डगल्याबद्दल लाज नको
त्याहून अधिक काळा डगला शोध
त्याकडे बोट दाखवून म्हण
माझा अजून तितका काळा नाही
मग 'जितं मया' चा शड्डू ठोक
आधुनिकतेची भांग घोटून एक टॅब्लेट चढव
नि मग्न हो प्रगतीच्या जयजयकारात
मगच बुडेल तुझा निधर्म

विनासायास...

- निधर्मवीर अरुणजोशी
==============
धर्माचं महत्त्व इतकं कमी झालं आहे आणि पर्यायी व्यवस्थांनी माणसाचं जगणं इतकं हराम केलं आहे तरीही वेचून धर्मावरच टिका करायचा सोयिस्कर मार्ग निवडणे म्हणजे अंधत्वाची हाईट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजोंच्या कोमल मनाला यातना झालेल्या पाहून आमच्याही मनास क्लेश जाहले. चित्तशुद्धीसाठी बालाजी तांबेंच्या सुधारगृहात जातो किंवा रामदेवबाबाकडे कुठली आयुर्वेदिक 'चित्तशुद्धी चूर्ण' मिळते का ते पाहतो.

रच्याकने धर्माचे मह्त्त्व कमी झाले असेल तर ती अतिशय आनंददायक गोष्ट आहे. धर्म ही संकल्पनाच नाहीशी व्हावी अशी आमची फार्फार इच्छा आहे. काय करणार पण, धर्माचे 'डोळस' भक्त काही ऐकायलाच तयार नाही. ते त्यांची सदसद्विवेकबुद्धी, विश्लेषणक्षमता, वगैरे सोडून अंधभक्त व्हायला तयारच नाहीत. मग आम्हीच तो कल्की अवतार असे आमचे जे भविष्य पुराणाच्या आधारे ज्योतिषविशारद रज्जोनाथांनी वर्तवले आहे ते कसे खरे होणार आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

धर्माचे मह्त्त्व कमी झाले असेल तर ती अतिशय आनंददायक गोष्ट आहे. धर्म ही संकल्पनाच नाहीशी व्हावी अशी आमची फार्फार इच्छा आहे.

डूम्सडे क्लॉक डॉट मध्यरात्रीच्या बारावर नेण्याची फार घाई झालेली दिसते तुम्हाला. विज्ञान ही संकल्पनाच नाहीशी व्हावी अशी आमची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

<<डूम्सडे क्लॉक डॉट मध्यरात्रीच्या बारावर नेण्याची फार घाई झालेली दिसते तुम्हाला. >> डूम्सडे क्लॉकचे ठाऊक नाही पण धर्माचे लवकर बारा वाजावेत अशी नक्कीच इच्छा आहे. इन्शाल्ला जरूर पूरी होगी.

<<विज्ञान ही संकल्पनाच नाहीशी व्हावी अशी आमची इच्छा आहे.>> सॉल्लिड आयडिया आहे. जमलं आपलं. एकदा विज्ञान नाहीसं झालं की धर्म नि धार्मिकही आपोआप नाहीसे होतील. बेष्टं आयडिया दिलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अगदी सहमत.
अमुक धार्मिक भंपकपणा "आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाला आहे" अशा लोणकढ्या मारणं तरी बंद होईल अ‍ॅट लीस्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अमुक विज्ञान हे मानवी मूल्य संमत आहे हा भंपकपणा बंद करा अगोदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अमुक विज्ञान हे मानवीमूल्यसंमत आहे, असे मी कधी म्हटलो?

धर्म नामक प्रकार मानवी मूल्यांची जपणूक करतो, असे तुम्हांस म्हणावयाचे आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धर्म नामक प्रकार मानवी मूल्यांची जपणूक करतो, असे तुम्हांस म्हणावयाचे आहे काय?

आधुनिक काळाच्या आरंभीची मूल्ये धर्माने नैतर काय मग तुमच्या सांख्यिकीच्या आणि भौतिकशास्त्राच्या असम्यक नियमांनी जपली?

अमुक विज्ञान हे मानवीमूल्यसंमत आहे, असे मी कधी म्हटलो?

मूल्य शब्दाबद्दल सॉलिडच लोचा झालाय. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आधुनिक काळ म्हणजे नक्की कुठला काळ हे सांगा. नायतर गैरसमज व्हायचा तुमच्या भाषिक दौर्बल्यामुळे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आधुनिक काळ स्थानपरत्वे, व्यक्तिपरत्वे वेगळा असू शकतो. गॅमिलिओला धार्मिकांनी विरोध केला म्हणून तेव्हापासून असं एका अर्थानं म्हणता येईल. निधर्मी राजवटी( जसे भारत) स्थापित व्हायला लागल्या तेव्हापासून म्हणता येईल. आपण धर्माच्या अंध पाशांखाली होतो, ती कशी त्याज्य अशी अफूची गोळी आहे हे आपल्याला आत्ता आत्ता कळले असे मानणारा कोणी २०१५ चा असेल.
===============
राजकारण, न्यायदान, निती, तत्त्वे, जीवनविषयक आचार विचार हे ठरवण्यात धर्माचे प्रस्थ ओसरल्याचा कोणताही काळ आधुनिक (मला अभिप्रेत उपरोधिक अर्थाने) काळ म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो एक प्रामाणिक शंका आहे. निधर्म म्हणजे धर्म नसलेला ना हो मग जे नाही ते कसं बुडेल?

धर्माचं महत्त्व इतकं कमी झालं आहे

काहीतरीचं. उलट वाढतय धर्माचं महत्व. धर्म वेगवेगळ्या रुपं धारण करतोय.

पर्यायी व्यवस्थांनी माणसाचं जगणं इतकं हराम केलं

कुठे ? केव्हा? कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरीचं. उलट वाढतय धर्माचं महत्व.

ज्याचे महत्त्व (/स्तोम/व्हॉटेवर) वाढत आहे, तो धर्म(च) आहे, याबद्दल आपणांस खात्री आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मा-र्मि-क!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्म आहे का काय ते कल्पना नाही.
पण "धर्मा"च्या नावाखाली हे सगळं खपवलं जातंय. सो द्याट इज व्हाट म्याटर्स..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे कसे?

समजा उद्या मी कोणाचा खून केला नि तो अस्वलाच्या नावावर खपवून दिला, तर नेमके काय म्याटर करेल?

जो न्याय अस्वलाला, तोच धर्माला.

(धर्म म्हणजे काय 'दामाजीचा घोडा' वाटला काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्ह्णजे असं की धर्मविरोधी ह्या छत्रीखाली बरंच काही खपून जातं.कसं वागावं, काय कपडे घालावेत, लग्न कुणाशी करावं इ.
प्रत्यक्ष 'धर्म' काय सांगतो ते काहीही असो, धर्माचे पुरस्कर्ते खवळतात. असो. जास्त डीटेलात जाण्यात प्वाईंट नाही, देजावूच होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्ती आणि धर्म यांच्यातला फरक आता तुम्हाला आम्ही सांगायचा का 'न'बा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजिब्बात फसलेला विडंबन प्रयत्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

कंटेंटपेक्षा मते न पटल्याने वरील प्रतिक्रिया आलीय असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे तुम्हाला कशावरून वाटले म्हणे?

जोशींची मते मला अजिबात पटत नाहीत यात सिक्रेट काहीच नाही.

त्यांचा विडंबनप्रयत्न चांगला कसा, ते जरा सांगितले, तर तुमच्या या प्रतिसादाला काही वजन राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विडंबनप्रयत्न इतकाही फसलेला नाही असे वाटते. हां आता ऑल टैम ग्रेट वगैरे चाळण्यांतून पार होईलच असे नाही पण इतका वाईटही वाटला नाही. त्यामुळे अशी प्रतिक्रिया येण्यामागचे कारण वैचारिक मतभेद असावे असा एक अंदाज वर्तवला इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"स्त्रीवाद्यांना" अन इतर ऐसीकरीय "प्रवृत्तींना" उद्देशून तुमच्याकडून येणारे कित्येक टिपिकल प्रतिसाद हे वैचारिक मतभेद नसल्यानेच येत असतात, असा एक साक्षात्कार झाला. शिवाय खाली त्यांनी काय म्हटलंय ते बघा.

"मला साहित्यातलं झाट काही कळत नाही. बरेचदा काय लिहिलं आहे ते देखिल कळत नाही. कविता हा प्रकार मुळीच झेपत नाही. सबब हा यत्न कोण्या साहित्यानिर्मिताचा नव्हता."

ज्या गोष्टीतलं झाट कळत नाही असं जो स्वमुखे कबूल करीत आहेत, त्यांचा तो प्रयत्न फसला, असे प्रांजळ विधान मी केलेले असताना केवळ 'काडी घालण्यासाठी' तुम्ही प्रतिसाद दिला, असे मी का म्हणू नये? Wink

१: 'स्त्री' व 'वाद्यांना' हे वेगळे शब्द नसून, स्त्री-वादी या एकवचनी शब्दाचे ते अ.व. आहे, द्य. नॉट द्द्य. प्लीजच नोट. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

"स्त्रीवाद्यांना"१ अन इतर ऐसीकरीय "प्रवृत्तींना" उद्देशून तुमच्याकडून येणारे कित्येक टिपिकल प्रतिसाद हे वैचारिक मतभेद नसल्यानेच येत असतात, असा एक साक्षात्कार झाला. शिवाय खाली त्यांनी काय म्हटलंय ते बघा.

सध्या विषय चाललाय तुमच्या प्रतिक्रियेचा. त्यात ओढूनताणून माझ्या प्रतिसादांचं मूल्यमापन करणे हे टिपिकल 'ऐसीय' प्रवृत्तीप्रमाणे रोचक आहे.

ज्या गोष्टीतलं झाट कळत नाही असं जो स्वमुखे कबूल करीत आहेत, त्यांचा तो प्रयत्न फसला, असे प्रांजळ विधान मी केलेले असताना केवळ 'काडी घालण्यासाठी' तुम्ही प्रतिसाद दिला, असे मी का म्हणू नये?

तुम्हांला काय पाहिजे ते तुम्ही म्हणा. विरोधी मते असलेल्यांसाठी १६ मे नंतरही कॉण्सण्ट्रेषन कँप उघडल्याचे अजून तरी ऐकिवात नसल्याने तुम्ही काही म्हटला म्हणून मला फरक काय पडणारे? मला मनापासून जे वाटलं ते मी म्हणालो. त्यात काडी पाहणं म्हणजे मॉडिफायिंग फॅक्ट टु फिट थिअरी असा प्रकार वाटतो. अर्थात तोही करायचा असेल तर देश स्वतंत्र आहेच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकतर तिथं पिवळी टिकली टाकलेली आहे.

दुसरं, तुमच्या, किंवा मला उद्देशून दिलेल्या कोणाच्या/कोणत्याही प्रतिसादास मी श्रेणी देत नाही, हे क्लियर करतो.

अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मी त्यांच्या प्रतिसादाचं मूल्यमापन करत होतो, त्या प्रतिसादाचं तुम्ही मूल्यमापन सुरू केलंत. तेव्हा विषय माझ्या प्रतिसादाचा नसून, विडंबन फसल्याचा होता, असे नम्रपणे नमूद करू इच्छितो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

श्रेणीबिणी घाला गर्दभश्रोणीत. (जमतंय यमक!)

तदुपरि प्रतिसादाचा पूर्वार्ध पाहता इशय एण्टायरलि तुम्ही म्हणता तोच नसावा असेही वाटले. पण असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला साहित्यातलं झाट काही कळत नाही. बरेचदा काय लिहिलं आहे ते देखिल कळत नाही. कविता हा प्रकार मुळीच झेपत नाही. सबब हा यत्न कोण्या साहित्यानिर्मिताचा नव्हता.

केवळ दुसरी बाजू दाखवायची होती. त्यात मी ऑपोझिट शब्द व्यवस्थित टाकले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

केवळ दुसरी बाजू दाखवायची होती. त्यात मी ऑपोझिट शब्द व्यवस्थित टाकले आहेत.
<<
"असे मला वाटते." हे अ‍ॅडवलं असतं शेवटी, तर दुसर्‍या वाक्याला बरोब्बर अर्थ प्राप्त झाला असता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

इथून पुढे माझ्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी "असे आडकित्ता यांना वाटते" च्या ऐवजी "असे मला वाटते" असे वाचायला चालू करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा वाक्प्रचार झाट्यापासून आपलं फाट्यापासून हायवेपर्यंत (किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत) वर्ल्डफेमस असल्याचे पाहून मराठीला आता चांगले दिवस आले आहेत याबद्दल मनात कोणतीही शंका उरली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एक सर्वसमावेशक माप आहे. स्ट्रिंग थियरीमधली सगळ्यात बारकी स्ट्रिंगही याच मापाने मोजली जाण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जरा हळू. वैज्ञानिक दृष्टीकोनाचे पुरोगामी दुखावतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवैज्ञानिक दृष्टीचे पुरोगामी कसे असतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाहून मराठीला आता चांगले दिवस आले आहेत याबद्दल मनात कोणतीही शंका उरली नाही.

अहो अरूणजोशी आहेत म्हणून मराठीच काय तर आख्खी भारतीय संस्कृती अजून शिल्लक आहे! ते नसते तर पुरोगाम्यांनी केव्हाच मोगलाई आणून अंदाधुंदी माजवली असती! मी तर म्हणतो भारतीय संस्कृतीला स्मरून (ऑनलाईन) का होईना जोशींचा मठबिठ बांधायला पाहिजे कोणीतरी.. कोण रे तो हलकट समाधीका विचारतोय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

च्यायला, संस्कृतीत किती किती प्रकारे कसल्या कसल्या स्तरावर अभिव्यक्ति झाली आहे याची एकिकडे उदाहरणे द्यायची. राधाकृष्णाची कोणकोणती उदाहरणे द्यायची. दुसरीकडे संस्कृतीरक्षकांनी अभिव्यक्ति केली कि आक्रोश. दुट्टप्पीपणाशिवाय पुरोगामित्वाला पूर्णतः येत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तसा मठ आलरेडी आहे.

जोशीमठ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ररेय आवडले.
ही कधीतरीच दिसणारी अपवादात्मक प्रवृत्ती म्हणून प्रवृत्तीजंत्रीत समाविष्ट करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघा बघा निधर्मांध लोक कसे वाढलेत! ऐसीवर ही निधर्मांध प्रवृत्ती सोकावली आहे. नाही काहो अजो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

'धर्म कसा बुडवावा' असे शीर्षक वाचून, 'चुल्लूभर पानी में' असा फुकटचा सल्ला द्यायला हात सरसावून आलो होतो. पण आपला सल्लाही वाईट नाही. अंमळ डिट्टेलवार (आणि अधिक पायर्‍या असलेला) आहे, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धाग्यातील जालिय हाणामार्‍यांच्या पोटेंशियलला अजून पूर्णपणे न्याय मिळालेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बस्स का राव. आम्ही एवढी शेकोटी पेटवून दिली आयती. तुम्ही काही 'सासू' आणंना झालाय नि वर म्हणे पुरेशी पेटली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

झक्कास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडली कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असेच म्हणतो. बाकी अधूनमधून अशा कविता वगैरे आल्यामुळेच अरूणजोशींसारखे कट्टर धार्मिक लोक अजून अस्तित्वात आहेत असा रिमाईंडर मिळतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दोन्ही कविता आवडल्या.
न जग बुडणार
न धर्म बुडणार
बोम्बलणारे लोक मात्र
एक दिवस बुडणार
Blum 3 Blum 3 Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास.
व्हॉट्सॅपवर फिरायला पाठवून द्यायला हवी ही कविता.
तिथल्या शड्डूठोक्यांसाठी थोडं अंजन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आधी तिथेच आलीवती की...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाने