अस ही एक प्रेम-१

ही गोष्ट आहे साधारण ८-९ वर्षांपूर्वीची जेंव्हा तिने त्याला व त्याने तिला प्रथम पहिले, त्यावेळी ती साधारण १६ वर्षांची अल्लड बालपण संपून तारुण्यात पदार्पण करणारी आणि तो साधारण २० वर्षांचा.
ती जिथे राहत होती तिथेच काही दिवसांपूर्वी तो त्याच्या कुटुंबाबरोबर राहावयास आलेला. तिच्या व तिच्या घरच्या लोकांची त्याच्या घरच्या लोकांशी बर्यापाकी ओळख झालेली. परंतु त्याची व तिची ओळख झाली तो दिवस मात्र तिच्या आयुष्यातला खास दिवस होता. त्यादिवशी वातावरण हि अगदी चैतन्यदायी होत. त्यादिवशी ती व तिची आई त्याच्याघरी गेल्या होत्या. त्याच्या आईने त्यांचे दरवाज्या मध्येच स्वागत केले. त्यादोघी घरात गेल्या असता त्याच्या आईने त्यांची त्याच्याशी व त्याच्या चुलत भावाशी ओळख करून दिली. परंतु तिने स्त्री सुलभ लज्जेने एक परका मुलगा म्हणून त्याच्याकडे पाहायचे टाळले. परतू त्यावेळी तिला ह्याची अजिबात कल्पना नव्हती कि ज्याच्याकडे ती आत्ता पहायचे टाळत आहे तोच तिच्या स्वप्नांचा राजकुमार आहे. परंतु झाल अस कि असच बोलता बोलता त्याच्या आईने सांगितले कि त्याचे कसले तरी ऑपरेशन झाले आहे आणि त्याच वेळी जी गोष्ट टी टाळत होती तीच घडली म्हणजे झाल अस कि त्याचे कसले तरी ऑपरेशन झाले अस त्याच्या आईने सांगितले तेंव्हा तिने सहजच त्याच्याकडे नजर टाकली आणि टी शहारून गेली. २० चा तो उंचापुरा देखणं तरुण तिच्याकडेच पाहत होता पण तो तिच्याकडे का पाहत आहे हेच तिला कळले नाही म्हणजे त्यालाही ती आवडली होती म्हणून तो तिच्याकडे पाहत होता कि सहजच समोर बसलेली व्यक्ती म्हणून तो तिच्याकडे पाहत होता हे मात्र तिला कळलेच नाही. तो तिच्याकडेच पाहत आहे हे बघून तिचे गाल लाल झाले आणि तिची नजर मात्र पटकन खाली झुकली. आणि इथूनच सुरुवात झाली तिच्या मनात नकळत फुलायला लागलेल्या सुंदर स्वप्नांची आणि त्याच्याबदलच्या तिच्या मनात निर्माण होऊन लागलेल्या नाजूक भावनांची.
ती व तिची आई घरी आल्या परंतु ती आपल हृदय मात्र तिथेच हरवून आली. ती घरी तर आली परंतु आत्तापर्यंत अल्लडपणा आणि हूडपणा करणाऱ्या तिच्या मनात मात्र एक अनामिक परंतु हवीहवीशी वाटणारी हुरहूर दाटून आली. हे तिलाही कळेना कि आपल्याला हे काय होतंय आणि का होतंय मनात कशाचीतरी ओढ आहे आणि ज्या गोष्टीची ओढ लागलीय ती गोष्ट मात्र समोर दिसेना किंवा ती नेमकी कोणती गोष्ट आहे हे कळेना म्हणून अगदी बैचेन झाली होती ती. याच बेचैनीमध्ये रात्री उशिरा झोप लागली तिला.
सकाळी जेंव्हा तिला जग आली तेंव्हा वातावरण अगदी प्रसन्न होत त्यामुळे तिलाही थोड प्रसन्न वाटल परंतु तिच्या मनाची बेचैनी मात्र अजून संपली नव्हती अजून हि ती आपल्या मनाच्या बेचैनीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत होती. आपल मन आपल्या नकळत काय शोधताय हे पाहण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला त्यामागचे कारण उमजत नव्हते. तेवढ्यात आईने अंघोळीला पाणी काढून ठेवल्याचे सांगितले आणि टी बाथरुमकडे वळाली. अंघोळ करून जेंव्हा टी खिडकीत केस पुसत उभी होती तेंव्हा अचानाक तिचे लक्ष समोरच्या घराच्या गच्चीत गेले आणि तिला समोर तो दिसला त्याचबरोबर तिला कालचा दिवस आठवला आणि आपल्या बेचैन मनाचे कारणही समजले. आपल्या मनाला नेमक्या कोणत्या गोष्टीची हुरहूर लागली आहे आणि आपले मन काय शोधण्याचा आणि कुणाला पाहण्याचा प्रयत्न करत आहे हे तिला उमगले आणि त्या विचाराने ती लाजली. जेंव्हा तिने नजर उंचावून त्याच्या दिशेने पहिले तेंव्हा तो आपल्याकडेच पाहतो आहे हे तिला कळाले तशी ती खिडकीतून बाजूला झाली. त्या नंतरचा प्रत्येक क्षण मात्र तिचा त्याच्याच आठवणीने जाऊ लागला. तिची तहान, भूक, झोप हरली. कोणाला सांगता हि येईना आणि सहन हि होईना अशी तिची अवस्था झाली. कशातच लक्ष लागेना त्यातच दहावीच वर्ष त्याचा अभ्यास यामुळे ती गप्प गप्प राहू लागली. परंतु त्याच बरोबर त्याला बघन हा तिचा गेल्या १५-२० दिवसांपासून नवीनच उपक्रम चालू झाला होता. तिच्या घराच्या खिडकीतून त्याच्या घरातील बराचसा भाग दिसत असल्यामुळे त्याला पाहणे हा एक दिनक्रमच चालू झाला होता. तो जर एखादे वेळी तिला नाही दिसला तर तिची अवस्था अगदी वेड्यासारखी होत असे. हळूहळू तिलाही कळायला लागल होत कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करु लागलीये आणि कदाचित आता तिला त्याच्याशिवाय आपल्याला काहीच ठीक वाटेना. तिच्या दिवसाची सुरुवात त्याला बघूनच होत असे आणि दिवसाचा शेवट हि त्याला बघूनच होत होता. परंतु अचानक एकेदिवशी तो कुठेतरी निघून गेला.
तो कुठे गेला? परत कधी येईल? तोपर्यंत तीची अवस्था कशी होईल हे जाणून घेण्यासाठी वाचा असेही एका प्रेम- भाग

वाचकहो, जर तुम्हाला हि कथा आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. मंज पुढची कथा लिहायला मलाही उत्साह येईल. तुमची प्रतिक्रिया हीच आमची शिदोरी.

3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

कथा ठीकच आहे- पण पुढला भाग

कथा ठीकच आहे- पण पुढला भाग टाकाच.. (स्माईल)
[ शुद्धलेखनाच्या आणि विरामचिन्हांच्या वगैरे चुका सहज टाळता येण्यासारख्या आहेत ]

लिहा कि सिनेमा बनविता येईल,

लिहा कि सिनेमा बनविता येईल,