कुणीतरी सोबत असावं आपल

कुणीतरी सोबत असावं
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं

हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं

कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं

आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं

कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं

फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं

कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं

थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं

कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं

एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त कविता, आवडली.
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं
पण कसं झाल आहे, आजकाल कुणी वाट पाहत नाही नवर्याला घरी यायला जेवढा उशीर तेवढा वेळ टीवी साठी देता येतो. मी लवकर घरी आलेलं कदाचित आजकाल तिला आवडतच नाही.
समर्थांनी म्हंटलेच आहे संसार करता करता फिका होतो. :tired: :tired: :tired:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0