Performance Review -

दरवर्षी साधारण जानेवारीच्या मध्यात अन फेब्रुवारीच्या सुरवातीला, ऑफिसच्या रुक्ष वातावरणाचा एकदम कायापालट होतो. अगदी इतका की प्रकर्षाने जाणवू लागतो. म्हणजे Employee Orientation च्या काळात ऐकलेले, घोकलेले समस्त manners सर्वांचेच,एकदमच उफाळून येतात. अचानक सौहार्द (synergy) चे लोण, वणव्यासारखे पसरु लागते. सहकार्‍यांच्या संदर्भातील, etiquettes कडे विशेष लक्ष पुरविले जाते व सर्वजण एकदम गुण्या गोविंदाने नांदू लागतात. खरं तर ऑफिसमध्ये स्वर्गच अवतरतो.

या वातावरणातील बदलास, जेरेमी, मी अन अ‍ॅमी आमच्या त्रिकुटाचाही अपवाद नसतो. काल काल पावेतो ३६ चा आकडा असणारे, विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारे आमचे त्रिकुट अगदी घट्ट मैत्री असल्याच्या अविर्भावात वावरु लागते, एकमेकांशी सौजन्य-आपुलकीने बोलू लागते, विचारपूस करु लागते.

तुम्ही विचाराल जान-फेब मधे अशी काय जादू होते?

तुम्हा झंटलमन लोकांना इतकेही ठाऊक नाही की जान-फेब मध्ये peer review आणि self appraisal चे वारे वाहू लागतात :D. Ah! talk about the joys of getting even in peer review. हे म्हणजे सहकार्‍यांचा वचपा काढायची, आंधळा मागतो एक डोळा , देव देतो २ अशी नामी संधी चालून येते. All those pented up emotions, केल्या गेलेल्या अपमानाचे कढ, त्यांना मुक्त वाट करुन देण्याची सुवर्ण-संधी.

पण अर्थातच peer review मध्ये अगदी स्पष्ट हेत्वारोप करताही येत नाहीत म्हणजे सहकार्‍यांविरुद्ध, किती गरळ ओकायची त्यालाही दुर्दैवाने मर्यादा असतेच Wink याची कारणे २- (१)बरेचदा त्या सहकार्‍याला, actual review मध्ये आपल्या comment चा feedback मिळत असतो अन तो कितीका अनामिक मिळेना, मठ्ठातल्या मठ्ठ सहकार्‍यालाही intuitively/logically कळून येते की कोणी ती comment दिलेली आहे. त्यामुळे पुढील जान-फेब पर्यंत आपले आयुष्य miserable होऊ शकते.
(२) मुख्य कारण हेदेखील आहे की - your comments reflect on you too Biggrin

peer review नंतर येतो खरा म्हणजे actual boss ने केलेला review. यालाच दुसर्‍या शब्दात पोटात गोळा , पायात पेटके, डोकेदुखी असे शब्द आहेत ;). भीक नको पण कुत्रा आवर च्या तालावर पगार वाढ नको-नको पण हा torturesque review आवरा म्हणायची पाळी येते. गेल्या वर्षी (कोणाला ते विचारु नका :D) review तील अनेक सौम्य निंदा-व्यंजक नीरीक्षणांनंतर पुढील गोषवारा मिळाला होता -

This employee sets low personal standards & then consistently fails to achieve them Biggrin

बिचार्‍या जेरेमीला तर गेल्या वर्षी review चा याहूनही विनोदी गोषवारा मिळालेला -

Since my last report, this employee has reached rock bottom & has started to dig :D.

असो. तर यावर्षी काय दिवे लागतात ते बघू. दिल्ली दूर नही.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

ROFL
दोन्ही गोषवारे धमाल आहेत.
पीअर रिव्यु माझ्या हपिसाततरी नसतो. इतर कुठल्या भारतीय हपिसांमध्ये असल्याचही ऐकलं नाय कधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काही हपिसांत (सर्वांना नाही) पण काही पातळीवरील लोकांना ३६० डिग्री रिव्यू असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लिहिणार होतो. ३६० डिग्री रिव्ह्यू जिथे चांगल्या रितीने इम्प्लिमेंट होतो तिथे तो पूर्ण गुप्त असतो. कोणत्याही अथॉरिटीला देणार्‍याची ओळख कळत नाही. त्यात ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असल्याने आणि ठराविक ऑप्शन्स प्री-डिफाईन्ड असल्याने आपल्याला शब्दरचना करावी लागत नाही आणि त्यातून ट्रेस लागण्याचा मार्गही राहात नाही.

पण शेवटी कितीही फुलप्रूफ सिस्टीम केली तरी वर हर्मिटजींनी म्हटल्याप्रमाणे जिथे टीम साईझ लहान असेल आणि वन टु वन वैर असेल तिथे फीडबॅक घेणार्‍याला तो कोणी दिलाय याचा अंदाज येतोच. कधीकधी फीडबॅक घेणारा वरिष्ठ असेल तर ओल्याबरोबर सुकं जळण्याच्या न्यायाने एकाच्या वाईट फीडबॅकची फळं पूर्ण टीमही भोगू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ आमच्याकडेही असतो ३६० फिडबॅक
अर्थात टिम खूप मोठी असल्याने कोणी काय रेट केलंय अजिबातच कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL
शेवटचे दोन्ही शालजोडीतले कहर आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयला, ते काय शालजोडीतले आहेत? इतक एक्सप्लिसिट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आमच्या हाफीसात पीअर रीव्ह्यू असतो (अर्थात तो आपल्याला कोणी लिहीला आहे हे गुलदस्त्यात असतं). आणि जेव्हा तुम्ही अप्रेझल घेणारे असाल तेव्हा समोरच्याला त्याचे पीअर काय रिव्ह्यू देताहेत हे वाचतांना आणि त्याचे/तिचे ते ऐकतानाचे हावभाव आणि प्रतिक्रिया टिपताना चांगला टिपी होतो. अर्थात हे पीअर फीडबॅक फार कोणी सिरीयसली घेत नाही.
काही लोक ह्या पीअर फीडबॅक चा गैरवापर करतात, म्हणजे उगीच पर्सनल वादांमधून त्या व्यक्तिबद्दल झालेलं मत ह्या ऑफीशियल मॅटर मधे उगीच घुसवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीअर रिव्यूची तुलना ऐसीवरील श्रेणीदान पद्धतीशी करता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादाला मिळालेली 'खोडसाळ' श्रेणी या दोहोंतील साम्य अतिशय यथार्थपणे अधोरेखित करते.

(आता कोणी श्रेणी चुकून/मुद्दामहून सुधारल्यास नकळे, पण हा प्रतिसाद लिहितावेळी तरी खोडसाळ अशीच श्रेणी होती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रकारच्या परफॉर्मन्स रिव्ह्यूला "हाड!" हे एकमेव समर्पक उत्तर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म्हणूनच पीअर रिव्यूची तुलना ऐसीवरील श्रेणीदान पद्धतीशी करता येईल काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाड! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL लोळून लोळून हसतानाच रडू आलं Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या पहिला परफॉर्मन्स रिव्ह्यूच्या वेळची एक गंमतीदार गोष्ट आठवली. पहिलाच परफॉर्मन्स रिव्ह्यू असल्याने आम्ही सगळेजण अत्यंत गांभीर्याने घेत होतो. प्रॉजेक्ट म्यानेजर व त्याची बॉस (डिलीवरी म्यानेजर टाईप एक अत्यंत शिस्तप्रिय बाई) मंडळी वन-टू-वन चर्चेत रेटिंगचे स्पष्टीकरण वगैरे देत होते. सगळ्यांना ठराविक प्रश्न व रेटिंगसंबंधी त्याच त्या मखलाशांचे डोस मिळाल्याने कॉन्फरन्स मधून बाहेर येणारा प्रत्येकजण गोंधळलेला दिसत होता. शेवटी एका मित्राची वेळ आली. आधीचे डोस त्याने ऐकलेच होते. नेहमीप्रमाणे त्याला अप्रेझल डिस्कशनमध्ये करिअर अॅस्पिरेशन वगैरे विचारले. तर उलट सवाल करुन त्यानेच डिलिवरी म्यानेजरला विचारले की 'आम्ही मंडळी प्रोग्रॅमिंग करतो. आमचा पीएल-पीएम आम्हाला दररोज कॉल्स मध्ये वगैरे दिसतात. डिझाईनसाठी वगैरे मदत करतात. पण तू नक्की काय काम करतेस? मी तुला फक्त एक्सेल शीट उघडून बसलेले पाहतो. म्हणजे मला ठरवता येईल की इज इट वर्थ इट टू सीक प्रमोशन्स हिअर'. काचेच्या बंद खोलीत चाललेल्या या चर्चेत डीएमचा पडलेला चेहरा स्पष्ट दिसत होता.

नंतर एकंदर प्रोसेस व फिक्सिंग कसे चालते ते लक्षात आल्यावर परफॉर्मन्स रिव्ह्यूला गांभीर्याने घेणे अर्थातच सगळ्यांना सोडून दिले. निव्वळ एचआर नामक डिपार्टमेंटला पोसण्यासाठी ही प्रथा सुरु आहे असे दिसते. म्यानुफ्याक्चरिंग कंपन्यांमध्ये असते तसे द्वैवार्षिक-त्रैवार्षिक कंत्राटे करुन पगारवाढ वगैरे केली तरी फारसा फरक पडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काचेच्या बंद खोलीत चाललेल्या या चर्चेत डीएमचा पडलेला चेहरा स्पष्ट दिसत होता.

अरे बाप रे. Smile

छान आहे हा किस्सा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

म्हणजे मला ठरवता येईल की इज इट वर्थ इट टू सीक प्रमोशन्स हिअर'.

जॉब मार्केट लैच तेजीत होते वाटते घटनेच्या वेळी.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जॉब मार्केट अगदी तेजीत नसले तरी मंदीही नव्हती. एक वर्ष अनुभव असलेल्या कमी खर्चिक नोकरांना कायमच डिमांड राहते. हे आहेच. शिवाय या मित्रमहोदयांच्या एमएसच्या अॅडमिशनचे सोपस्कारही पूर्ण झाले होते हे आम्हाला नंतर कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या रेटिंग कन्व्हे करायच्याच्या मिटिंग्जमध्ये मी काहीही बोलत नाहीये बघुन बॉसकडून मला हमखास विचारले जाते "डोन्ट यु वॉण्ट टु आस्क एनिथिंग ऑर से समथिंग?" त्यावर मी फक्त एवढंच विचारतो "इज दॅट गोइंग टु मेक यु चेंज माय रेटिंग?" त्यावर हा प्रश्न विचारायला लागल्यापासून गेल्या ४-५ वर्षात एकदाही होकारात्मक उत्तर न आल्याने याव्यतिरिक्त एकही शब्द न बोलता फक्त रेटिंग आणि भली-बुरी बडबड ऐकून बाहेर येतो, नी लगेच मनातच "हाड!" असं म्हणून पुन्हा कामाला (ऐसीवगैरे उघडणे ;)) लागतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यापेक्षा रेटिंग आणि पगारवाढ याचा सबंध आहे का असं विचारायचं. म्यानेजर लोक अजून गार पडतात. हा प्रश्न मी एका एचारच्या ललनेला जाहीर मिटिंग मध्ये विचारला होता. डायरेक ततपप झालं बिचारीचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दुर्दैवाने मी माझ्या टिमला रेटिंग देणार्‍यांपैकीही आहे. Wink
असा प्रश्न आला की काय उत्तर द्यायचे हे आता पाठ झाले आहे Blum 3

तरी मी ही तेच विचारले तर या प्रश्नाला "डोन्ट यु नो हाउ सिस्टिम वर्क्स?" हे उत्तर तयार असेल किंवा काहीतरी फार पकाऊ - मला कळतंय तुम्ही मला खोटं सांगताय - छाप उत्तर देतील.एकुणच "तुमच्या गोल गोल उत्तराने काही फरक पडत नाही नी माझ्या रेटिंगमध्ये किंवा सॅलरीत त्याने अजिबात फरक पडणार नैये हे मला माहितीये तेव्हा फार पकवू नका" हे पोचवायचे काम तो प्रश्न करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या माहिती प्रमाणे सर्व कंपनीज मधे रेंटींग (मॅनेजर कडून दिलेलं) आधीच झालेलं असतं आणि हे परफॉरमन्स रिव्ह्यू, पिअर रिव्ह्यू मिटींग्स फक्त नावाला घेतात. त्यात अगदीच वादाचे किंवा निकडीचे मुद्दे समोर आले तर त्यावर मॅनेजमेंट काम करतेच-नाही असं नाही, पण त्याने रेटींग ला 'टींग-टाँग' फरक पडत नाही असं वाटतं.
निदान माझ्या कंपनी मधे तरी ह्या अप्रेझल मिटींग्स (मग त्यात, पिअर फिडबॅक, मॅनेजर फिडबॅक, क्लाईंट फिडबॅक वर रवंथ करत बसतात) केवळ फॉर्म्यालिटी म्हणून असतात, तुमच्याही कंपनी मधे किंवा सगळीकडे असेच असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय हाफिसा-हाफिसी मातीच्या बाता नी मातीचेच रेटिंग Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय हाफिसा-हाफिसी मातीच्या बाता नी मातीचेच रेटिंग

खरं रे बाबा

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नळोनळी गढूळच पाणी....

कारण आपण जसे एका कंपनीतून दुसरीत आणि तिथून तिसरीत जातो तसे यच्चारवाले पण नै का जात??? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हायला, मला तरी आत्तापर्यंत जेवढ्या रिव्यू मिटिंगमधे जे काही सल्ले मिळाले त्याचा फायदाच झालेला आहे. हा इतका बोगस प्रकार असेल असं वाटलं नव्हतं.
ते सल्ले अथवा टीका कळाल्यावर दोन गोष्टी कटाक्षाने पाळत आलो आहे. पहिली म्हणजे जो काही सल्ला वा टीका असेल ती त्रुटी खरेच माझ्यात आहे का हे तपासणे आणि ती लवकरात लवकर कशी सुधारता येऊ शकेल यावर प्रयत्न करणे,
आणि दुसरी म्हणजे ज्या व्यक्तीने हि टीका केली असेल तिला ओव्हरटेक, साईडलाइन करून अथवा तोंडावर पाडून पुढल्यावेळेला नवीन व्यक्तीकडून फीडब्याक कसा मिळवता येईल.

आता या फीडब्याक, रिव्यूचा आणि पगारवाढीचा काहीच संबंध नसतो हे दोन्ही बाजू बघून झाल्याने माहिती आहेच,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या गोष्टीबद्द्ल __/\__

पहिल्याबाबतीत मला उपयुक्त फिडबॅक अनेकांकडून वर्षभर मिळतच असतो. त्या फॉर्मल मिटींगमध्ये मात्र जाम स्तिरिओटिपिकल बोलतात - अत्यंत पढवलेलं आणि निरूपयोगी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फॉर्मल मिटींगमध्ये मात्र जाम स्तिरिओटिपिकल बोलतात - अत्यंत पढवलेलं आणि निरूपयोगी!

ह्याला "संतुलित" बोलतात असे ही म्हणता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगं सुसंबद्धही नसते, संतुलित कुठे घेऊन बसलीस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गम्मत करत होते. माझ्या मते ही सर्व प्रोसेस निरर्थक आहे आणि It does more Bad to the Organisation. त्यानी निगेटीव्हीटी वाढु शकते.

म्हणजे प्रत्येकाच्या कामाचे अ‍ॅसेसमेंट असावेच आणि ते व्हावेच. खरेतर अशी काही फॉर्मल प्रोसेस नसली तरी ते होतच असते, अगदी क्षणाक्षणाला होत असते. फीडबॅक ही वेळच्यावेळी मिळत असतात आणि आपण पण दुसर्‍यांना देत असतो.

मॅनेजरला च्या डोक्यात पण कोणाला कीती रेटींग द्यायचे हे पक्के असते. सर्व प्रोसेस अगदी नॉर्मलाय्झेशन धरुन सुद्धा १-२ दिवसात होयला हरकत नाही. पण २-३ महीने ही गोष्ट चालवणे म्हणजे HR च्या लोकांना रोजीरोटी मिळावी म्हणुन केलेली सोय आहे. हे थोथांड बंद केले तर बॉटमलाइन १-२ टक्क्यानी वाढेल असे माझे मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तरी आत्तापर्यंत जेवढ्या रिव्यू मिटिंगमधे जे काही सल्ले मिळाले त्याचा फायदाच झालेला आहे. हा इतका बोगस प्रकार असेल असं वाटलं नव्हतं.
ते सल्ले अथवा टीका कळाल्यावर दोन गोष्टी कटाक्षाने पाळत आलो आहे. पहिली म्हणजे जो काही सल्ला वा टीका असेल ती त्रुटी खरेच माझ्यात आहे का हे तपासणे आणि ती लवकरात लवकर कशी सुधारता येऊ शकेल यावर प्रयत्न करणे,
आणि दुसरी म्हणजे ज्या व्यक्तीने हि टीका केली असेल तिला ओव्हरटेक, साईडलाइन करून अथवा तोंडावर पाडून पुढल्यावेळेला नवीन व्यक्तीकडून फीडब्याक कसा मिळवता येईल.

+१ सहमत
मी देखील कंपनी मधे किंवा कॉर्पोरेट कल्चरला नवीन असतांना ह्या मिटिंग्स चा खूप फायदा झाला. मी ज्या टीम बरोबर काम करतो आहे त्यांच्या माझ्या कडून काय अपेक्षा आहेत किंवा मॅनेजमेंटच्या काय अपेक्षा आहेत हे समजायला नक्कीच मदत झाली (अर्थात तेव्हाही सगळ्याच कमेंट सिरियसली घेतल्या होत्या असं नाही Wink ) थोड्याफार प्रमाणात त्याचा आजही फायदा होतोच. पण फिडबॅक फार वाईट असला (सुदैवाने अजून तरी तसं झालं नाहीये) तरीही त्याचा रेटींग वर काही एक फरक पडत नाही त्यामुळे 'चालू द्या' अश्या निवांत मोडची तयारी अता असते... कसें! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तरी आत्तापर्यंत जेवढ्या रिव्यू मिटिंगमधे जे काही सल्ले मिळाले त्याचा फायदाच झालेला आहे.

उलट रिव्ह्यू मीटिंगच्या बाहेर जे सल्ले मिळतील ते मोलाचे - असं माझं मत आहे. रिव्ह्यू मीटिंगच्या कॉर्पोरेट कुळाचारामध्ये संतुलित/बाष्कळ/पोलिटिकली करेक्ट वगैरे बोलायला शिकवलं जातं. तिथे फीडब्याक देणार्‍याला घोड्यावर बसवलेलं असतं - बर्‍याचदा कर्तव्यभावनेने तो रिव्ह्यू-यज्ञात हविस घालतो. (यावरून माझ्या एका शामळू मित्राचा किस्सा आठवला. फिर कभी...)

त्याउलट एखादा मनुष्य (वरिष्ठ/कनिष्ठ/क्लायंट/इतर कोणी) रिव्ह्यू मीटिंगच्या चौकटीबाहेर आपल्याला काही फीडब्याक/सल्ला द्यायला आला, की मी सगळी कामं टाकून तो ऐकतो. स्वतःहून बोलायला आला आहे, म्हणजे त्याला आपल्यातली एखादी गोष्ट इतकी चांगली/वाईट वाटते आहे, की आवर्जून येऊन त्याला सांगावंसं वाटावं! हे सल्ले प्रामाणिकपणे दिले असण्याची शक्यता जास्त असते. असले सल्ले मी शक्यतोवर लिहून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

की आवर्जून येऊन त्याला सांगावंसं वाटावं! हे सल्ले प्रामाणिकपणे दिले असण्याची शक्यता जास्त असते. असले सल्ले मी शक्यतोवर लिहून ठेवतो.

मोलाचा मुद्दा, अगदी सहमत. मलाही तेच वाटतं नेहमी, की ६ महिने किंवा वर्षभर (जो काही अप्रेझल चा काळ असेल) ह्या लोकांनी का थांबावं फिडबॅक देण्यासाठी. जे काय असेल ते जेव्हा वाटेल त्या योग्य वेळी सांगावं ना. आणि जेव्हा वाटेल म्हणजे वाटेल तसं किंवा तिथे म्हणत नाहीये मी (भसकन डेस्क वर येऊन चार-चौघांसमोर सांगणं अपेक्षित नाहीच) पण रिव्ह्यू मिटींगची वाट पाहू नये तेवढा काळ थांबू नये त्या साठी. पण लोकांना त्या मिटींगच्या वेळी मुद्दे हवे असतात ना, आधीच सांगितलं आणि त्या व्यक्ती ने त्याच्यावर काम करून तो मुद्दा सुधरवला तर मिटींग मधे सांगायला मुद्दे रहाणार नाही ना मॅनेजर कडे म्हणून मॅनेजर तरी मुद्दामहून थोडं हातच राखूनच सल्ले देतो Wink

त्याव्यतिरिक्त आपल्या टीम मधल्या कनिष्ठ सहकार्‍यांना पण आपल्या कडून अपेक्षा असतात आणि त्यांनाही आपल्याला काही सुचना द्याव्या वाटतात आणि त्या बहुतांशी योग्य/रास्त असतातही . पण केवळ आपण त्यांचे वरिष्ठ म्हणून ते ते उघडपणे बोलायला चाचरतात, अश्या वेळी पिअर फीडबॅक ऑर रिव्ह्यू मिटींग ची मदत होते (त्याचा योग्य वापर केला तर) असं वाटतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्सा लिहा ना आदूबाळ. तुम्ही कथा मस्त लिहीता Smile

उलट रिव्ह्यू मीटिंगच्या बाहेर जे सल्ले मिळतील ते मोलाचे - असं माझं मत आहे.

हा नवीन अन मोलाचा विचार आहे माझ्याकरता. अंमलात आणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...