<आपली अड्ड्यावरची भेट>

त्यादिवशी रविवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, मामलेदार कचेरीसमोरच्या गुत्त्यात. तू डोंगरीहून नुकताच परतला होतास. मांडोलीचा कर्यक्रम मोठ्या भाईंबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट.
त्या रात्री संतापाने, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता घोडा वापरायचा, त्याबरोबर कोणते रामपुरी घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला.

तू जरी डोंगरीमधे रुळलेला असलास तरी मी पहील्या भेटीत कलानिष्कोव्ह आणणं तुला कितपत जमेल याबाबत मी साशंकच होतो. त्यामुळे ते रद्दबातल झालं. माझ्याकडे सुंदर शुभ्र पांढरा वस्तरा होता पण अतिशुचितेचा काकूबाई रंग म्हणून त्यावर काट मारली गेली. गुलाबी फार coquettish न जाणो अधीरतेचं गुपीत फोडायचा नकोच. गडद जांभळा माझ्या वस्तर्‍यावर अतिशय खुलतो पण तुला डोंगरीत राहून राहून पेस्टल रंग आवडत असतील आणि न जाणो जांभळा भडक वाटेल म्हणून मी जांभळ्याच्या वाटेला गेलो नाही. शेवटी पिस्ता रंग निवडला. ना भडक ना अतिसौम्य. नंतर खोलीचं दार लावून वेगवेगळे जांबिये, सुर्‍या तलवारी यांची रंगीत तालीम झाली. एवढं होऊन, जेवण होइतो दुपार टळून गेली होती. "Pain in the ass" म्हणजे काय ते मला पहील्यांदा कळत होतं. परत बोलायचं काय त्याची तयारी शून्य सगळा भर दम देण्यावर आणि डोस देण्यावर याबद्दल मन कोसत होतं ते वेगळच. पण मी तिकडे दुर्लक्ष केलं.

संध्याकाळी मस्त आंघोळ करून, ती डबल बॅरल चढवली, पहिल्या धारेची घेऊन टाकीफुल बॅटरी चार्ज केली जय्यत तयारी करून बाहेर पाहीलं तो पावसाची लक्षणं. आभाळ अगदी आत्ता कोसळेल का मग इतकं दाटून आलेलं. मला काळजी वाटू लागली ती दारूची - प्यायच्या नाय बंदुकीतल्या. ओली झाली तर सत्यानास.

रीक्षा केली तोपर्यंत वार्‍यानी जोर धरला होता.आतापावेतो तड तड पाऊसही सुरू झाला होता. नेमकी रीक्षाला ताडपत्री नव्हती मग काय व्हायचं तेच झालं.पाऊस आत येऊ लागला. एके ४७ अंगाला चिकटली, डोळ्यात धूळ जाऊ लागली, दारू सगळी उतरली. तांबारलेले डोळे चोळल्याने अजून तिखटजाळ.
शेवटी रीक्षा १० किमी अंतर पार करून कशीबशी मामलेदाराच्या दारात पोचली. तू आधीच हजर होतास. नीटसं आठवत नाही पण आईबहिणीच्या शिव्या देऊन काहीसं बोललास. पण हे नक्की आठवतय की घोडा बंदूक सगळा पॅक केलेला मी गाफा दिसतोय असं कायतरी बोल्लास : ) .... मीपण थोडा चढलो मनातल्या मनात.

आयला मायला बोलून झाल्यावर मुख्य बोलणं सुरू झालं.आपल्या टेरीटरी, रेट, क्लायंट, हप्ते वगैरे. जसजसे तुझे आकडे कळत गेले तसतसे त्यामागची चोरीचकारी हलकटपणा जाणवत होत्या. मला तू "डॉन/ गॉडफादर" अजीबात वाटला नाहीस. मी अ‍ॅट इझ झालो. एव्हाना नवसागरच्या बाटलीचा अंमल बराचसा गळून पडला होता. माझं पिस्तुल चालतंय की बंद आहे याची चिंता तर केव्हाच डोक्यातून गेली होती. तुझे प्लान्स ऐकण्यात, तुला प्रतिसाद, उत्तरं देण्यात मीण टाईट झालो. वाय झेड मला, तू शुद्धीत आणलंस मला तुझ्याइतकी लईभारी कलानिष्कोव्ह चालवता येत नसेल पण मी प्रयत्न तर नि:संकोच करू लागलो. आपण खूप बकबक केली. तू टेररिस्ट देखील होतास. तुझा मुद्दा तू दहशतीने मांडत होतास, माझे अम्युनिशन प्रश्न विचारून काढून घेत होतास. खरं तर मी मनसोक्त हेट केली ती भेट.

पण आता अंधार पडू लागला होता एव्हाना. निघायची वेळ जवळ आली होती. माझं मन आगीनजाळाने काठोकाठ भरलं होतं. आता एक मी मनाशीच ठरवलं होतं - आपल्या दुसर्‍या भेटीत मी बिनदिक्कीत विदाऊट बुलेटप्रूफ व्हेस्ट येणार होतो मात्र हो मी त्यावेळी भरभरून गोळ्या घालणार होतो, मी विषय निवडणार होतो . तुला पूर्ण engaged ठेवणार होतो माझ्या नेमबाजीने. कारण मला विश्वास मिळाला होता - तू खोक्याला भुलणार्‍यातला नाहीस , पंटर आणि घोडे पण ठेवणारा आहेस.
मला तुझ्याकडून लुटण्यासारखं खूप काही होतं. मला तू खूप तगडं गिर्‍हाईक वाटला होतास.
मला निघाल्यावर रीक्षात बसल्यावर नशेत आठवत राहीलं -

"गोली मार भेजेमें
भेजा शोर करता है
भेजेकी सुनेगा तो मरेगा कल्लू
कल्लू मामा"

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

छान ब्रोमँटिक लिखाण. टुरटुरीचं चित्रण खूपच मस्त केलेलं आहे.


-गोळेश उडवाउडवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अक्षरशः थरथरतं लेखन आहे. भकास.
- कवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हमसून हमसून रडलो. तो घोडा (कमरेवर लावलेला), ती रिक्षा, ते क्लायंट्स.. सगळं आठवून गेलं.
तुमचाच,
कल्लू मामा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
रा.रा.श्री. गुरुगुलाब खत्री आणि मा. चिमन चप्पू यांची कन्या टीना यांचा पहिला प्रेमालाप आठवला (१:४६:२९ ते १:४८:३०).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलेय पण गटाराच्या काठाकाठानेच अंदाज घेतल्याने आत एक़ज्याट किती माल हाय ते क्लीयर झाले नाय तुम्हाला.
घोडा आणि रामपूरीवाला डायरेक 'कलानिष्कोव्ह' शब्दाचा विचार करत नाही. त्याला फॅन्सी शब्द आहे 'एके४७'.

त्या रात्री संतापाने, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता घोडा वापरायचा, त्याबरोबर कोणते रामपुरी घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला.

संतापाने की चिंतेने ते नीट ठरवा बरं ! संताप असेल तर पहिला रामपुरी घालायचा. घोडा नंतर. तेच जर चिंता जास्त असेल तर घोडा पहिला आणि रामपुरी नंतर ( गरज पडली तरच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहील्या भेटीत कलानिष्कोव्ह

निष्काम कलायोग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ठ्ठो ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरारा भलताच काला झाला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

==))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुला डोंगरीत राहून राहून पेस्टल रंग आवडत असतील

खी: खी: खी:

बाकी या लेखाला 'दास डोंगरी राहतो' हे शीर्षक शोभून दिसले असते का, या विचारात आहे. (मिसळीचा अनुल्लेख खटकला ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0