एका डेटिंगची गोष्ट – भाग दुसरा

कारमधल्या शक्य त्या प्रत्येक आरशात पाहून,स्वतःशीच हसत, स्वतःवर निहायत खुश होत आणि ह्या आरशांमध्ये जितक्या निवांतपणे पाहता येतं, स्वतःला निरखता येतं तितक्याच निवांतपणे त्याच्यासोबत राहून त्याच्यात हरवून जाता येईल का हा बराचसा रोमांटीक आणि तितकाच अव्यवहार्य विचार करत ती कारमधून उतरली आणि हॉटेलात शिरली. तो आला नव्हताच. उत्साहात टेबलसुद्धा तिनेच बुक केलं होतं. तिथे जाउन ती बसली. कधी येईल तो? किंबहुना येईल तरी का हा प्रश्न तिला छळत होता. वेटरने आणून दिलेल्या मेनुकार्डची पानं उलटत ती बरीच मागं जाउन पोचली. पार कॉलेजपर्यंत. कॉलेज, नुसत्या नावासरशी आठवणी भरभर गोळा झाल्या. तो पहिल्यांदा कॉलेजात भेटलेला. नाही. भेटलेला तसा शाळेतच पण भावलेला कॉलेजात असताना. प्रचंड बिझी असायचा तेव्हापासूनच. बोलायचा ते फक्त त्याचे इवेन्ट्स, अचीवमेंटस, आणि त्याचा ‘बिझी’नेस याबद्दलच. बरचसं काही ठरवलेलं त्याने आयुष्याबद्दल. काय मिळवायचं, कधी मिळवायचं आणि कसं मिळवायचं ते. भेटी व्हायच्या तेव्हाही तो तसाच असायचा. कायम घोड्यावर. तिच्यासाठी ती भेट असायची पण त्याच्यासाठी मात्र फक्त ‘मीटिंग’. निदान तसं वाटायचं तरी. भेटीचा एक तास झुर्र्कन उडून जायचा. तासभर ती शोधत रहायची त्याच्या आयुष्याच्या चित्रातली त्याची जागा. तिला मात्र रिकाम्याच हाताने परतावं लागायचं नेहमी. आणि तो ???

तो निघून गेला असायचा बाईकला किक मारून. या बाईकवरूनच तिला भेटायला जायचा तो. आजच्यासारखा. चाकांच्याच गतीने त्याचं मनही भूतकाळात जायला लागलं. आवडायची ती त्याला आधीपासूनच, पण तरीही आयुष्याच्या चित्रात तिला कुठं बसवावं हे त्याला उमगायचं नाही. त्याचं चित्र आधीपासूनच तयार होतं. काम, ध्येय, यश या सगळ्यात तिला कुठं ठेवावं? ‘background’ला ? ते मान्य नव्हतं त्याला. पण मग मूळ चित्रात घातलंच तर तितका वेळी देऊ शकणार नव्हता तो तिला. कदाचित मग स्वतःच्या चित्रापेक्षा ‘दोघांच्या’ चित्रात जास्त गुंतून जाऊ असं वाटायचं त्याला. भविष्यातल्या यशाचं चित्र काढायचं असेल तर आजचा वर्तमान काम सोडून बाकी कुणासोबत शेअर करायची त्याची तयारी नव्हती. आणि तिची???
भूतकाळाचा बराचसा पल्ला पार करून आता ती वर्तमानात आली. भविष्याचा विचार करताकरता ती अधिकच कन्फ्यूज झाली. त्याच्यासोबत आयुष्य काढायचं तर त्याचं कामच तिची “सौतन” झाली असती. तिला ते नको होतं. तिला तो फक्त तिचा म्हणून हवा होता. त्याला बाकी कुणाहिसोबत ‘शेअर’ करण्याची तिची तयारी नव्हती. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने मेनुकार्ड बंद केलं आणि वेटरला बोलावलं. त्याला वाटलं मगाचपासून “नक्की काय मागवायचं?” या विचारात असणाऱ्या म्याडमनी ओर्डर फायनल केलीये…

त्याचं मात्र काहीच फायनल होत नव्हतं. एका क्षणी त्याला वाटायचं आपलं काम हेच आपलं पाहिलं प्रेम आहे. खात्री होती त्याला कि जितकं प्रेम कामावर करतोय तितकं तिच्यावर करूच शकणार नाही आपण. पण तरीही प्रत्येक वेळेस तिला भेटला कि ही खात्री, विश्वास क्षणार्धात डळमळायला लागायचा. मग तो तिच्याशीही कामाबद्दलच बोलत राहायचा. ‘फोकस’ ढळू नये म्हणून. आज मात्र आपण हिच्याशी ‘आपल्या’बद्दल बोलायला हवं. विचारांच्या तंद्रीतच हॉटेल आलं. त्याने बाइक पार्क केली. “गुड इविनिंग साहेब” म्हणणाऱ्या दारवानाकडे जवळ जवळ दुर्लक्ष करीत तो वेगाने आत शिरला आणि त्याची अस्वस्थ नजर अक्ख्या हॉटेलभर फिरली.
(क्रमश:)
-अभिषेक राऊत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

फारच लहान भाग वाटतायत, जरा मोठे टाका की, किंवा दोनतीन एकत्र लिहून टाका, (नुकताच ज्ञानपीठ मिळालाय नेमाडेंना, जरा हिंदुच्या आकाराचातरी आदर्श ठेवा ;))

काही भाग मस्त जमलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं काम हेच आपलं पाहिलं प्रेम आहे. खात्री होती त्याला

तिला अशी खात्री कधीच का नसते ब्वॉ??? Smile
आजकाल मुलीही तितक्याच धडाडीने व समर्पणाने काम करतात. असो.

वरती अर्धवट यांनी म्हटल्याप्रमाणे मोठे भाग टाकलेले आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आजकाल मुलीही तितक्याच धडाडीने व समर्पणाने काम करतात.

'आजकाल'?

म्हणजे, 'पूर्वी करत नसत' असा दावा आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठे भाग हवेत याच्याशी सहमत
पुभाप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!