Skip to main content

शिक्षण

संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ. मुंबई छशिट स्टेशनच्या बाहेर मी आणि मैत्रीण टाईमपास करत बसलो होतो. थोडा जास्त अंधार झाला की दिव्यांमध्ये झगमगणारी स्टेशनची इमारत बघायची आणि घरी परत जायचं असा बेत होता. रस्त्यावरून स्टेशनाकडे चालत येताना दोघी थबकलो. समोर हे दृश्य दिसलं. मावशींना विचारून फोटो काढले.

आमच्यात छोटासाच संवाद झाला. "मावशी, तुम्ही या पर्सेस विकता का?" मावशी हो म्हणाल्या. "याला अभ्यास करायला आवडतो का?" मैत्रिणीने हिंदीतून विचारलं. मला म्हणाली, "आकडे इंग्लिश नाहीत, मराठी आकडे आहेत." मावशी म्हणाल्या. "मी मराठीच आहे. ही आर्यनमध्ये शिकते." मुलगी विनतक्रार सगळा अभ्यास करत होती; मावशींना तिच्या अभ्यासात एवढं लक्ष देण्याची गरजच नव्हती असं वाटलं.

मावशींच्या परवानगीने काढलेले हे फोटो -

सध्या एका अमेरिकन स्त्रीवादी प्राध्यापिकेने लिहिलेले निबंध वाचत आहे. त्यात एक निबंध आहे आपल्याला असणाऱ्या privileges बद्दल. आपल्याला जे काही मिळतं त्यात नाखूष असणाऱ्या लोकांना टप्पल मारताना, ती स्वतःला मिळालेल्या फायद्यांबद्दलही बोलते. ती म्हणते, माझ्या आईवडलांना आम्हां भावंडांच्या शिक्षणाबद्दल प्रचंड आच होती. असा विचार करण्याइतपत ही पोरगी मोठी होवो अशी सदिच्छा.

Node read time
1 minute
1 minute

मेघना भुस्कुटे Wed, 11/02/2015 - 22:31

इंट्रेष्टिंग फोटो नि विषय आहे. पण एक तक्रार - याचा जीव अगदी लहानसा आहे. अशा प्रकारच्या फोटोंची मालिका करून प्रकाशित केली किंवा अशा एका फोटोच्या धाग्याने सुरू झालेल्या विषयाचा विस्तार केला, तर ते वाचणं अधिक आनंददायी ठरेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/02/2015 - 08:27

In reply to by टिन

'मुंबईकर' ही कल्पनाही आवडली. असे बरेच फोटो काढलेही आहेत. ते फुरसतीत दाखवेनच.

पण या छोट्या संवादाला स्वतंत्र स्थान असावं असं वाटलं. आई मुलीला शिकवत्ये, तिच्याकडून अभ्यास करवून घेते हे दृष्य नवीन नाही. पण रस्त्यावर पर्सेस विकताविकता एकीकडे मुलीचा अभ्यास करवून घेणं, मुलीनेही अजिबात तक्रार न करता, इकडेतिकडे न बघता अभ्यास करणं, वहीवर लिहिलेलं होतं तसं फुटपाथवरही आकडे लिहिलेलं असणं ... हे पाहून नित्यनेमाने तक्रारी करणारे, बरेच मध्यमवर्गीय परिचित आठवले.

भले या गोष्टीचा जीव छोटा असेल पण त्यातली सकारात्मकता पसरवल्याशिवाय राहवेना. शिवाय एक चित्र म्हणजे हजार शब्द वगैरे आहेच.

अस्वल Thu, 12/02/2015 - 11:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

@मुंबईकर वगैरे - People's archive of Rural India (PARI) हा पी. साईनाथ यांचा उपक्रम भारतभरासाठी हेच करतो आहे.
वेबसाईटही खूप छान बनवलीये. ही चित्रं बघून त्यातल्या काही लोकांच्या गोष्टी आठवल्या.

ऋषिकेश Thu, 12/02/2015 - 08:45

छान.
आजुबाजुला बरेच काही शिकण्यासारखे असते. असे टिपता आले म्हणजे झाले.

त्या मुलीच्या आईसारखेच आमच्याही शिक्षणाची आच लाऊन घेतल्याबद्दल अदितीतैंचे पेश्शल आभार!

नितिन थत्ते Thu, 12/02/2015 - 08:54

In reply to by ऋषिकेश

जोजोकाकूंनी आम्हाला चित्रकलेची गोडी लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण आमची पाटी कोरीच राहिली.

नंदन Thu, 12/02/2015 - 09:01

फोटो आणि लेख आवडला. कशातही मनापासून रंगून गेलेलं मूल किंवा व्यक्ती पाहणंच आनंदाचं असतं, याचा पुन्हा प्रत्यय आला.

वृन्दा Thu, 12/02/2015 - 19:02

In reply to by नंदन

प्रतिसाद अतिशय आवडला.

ॲमी Fri, 13/02/2015 - 08:02

In reply to by अंतराआनंद

असेच म्हणते.
अदितीने काढलेले फोटो बर्याचदा क्षण क्याप्चर करणारे असतात. त्यामुळे (ह्युमन्स ऑफ बाँबे/न्युयॉर्क इथले जे थोडेफार पाहीले त्या) पोझ देऊन काढलेल्या फोटोंपेक्षा ते खूप जास्त आवडतात.