कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार

सोशल मीडीयावर काही ठिकाणी वाचल्यानुसार, कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार होऊन त्यांना गंभीर इजा झालेली असल्याचं समजतं.

हे खरं असेल तर निराशा आणि हतबुद्ध व्हायच्या पलिकडचं काहीतरी चाललेलं आहे.

नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे यांच्याबद्दलच्या बातम्यांमधलं अस्वस्थ करणारं प्रकरण असं आहे की हे करून नेमका कोणता हेतू साध्य होतो आहे, कुणाला राजकीय भांडवल मिळतं आहे, कुणासमोरचा कसला अडसर दूर होतो आहे हे कळत नाही. त्यामुळे कॉन्स्पिरसी थिअरीज् मांडण्याशिवाय आणि वांझ संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही करता येणं अशक्य आहे.

महाराष्ट्र सरकारला या केसेस सोडवण्यात रस असेल की नाही माहित नाही; पण या केसेस सुटत नाहीत हे वास्तव आहे. (सरकार बदल झाला तरी किमान दाभोळकर प्रकरणी जैसे थे स्थिती आहे) . परदेशामधे असं काही झालं की केंद्रसरकार हस्तक्षेप करतं. तेही इथे होत नाही. त्यामुळे सगळं भीतीच्या पलिकडे - म्हणजे ज्याला अ‍ॅबसर्ड म्हणावं असं - वाटायला लागलेलं आहे.

काही संदर्भांत या बातमीच्या ठिकाणी "नथुरामवादी प्रवृत्तीं"चा निषेध होताना दिसला. हा निषेध जरी योग्य असला तरी, "हिंसेचा अवलंब करणार्‍या प्रवृत्तीचा निषेध" या सदरातच टाकायला हवा. पानसरे प्रकरणी (किंवा दाभोळकर प्रकरणी ) पुराव्याशिवाय भगव्या शक्तींना (किंवा कुठल्याही राजकीय व्यक्ती/संस्थेला) जबाबदार धरणं बरोबर होणार नाही. पुराव्याशिवाय कुणाला एरवीही दोष देऊ नयेच; पण या प्रकरणांमधे ते फारच निसरडं होईल.

फार गुळगुळीत शब्द वापरायचे तर मी इतकंच म्हणेन की जे कुणी हे घडवून आणतंय ते फारच सडलेलं, दुष्टावा आणि खुनशीपणाने ओतप्रोत भरलेलं आहे.

या प्रकरणीच्या बातमीचा दुवा

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

वाईट वाट्ले

स्व. पानसरे ह्यांच्या कार्याचा फारसा परिचय नव्हता तरीही एका (ज्येष्ठ) व्यक्तीची ह्त्या हे वास्तव धक्कादायक आहे. पोलिस स्वतः कितीही सक्षम आणि ऊत्सुक असले तरी राजकीय हितसंबंध आणि पोलिसातीलच भ्रष्टाचार तपासातील प्रगती कितपत होऊ देईल याबद्दल शंकाच आहे.

दाभोलकर हत्या आणि आता पानसरे हत्या, ह्या दोन घटनांमुळे एक गोष्ट दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे, की कुठल्याही चळवळीचा दबावगट म्ह्णून प्रभाव पडत नाही. कुठलीच चळवळ जनक्षोभ निर्माण करू शकत नाही.मला वाटत, अनेक चळवळीत बहुसंख्य सामान्यांचा सहभाग नसतो. ते स्वतःला त्या कारणाशी जोडू शकत नाहीत अथवा ईच्छीत नाहीत, अनेक चळवळीत नेतृत्वाची पुढची फळी नसते,आर्थिक बाबी जमत नाहीत,पण या आणि अशा विविध प्रश्नांवर मात करून चळवळी उभ्या राहिल्या पाहिजेत.नवीन चळवळसुद्धा वेगळ्या पद्धतीने आणि जास्त जागरूकतेने करायला हवी. विचारवंत आणि सामान्यजन ह्यातली दरी भरून काढायला हवी तरच अशा घटना आणि प्रवृत्तीला आळा बसेल.

पण त्याहूनही महत्वाच म्हणजे, सामान्यजन आणि बहुसंख्य ह्या चळवळीत मनापासून कसे सामील होतील ह्याचा विचार करायलाच हवा.

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

ए भाउ

१९७० च्या थोडस्सं आधी एकसाथ होलसेल राष्ट्रियीकरण (मराठीमध्ये साम्गायचं तर न्याशनलायझेशन) झालं तेव्हा सर्वाधिक तूप मध्यमवर्गीय शिक्षित लोकांच्याच रोटीवर पडलं ना भौ. सरकारी क्षेत्रात अथवा सार्वजनिन्क क्षेत्रात ज्या नोकर्‍या निर्माण झाल्या त्यातही मध्यमवर्गीयांना फायदा झाला ना.
आता मध्यमवर्गीयाची नेमकी काटेकोर व्याख्या वगैरे करायची ताकत/ऐपत नै; पण भावनाओं को समझों.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक शंका

मी काही समाजवाद, भांडवलवाद यांचा एक्सपर्ट नाही. पण मध्यमर्गाकडे पैसा आणणार्‍या नोकर्‍या ९१ पूर्वी निर्माण झाल्या का?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

श्रद्धांजली कॉ पानसार्‍यांना!

श्रद्धांजली कॉ पानसार्‍यांना!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

शंकेखोरी

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कॉ. पानसरे यांना आदरांजली.

कॉ. पानसरे यांना आदरांजली.

गोळीबार होण्याच्या एक दिवस आधी पानसरे काय बोलले होते, याचा व्हिडीओ.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

?

आमचे काही अमेरिकन (मूळ भारतीय) परिचित तर म्हणतात

कोण? कधी? कोठे?

अगदी

आमचे काही अमेरिकन (मूळ भारतीय) परिचित तर म्हणतात की आपण सोविएत यूनियनशी सख्य न दाखवता अमेरिकेच्या सीटो-सेन्टो किंवा तत्सम करारात दाखल झालो असतो तर एव्हाना कुठल्या कुठे गेलो असतो.
कदाचित त्यांना पाकिस्तानसारखे कुठच्या कुठे असे म्हणायचे असेल.

.

>>समाजवादी, कम्युनिस्ट यांची कितीही थट्टा केली तरी पूर्वीच्या निम्न मध्यमवर्गीयांना आजच्या उच्च मध्यमवर्गीयांमध्ये बदलण्यात या विचारधारेशी संबधित कायदेकानून आणि व्यवस्थेचा हातभार लागलेला आहे हे आपण एवढ्यात विसरावं?

सध्या सुखवस्तू असलेल्या बर्‍याच लोकांचा असा समज आहे की ते पूर्वीच्या निम्न मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आले आहेत. स्वातंत्र्यापासून १९९१ पर्यंत जी व्यवस्था होती ती नसती तरी आम्ही वर आलोच असतो असा त्यांचा समज असतो. (किंवा ती व्यवस्था नसती तर आम्ही कुठेच्या कुठे गेलो असतो असाही समज असू शकतो) अर्थात त्या जर-तर लॉजिकला जसा आधार नसतो तसाच ते लॉजिक नाकारण्यालाही काही आधार नसतो.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

दु:ख

पाच दिवस पराकाष्ठेचे प्रयत्न होऊनही नाहीच वाचू शकले गोविंदराव पानसर्‍यांचे प्राण. समविचारी लोकांना हा लढा पुढे नेण्यासाठी या हत्येमुळे आता अधिक बळ मिळो.
श्रद्धांजली.

+१

राही यांच्या प्रतिसादाला +१

.

.

ह्या धाग्यावर जे विचार व्यक्त

ह्या धाग्यावर जे विचार व्यक्त झाले ते वाचून वाईट वाटलं. एखादी विचारधारा न पटणे, माणसाबद्द्ल माहित नसणे हे समजण्यासारखे आहे पण "माझा याच्याशी काय संबध?" किंवा "ठीक आहे मग? " असे म्हणणे संवेदनाहीनतेचे लक्षण आहे. आपण नाही तरी आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या आधीच्या पिढ्या ’नाही रे’ वर्गातूनच आलेल्या आहेत याबद्द्ल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. समाजवादी, कम्युनिस्ट यांची कितीही थट्टा केली तरी पूर्वीच्या निम्न मध्यमवर्गीयांना आजच्या उच्च मध्यमवर्गीयांमध्ये बदलण्यात या विचारधारेशी संबधित कायदेकानून आणि व्यवस्थेचा हातभार लागलेला आहे हे आपण एवढ्यात विसरावं? कोणतीही व्यवस्था ही सर्वांना सर्वकाळ फायद्याची ठरेल हे अशक्यच आहे.
पोलिस अनेकदा धागेदोरे नसलेल्या खून प्रकरणात शिताफीने उकल करतात कारण तिथे वैयक्तीक हितसंबध असतात. पण हे कसब दाभोळकर वा पानसरे प्रकरणी ते वापरत नाहीत कारण तिथे राजकिय दबाव असतो हे उघडच आहे.
जेसिका लाल सारख्या प्रकरणात मिडीयामुळे बंद केलेली फाईल उघडायला लागल्याचं उदाहरण आहे पण या प्रकरणात मिडीया ठराविक पोपटपंचीपलीकडे जाणार नाही हे उघड आहे. अश्यावेळी जे एकत्र येउन दबाव निर्माण करू शकतात अश्या गटांची आवश्यकता असते. असा दबावगट आंजावर आपण तयार करु शकतो का? कश्या प्रकारे? यावर चर्चा व्हायला हवी. कारण अश्याप्रकारे कोणाचा खून होणॆ वा त्याचा प्रयत्न होणे हे धक्कादायक आहे त्याहून धक्कादायक आहे ते असा प्रयत्न पचून जाणे. हे सगळं आपला दरवाजा ओलांडून कधीही आत येउ शकतं. कारण सिस्टीम खिळखिळी असणं हे जास्त घातक आहे.

@अनुराव : समाजसेवा करणार्‍यांना त्यातून आनंद मिळतो. हा मुद्दा टेक्निकली बरोबर आहे. मग त्या न्यायाने पोलिस , सैनिक कोणालाच मोठ मानायला नको ना? पण ते वैयक्तिक स्वार्थापलीकडे जातात म्हणून आपण आपल्या घरात सुरक्षित असतो . किमान भारतीय स्त्रीने तरी समाजसेवा या प्रकाराला असं तुच्छ लेखणं बरोबर नाही. आपल्यासाठी कोणीतरी कष्ट घेतले म्हणून आपण आज रांधा-वाढा यातून बाहेर येऊन हे बोलू शकतोय याची थोडीतरी जाणिव असावी.

पानसरेंबद्द्ल अजून माहीती ईथे

हा लेखही या दृष्टीने वाचनीय आहे.

त्यामुळे एखाद्या तळमळीच्या,

त्यामुळे एखाद्या तळमळीच्या, नि:स्पृह आणि सच्च्या माणसाचा खून (किंवा त्याच्यावर सशस्त्र हल्ला) ही जर एखाद्या मोठ्या समाजगटाला हादरवणारी घटना असेल तर तिची दखल सरकारने आणि उर्वरित समाजानेही घेणे हे सुसंस्कृत समाजात अपेक्षित असते.

याचेशी शतशः सहमत.
----------------
बाकी काही बोलणे या धाग्यावर खूप अप्रासंगिक ठरेल.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

सशस्त्र संघर्ष

सशस्त्र संघर्ष हाच एकमेव आणि श्रेष्ठतम संघर्ष असे मानणार्‍यांचा एक वर्ग समाजात कायम अस्तित्वात असतोच. वीरश्री किंवा इरेसरी हेच परममूल्य मानण्याकडे यांचा कल असतो.
आर्म्ड फोर्सेस अर्थात सशस्त्र सेनादलांकडून(च फक्त) सशस्त्र संघर्ष अपेक्षित असतो. सिविल सोसायटीत तसा तो अजिबातच नसतो.
पायदळात अनेक पायिक बळी पडतात. त्यांचे सर्वांचे स्मारक होत नाही. नौदलातील कमांडर अथवा अगदी कॅप्टन लोकांचेही होत नाही. त्यांच्या अपमृत्यूच्या विरोधात मोर्चे निघणार नाहीत. या लोकांनी प्रतिपक्षातील एखाद्याला किंवा अनेकांना मारले तर तो गुन्हा नसतो. ते त्यांचे कर्तव्य असते. रणाचे (आणि प्रेमाचेही) नियम वेगळे असतात. तिथे जे क्षम्य असते ते इतरत्र तसे नसते.
सिविल सोसायटीमध्ये वैचारिक शत्रूला संपवण्यासाठी विचारांची किंवा कायद्याची मदत घ्यावी असा संकेत आणि नियमही असतो. कायदा हातात घेण्याची मुभा कुणालाही नसते.
त्यामुळे एखाद्या तळमळीच्या, नि:स्पृह आणि सच्च्या माणसाचा खून (किंवा त्याच्यावर सशस्त्र हल्ला) ही जर एखाद्या मोठ्या समाजगटाला हादरवणारी घटना असेल तर तिची दखल सरकारने आणि उर्वरित समाजानेही घेणे हे सुसंस्कृत समाजात अपेक्षित असते.
'बुडाला पानसर्‍या पापी, कम्यूनिस्ट-संहार जाहला' ही भूमिका अगदीच विचित्र, खरे म्हणजे विकृत वाटते.

:(

अजो, हा एक वाक्याचा प्रतिसाद (आणि नंतर लाल बावट्यांनी मोर्चा काढला तर मी का सहानुभुती बाळगु? असा काहितरी प्रतिसाद) वाचून खूपच वाईट वाटले.
तुम्हाला त्या त्या गटांना पाठिंबा द्यायला कोण सांगते आहे.
==
वर अनु आंटींना आवडलेल्या अग्रलेखातील त्यांनी एक वाक्य उधृत केले आहे. "यांच्यावरील हल्ल्यामागेदेखील हे आर्थिक हितसंबंध असू शकतात. पण त्याकडे आपले लक्षच जात नाही आणि पुरोगामित्व-प्रतिगामित्वाच्या कालबाहय़ आणि निष्फळ चर्चात आपण रमतो."

मात्र त्याच्या पुढील वाक्य त्याहून महत्त्वाचे आहे असे वाटते:

अशा परिस्थितीत विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्वानीच एकत्र यावयास हवे.

==

असो. ज्याची त्याची जाण म्हणायचे नी सोडून द्यायचे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यामुळे सत्तत कुणीतरी

त्यामुळे सत्तत कुणीतरी आपल्याला जज करतंय नि आपण ते खोडून काढायला सज्ज हवं अशी मनोवस्था कुठून येते

ही काहीशी victim mentality आहे का? आपल्याला म्हणजे आपल्या, स्वतःच्याच समाजाला जज करतंय, एका व्यक्तीला नव्हे, इतपत शहाणपणही विसरण्यामागचं कारण काय असेल? आपल्याला लोक "गुन्हेगार" समजतात असं वाटण्यामागचं कारण काय असेल?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्दा मी वर स्पष्ट केलेला

मुद्दा मी वर स्पष्ट केलेला आहे. समजला नसेल तर समजून सांगता येते, पण समजून न घ्यायचे सोंग घेतलेल्याला काहीही सांगणे अशक्य आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

गिरे तो भी...

म्हणूनच मी मुळात अनुरावांच्या मताला विरोध केला होता कारण त्यासाठी त्यांनी ठोस काही दिलेलं नव्हतं. ते नीट वाचून प्रतिसाद द्यायच्या ऐवजी तुम्ही अजून पिंका मारत सुटलात. तेव्हा उशीरा का होईना माझा मुद्दा कळलेला दिसतो.

पिंक मारणे याचे उत्तम उदाहरण म्हणून तुमचा वरिजिनल प्रतिसाद चपखल बसतो. तस्मात हा शतमूषकभक्षणोत्तर हजयात्री प्रतिसाद रोचक आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

एक तर यात कुणा एका घटकाला जज

एक तर यात कुणा एका घटकाला जज केलेलं नाही. एका विशिष्ट व्यवस्थेत चालणार्‍या समाजाबद्दल काहीतरी म्हणू बघतेय मी, ज्यात मीही आहे. त्यामुळे सत्तत कुणीतरी आपल्याला जज करतंय नि आपण ते खोडून काढायला सज्ज हवं अशी मनोवस्था कुठून येते याबद्दल आता मला कुतूहल वाटायला लागलं आहे.

तेही एक असो. केलं कुणीतरी आपल्याला जज. त्या माणसाला आपण इतकी किंमत नक्की कशामुळे देतो, याचाही थोडा विचार झाला तर बरं होईल. म्हणजे मग अनेक 'तथाकथित' लोकांचं मत तर महत्त्वाचं आहे, पण तसं दाखवायचं तर नाही. मग हाणा त्याला... ही कसरत थोडी कमी होईल.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

समजावून सांगा पाहू

मुद्दा काय आहे ते समजावून सांगा पाहू. माझ्यामते तुम्हालाच मुद्दा समजेला नाही त्यामुळे तुमचे भाषिक अन आकलन दौर्ब्यल्य छानच अधोरेखित होतेय.

असल्या ओळी लिहायला फार काही लागत नाही.

उपरती

ठीके, निव्वळ तुम्हांला काय वाटतं यावरून माझ्या व्याख्या वा मते बदलण्याची वेळ अजूनतरी आलेली नाही.

सेम अप्लाईज टू एव्हरीवन. म्हणूनच मी मुळात अनुरावांच्या मताला विरोध केला होता कारण त्यासाठी त्यांनी ठोस काही दिलेलं नव्हतं. ते नीट वाचून प्रतिसाद द्यायच्या ऐवजी तुम्ही अजून पिंका मारत सुटलात. तेव्हा उशीरा का होईना माझा मुद्दा कळलेला दिसतो.

इथे ह्या धाग्यावर मात्र असं

इथे ह्या धाग्यावर मात्र असं जाणवू लागलं की -

पानसरे कोण मला माहीत नाही.
माहीत करून घेण्याची इच्छाही नाही.
इथल्या सदस्यांचे परस्परांतले आकस, हेवेदावे वगैरेंमध्ये मात्र मला पुरेपूर रस आहे आणि ते सगळे खेळ मी कोणत्याही धाग्यावर हिरीरीनं खेळतो.

पानसरे कोण हे खरोखरच लोकांना माहित नाही. त्यांचा "टोलला विरोध" आणि "कम्यूनिझम" पाहता माहित करून घ्यायची गरज न वाटली तर त्यात काही चूक नाही. जे विषय स्वतःच्या जिव्हाळ्याचे आहेत त्यात काम करणार्‍या लोकांचे बरे वाईट झाले तर लोकांनी का बरे दु:ख करत सुटावे. २६ जानेवारीला शौर्यपदक मिळाले नि २७ ला काश्मिरमधे शत्रूकडून हत्या झाली असे एका कर्नलबाबत याच वर्षी झाले. कोणाला त्याचे नाव आठवतेय? कोणी धागा काढला त्याच्यासाठी? त्याला न्याय नको का?
पानसरेंबद्दल ज्यांना जितके दु:ख झाले आणि त्यांनी ते जसे व्यक्त केले ते गरजेचे आहे. पण हीच भावना सार्वत्रिक असावी ही अपेक्षा चूक आहे. काही लोक कमी संवेदनशील असणारच आणि ते ओके आहे. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हत्येच्या एकूण इतक्या बातम्या आम्ही रोज पाहतो कि विशेष सान्निध्य असल्याशिवाय संवेदना होत नाहीत. हे खरं दुखणं आहे.
-------------
वर ऐसीच्या सदस्यांत आकस आणि हेवेदावे आहेत असं म्हणणं अजूनच चूक आहे. ते इतके आहेत कि कोण्या भ्याड हल्ल्याच्या दु:खाऐवजी मोठे आहेत असं म्हणणं देखिल गैर आहे. कोणाच्याही सामाजिक कळकळीचा प्रत्येकाला आदर आहेच. इथे कमेंट करणार्‍या प्रत्येक सदस्याला त्यांच्याबद्दलचा किमान आदर आणि हल्ल्याबद्दलचे दु:ख आहेच आहे. मात्र ते याच धाग्यावर अवांतर बाबतीत आपली मते देत आहेत हे प्रासंगिक वाटत नाहीय हे खरे आहे. पण तरीही त्यावरून त्यांच्या दु:खाच्या दर्जावर असे भाष्य टाळलेले बरे झाले असते.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

१.५ वर्ष मारेकर्‍यांचा शोध न

१.५ वर्ष मारेकर्‍यांचा शोध न लागणं, खुनाचे हल्ले होणं हा फडतुसांसाठी गंभीर आहेच. त्याला नाही म्हणत नाहीच.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ओके

माझ्याबद्दल सांगतो. काल इथेच ती बातमी वाचली. नाव गूगल केलं. ऐसीच्या मुखपृष्ठावर जो लेख दिलाय, ओळख म्हणून, तो लेख सापडला. वाचला. माझ्या परिसराशी संबंधित काही काम दिसलं नाही पण कोणासाठी तरी काहितरी केलय ते दिसलं. चांगला माणूस दिसतोय, हल्ला झाला ते वाईट झालं हे वाटलं. पण इथे लगेच सामजिक भान, बबल वगैरे लिहिलेलं पाहिलं त्यामुळे ती रिअ‍ॅक्क्षन आली. त्या व्यक्तिबद्दल कींचितही अनादर नाही.

इथल्या सदस्यांचे परस्परांतले आकस, हेवेदावे वगैरेंमध्ये मात्र मला पुरेपूर रस आहे आणि ते सगळे खेळ मी कोणत्याही धाग्यावर हिरीरीनं खेळतो.

हे झालय हे खरय. त्याबद्दल वाईट वाटलं. पण चर्चा ऑलरेडी सीबीआय वगैरे गावांना फिरून आलेली, सो त्यात हा मुद्दाही पडला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला तर समाजभान नसल्याचं जाम

मला तर समाजभान नसल्याचं जाम गिल्टी वाटतं. इन फॅक्ट ती गिल्ट विसरायला अन समाजभान वाढवायला या दुहेरी फायद्याकरता मी ऐसीवर येते. (डोळा मारत)
___
वरील वाक्य "खवचट" नसून वस्तुस्थिती आहे Sad
________
अनु राव व बॅट्या यांचे मुद्दे आवडले.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

+१

+१ Sad

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

थोडा वेगळा मुद्दा

कॉ. पानसर्‍यांबद्दल, त्यांच्या अस्तित्वाबद्दल मीदेखील अद्यापपर्यंत अनभिज्ञ होतो. (आज पहिल्यांदाच ऐकले/वाचले हे नाव.)

आता वाटले तर मला बुडबुड्यातला म्हणा, किंवा माझा बुडबुडा पुरेसा मोठा नाही म्हणा. आपल्याला मंजूर आहे. मुद्दा तो नाही.

मी कोणत्याही निकषाने 'आजकालच्या पिढी'तलाही नाही. (पुढल्या वर्षी पन्नास वर्षांचा होईन.) मुद्दा तोही नाही.

मुद्दा असा आहे, की पानसरे हे एक टोटली अननोन गृहस्थ आहेत, यट्टनादर 'कॉमन म्यान' आहेत, 'फडतूस' आहेत (बोले तो, तुमच्याआमच्यासारखेच सामान्य, कोठलेही विशेष बोले तो पेपरात छापण्यालायक कर्तृत्व खात्यावर नसलेले, कोठल्याही दृष्टिकोनातून 'गबर' क्याटेगरीतले नव्हेत असे - आणि 'कॉ.' म्हणवताहेत म्हणजे बख्खळ माया गाठीशी बांधून बहुधा नसणार असे मानायला जागा आहे (चूभूद्याघ्या.) तेव्हा त्याही अँगलने 'फडतूस' - एवढ्याच मर्यादित अर्थाने) असे जरी मानले, तर मग मामला अधिकच गंभीर बनतो.

बोले तो, तुमच्याआमच्यापानसर्‍यांच्यासारख्या फडतूस सामान्यांवर कोणाही येरागबाळाने खुनी हल्ला चढवावा आणि मारेकर्‍यांनी सहीसलामत सुटावे - तुम्हाआम्हापानसर्‍यांसारख्या फडतूसांच्या जिवाची किंमत हीच राहिली आहे म्हणायची काय? (समाजातल्या 'गबर'मंडळींचे ठीक असते; (देव न करो, पण) उद्या त्यांना जर कोणी 'उडवले', तर लग्गेच सीबीआयचौकशी होईल; तुम्हांआम्हांपानसर्‍यांसारख्या 'फडतूसां'चा वाली कोण?)

अरे, कुठे नेऊन ठेवले आहे माझ्या भूतपूर्व देशाला? (माझा सद्य देश या बाबतीत अगोदरच ***च्या **त जाऊन रुतलेलाच आहे; तो मुद्दा आणखी वेगळा.)

जजमेंटल

>> जे कॉ. पानसर्‍यांबद्दल अनभिज्ञ होते त्यांना उगाच जज केलेलं आहे. हे जजिंग पटलं नाही. यात 'आजकालची पिढी...' छाप वास येत आहे. माझा एवढाच मुद्दा आहे. <<

मी कम्युनिस्ट नाही. व्यक्तिशः पानसऱ्यांची अनेक मतं मला पटतही नाहीत. तरीही, त्यांची तळागाळातल्या माणसाविषयीची कळकळ आणि त्यासाठी आपलं आयुष्य खर्च करणं मला जाणवू शकतं. खरं तर त्यामुळेच काल अनेकांनी पानसऱ्यांना 'अजातशत्रू' असं संबोधलं. इथे ह्या धाग्यावर मात्र असं जाणवू लागलं की -

  • पानसरे कोण मला माहीत नाही.
  • माहीत करून घेण्याची इच्छाही नाही.
  • इथल्या सदस्यांचे परस्परांतले आकस, हेवेदावे वगैरेंमध्ये मात्र मला पुरेपूर रस आहे आणि ते सगळे खेळ मी कोणत्याही धाग्यावर हिरीरीनं खेळतो.
  • त्यावरून मला काही म्हणाल तर मग मात्र मी लगेच उसळून उठणार.
  • ह्या सगळ्यात मी व्यग्र असेन तेव्हा मृत्यूशी झुंज देणारे पानसरे आणि त्यांचं जीवितकार्य अशानं गौण ठरलं तर ठरू देत.

व्यक्तिशः मला हे तथाकथित 'सामान्य' माणसाचं प्रातिनिधिक अजिबातच वाटलं नाही. माझ्या अनुभवात सामान्य माणसं अशा प्रसंगी अधिक सहृदयपणे वागतात आणि व्यक्त होतात. हे वर्तन मात्र मला अस्थानी आणि चिंतनीय वाटलं. माझा एवढाच मुद्दा आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

टोलच्या नावावर चाललेल्या

टोलच्या नावावर चाललेल्या लुटीला

अतीव दु:ख झाले आहे ही फ्रेज वाचून.
---------------------------------
कृपया कधी भारतात पायाभूत क्षेत्रात सेवेची किती तूट आहे नि कशी भरून काढायची याबद्दल सरकारचा काय प्लॅन आहे याबद्दलही बातम्या वाचत चला.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

टोल रद्द झाले तर जे लोक सो

टोल रद्द झाले तर जे लोक सो कॉल्ड बुडबुड्यात आहेत त्यांचाच फायदा होणार आहे.

फक्त टोल रद्द करणे चुक आहे, त्याच्या मुळाशी जायला पाहीजे. ही टोलची काँट्रक्ट कोणी दिली, त्यात कीती पैसे खाल्ले गेले हे शोधुन काढले पाहीजे. नुस्ते टोल रद्द करुन काय होणार?

अगदी अगदी. नाहीतर कोण आले

अगदी अगदी. नाहीतर कोण आले असते उत्तर द्यायला. आणि दुसर्‍यांना पण खुप खुप जास्त माहीती असु शकते हे ही थोडेफार लक्षात घेतले तर बरे होइल.

तुम्हालाच काही माहीती

तुम्हालाच काही माहीती नाहीये.

ह्या सर्वाला महानगरपालिका कीती जबाबदार आहे त्याचा पण शोध घ्या. रस्त्याची जागा ताब्यात यायला कीती उशीर लागला ( अजुन सर्व जागा आलीच नाहीये ताब्यात, तर रस्ते कसे बांधणार). ड्रेनेज, केबलिंग वगैरे चे काम कोणाच्या स्कोप मधे होते आणि त्यांनी ते वेळेत केले का?

टोलची रक्कम आणि कालावधी यांत पारदर्शकता आहे का ?

आणि बाकी सर्व बाबतीत कोर्टात गेले होते ना हे लोक, मग निकाल विरुद्ध का लागला?

बर हे सर्व होत असताना, नगरसेवक, आमदार आणि विरोधी पक्ष काय झोपला होता का ५ वर्ष

टोल कर्मचारी आणि इतर सुविधा या नियमावलीनुसार आहेत का ?

आता तुम्ही टोल कर्मचार्‍यांची काळजी होती म्हणुन बुथ जाळले म्हणु नका. (स्माईल)

सर्वात महत्वाचे म्हणजे टोल आणणारे सर्व राजकीय नेते पुन्हा पुन्हा निवडुन आले आहेत. हा दोष कोणाचा आहे? आणि जर दोष कोल्हापुरच्या लोकांचा असेल तर त्यांनी टोल ची जबाबदारी त्यांचीच आहे हे समजुन घ्यायला नको का?

टोलनाके नव्हे, वाटमारीचे अड्डे!

टोलनाके नव्हे, वाटमारीचे अड्डे!

राज ठाकरे किंवा पानसरे ह्यांच्या आंदोलनाला माझं समर्थन असण्याचा किंवा नसण्याचा हा प्रश्न नाही. आंदोलन कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधात जातं हादेखील इथे मुद्दा नाही. ज्या जनतेनं भाजपला केंद्रात आणि राज्यात निवडूनदेखील दिलेलं आहे त्या सामान्य जनतेचा टोलच्या नावावर चाललेल्या लुटीला पाठिंबा नाही. टोलवसुली हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हे जमिनीवरचं वास्तव आहे. त्यासाठी बुडबुड्याबाहेर पाहायला हवं मात्र.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पकडापकडी इथून सुरू झाली. यात

पकडापकडी इथून सुरू झाली.

यात दोषी कोण कोण?

- आपल्या आजूबाजूला घडलेल्याल्या गोष्टींशी सांधा अजिबात न जुळला तरीही चालेल, पण माणसानं स्वतःच्या सुखसोईंसाठी एका बुडबुड्यात धावत राहिलं पाहिजे - तेच महत्त्वाचं आहे, असं बिंबवणारी व्यवस्था. यात सगळेच आले - बाजारापासून माध्यमांपर्यंत नि सरकारपासून विचारवंतांपर्यंत.

यात जे कॉ. पानसर्‍यांबद्दल अनभिज्ञ होते त्यांना उगाच जज केलेलं आहे. हे जजिंग पटलं नाही. यात 'आजकालची पिढी...' छाप वास येत आहे. माझा एवढाच मुद्दा आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

टोलला विरोध

टोलची पूर्ण कामे झाली आहेत का ? सर्विस रोड बांधायचा काँट्रक्टमधे लिहिला होता ते पूर्ण झालय का ? तयार झालेल्या रस्त्याची गुणवत्ता ठरवलेल्या प्रमाणात आहे का ? संपूर्ण बांधकाम ठरवलेल्या वेळेत झालय का ?
टोलची रक्कम आणि कालावधी यांत पारदर्शकता आहे का ?
टोल कर्मचारी आणि इतर सुविधा या नियमावलीनुसार आहेत का ?

तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत का ?
की तुम्ही पण लगेच जालीय जाळपोळ करत आहात ?

तुमच्या माहितीसाठी - यात काही

तुमच्या माहितीसाठी -
यात काही गैर नाही. फक्त ते तुमचे राजकीय विरोधक दिसतात.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

वडाची साल पिपळाला लावू

वडाची साल पिपळाला लावू नका.
भ्रष्टाचार झाला असेल तर त्या विरुद्ध केस करा, पण अराजक कशासाठी. आणि ४-५ वर्ष रत्याची कामे चालू होती, ती सुरुच होउन द्यायची नव्हती कोर्टात जावुन.
त्याही आधी जेंव्हा हे काम आयाआरबी ला द्यायच्या वेळीच हा जनमताचा दबाव आणायचा. टोल काही अचानक आला नाही.
ह्या कोल्हापुर करांनी निवडुन दिलेल्या लोकांनीच आयाआरबीला काम दिले ना? काम चालू असताना, एक निवडणुक पण झाली आणि पुन्हा हे टोलचे काम देणारेच लोक निवडुन आले. तेंव्हा पालिका निवडणुकीत हा मुद्दा घेउन उभे रहायचे.
आता कसे बसे रस्ते बांधुन झाल्यावर टोल द्यायचा नाही हा कुठला न्याय? बरं न्यायालयाने पण स्टे आणला नाही टोल वर.

महापौराला रंगेहात पकडले लाच घेताना तेंव्हा कोल्हापुरात काही मोर्चा वगैरे निघाला नाही, अजुन राजीनामा पण दिला नाही. पण टोल भरायची वेळ आली की लगेच जाळपोळ.

त्यावेळी तुम्ही कुठे असता? हा

त्यावेळी तुम्ही कुठे असता?

हा प्रश्न विचारणारे लोक आता तसे परिचित आहेत. यांना गैरसोईच्या असलेल्या कोणत्याही ठिकाणाबद्दल निषेधाचा सूर ऐकू आला, की हे 'ते ठीक आहे, पण अमकं हे झालं तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा का नाही केला विरोध?' असले प्रश्न घेऊन पहिले येतात. आपण कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतो आहोत, त्यातून नक्की काय संदेश जातो, त्याचे दूरगामी फायदेतोटे काय... यांतले कुठलेही विचार त्यांना शिवतही नाहीत. त्यांपैकी तुम्ही एक असणार, याचा अंदाज असल्यामुळे आश्चर्य वाटलेलं नाही.

तुमच्यासारख्यांना पाठिंबा देणारे आवाज वाढताहेत, त्याची मात्र चिंता वाटते.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

टोल - काही संदर्भ

>> टोलला विरोध करणे म्हणजे सामाजिक कार्य नव्हे. वास्तविक ते बर्‍यापैकी चूक आहे. <<

तुमच्या माहितीसाठी -

Sharad Pawar held 1,000 shares in Gadkari-linked IRB

The curious case of Virendra Mhaiskar, IRB Infrastructure and Nitin Gadkari

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.

.

ट्रोलिंग नाही हो.

ट्रोलिंग नाही हो. पानसरेंवरच्या हल्ल्याच्या नादात -
१. कम्यूनिझम
२. टोलला विरोध
हे पुण्यशब्द ठरू नयेत.
=============
काल नागपुरात कम्यूनिस्टांनी मोर्चा काढलेला. लाल झेंडे घेऊन. माझी का सहानुभूती असावी त्याला?
=============================
भारतात अनेक हल्ले होतात. कश्मिरात, नागालँडमधे, छत्तिसगडमधे, ... . त्यात आपले सैनिक, पोलिस मरतात. त्यावेळी तुम्ही कुठे असता? उलट नक्षलवाद्यांचं समर्थन करत असता. वास्तविक असं विचारणं हलक्या मानसिकतेचं आहे हे मान्य करूनच विचारतो. तुमचे समविचारी, समकार्यी त्यांची दखल सर्वांनी घ्यावी हा अट्टाहास चूक आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

ह्या बाबत चर्चा होयला तरी

ह्या बाबत चर्चा होयला तरी हरकत नाही ना.

'मी ट्रोलिंग करत नाही हो,

'मी ट्रोलिंग करत नाही हो, मागे घ्या ते शब्द' म्हणून आर्त टाहो फोडणं एकीकडे. नि एका सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झालेला असताना त्याच्या कामाच्या समाजोपयोगाबद्दल वा योग्यायोग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं एकीकडे. अंतर्गत विसंगती तरी किती टोकाच्या असाव्यात...

असो. उर्वरित प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाखाली असला तरी तुम्हांला एकट्यांना उद्देशून नाही.

अशा प्रकारच्या हल्ल्यांची दखल सामान्य माणसानं का घ्यावी, त्याला दैनंदिन सुखांतून त्यासाठी वेळ कुठला, त्याला त्या समाजोपयोगी कामाचा फायदा काय, मुळात काम तरी सामाजिक कुठे आहे, निषेध व्यक्त करणारे लोक पुरोगामी का स्यूडोपुरोगामी.... या सुरातले प्रतिसाद मला अतिशय घाबरवतात. अशा प्रकारचे हिंसक प्रकार होत राहणार. जर सर्वसामान्यांच्या सद्यकालीन वा चौकटबद्ध सुखांच्या दृष्टीनं ते फारसे महत्त्वाचे नसतील तर राजरोस खपवून घेतले जाणार आणि लोकांनाही त्याबद्दल काहीही विधिनिषेध नसणार, असं त्यातून दिसतं. हे भयावह आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रत्यक्ष जगातल्या माझ्या

प्रत्यक्ष जगातल्या माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार सांगायचं, तर अगदी सामान्य माणूससुद्धा आपल्या परिसराबाहेरच्या अनेक गोष्टींबद्दल मत राखून असतो आणि ते वेळोवेळी खाजगीत व्यक्तही करत असतो.

सामान्य माणूस मत राखून असतो हे पण मान्य. पण मी वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या प्रतिक्रियेचा सूर काय असतो आणि क्षणिक हळहळ व्यक्त करण्यापलिकडे तो काही करतो का हा प्रश्न आहे. मेघना यांच्या वरील प्रतिसादात लोकसंरक्षण वगैरे संकल्पनांचा उल्लेख आहे त्या तर मग या केसमध्ये बर्‍याच लांबच्या गोष्टी ठरतात.

मात्र, त्या परिप्रेक्ष्यात पाहता 'काय फरक पडतो?' असा वरच्या प्रतिसादांत आलेला सूर काहीसा विसंगत आणि त्यामुळे आश्चर्यकारक वाटतो, हेही खरं. म्हणजे, परिसराबाहेरच्या गोष्टींमध्ये रस नाहीच, असं नाही; तर त्याहून वेगळं काही तरी कारण त्या आत्मसमर्थनामागे असेल का, असा प्रश्न पडतो.

'काय फरक पडतो?' असा सूर नसून 'एखाद्याला नसेल माहित तर त्यात त्याची काय चूक (पक्षी: बच्चे की जान लोगे क्या)?' असा सूर आहे. वर समर्थनार्थ लिहिलेले प्रतिसादही त्याच परिप्रेक्ष्यातून आणि दीर्घकालीन स्वार्थ वगैरे प्रतिसादांना उद्देशून लिहिलेले आहेत.

म्हणजे, परिसराबाहेरच्या गोष्टींमध्ये रस नाहीच, असं नाही;

रस नाही असे नाही. पण एखाद्या घटनेमुळे एखाद्याच्या आयुष्यात काही विशेष फरक पडत नसेल आणि सामान्यज्ञान यापलिकडे त्याच्यासाठी या घटनेचे महत्व नसेल तर त्याने त्या घटनेकरता स्वतःचा बुडबुडा सोडून बाहेर का बरे यावे हा प्रश्न आहे.

टोलला विरोध करणे म्हणजे

टोलला विरोध करणे म्हणजे सामाजिक कार्य नव्हे. वास्तविक ते बर्‍यापैकी चूक आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

तुमच्या रोजच्या आयुष्यावर बोलू काही...

>> ज्या घटनेचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर काही तत्काळ आणि/किंवा भयंकर असा परिणाम होणार नसेल तर अशा वेळी स्वतःशी थेट संबंध नसणार्‍या घटनेमुळे लोक जर बुडबुड्यातून बाहेर नाही आले तर एकुणच बुडबुड्यात धावणार्‍या पब्लिकला दोष कसा द्यायचा? <<

प्रत्यक्ष जगातल्या माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार सांगायचं, तर अगदी सामान्य माणूससुद्धा आपल्या परिसराबाहेरच्या अनेक गोष्टींबद्दल मत राखून असतो आणि ते वेळोवेळी खाजगीत व्यक्तही करत असतो. आंतरजालावर तर वेगवेगळ्या आणि आपापल्या क्षेत्राबाहेरच्या गोष्टींविषयी मतप्रदर्शन करण्याविषयी इतका काही उत्साह दिसतो, की कधी कधी प्रश्नही पडतो की ही उर्मी कुठून येते? अगदी ह्या धाग्यावरसुद्धा असं दिसतं, की ज्यांना कालपर्यंत पानसरे ठाऊकदेखील नव्हते त्यांनाही मत आहे आणि ते व्यक्तही होत आहेत. अर्थात, ही काही मूलतः वाईट गोष्ट नव्हे. मात्र, त्या परिप्रेक्ष्यात पाहता 'काय फरक पडतो?' असा वरच्या प्रतिसादांत आलेला सूर त्यामुळे मग काहीसा विसंगत आणि त्यामुळे आश्चर्यकारक वाटतो, हेही खरं. म्हणजे, परिसराबाहेरच्या गोष्टींमध्ये रस नाहीच, असं नाही; तर त्याहून वेगळं काही तरी कारण त्या आत्मसमर्थनामागे असेल का, असा प्रश्न पडतो.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

टोल

कोपुरामध्ये टोल आंदोलनातलल्या सहभागामुळे हल्ला झाला असावा का ?

..बाय द वे. पानसरेंची तब्येत

..बाय द वे. पानसरेंची तब्येत स्थिर आहे अशी बातमी मटा ऑनलाईनमधे वाचली.

...लवकर उतार पडू दे जखमांना.

मेघना, तुम्ही आणि वर चिंजं

मेघना, तुम्ही आणि वर चिंजं यांनी दिलेल्या प्रतिसादाला एकदमच उत्तर देत आहे. मुळात पानसरे यांच्या मोठेपणाविषयी किंवा त्यांनी केलेल्या कार्याविषयी शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही. ते बाजूला ठेवू.

माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याबद्दल पब्लिकला माहिती असण्याची कारणं म्हणजे एक तर त्याने केलेल्या कार्याचा लोकांच्या रोजच्या आयुष्यात पडलेला प्रभाव (उदा. अण्णा हजारे - माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार निर्मूलन) आणि/किंवा त्या कार्यकर्त्याला मिळणारी प्रसिद्धी (उदा. डॉ. प्रकाश आमटे - पब्लिकच्या आयुष्याशी थेट संबंध नाही पण पुस्तके, पुरस्कार, सिनेमा वगैरे गोष्टींमुळे पब्लिकमधे प्रसिद्ध). तुम्ही म्हणता तसं पानसरे हे कोल्हापूरकरांकरता प्रसिद्ध व्यक्तिमत्व असेलही पण ज्या ठिकाणी त्यांच्या कार्याचा प्रभाव नाही तिथे त्यांच्याबद्दल माहिती असण्याची शक्यता कितपत आहे? आणि जर माहितीच नसेल तर त्यांना लोकसंरक्षण (कोणत्याही प्रकारचं, तुम्ही म्हणता त्याप्रकारे संकल्पेनेमागच्या भावार्थानेही) वगैरे कसं मिळेल? आणि ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तिथे लोकांनी 'च्यायला भरदिवसा खून! काय खरं नाय राव' किंवा 'अरेरे, सामाजिक कार्यकर्ते होते का? असं व्हायला नको होतं..' अशा क्षणिक हळहळीच्या भावना व्यक्त करण्यापलीकडे काही केलं नाही तर त्यांना दोष कसा द्यायचा?

बाकी बुडबुड्याचं म्हणाल तर जोपर्यंत बुडबुड्याला मेजर धक्का लागत नाही तोपर्यंत कोणीही त्यातून स्वतःहून बाहेर येत नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या घटनेचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर काही तत्काळ आणि/किंवा भयंकर असा परिणाम होणार नसेल तर अशा वेळी स्वतःशी थेट संबंध नसणार्‍या घटनेमुळे लोक जर बुडबुड्यातून बाहेर नाही आले तर एकुणच बुडबुड्यात धावणार्‍या पब्लिकला दोष कसा द्यायचा?

एडिटः उपमेतच बोलायचं झालं तर बुडबुडा जरी असला तरी तो पारदर्शक असतो. बाहेर काय चाललंय हे पब्लिकला कळतं आणि पब्लिक त्यातून बाहेरही येतं (उदा. मतदानासारख्या वेळेला, निर्भयासारख्या घटनांमुळे, इ.) हे ही तितकंच खरंय.

असा यंत्रणेचा धाक हवा. भारतात

असा यंत्रणेचा धाक हवा.

भारतात यंत्रणा नामक प्रकार अर्थहिन आहे. जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करावं लागणार. यंत्रणा खूप ढिली आहे आणि गुन्ह्यांना पोषक आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

दु.क.ये.आ.

दु.क.ये.आ.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उद्या मी समाजाच्या

उद्या मी समाजाच्या सर्वायवलच्या दृष्टीनं काही करायला गेले (कारण व्यक्तिगत स्वार्थ जपणं कधीतरी अपुरं ठरतंच. माणूस समाजशील आहे.), आणि मलाही ठार केलं, तर?

नक्की काय करायचा विचार आहे आपला?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

सूर

>> काही लोकांना एका कार्यकर्त्याबद्दल माहिती नाही. यात कोणीतरी दोषी आहे असं का वाटावं? सगळ्यांना सर्व गोष्टी माहिती असाव्यातच हा आग्रह समजला नाही. <<

तसा माझा तरी आग्रह नाही. पण वर अनेकांचा सूर काहीसा अ‍ॅग्रेसिव्ह लागला आहे. घटनेची दखल तरी कशाला घ्यावी, काय फरक पडतो, माझ्या बुडबुड्याला धक्का लागत नसेल तर मला काय त्याचं, असा सूर आत्मसमर्थनासाठी दिल्या गेलेल्या उत्तरांत जाणवतोय. तो अस्थानी वाटतो आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत आहे. तसे घटनेत समता शब्द

सहमत आहे. तसे घटनेत समता शब्द आहे. मागची विषमता किती का असेना किमान २६-०१-५० पासून तरी समता असेल असे अभिवचन आहे. मग दाभोळकरांना न्याय द्यायला जास्त प्रयत्न करायचा आणि सामान्य नागरीकाला त्यामानाने कमी हा अन्याय आहे. शिवाय दाभोळकर कोणत्या घटनात्मक पदावर नव्हते.
------------
दाभोळकरांचे मारेकरी पकडण्यासाठी जास्त प्रयत्न करणे हे एक प्रकारे योग्य आहे. 'जास्त सामाजिक योगदान असेल तर जास्त न्याय' असा अलिखित सामाजिक नियम आहे जो रास्त वाटतो.
------------
ऑर्वेल कोण? तो काय म्हणालेला?*
==========
*लिंक देणे टाळा अशी नम्र विनंती.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

काही लोकांना एका

काही लोकांना एका कार्यकर्त्याबद्दल माहिती नाही. यात कोणीतरी दोषी आहे असं का वाटावं? सगळ्यांना सर्व गोष्टी माहिती असाव्यातच हा आग्रह समजला नाही.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मारेकरी

अशा कृत्यांतले मारेकरी हे बहुधा प्रोफेशनल असतात. खून करणे हा त्यांचा पोटापाण्याचा धंदा असतो. त्यामुळे एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या हत्येची सुपारी घेताना असला माणूस दोनदा विचार करील, हे खरे पण तो विचार ह्या जोखमीच्या सुपारीची रक्कम किती वाढवू हा असेल.
प्रोफेशनल मारेकर्‍याला त्या व्यक्तीची सज्जनता आणि लोकप्रियता माहीत असेलच असे नाही. आणि हल्लाबाध्य गृहस्थ मारेकर्‍याच्या दृष्टीने जितका अनोळखी, तितकी सुपारीची रक्कम कमी असेही उलटे लॉजिक असू शकते. म्हणजे चित्रपट अभिनेत्यासाठी अधिक रक्कम आणि तळागाळातील राजकीय नेत्यासाठी कमी, असेही होऊ शकते.
शिवाय, पानसर्‍यांसारखे लोक हे निर्भय असतात, 'बुध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें' या प्रकारातले असतात. यातले धोके आणि जोखीम त्यांनी गृहीतच धरलेली असते.
ओके, हे अवांतर खूप झाले.

हे ठीक, पण...

माझा प्रतिसाद वर अनेकांच्या प्रतिसादात दिसत असलेल्या एकंदर सुराविषयी होता. फक्त तुम्हाला उद्देशून नव्हे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नै नै

पानसर्‍यांना समाजभान नाही असं म्हण्णं नाही.
उलट सामान्य माणसांनी दखल घेतल्यास, सामाजिक काम करणार्‍या व्यक्तीला आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी काहीही करू धजणार्‍या यंत्रणांपासून वाचवल्यास सामान्य माणसावरच काही काळानं Then they came for me असं म्हणण्याची वेळ येउ शकते असे सुचवायचे आहे प्रतिसादातून.
"आम आदमीला पानसरेंवरच्या हल्ल्यात लक्ष घालून करायचय काय" ह्याला उत्तर म्हणून मेघनानं वरच्या दोन ओळींत लिहिलेला आशय असणारा प्रतिसाद लिहिला.
त्यास मी +१ केले.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्यांच्या बाबतीत तरी हा

त्यांच्या बाबतीत तरी हा लोकांचा दबाव कामाचा ठरू शकेल.

क्षणोक्षणी कायदा आणि नियम आपल्या स्वार्था साठी मोडणारी इथली तमाम जनता कुठल्याही प्रकारचा दबाव सरकार वर आणु शकते का? ( तसा नैतिक अधिकार तरी आहे का?)

२४ तास संरक्षण नव्हे हो!

२४ तास संरक्षण नव्हे हो! लोकांच्या जनरल दबावाबद्दल बोलते आहे मी.

आपण तुमच्या पॉइंटाविषयी बोलू या का?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शरीराची संरक्षक फळी वगैरे काय

शरीराची संरक्षक फळी वगैरे काय हो! इतकं टोकाचं आणि शब्दशः नाही म्हणत आहे मी. 'मी पकडला गेलो/ले, तर माझं काय होईल?' हा प्रश्न पडून कृतीपासून मागे फिरावंसं वाटेल, असा यंत्रणेचा धाक हवा. यंत्रणेला कामाला लावायला लोकांचा दबाव हवा. इतकंच.

काही मारेकरी माथेफिरू असतात हे सत्य आहे. पण तो निराळा भाग झाला. निदान इथे ज्या प्रकारच्या खुनांबद्दल / हल्ल्यांबद्दल चर्चा चालली आहे, त्यांच्या बाबतीत तरी हा लोकांचा दबाव कामाचा ठरू शकेल. कारण बर्‍याचदा या हल्ल्यांमागचा मेंदू कुठेतरी दूर असतो आणि हात भाडोत्री आणि सहजगत्या उपलब्ध होणारे असतात, असं गृहीतक आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रश्न

>> Then they came for me अशी अवस्था टाळायची असेल तर समाजभान असणे आवश्यक आहे; असा सूर आहे.
त्यात तथ्य आहे. <<

गोविंद पानसऱ्यांनी अनेक लेख आणि पुस्तकं लिहिलेली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचं समग्र साहित्यसुद्धा प्रकाशित झालेलं आहे. त्याकडे नजर टाकली तरी लक्षात यावं की 'पानसऱ्यांना समाजभान नव्हतं' हा दावा फारसा टिकणारा नाही. त्यामुळे किमान त्यांच्यावरच्या हल्ल्याच्या चौकटीत तरी प्रश्न असा पडतो, की सुशिक्षित सुसंस्कृत समाजाला पानसरे कोण हेदेखील माहीत नाहीत, तर त्यात जो काय असेल तो दोष पानसऱ्यांचाच आणि समाजाचा मात्र थोडादेखील दोष नाही असंच का मानावं?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शॉल्लेड. हायपरबोलिक

शॉल्लेड.

हायपरबोलिक डिस्काऊंटिंग ...... का काय ते.... दीर्घकालीन हितसंबंधांबद्दल च असते ना. फरक एवढाच की ते हितसंबंध ज्यांचे असतात ते अनभिज्ञ असतात. इतरांनाच त्यांची काळजी जास्त.

>>माझ्या आयुष्यात मला

>>माझ्या आयुष्यात मला त्यासाठी वेळ किती मिळतो आणि मी अशा प्रकारे व्यग्र राहावं अशी व्यवस्था का अस्तित्वात आहे, हा दुसरा प्रश्न. तोही महत्त्वाचाच आहे.

द्याट वॉज माय पॉईंट.

इतर मुद्द्यांशी जनरल सहमती आहे.

बाकी तुम्ही लोकसंरक्षणाबद्दल म्हणताय खर्‍या, पण लोकं तरी अशा वेळी संरक्षणाच्या कामी किती उपयोगी पडणार? लोकं फार फार तर माणूस गेल्यावर बोंबाबोंब, आंदोलनं, सरकारवर दबाव टाकणं वगैरे करू शकतात. पण २४ तास संरक्षण ही अपेक्षा मला जरा जास्त वाटते. असो.

आणि दीर्घकालीन गोष्टीबद्दल म्हणाल तर पब्लिक जो त्या त्या वेळेला बलिष्ठ असेल (सरकार/गुंड/डॉन्/गुंठामंत्री इ.) त्याच्या मागे जाऊन स्वतःचं रक्षण करून घेईल असे वाटते. कारण इन जनरल सर्व्हायव्हलपुढे नीतिमत्ता वगैरे गोष्टी लैच किरकोळ ठरतात. पुन्हा असो.

न्याय

खरे तर इथे प्रश्न 'मला संरक्षण काय?' या ऐवजी मला मृत्यूत्तर न्याय मिळेल का?' असा पाहिजे.
लोकसंग्रह कितीही असला तरी लोक आपापल्या शरीरांची संरक्षक फळी वगैरे उभारून कुणाचे संरक्षण कधीच करीत नसतात.
हां, मारेकर्‍याला असा प्रश्न पडला पाहिजे की हा प्रयत्न आपल्याला केव्ह्ढ्याला पडेल? म्हणजे ह्याच्या मृत्यूमुळे लोक चवताळून उठतील का? माझा शोध लावणे सरकारला भाग पडेल का? वगैरे. म्हणजेच, व्यक्ती लोकप्रिय असली तर साधारण मनुष्य तिच्यावर हल्ला करताना दोनदा विचार करेल.
पण दुर्दैवाने मारेकरी हे 'सर्वसाधारण मनुष्य' या कॅटेगरीतले नसून ते खास आदमी असतात.
नपेक्षा गांधीहत्या घडती ना.

+१-१

Then they came for me अशी अवस्था टाळायची असेल तर समाजभान असणे आवश्यक आहे; असा सूर आहे.
त्यात तथ्य आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सामान्य माणसांनी दखल न घेणं

सामान्य माणसांनी दखल न घेणं चूक आहे असं मी म्हणत नाहीय. किंबहुना सामाजिक काम करणार्‍या व्यक्तीला आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी काहीही करू धजणार्‍या यंत्रणांपासून वाचायचं असेल, तर सामान्य माणसांपर्यंत पोचणं एका परीनं आवश्यक ठरतं आहे का, असा प्रश्न विचारतेय. कारण पोलीस आणि तादृश यंत्रणा जर संरक्षणात कमी पडत असतील, तर अशा व्यक्तींना लोकसंरक्षण हाच एक मार्ग उरतो.

बाकी बुडबुड्यात धावत राहण्याबद्दलः परत एकदा - मी गैर वा वाजवी असा निर्णय करत नाहीय. दीर्घकाळासाठी काय बरं, काय वाईट, याचा विचार करतेय. समजा - आज पानसरेंसारख्या सामाजिक काम करणार्‍या व्यक्तीला कुठल्यातरी यंत्रणेनं त्यांच्या आर्थिक हितासाठी ठार केलं. त्यांना काहीही शिक्षा झाली नाही. उद्या मी समाजाच्या सर्वायवलच्या दृष्टीनं काही करायला गेले (कारण व्यक्तिगत स्वार्थ जपणं कधीतरी अपुरं ठरतंच. माणूस समाजशील आहे.), आणि मलाही ठार केलं, तर? मला संरक्षण काय? उद्याच्या दृष्टीनं आज पानसर्‍यांसारख्या लोकांबद्दल मला ठाऊक असणं आणि मी जाब विचारणं महत्त्वाचं नाहीय का?

माझ्या आयुष्यात मला त्यासाठी वेळ किती मिळतो आणि मी अशा प्रकारे व्यग्र राहावं अशी व्यवस्था का अस्तित्वात आहे, हा दुसरा प्रश्न. तोही महत्त्वाचाच आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दीर्घकालीन स्वार्थ नामक काही

दीर्घकालीन स्वार्थ नामक काही ऐकलंय का तुम्ही?

हो...... ऐकलय की. पण "कोणाचा"

मुद्दा न समजून घेता मत

मुद्दा न समजून घेता मत देण्याची धडपड काय असते हे दाखवणारा एक रोचक प्रतिसाद. भाषिकांचे दौर्बल्य छानच अधोरेखित होतेय.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बुडबुड्याला धोका?

नाय बा. आम्ही आपली पायापुढचं पाहून दिवस काढणारी माणसं. आणि खरं सांगायचं तर पानसरे यांचं नाव मी कोल्हापूर टोलैतर संदर्भात या आधी ऐकलं नव्हतं. तेसुद्धा आयबीएन लोकमतवर एकदा वागळ्यांनी त्यांना बोलावलं तेव्हा कळलं की असे कोणीतरी आहेत म्हणून.

असे प्रसिद्धीच्या झोतात नसलेले, अखंड काम करणारे अनेक कार्यकर्ते असतील. माझा मुद्दा एवढाच आहे की अशा प्रत्येक व्यक्तीचं सामाजिक कार्य करताना जर काही बरंवाईट झालं तर प्रत्येक सामान्य माणसाद्वारे त्याची दखल घेतली जाणं शक्य आहे का? आणि तशी दखल घेतली नाही तर त्याच्यात चूक काय? ऐसीवर वावरणारे बहुतांश सदस्य बहुश्रुत, चळवळींशी निदान परिचय असणारे आहेत (त्या दृष्टीने मीसुद्धा ऐसीवर वावरायला सर्वस्वी नालायक आहे). पण शेवटी अशा ज्ञानी लोकांची संख्याही मर्यादित आहे. तुम्ही कोल्हापुरातच जाऊन विचारा पानसरेंबद्दल, मला खात्री आहे की बहुतांश लोकांना त्यांनी टोलविरोधात चालवलेल्या आंदोलनाखेरीज त्यांच्या इतर कार्याविषयी फार माहिती नसेल.

त्याही पुढे जाऊन मी असं म्हणीन की एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मृत्यूमुळे पब्लिकला फरक पडेलही, पण केव्हा? जर त्या सा.का.ने केलेल्या एखाद्या कार्यामुळे पब्लिकच्या आयुष्यात काही फरक पडला असेल तर. उदा. उद्या कोणी येऊन अण्णा हजार्‍यांवर हल्ला केला तर पब्लिकची होणारी प्रतिक्रियासुद्धा नक्कीच तीव्र असेल. तुम्ही म्हणता की पानसर्‍यांबद्दल लोकांना ठाऊक नव्हतं, याउलट अगदी सामान्य लोकं इथे महानगरपालिकेचा चांगला आयुक्त बदलला तरी आंदोलनं करतात. प्वाईंट हाच आहे की जोपर्यंत आजूबाजूला बुडबुड्याला धक्का लागण्याइतपत उलथापालथ होत नसेल तर बुडबुड्यात धावत राहणं, भोवतालच्या परिस्थितीशी इक्विलिब्रियम साधून राहाणं काय गैर आहे?

समानता आणि समाजवाद

ज्या घटनेचा एका व्यापक समाजमनावर परिणाम (इम्पॅक्ट) होण्याची शक्यता असते, त्या घटनेची पाळेमुळे, तलाशी, लेखाजोखा, अन्वयार्थ इ.शोधण्याची निकड आणि ऊर्मी जास्त जाणवते. पार्लमेंट हाउसमध्ये बॉम्ब फुटणे आणि एखाद्या कचर्‍याच्या कुंडीत फुटून एकदोन लोक मरणे या दोन घटनांमध्ये कुठल्या घटनेची अधिक त्वरेने आणि जोमाने चौकशी होईल याचे उत्तर उघड आहे.
स्थानमाहात्म्य, व्यक्तिमाहात्म्य, कालमाहात्म्य यांना समाजवादाची तत्त्वे लावताना तारतम्याने लावली गेली पाहिजेत. (पहा, इथेही तारतम्य आलेच.) गुणवत्ता ही असतेच. समान गुणवत्ता हे वास्तव नसते.
एकाच गुन्ह्याला समान शिक्षा किंवा समान नुकसानभरपाई असे कित्येकवेळा नसते.

दाभोलकरांच्या खुनाचा छडा

दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यापूर्वी मला श्रेणी का देता येत नाही याचा छडा लावा. ते फार जास्त महत्त्वाचं आहे.

हलके घ्या. दाभोलकरांबद्दल चांगल्याच भावना आहेत आणि अनादर नाही.

मी एक बॉट. शाब्दिक कचरा तयार करणं हे माझं काम. Write first, think never.

ह्म्म तेही खरंच म्हणा.

ह्म्म तेही खरंच म्हणा. स्वतःच्या निरीक्षणाबाहेर काही असूच शकत नाही असे म्हणणार्‍यांपुढे काय बोलणार.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

"दाभोलकर का खून, खून और मेरा

"दाभोलकर का खून, खून और मेरा खून, पानी"
हे डेंजरस तत्वज्ञान आहे. Shock

हलके घ्या. दाभोलकरांबद्दल चांगल्याच भावना आहेत आणि अनादर नाही.

सर्वपरिचितता

विश्व ही आपली कर्मभूमि मानणारे महामानव विरळा असतात. काही लोक आपापला परीघ आणि परिसर निश्चित करून त्यावरच लक्ष्य केंद्रित करतात. परिघाबाहेरच्यांना त्यांची माहिती नसणे स्वाभाविक आहे. पण म्हणून आपल्या परिघातल्या त्यांच्या कार्याचे मोल कमी होते असे नव्हे की परिघाबाहेरच्यांनी या अज्ञानाबद्दल न्यूनगंड बाळगावा असेही नव्हे.
कॉ. पानसरे कोल्हापूर परिसरात कार्यरत आहेत आणि तेथे ह्या कृत्याची तीव्र आणि जळजळीत प्रतिक्रिया उमटली आहे. आणि ती सरकारला जागे राखण्यास पुरेशी आहे.

अरे कशाला डोकेफोड करतोय्स

अरे कशाला डोकेफोड करतोय्स बॅट्या...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

असे मोर्चे वगैरे काढुन सरकार

असे मोर्चे वगैरे काढुन सरकार खर्‍या सुत्रधाराला पकडेल आणि न्यायालय त्याला शिक्षा देइल, ही अनिस ची अंधश्रद्धा आहे असे म्हणले तर ते चुक आहे का?

नॉट रियली.

सरकारने करारान्वये जनसमुदायाच्या जीवीताचे रक्षण करण्याचे कबूल केलेले आहे. तेव्हा अंनिस हॅज द राईट टू पिटिशन द गव्हर्नमेंट.

ह्यातला उपहास लक्षात घ्या. अंनिस हॅज द राईट टू पिटिशन द गव्हर्नमेंट हे बरोबर आहे. पण रीयालीटी पासुन काहीतरी चमत्कार घडुन वेगळेच घडेल असे वाटणे म्हणजे अंधश्रद्धा नाही का?
उदा : मोर्चे आणि पिटीशन करुन सरकार हलेल आणि खर्‍या सुत्रधाराला पकडेल, वर न्यायालयात त्याला शिक्षा होइल ( आणि हे सर्व भारतात होइल ) हे रीयालिटीच्या ०.०००००१% तरी जवळ आहे का? म्हणजे अनिस चमत्काराचीच अपेक्षा करते आहे का?

दीर्घकालीन स्वार्थ नामक काही

दीर्घकालीन स्वार्थ नामक काही ऐकलंय का तुम्ही?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

व्हॉट्स राँग इन धाविंग इन अ

व्हॉट्स राँग इन धाविंग इन अ बुडबुडा?

ठीके, निव्वळ तुम्हांला काय

ठीके, निव्वळ तुम्हांला काय वाटतं यावरून माझ्या व्याख्या वा मते बदलण्याची वेळ अजूनतरी आलेली नाही. तुम्हांला वाटतं ना मी फेकतोय? ठीके, आपल्या समजुतीत खूश रहा. मला माहितीये मी फेकत नाही ते. असो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मी ऐहिक आणि पारलौकिक अशी

मी ऐहिक आणि पारलौकिक अशी विभागणी करत नसून खाजगी आणि सामाजिक अशी विभागणी म्हणते आहे. पण तुमचा एकूण नूर पाहता तुम्हांला त्यात फार रस नसावा, त्यामुळे तुमचं चालू द्या! (डोळा मारत)

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

परफेक्ट! म्हणजे जिविताची हमी

परफेक्ट!

म्हणजे जिविताची हमी सगळ्यांच्याच आहे. पण समाजासाठी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवणार्‍या दाभोलकरांसारख्या व्यक्तीच्या जिविताबद्दल आपण इतके उदासीन आहोत, हे लांबचा विचार करू जाता समाज म्हणून आपल्यालाच धोक्याचे आहे, हे समाजमनाला समजतं, म्हणून त्यांचे खुनी न पकडल्याबद्दल बोंबाबोंब होते. अशा प्रकारे लोक आपल्या कामामध्ये दीर्घकालीन सामाजिक स्वार्थ पाहतील, अशी कामाची मांडणी केल्यास लोकांकडून संरक्षण मिळण्याची काहीएक शक्यता आहे. हे मला म्हणायचे होते, लोकांना कामामध्ये जोडून घेण्याच्या संदर्भात.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गब्बर - दुसर्‍यांच्या

गब्बर - दुसर्‍यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कोणी प्रयत्न करावेत हे खरे तर तुझ्या फिलॉसॉफीच्या विरुद्ध असायला हवे ना.

माझ्या फिलॉसॉफीत बसते की नाही याची महत्वाची टेस्ट आहे. Is the activity being performed voluntarily or by means of force ???

जर ती अ‍ॅक्टिव्हीटी स्वेच्छेने केली जात असेल व त्यातून इतर कोणावरही बळजबरी होत नसेल तर सर्वसामान्यपणे माझ्या फिलॉसॉफीत व्यवस्थित बसते. याला ब्रायन कप्लान Libertarian Overlearning म्हणतो. लेख अवश्य वाचणे. छोटेखानीच आहे पण वाचनीय. ब्रायन कप्लान हा आधुनिक जमान्याचा रॉबर्ट नॉझिक आहे.

----

असे मोर्चे वगैरे काढुन सरकार खर्‍या सुत्रधाराला पकडेल आणि न्यायालय त्याला शिक्षा देइल, ही अनिस ची अंधश्रद्धा आहे असे म्हणले तर ते चुक आहे का?

नॉट रियली.

सरकारने करारान्वये जनसमुदायाच्या जीवीताचे रक्षण करण्याचे कबूल केलेले आहे. तेव्हा अंनिस हॅज द राईट टू पिटिशन द गव्हर्नमेंट.

हेच म्हणायचे होते. मला जर

(लोळून हसत) हेच म्हणायचे होते.
मला जर श्रेणीप्रदानाचा अधिकार असता तर महामार्मिक अशी श्रेणी दिली असती.

गब्बर - दुसर्‍यांच्या

गब्बर - दुसर्‍यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कोणी प्रयत्न करावेत हे खरे तर तुझ्या फिलॉसॉफीच्या विरुद्ध असायला हवे ना.

अवांतर - असे मोर्चे वगैरे काढुन सरकार खर्‍या सुत्रधाराला पकडेल आणि न्यायालय त्याला शिक्षा देइल, ही अनिस ची अंधश्रद्धा आहे असे म्हणले तर ते चुक आहे का?

है धत्तड तत्तड

प्रत्येक जणच स्वताच्या सुखसोईंसाठी धावत असतो ( त्यात कॉ पानसरे पण आले ), फक्त प्रत्येकाची सुखसोईची डेफिनीशन वेगळी असते. फक्त वेगळी असते, दर्जात्मक रीत्या कमी जास्त नाही.

क्या बात है. एकच नंबर.
पूर्ण पूर्ण सहमत...
मला गोठ्यात लोळायला आवडत
अनुतैंना ऐसीवर जजमेंटल खेळायला आवडत
आइनस्टाइनला ल्याबमधे फिजिक्स खेळायला
आइनस्टाईन आणि मठ्ठ बैल आणि अनुतै
ह्यांच्यात दर्जात्मक रीत्या कमी जास्त नाही!!
कॉमरेड अनुतैंचा जयजयकार!!!
तुम्हीच पान्सरेंच्या राखणदार!!!
लाल बावटा अमर रहे
आपण सारे पान्सरे

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

नाही ब्वॉ

जी प्रायोरिटी असते त्याप्रमाणे सुखाची व्याख्याही बदलते असे मला वाटते कारण तशी उदाहरणे पाहिली आहेत.

आम्ही बरोबर उलटी उदाहरणं पाहिली आहेत. त्यामुळे मला वाटते तुम्ही फेकत आहात. पुढे?

नुसत्याच तोंडाच्या वाफा आहेत

नुसत्याच तोंडाच्या वाफा आहेत का काही काँक्रिट आहे या दाव्यामागे?

साधा विचार केला तरी कळेल. जी प्रायोरिटी असते त्याप्रमाणे सुखाची व्याख्याही बदलते असे मला वाटते कारण तशी उदाहरणे पाहिली आहेत. एखाद्याला समाजसेवेची आवड असते त्यामुळे ती त्याची प्रायोरिटी होते आणि त्यातच त्याला सुखही मिळते. तेच बाकी गोष्टींबद्दलही.

बाकी अनुकाकूंनी पानसर्‍यांना जज केले असा तुमचा समज आहे, मला तसे वाटत नाही. त्यांच्यापेक्षा जजमेंटल प्रतिसाद तुमचा आहे.

बाकी खेळ चालूद्या. त्याचे मनोरंजनमूल्य मात्र वादातीत आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हं

सुखसोयी व प्रायॉरिटी या दोन गोष्टी एकदम टाईट लिंक्ड आहेत

नुसत्याच तोंडाच्या वाफा आहेत का काही काँक्रिट आहे या दाव्यामागे?

त्याला जज करण्याचा हव्यास निरर्थक आहे असे उत्तर अगोदरच दिलेय.

जज अगोदर तुमच्या अनु काकूंनी केलं. (त्याला तुम्ही क्या बातही केलं) आम्ही अनुकाकूंच्या जजला चॅलेंज केलं. जरा नीट वाचून बघा पुन्हा म्हणजे कळेल.

बाकी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या बघू आधी. (ज्यात तुम्ही आम्हाला जज केलं आहे ते.)

पुन्हा उद्धृत करतो, तुमच्या विषयांतर करून वायफळ प्रतिसाद द्यायच्या सवयीमुळे तुम्हाला सापडायचे नाहीत ते प्रश्न.

लोकांना हायरार्कीत बसवून त्या त्या हिशेबाने अप्रूव्हलचे कण फेकण्याचा हव्यास केविलवाणा आहे.

कोणाला हायरार्कित बसवलं मी? आणि कोणाला अप्रूव्हलचे कण फेकले? माझा हव्यास आहे हा निष्कर्ष कशावरून काढला?

बाकी विषयांतर कोण केलं ते दिसतंच आहे.

विषय काय आहे