मी आणि ती

उन्हात चालणारे तिचे पाय
अनवाणी.
चार थेंब पाण्यासाठी
पाच मैलांची वणवण
कोरडे ओठ, भेगाळलेली भुई
शुष्क जीवन आणि फुटलेली टाच

मी माझ्या गाडीत बसून
समाजकार्य करायला बाहेर,
माझ्या पायात हिल्स
तिची आशाळभूत नजर.
मिनरल वोटर पीत मी
दिलेलं दिमाखदार भाषण

तिच्या डोळ्यात दाटलेलं पाणी
आणि त्यापुढे फ़िकं पडलेलं माझं मिनरल वाटर

माझा आत्मा असा कसा विकला मी ……

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फार शल्य घेत जगू नये माणसानं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सफेद गाडीतून उतरली बया
टाचा म्हनावं की खूर
आन कचकड्यातून पानी पीत
लई भारी भासन ठोकलं की
बया बया, कवतिक वाटलं आवशीचं
आन भेटाया जवल जाती तर
मागं मागं सराया लागली
अन उगा डोल्यांत पानी
आता म्यां काय केलं हिचं
आत मा आत मा म्हनत
उबी र्‍हायली येड्यावानी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0