अथ: केस कथा

कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो. तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच बस स्थानकावर खाली उतरला. साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले आवडत नाही. एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही. काही पुरुष विग घालतात, पण विग डोक्यावरून पडली तर, फजिती होते. आजकाल केसांचे रोपण ही होते, पण त्यासाठी कमीत कमी एक लक्ष रोकडा तरी खिश्यात पाहिजे. शिवाय ते केंस खर्या सारखे चमकदार वाटत नाही. शेवटी एकच उपाय उरतो, डोक्यावर केसांचे जंगल उगवा.

मजबूत, लांबसडक केस तर स्त्रियांच्या सौंदर्याची निशाणी. नाजुक सुंदर राजकुमारी पण तिचे केस मात्र लांबसडक व दोरखंडा सारखे मजबूत. परीकथेतील राजकुमार तिचे मजबूत केस पकडून किल्यात चढायचा. कुणाला कळायचे ही नाही. दुसर्या राजकुमारीना निश्चितच तिच्या केसांचा हेवा वाटत असेल. एकदा एका सन्यासिनीचा फोटो बघितला होतो. तिच्या लांब केसानीच तिचे संपूर्ण शरीर झाकलेले होते, तिला अन्य वस्त्र परिधान करण्याची गरज वाटत नव्हती.

स्त्री असो व पुरुष केसांसाठी लोक काहीही करायला तैयार असतात. शिकाकाई, अंड्याची जर्दी, आणि अधिकांश लोक 'मजबूत और घने बालोंका राज' चे विज्ञापने पाहून शेम्पू आणि तेल वापरतात. बाजारात विदेशी कंपन्यापासून ते बाबा रामदेवांचे स्वदेशी शेम्पू ही बाजारात आहे. कुठे सुपर स्टार 'अभिताभ बच्चन' थंडा थंडा कूल कूल नवरत्न तेल विकतो. तर कुठे हिरोईन आल क्लिअर विकते.

दिल्लीच्या संग्रहालयात, मुगल आणि राजपूत कालीन चित्रे पाहत असताना, एक बाब लक्षात आली.चित्रातल्या अधिकांश स्त्रियांचे केस लांबसडक आणि मजबूत होते. स्त्रियांच्या पुरातन मूर्तींचे केस ही लांबसडक होते. मनात एक प्रश्न घोळू लागला, आज केसांसाठी स्त्रिया तेल, शेम्पू इत्यादी वापरतात, जुन्या काळी काय वापरत वापरात असतील, सहज वाचता वाचता अथर्ववेदात एक कथा सापडली.

वीतहव्य नावाचे एक महर्षि होते. त्यांची एक मुलगी होती. ती त्यांना अत्यंत प्रिय होती. आपली मुलगी सुंदर दिसावी असे सर्व माता-पितांना वाटते. पण तिच्या केसांची वाढ कमी होती. काळजी पोटी महर्षि वीतहव्य, मुनी कृष्णकेश यांच्या निवासस्थानी गेले. आपली समस्या त्यांच्या पुढे ठेवली. मुनी कृष्णकेश यांनी नितत्नी नावाची औषधी गुणांनी युक्त वनस्पती महर्षि वीतहव्य यांना दिली. ह्या वनस्पतीच्या उपयोगाने केस शीघ्र वाढतात असा शोध महर्षि जमदग्नी यांनी लावला होता. निश्चितच या औषधी गुणांनी युक्त वनस्पतीच्या उपयोगाने महर्षि वीतहव्य यांच्या मुलीचे केस लांबसडक आणि सदृढ झाले असतील. म्हणूनच त्यांनी आभार व्यक्त करण्या साठी नितत्नी वनस्पतीला देवता मानून तिची स्तुती केली. (आजच्या भाषेत म्हणाल तर तिचे विज्ञापन केले) या केसवर्धक वनस्पतीला वेदांमध्ये स्थान मिळाले. (अथर्ववेद ८/१३७/१-३)


दृंह मूलमाग्रं यच्छ वि मध्यं यामयौषधे I
केश नडाइववर्धन्तां शीर्ष्णस्ते असिता: पर II

(अथर्ववेद ८/१३७/३)

हे औषधे तो केसांच्या अग्र भाग लांब, मध्यभाग सुस्थिर आणि केसांच्या जडानां मजबूत कर. नदी काठच्या नड वनस्पती प्रमाणे केस ही शीघ्र वाढो .

नड: (नदी काठी वाढणारी वनस्पती (बहुतेक एक प्रकारचे तृण/वेत) - उपयोग नाव टोकरी बनविण्यात किंवा लहान नौका बनविण्यासाठी वापर होत असे)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कॅन्सरमुळेही केस जातात Sad
या स्त्रियांनी कॅन्सरला तोंडच दिलेले नाही तर उणीवेचे रुपांतर बलस्थानात केलेले आहे

चित्रे नेटवरुन ...


__________
आम्हाला "सुकेशिनी" या भाविक स्त्रीचा धडा होता. बुद्ध गावात आला तेव्हा तिने लांबसडक केस विकून काहीतरी अर्पण केला असे फेंटली आठवते. मग बुद्धाने तिच्या मस्तकावर हात ठेवला व तिचे केस पूर्ववतच नाही तर अधिक सुंदर झाले.
माझा फार आवडता धडा होता तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हो मलाही होता तो धडा. पहिलाच असावा. आणि त्यात त्या सुकेशिनीचं गौतम बुद्धाला कमरेत वाकून नमस्कार करतानाचं चित्र होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile येस्स्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

एका शोधाचा एकाच व्यक्तिला फायदा व्हावा? अशा व्यवस्थेचा निषेध!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रे माझ्या गळणार्‍या केसा....

www.aisiakshare.com/node/1236

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars