आन्सर क्या चाहिये? : फर्स्ट यर उर्फ एफी

भाग १ : भाग २ : भाग ३ : भाग ४ : भाग ५ : भाग ६ :
भाग ७

टक् टक् टक्.
टक् टक् टक्
पंख्याच्या अशा सहा गिरक्या झाल्या की एक्झॅमिनर्/सुपरवायझर्/इन्विजिलेटर्/बट्ट्याबोळक कानात एकदा पेन घालतात. एकाग्रते, तुझी भक्ती.
बाजूच्या मुलीची पोनीटेल छान आहे.
समोरच्या एका हरामखोराने ऑलरेडी एक पुरवणी घेतली आहे. वॉर्निंग.
विचार मग वाहत जातात.
फर्स्ट सेमच्या परिक्षेतला पेपर जरा बाजूला सोडून मी इन्सेप्शन स्टायलीत विचार इन अ विचार इन अ विचार इन अ विचार.....
.
०००
.
तुम्ही जंगलात गेलाय. तिकडे निरनिराळे प्राणी असणार. कोल्हे आपल्या ग्रूपमधे, गेंडे त्यांच्या गँगमधे. तरसांची वेगळी झुंड असेल. सगळे जिराफ एकत्र कळपात चरत असतील.
पण तुम्हाला कधी एक झेब्रा, एक कोंबडी, २ गेंडे आणि ४ जिराफ एकत्र फिरताना दिसणार नाहीत. कारण त्यांची नियतच वेगळी आहे- मग ते एकत्र रमतीलच का?
.
.
पण एफीत हेच होतं. तुमचं इंजिनीरींग फील्ड कुठलंही असलं तरी पहिल्या वर्षी तुम्ही फक्त एफी असता. सगळ्यांना पहिल्या वर्षी सारखेच विषय असल्यामुळे मग कॉलेजांतही सरमिसळ होते. मग ३ कॉंम्पस, २ मेक, १ इलेक्ट्रॉनिक्स आणि २ इटी असा कंपू जमतो. हा कंपू अख्खं वर्ष एकत्र काढतो. कधी कधी हा एफीचा ग्रूप आयुष्यभर एकत्र रहातो, एवढे घट्ट धागे जुळतात. कारणच तसं असतं!

एफी हे नक्की काय आहे ते त्यावाटेला गेल्याशिवाय कळणार नाही. आता एफी (एफ.इ = First year Engineering) ही जरी इंजिनेरींगची भाषा असली तरी आयुष्यात प्रत्येकजण कधीतरी कुठेतरी एफी असतोच.
आता तुम्ही पैदाइशी बच्चन असाल तर गोष्ट निराळी, पण आम्हा मॅकमोहनांसाठी एफी असते.
.
००००
.
अ‍ॅडमिशन तर होऊन गेली. घनघोर लढाईनंतर जसं सैनिकांना शिथील वाटत असेल तसं काहीसं वाटत होतं मग आठवडाभर. मागच्या महिन्याभरातली धावपळ, अनिश्चितता आणि टेन्शन -सगळं अचानक विरून गेलं.
माझं अ‍ॅङ्रेनलिन आता भजन करत बसलंय. बरं, कॉलेज लवकर चालू होईल म्हणावं तर तेही नाही. कसल्यातरी पंचायती काढून ठेवतात आणि मग कोर्टाचा स्टे वगैरे. थोडक्यात अजून महिनाभर तरी कॉलेज चालू होणार नाही. चिपळ्या घेऊन बसा आता.
.
आणि च्यायला आमचे आई-बाबा तरी असे दिव्य आहेत! कुठल्याही यत्तेसाठी क्लास- ह्यांना बरोबर माहीती असतात. ह्यांना क्लास म्हणजे एकदम जादूच वाटते. लावला क्लास की पोरगं पास.

"ऐक रे, तो तुषार म्हणत होता की इंजिनीरींगला पहिल्या वर्षी क्लास लावावाच लागतो म्हणे."
.
कोण तुषार? कौन है यार! क्यू है यार? क्या है यार? तुषार. कपूर साला.
.
"मग लावून टाक तो क्लास. विद्यालंकार की काहीतरी असाच आहे."
.
विद्यालंकार हे नाव तेव्हा पहिल्यांदा कानी पडलं. इंजिनेरींगातही क्लासेस असतील असं खरं तर वाटलं नव्हतं. इंजिनीरींग म्हणजे काहीतरी खरंखुरं -hands on - शिकायला मिळेल अशी आशा होती. पण हे क्लासेसचं झंझट ऐकून थोडा हिरमुसलो मी.
आसपास चौकशी केली आणि समजलं की मेकॅनिक्स हा प्रकार लई डेंजर. ड्रॉइंग त्याखालोखाल. म्हणून मग सगळी जन्ता रिस्क नको म्हणून क्लासेस लावूनच टाकते!
पक्या, जतिन, निलेश असे आम्ही ३-४ होतकरू इंजिनेर मग कॉलेज चालू व्हायच्या आधीच क्लासची अ‍ॅडमिशन घ्यायला गेलो.
भर गर्दीत वसलेल्या एका अनामिक बिल्डींगीत दुसर्‍या मजल्यावर पोचलो. हे क्लासेस खुफिया होते बहुतेक.
.
"क्या चाहिये तुम्हारे को?" त्या तिथल्या स्टूलावर बसलेल्या एका मराठी दिसणार्‍या प्यूनकाकांनी अस्सल मराठी हिंदीत सवाल केला.
.
"वो जरा विद्यालंकार मे अ‍ॅडमिशन लेने का है". पक्याने तेवढ्याच अस्सल मराठी हिंदीत उत्तर दिल्यावर मराठी-मराठी ओळख पटली. पुढला संवाद मराठीतून.
.
कुठे अ‍ॅडमिशन हवीये?
.
विद्यालंकार फर्स्ट इयर इंजिनीरींगला. मेकॅनिक्स.
.
मेकॅनिक्स की मेकॅनिक्स-ड्रॉइंग कॉम्बो बॅच?
.
एकमेकांकडे नजर टाकून सगळ्यांनी नेत्रपृच्छा केली. दोन्ही ना? दोन्ही,दोन्ही - हे नक्की केलं. हो, कॉम्बो.
.
ह्म्म, ह्या बघा बॅचेस आहेत. कुठली पायजे ती ठरवा. सकाळची फुल्ले. ती सोडून कुठलीपण.
.
तिथे बघितलं तर कारखानाच होता च्यायला. ८-११, ११-२, २-५, ५-८, ८-११. एवढ्या बॅचेस? माsssssधुरी!!
.
आम्ही मग ११-२ नक्की केली. कारण सकाळी फ्रेंडली मॅचेस आणि संध्याकाळचा कट्टा. रात्री एखादा पिक्चर वगेरे- हे सगळं मस्ट होतं. ११-२ तशी चंपक वेळ आहे. ते बरं.
.
व्हेकेशन की रेग्युलर? की मग क्रॅश कोर्स?
परत आमचं टीम हडल. हे सगळे काय प्रकार आहेत? रेग्युलर म्हणजे रोजचा शॉट असावा. पण क्रॅश कोर्स हा काय प्रकार होता, ते झेपलं नाही.
मग काकांनी समजावून सांगितलं की परिक्षेच्या आधी काही दिवस २-३ दिवस सलग असतो तो क्रॅश कोर्स. त्या २-३ दिवसांत तिथे अख्ख्या सेमिस्टरचा विषय शिकवतात.
शिकवतात काय च्यायला, कोंबत असतील डोक्यात. पण तो क्रॅश कोर्स. त्याच्या अ‍ॅडमिशन आतापासूनच घ्यायला लागतात.
नाही, आम्हाला व्हेकेशन बॅचच हवीये.
.
विद्यालंकार क्लासेस.
हे सगळं मुग्धाला सांगितल्यावर ती म्हणते की गोष्टींमधे राक्षसाचे प्राण ज्या पक्ष्यात असतात, तो पक्षी म्हणजे मेकॅनिक्स. आम्ही सगळे राक्षसाने पळवलेली राजकन्या. आणि विद्यालंकार क्लासेस म्हणजे एक राजबिंडा राजपुत्र. एकदम तलवार वगैरे बाहेर काढून आमची सुटका करणारा. नॉन्सेन्स!
.
.
पहिल्या सेममधे ५ विषय होते. बाकीचं एफी फर्स्ट सेम कुठे सांडलं ते नीट लक्षात नाही आता, कारण मेकॅनिक्सची दहशत पूर्ण वर्षावर होती.
नाही, म्हणजे बाकी विषयही काही कमी खतर्नाक होते असं नाही.
फिजिक्सला एवढा वैतागलो की २०% भाग ऑप्शनला टाकला मी. केमिस्ट्रीत कसंबसं ६०-७०% पूर्ण केलं वाचून. मॅथ्स होतं, प्रोग्रॅमिंग वगैरे. पण ह्या वर्षाचा विलन मेकॅनिक्स होता.
००००

मग कॉलेज सुरू झालं. कॉलेजला जायला १ तास, यायला १ तास. पश्चिम आणि मध्य अशा दोन्ही रेल्वेंचा दिलखेचक प्रवास. कॉलेजचा चौथा दिवस मला अजून आठवतोय.
गेटवर पोचताना मी थांबलो, आणि हिशेब केला. आज चौथा दिवस. मग चौथा आठवडा, मग चौथा महिना आणि मsssssग चौथं वर्ष! च्याय्ला, एवढ्यात बोर होऊन कसं चालेल?
पण प्रवास सुरवातीला जाम जड गेला. आता एफीला सगळ्यांना वर्कशॉप असतं. तो एक वेगळा प्रकार आहे, त्याबद्दल नंतर सांगतो.
पण एक आठवण सांगतोच-
वर्कशॉपच्या दिवशी बरंच सामान घेऊन जावं लागतं. कॉलेजात लॉकर वगैरे देतात, पण तिकडेही चोर्‍या फार. म्हणून मग ते सगळं सामान घरून घेऊनच आम्ही जायचो. कधीतरी मग वर्कशॉपचेच कपडेही असत.
रेल्वे कन्सेशन मिळत असल्याने फर्स्टक्लासचा पास काढलेला, दुपारी एकदा तिकडे लटकत होतो. एक काका ग्रूप बाजूला उभा होता. माझे कपडे मळके, वर्कशॉप ओवरऑल घातलेला होता. तेलाबिलाचे डाग आणि आमचा अस्सल देशी वर्ण.
.
"पास है क्या?" बाजूने पृच्छा आली. बघतो तर एक फॉर्मल शर्टातले काका तुच्छतेने विचारत होते.
.
आयचा घो तुझ्या. ह्याची विकेट घेतलीच पायजे.
.
"तुमच्याकडे आहे का पास?" मी त्याच्याकडे न बघताच विचारलं.
.
तो काका एकदम गरम झाला. इकडेतिकडे बोलला कायतरी. लक्ष दिलं नाही. मग उतरताना फक्त माझ्या तेलकट ओवरऑलचा एक धक्का दिला- फटॅक. शर्ट वारला असणार त्याचा. म्हणे पास है क्या.
०००
.
सरकारने बंदी आणल्यापासून मग रॅगिंग वगैरे नसतं आजकाल. मुंबैत तर नाहीच. हॉस्टेलात रहात असाल तर गोष्ट वेगळी आहे. थोडक्यात रॅगिंगमधून वाचलो. चमनचिंधी रॅगिंग झालं, पण ते एकदम खेळकर.
मग फ्रेशर्स इव आली. आमच्या प्रिन्सिपलवर रंगीत पाण्याचा फुगा फोडला कुणीतरी. सगळी पोरं एवढी खिंकाळली की प्रिन्सी मग निघून गेला. उरलेला वेळ मग फालतू गाणी, नाच वगैरे झाले, आम्ही आता ऑफिशिअल एफी झालो!
.
थोड्या दिवसांनी मग कॉलेजातल्या बाकी गोष्टी कळायला लागल्या. पण पहिल्या सेमिस्टराची गोष्ट एकदम सुरू होता होताच संपली. कारण? महान महाराष्ट्र सरकार.
अ‍ॅडमिशन झाली जुलैमधे. कॉलेज सुरू सश्टेंबरात. परिक्षा लावली डिसेंबरात. माssssधुरी. ३ महिन्यात ५ नवीन विषय? कमांडो ट्रेनिंग परवडलं असतं.

त्यामुळे पहिल्या सेममधे पाण्यात पडल्यापडल्या पोहायला सुरूवात. आणि बर्‍याचशा गटांगळ्याच.
.
००००

टक् टक् टक्
टक् टक् टक्

विचार इन अ विचार इन अ विचार.
मेकॅनिक्सचा पेपर चालू आहे. अर्धा पेपर सोडवल्यावर मला लक्षात आलंय की जेवढं काही येतंय ते सगळंच लिहून टाकलंय मी. अजून १.५ तास बाकीये. काय करणार?
.
हे सगळे वरचे विचार त्या वेळातच केलेत. पेपर लिहिताना थांबून. मला अचानक असं कळलं, की मेकॅनिक्स बहुतेक आपल्याला सुटणार नाही. के.टी. लागणार.
पेपर चालू असतानाच मग मी पुढचं भविष्य बघितलं. अजून एक वर्ष विद्यालंकार. स्टॅटिक्स, डायनॅमिक्स. त्यातली न कळणारी गणितं. पुढच्या सेमला ६ विषयांचा अभ्यास.
आई-बाबांना बसणारा शॉक- पोरगं नापास झालं? ना-पा-स?
.
पक्या म्हणत होता एका सिनियला तर ४ वर्षं मेकॅनिक्सची के.टी. होती. त्याने शेवटच्या सेमला सोडवली ती. आपलं तसं झालं तर? काय करायचं?
टक् टक् टक्- स्टॅटिक्स- डायनॅमिक्स- के.टी.- नापास
हुफ्फ. शांत गदाधारी भीम शांत. टेन्शन घेऊ नकोस.एक तास बाकी आहे. लढायला पाहिजे. मेकॅनिक्सात के.टी परवडणार नाही. चड्डी फाटेल. कुछ करना पडेगा.
.
डोकं ताळ्यावर आणून कसाबसा एक तास परत परत काहीतरी खरडून मी तो पेपर संपवला. परिक्षा खतम. सस्पेन्स सुरू.
.
आजूबाजूला घोंघावणार्‍या "तुला कसा गेला? हे आलं का? त्याचं उत्तर काय?" वाल्या वावटळीपासून लांब गेलो मी. ह्या माश्या नेहेमी "तेरा क्या आया? मेरा गलत है शायद" असलं काहीतरी बोलून उगाच त्रास देतात. एकटाच बस पकडून घरी आलो मुद्दाम. जरा शांत वाटलं.

अख्ख्या प्रवासात एकच विचार- के.टी लागली तर?

क्रमश:

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

चार वर्षं केटी? म्हणजे आठ टर्म्स? पण काही क्ष टर्म्स केटी पडली की इयर डौन उर्फ वायडी होतं ना? "माझा अमकातमका विषय यंदा क्रिटिकलला आहे" म्हणून तांब्या उपडा करून अभ्यास करणारे काही मित्र होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पहिल्या वर्षाचा विषय तिसर्या वर्षात आणि दुसर्या वर्षाचा विषय चौथ्या वर्षात घेऊन जाता येत नाही, पाप फेडून मगच गती मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर.
पण बरेचदा ह्या "सुपर सिनिअर्स"च्या आख्यायिका कॉलेजांत फिरत असतात.
की अमुक तमुक सिनिअरने एकावेळी १० केट्या क्लियर केल्या.
कुणीतरी सिनिअर ६ वर्षं बी.इ.तच आहे वगैरे.
एफीच्या लोकांची टरकते हे सगळं ऐकून, विशेषतः पहिल्या सेमला. नंतर मग सवय होतेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कुणीतरी सिनिअर ६ वर्षं बी.इ.तच आहे वगैरे.

असतात नशीबवान काही लोक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एफी मेकॅनिक्सचा पेपर अजुन आठवतो मला....कशाचा तरी C.G. काढायचा होता. १४ मार्क Smile ३० मिन्ट झटापट केल्यानंतर २४००० असं काहितरी ऊत्तर आलं. बाकि सगळे युनीट्स १०, २० असे होते. पेपर वापस दिला आणी ४० मीनीटात बाहेर :). ४ मार्क पडले फर्स्ट अटेम्ट ला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

मस्त. सुरेख . छान. अप्रतिम वैगेरे नेहमीप्रमाणेच . लवकर पुढला भाग टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

एकुणच या केट्यांचा दरारा नी टाइमटेबलची जंजाळं इतकी असतात की विंजिनीरींग संपून इतकी वर्ष झाल्यावरही घामाघून करणारं स्वप्न म्हणजे हेच्च.... टक् टक् टक्.. ROFL

कित्येकदा पेपर पुढ्यात आहे नी आपल्याला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाहिये.. आता काय थापा ठोकाव्यात किंवा अरे आज हा पेपर होता होय मी हे रटून आलोय अश्या प्रकारचीही स्वप्न पडतात!

या चार वर्षांत असल्या केट्यांची म्हणा, ८ नी १६ मार्कांच्या प्रश्नांची चळात असणार्‍या प्रश्नपत्रिकांची म्हणा भिती पार मुरलीये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१ मलादेखील अजूनही असली स्वप्न पडतात Sad

अॅप्मेक, ग्राफीक्स, M1, M2, M3 वगैरे चांगले विषय होते. बरे मार्क पडले होते सगळ्यातच. गोगोल ज्याला M1 म्हणतायत तो आमचा M2. 96 मार्क्स Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यूज्वल. थोर वगैरे. थोऽडी तक्रार. ’माऽऽऽऽधुरी’ गिमिकी वाटतंय / कळतंय. पुढे काही आडून वगैरे स्पष्टीकरण येणारे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्हाला माssssधुरी ठाऊक नाही?
असो! इश्क-विश्क ह्या भयानक चित्रपटात बहुतेक हा ड्वायलॉक पहिल्यांदा बोलला गेला. इथे बघा.. एका मित्राच्या तोंडी कायम ऐकलेला आहे.
आईच्या ...गावात किंवा आईची.... वगैरे स्यूडोउद्गारांप्रमाणेच हा एक. निरर्थक, पण कॅची फ्रेज आहे!

दीक्षितांच्या माधुरीशी काही नातं नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुम्ही पैदाइशी बच्चन असाल तर गोष्ट निराळी, पण आम्हा मॅकमोहनांसाठी एफी असते.

सुबहान अल्ला!!!

प्रसंग एकः
"एक्स्क्यूज मी, कार्पेंटरीचं वर्कशॉप कुठे आहे?"
"एफी क्या?"
"येस सर"
"सीधा जाव, लेफ्ट मुडो... बाकी ज्यादा दंगा नै कर्नेका इधर, क्या समझे....ख्यॅ: ख्यॅ: ख्यॅ:... पल्ल्या, यंदाची एफी ची बॅ च ब री ए...." (दुरून ऐकू आलेले काही शब्द)

प्रसंग दोनः
मी: "एक्स्क्यूज मी, जरा फिरोदियाची दोन तिकिटं हवी होती"
बीई १ -"एफी ना? तुम्हाला कशाला पाहिजे? संपलीयेत"

बीई २ - "सच्या, माझी ४ तिकिटं ठेवलीयेत ना?"
मी - "????? पण तिकिटं संपलीयेत ना?"
बीई १ - "एफीचा कोटा असतो... जास्त तिकिटं देत नाही आम्ही"
बीई ३ - "सच्या तिकिटं दे रे २...." मला उद्देशून, "काय रे इकडे काय करतोयस"
मी - "तिकिटं घ्यायला आलो होतो. पण संपली म्हणतायत"
बीई ३ - "सच्या देऊन टाक रे.... ओळखीचा आहे पोरगा"
बीई १ - "बरं घे... पण तिकडे जाऊन जरा चीअरिंग करा... नुसते बसून राहू नका. यंदाची एफी ची बॅच ना......" (दुरून कानवर आलेले पण मनावर न घेतलेले काही शब्द)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही!!!!!!!!!! ROFL Biggrin

आणि मेकॅनिक्स ईतकं काही वाईट नाहीये..
.
.
.
.

मल्टीबॉडी डायनॅमिक्स विंजेनेर
मंदार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान...
============
माधुरी तुमची कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दुर्दैवाने कुणीच नाही हो.. Smile
वर म्हटल्याप्रमाणे ती कॉलेजात, किंवा आसपास ऐकलेली कॅचफ्रेज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्कृष्ट मालिका..

बाकी या निमित्ताने एक आठवलं. अमेरिकेत "असलेला" मनुष्य जसा भारतात आल्यावरही न चुकता झेड ऐवजी झी म्हणतो किंवा शून्याऐवजी ओ म्हणतो. आणि समोरच्याला समजलं नाही तर झी अ‍ॅज इन एक्स, वाय, झी.. असं समजावून सांगतो पण झेड म्हणत नाही, तसं इंजिनियरिंगचे लोक "एफ वाय", "एस वाय", "टी वाय" म्हणत नाहीत.

"एफ ई", "एस ई"च..

FY, SY, TY वगैरेमधे अ‍ॅम्बिग्विटी येते.. त्यात बीएश्शी, बीए, बीकॉम यांत आपण चुकूनही गणले जाऊ नये म्हणून..?!! Wink

जनरल ऑब्झर्वेशन, ह. घेणे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin असेल असेल, निव्वळ माजही असेल!
पुढे येईलच, पण स्वतःला बी.ई. म्हणवून घेणं हा इंजिनेरींगच्या विद्यार्थ्यांसाठी बहुतेक सर्वोच्च सन्मान असलेला जन्रली बघितला आहे..
(आणि फर्स्ट यर /फोर्थ यर दोन्हींसाठी एफ.वाय होतं, म्हणून कदाचित हे बी.ई वगैरे आलं असेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या वेळी मात्र एफवाय एसवाय असेच म्हणत असू. मेबी बी ई ऐवजी बीटेक असल्यामुळेही असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

m१ m२ आणि m3 वर प्रत्येकी एक स्पेशल लेख पाहिजे हां, आत्ताच सांगून ठेवतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

m१ m२ आणि m३ या विषयांची नावे आमचे एक मास्तर मराठीत 'यम-१', 'यम-२' आणि 'यम-३' अशी सेमिस्टरच्या सुरुवातीला मुद्दाम लिहून दाखवत त्याची आठवण झाली. खरोखर यम परवडला पण गणित आवर अशी परिस्थिती होती तेव्हा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हांला यमयातना झाल्या असतील मग, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हांला यमयातना झाल्या असतील मग, नै?

झाल्या ना... पण शेवटी पदरात दान काही वाईट पडलं नाही. ५८, ४२ आणि ५६ म्हणजे भरुनच पावलो म्हणायचे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तुफान चालू आहे.

मला दहाविला गणितात १५० पैकी १०० च्या वर जेमतेम मार्क्स मिळाले होते (क्लास वगैरे लावून सुद्धा).
पण म१, म२ आणि म३ ला माहीत नाही कसे पण अनुक्रमे ९०+, ७०+ आणि ८०+ मिळाले होते. मला अजून ही मी म२ मध्ये फक्त ७०+ मिळाल्यामुळे खट्टू झालेले आठवतय. तिन्ही वेळेला मी बाफना क्लासेस झिंदाबाद.
यापैकी मी मन लावून असा फक्त म१ चाच अभ्यास केलेला होता. म१ च्या पेपर ला मला त्या विषयात खूपच ईंटरेस्ट निर्माण झाला होता. त्या कसल्या कसल्या टेलर, मॅक्लॉरेन सेरीजेस होत्या वेगवेगळ्या फंक्शन्स च्या. मी त्या कधीही पाठ केल्या नव्ह्त्या. अगदी परीक्षेत सुद्धा त्या पहील्यांदा डीराईव करायचो आणि मग वापरायचो. पुर्ण ईंजिनियरींग मध्ये मन लावून केलेला आणि पेपर देऊन बाहेर पडल्यावर कॉन्फिडन्स वाटलेला असा हा एकच विषय :):). पेपर दिल्यावर बाकीची जनता कावरी बावरी होऊन बाहेर पडलेली आठ्वतीय. मी मस्त पैकी
हसत बाहेर पडलेलो. त्या वेळेला खर तर मला खुप जोरात ओरडावासे वाटत होते कि हा विषय अवघड आहे? यात अवघड अस काहीच नव्हत. पण स्थळ काळ आणि बाकिच्यांची अवस्था बघून निमुट गप बसलो.
त्या वेळेला हा बारावी नंतरचा पहीलाच पेपर असल्यामुळे मोठे बन्धुराज (जे स्वतः ईंजिनियरींग च्या शेवटच्या वर्षाला होते आणि बर्यापैकी विषय ठेवून होते) ते मोठ्ठ्या उत्साहात मार्क्स काढायला सरसावले. याच काय लिहीले, ते आल का ई ई. माझ प्रत्येक प्रश्नाला हो अस उत्तर होत. आणि माझ्या आठवणी प्रमाणे १० पैकी ६ प्रश्न सोडवणे कंपल्सरी असते. मी ७ का ८ सोडवून आलो होतो. माझे बन्धुराज माझा दहाविचा ईतिहास बघता माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्ह्ते. त्यानी मॅक्झिम्म, मिनिमम आणि अ‍ॅव्रेज असे तीन मार्क्स काढले होते. त्यात मॅक्झिम्म होते ७०. आणि ते सुद्धा त्याला खूप च अविश्वस्नीय वाटत होते. मी जरा नाराज झालो कारण मला वाटत होते की मी तर सर्व बरोबर सोडवल आहे. पण मग म्हंटल की हा म्हणतो तेही बरोबरच आहे. मला दहावी सारक्या कमी अवघड गणितात कसेबसे १००+ मिळाले आहेत आणि शिवाय याला ईंजिनियरींग चा ज्यास्त अनुभव आहे.

पुढे ९०+ मार्क्स मिळाल्यावर मी शांत पणे मार्क्स शीट पुढे नेवून ठेवली. घरातले सगळे जण फक्त खाली पडायचेच बाकी होते.

हे मार्क्स मिळाल्यावर मी टोट्ल ओवर कॉन्फिड्न्स मध्ये गेलो आणि म२ चा ज्यास्त अभ्यास केला नाही. शिवाय त्यात असलेले गणित मला कधी फारसे आवडले नाही. म१ सारखा पुर्ण सेमिस्टर आवड घेऊन नाहीच, पी ल च्या शेवटच्या दिवसात टेंशन घेऊन् म१ ची लाज राखायला जो काही शक्य होईल तो अभ्यास करून कसे बसे ७०+ मर्क्स काढले होते.

म३ च्या वेळेला जे गणित होत ते आवडीच होत. त्या वेळेला आमच्या मेन ईंजिनियरींग चे विषय आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर सेमिस्टर च्या दरम्यान सुरु होते Smile
पुर्ण सेमिस्टर नसेल तरी पी ल मध्ये मन लावून अभ्यास केलेला होता. तरी पण कॉन्फिडन्स असा काही वाटत नव्हता. माझा स्वतःचा पेपर देवून पडल्यावरचा अनुभव खूपच अवघड होता. मला वाटत होत की ६० वगैरे मिळतील, पण ८०+ मिळवून म१, म२, आणि म३ मधून कायमचा हाश्श्य हुश्श्य म्हणत सुटलो.

त्या नंतर गणिताशी ७-८ वर्ष संबंध तुटलाच. आता गणितातल असे काहीच विषेश आठवत नाही. आता परत शिकायला सुरु करतोय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही पण बाफनाचे विद्यार्थी का? वा वा... मग यम१, यम२ वगैरे आठवत असेलच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाफना हा इसम एक अजब रसायन आहे.

कॅप्रिशियसच खरखुर उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याबद्दल बघा पुढिल वाक्य वाचल्यावर कशी सहानुभुती दाटून येणारे सगळ्यांच्या डोळ्यात!:

आम्हाला पाच पाच यम होते! यम-१ ते यम-५!

मात्र क्रॅशकोर्स जिंदाबाद! एकदाही ६० क्रॉस केले नाहीत नी एकदाही ४० खाली उतरलो नाही Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाही भाग झकास!

दादर पश्चिमेला भर पहाटे भाज्या कोंबलेले ट्रक्स येत असत. त्याच सुमारास, त्याच ठिकाणी विद्यालंकारच्या त्या 'नाही चिरा, नाही पणती' इमारतीत (तिला एक मधला मजलाही - mezzanine floor - होता बहुतेक) साधारण तसेच विद्यार्थी कोंबलेले असत. तत्रस्थ शिक्षकगणही अख्ख्या सेमिस्टरचं ज्ञान त्या चार दिसांच्या क्रॅश कोर्सात आमच्या शिणलेल्या डोक्यात कोंबायचा प्रयत्न करे. त्या आठवणी ऑलमोस्ट विसरलो होतो, पण आज अस्वलभौंचा हा लेख वाचून आज फारा दिवसांनी 'कोंब' मुसळाला आले! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यप! नवर्यानेही विद्यालंकारच्या याच आठवणी सांगितल्या. अर्धे मजले, त्यात कोंबलेली पोरं. लक्ष लेक्चर सोडून कुठेही जाऊ नये अशा गिचमिडीने बसवलेली. त्याच्या वतीने अस्वलला धन्यवाद (तो ऐसीवर नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिट्टो!
ती बिल्डिंग म्हणजे झारापकरच्या मागचं पर्ल सेंटर का? ऑड सेमची सकाळची वेकेशन बॅच असेल तर पाऊस-छत्री-गर्दी-मार्केटमधला रमरमाट.. मोठं दिव्य असायचं.
पूर्वेचं हिंदू कॉलनीतलं विद्यालंकार हाऊस मात्र छान आहे. (कोंबाकोंबी असायचीच, पण इमारत आवडायची)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच ठिकाणी विद्यालंकारच्या त्या 'नाही चिरा, नाही पणती' इमारतीत

बोले तो, ७०/९०/सध्या-जो-काही-गोइंग-रेट-असेल-तो-तितक्या-रुपयांत-गर्भपात-केंद्राच्या वरती ना?

ती इमारत 'पर्ल सेण्टर'-नामे मशहूर आहे.

(खालती झारापकर?)

----------------------------------------------------------------------------------------------------

(अवांतर:) याची जाहिरात लोकललोकलमध्ये प्रॉमिनण्ट जागी लावलेली असे. सोबत बिफोर-अ‍ॅण्ड-आफ्टरपैकी बिफोरचे चित्रही लावलेले असे. आफ्टरचे का लावत नसत, कोण जाणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही एम३ एकदा आणि इलेक्ट्रिकल२ हा विषय दोनदा पक्का करून घेतला. Wink

अ‍ॅप्लाइड मेकॅनिक्स पक्का करण्याची संधी कै. जयकर यांनी मिळू दिली नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एम३ कसा सुटला माझा हे मला न सुटलेलं कोडं आहे. आणि ४० देखील नाही, तब्बल ४१ मार्कांनी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

m3 -

पहिला प्रयत्न १०० पैकी ६ मार्क
दुसरा प्रयत्न १०० पैकी 3 मार्क
तिसरा प्रयत्न १०० पैकी १ मार्क
चौथा प्रयत्न - केलाच नाही.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यातून आम्ही डिप्लोमावाले असल्यामुळे जास्तच कठिण जाय्चा मॅथ्स.

म३ च्या पेपर हून बाहेर आल्यावर माझा हताश (म्हणजे प्रतेय्क पेपर नंतर दिसे तसाच) चेहेरा बघून वर्ग'भगिनी' (भगिनीच राहल्या शेवटपर्यंत (श्रेयाव्हेर ई ई) ) हिरिरीने पुढे सरसावल्या, "इथे काय लिहिलस", हे कस सोडवलस", "इथे मेथड कोणती वापरलीस?" आणि एकेका उत्तरानंतर मार्क (अंदाजे) काढू लागल्या. कितिही लिबर्टी घेउनही टोटल जेव्हा २५ च्या पुढे सरकेना तेव्हा सांत्वन सुरु झाले.
घरी सेटींग करुन ठेवली, कि मॅथ्स राहील बहुतेक, पहिलाच प्रयत्न होत, सो पालक ओके होते.
रिझल्ट्चा दिवस, बोर्ड वर चिकटवायचे, बघायला जायची हिम्मतच नव्हती. ग्रुप मधल्या एकीने ही अवघड कामगिरी उचलली (मित्र सगळे आमच्याच लाईनीतले, कोणातच दम नव्हता), आणि धडपडत गर्दीत रिझल्ट बघून आल्यावर मला एक्दम मिठीच मारली. (पहिली मिठी पण नीट एंजॉय करता आली नाही)

"तुला ४४ मिळालेत" - बाकी इतर विषयांबद्दल टेनशन नव्हते, सो सगळे मिळून चक्क फर्स्ट क्लास.

आयुष्यात तेव्हा देवावर विश्वास बसला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनील कुंबळे वर केला जाणारा एक जोक ...
तो इंजीनीयर असल्याने ४० धावा झाल्यावर बॅट वर करायचा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एफईच्या पहिल्या सेमिस्टरला तुफान अभ्यास करुन डिस्टिंक्शन वगैरे मिळवले होते. शहरातल्या इंग्लिश वगैरे बोलणाऱ्यांपेक्षा आपल्याला चांगले मार्क पडू शकतात याचा इतका ओवरकॉन्फिडन्स आला की दुसऱ्या सेमिस्टरच्या परिक्षांना १० दिवस राहिले तोपर्यंत अभ्यासच केला नाही. शेवटी मेकॅनिक्स, ग्राफिक्स वगैरे विषय अवघड म्हणून त्यांचा अभ्यास जास्त केला. ते सुटले आणि एम-२, अप्लाईड सायन्स वगैरे तुलनेने फुटकळ विषय राहिले हे आठवले. एफीचा फायदा असा की एकदाचा आत्मविश्वासाचा फुगा फुटल्यावर जमिनीवर पाय आले आणि पास होण्यापुरता अभ्यास कायम केलाच पाहिजे एवढे लक्षात ठेवून बाकीची वर्षे काढली.

पुण्यात कुंजीर, जीवीके वगैरे मंडळींचे क्लासेस भलतेच लोकप्रिय होते. जीवीकेचे क्लासेस लावले होते पण आम्हाला सकाळी ६ची ब्याच मिळाल्याने पैसे वायाच गेले.

मस्त लेखमाला. येऊद्या आणखी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जखमांवरच्या खपल्या काढल्यात तुम्ही अस्वल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

वाचतोय! आम्ही रेग्युलर विंजीनीअरींग न केल्याने क्लासेस वगैरे भानगडींची मजा हुकली. (बाकी पोरांना मेकॅनिक्स अन ड्रॉईंग इतकं का अवघड जातं हे आजवरही न सुटलेलं कोडं आहे!) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>बाकी पोरांना मेकॅनिक्स अन ड्रॉईंग इतकं का अवघड जातं हे आजवरही न सुटलेलं कोडं आहे!

ड्रॉइंगबाबत सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

आम्ही यात कधीच ८५च्या खाली नै उतरलो (याला "चष्मिष्ट खिजवणे" म्हंटात हे माहितीये :P)

मात्र मेकॅनिक्स, पहिल्या सेमला ४२, दुसर्‍या सेमला २८ (केटी) नी पुन्हा घासून घासून अभ्यास केल्यावर ४३! Sad

मात्र अतिशहाणा म्हणतो तसे, त्यानंतर दर सेमला पासिंगपुरता अभ्यास केलाच पाहिजे हे शिकलो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कधीच उतरलो नाही म्हणजे ड्रॉइंचे एकाहून अधिक पेपर होते काय? आम्हाला एकच होता, फष्ट इअरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आम्हाला दोन होते. पहिल्या दोन सेमिस्टरचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

केटिची मज्जा वेगळीच असते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

मस्त झालाय हा भागदेखील! खूप आवडतेय लेखमाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला गणिते तोंडपाठ असल्याने m1 ते m4 कशाला विशेष अडाचण आली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तोंडपाठ ????

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाच्या यशाचं गमक त्यातील विनोद आहेच - १००% आहे अन दुसरं हे देखील की या विषयाला mass-appeal आहे. अनेक इंजिनीअरांना मर्मबंधातील ठेवी उघड्या करण्यास वाव मिळाला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लिखाण आवडले.
काही अन्य बाबींच्या प्रतीक्षेत :

डे स्कॉलर्स/ होस्टेलाईट्स : तुलना, (प्रासंगिक) हेवेदावे
रिलेटिव्ह ग्रेडींग : आपण कितीही वाईट असलो तरी "एफ्" ग्रेड मिळवणार्‍यापेक्षा बरे असलो की झालं. किंवा आपला अभ्यास झाला की दुसर्‍यांना त्रास देणे.
ओपन बुक टेस्ट्स
प्रोजेक्ट गाईड्स आणि विद्यार्थी यांच्यातले संबंध, किस्से, कहाण्या.
प्रॉफिज् ना दिलेली नावं.
स्टेपल डाएट : कटींग, वडापाव इत्यादि.
"व्यसन" म्हणून ज्या ज्या सुंदर गोष्टींची वाईट शब्दाने संभावना होते त्या त्या गोष्टींची झालेली ओळख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पुढे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अहो, कसं कळत नाही तुम्हाला?

एफी ला केटी नाही मिळाली बहुधा. त्यामुळे अजून एसईत गेले नैयेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

बुकमार्क करण्याजोगी सिरीज आहे. केलेले आहेत. अन उडतं झुरळ वालाही. उच्च विनोदी लेखन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

एफी धमाल होती. वालचंदला अ‍ॅडमिशन मिळालं हे ऐकल्यावर आमच्या नात्यातले बरेच लोक नव्याने आमच्याशी बोलायला लागले. Smile
पहिल्यांदा उत्साह, नंतर नेहमीचेच अ‍ॅडमिशन्सचे घोळ, कोर्टाचा स्टे.. सगळं होताहोता कॉलेज चालू व्हायला सप्टेंबर उजाडला आणि फ्ल्यूमुळे आजारी पडले. त्यामुळे अ‍ॅप्लाईड मेकचा जाम धसका बसला होता. तेव्हाच लोक कशाकशाचे क्लासेस लावतात आणि क्लास न लावणं म्हणजे केट्या हे समीकरण डोक्यात बसलं होतं. मी सांगलीत राहात नसल्याने क्लासेस लावण्याचा संबंधच नव्हता. आमच्या वर्गात तुफान हुशार आणि तितकेच आगाऊ लोक भरले होते. आम्हाला आंगलेकर अ‍ॅपमेक शिकवायचे, एफीला दोन तासांचं एक लेक्चर होतं का ते आठवत नाही, पण एकदा शंका विचारली की ते जाम गोंधळायचे आणि त्या गोंधळातच लेक्चर संपून जायचं. आमचे ग्राफिक्सचे निगळेसर आधी पंधरा मिनिटं उशीरा यायचे आणि शेवटी सगळ्यांची पूर्ण नांव घेऊन हजेरी घ्यायचे. आम्हाला वर्गातल्या सगळ्यांची नावं समजायला त्यांची खूप मदत झाली. त्यांच्या लेक्चरला आम्ही भिंतीला पाठ लावून बसायचो आणि कोणत्या नावाला कोण उत्तर देतंय हे पाहात बसायचो. टिपिकल पिक्चरमध्ये दाखवतात तसे एकदम मजेदार होते ते.. मोठा मेटॅलिक बेल्ट लावायचे, बेल बॉटम घालायचे... एक ना दोन.. फिजिक्सचे महाधने आणि वर्गातला एक मणिपूरचा मुलगा लेक्चरला दोघे गप्पा मारायला लागले की थांबायचे नाहीत, आम्ही मध्ये मध्ये तेल ओतत असू. आमचे केमिस्ट्रीचे सर नेहमी तोंडात मुखरस सांभाळून असायचे व स्वतः प्रश्न विचारून स्वत:च उत्तर द्यायचे.

कैर्‍या, आवळे, बोरं, पेरू, जांभळं, चिंचा खाऊन आणि गणपतीच्या मंदिराजवळच्या प्राजक्ताची फुलं वेचत आमची एफी संपली. वर्ष संपता संपता पुढच्या वर्षांत कोणत्या मास्तरांसमोर आपल्याला काही येतं हे दाखवयाचं नाही आणि जीन्स घातल्यानंतर कुणासमोर जायचं नाही इतपत माहिती मिळाली..

बाकी काय योगायोग असावा हे माहित नाही, पण एम्१,एम२ आणि एम३ तिन्हीही ४०वरच सुटले. :-ड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

फार भारी!

एफी मधे आम्ही सगळ्या होस्टेलमधे राहणार्‍या मुली अतिशय बावळट होतो. आमच्या सिनियर मुली रॅगिंन्गच्या नावाखाली खूप टाईमपास करायला लावायच्या. पंजाबी ड्रेसच घालायचा, केसांना पचपचीत तेल लावायचं, हिल्स घालायच्या नाहीत वगैरे. थोडे दिवस ते नाटक चाललं, मग एकदम परीक्षाच आली. M1 बद्दल फुल्ल काँफिडन्ट असल्याने टेन्शन नव्हतं, पण अ‍ॅप्लाईड सायन्स मधे माती खाल्ली. आपण नापास होणार हे कळलं, पण कसा कुणास ठाऊक, पहिल्या सेममधे तो सुटला. पण दुसर्‍या सेमला राहीला. मेकॅनिक्सच्या वेळी मी फक्त स्टॅटिक्सचा अभ्यास करून गेले होते, डायनॅमिक्सचा पेपर अक्षरशः कोरा सोडून आले. पण नशिबाने ४० वर सुटला!

आमच्या मेकॅनिक्सच्या सरांच्या एका लेक्चरला कुणीतरी अटेंडन्स शीट वर "मल्लिका शेरावत" अशी प्रॉक्सी मारली. वाईट चिडले होते सर. मग मुलं त्यांना समजावयला गेली. नशीब त्यांच्या हातात कुठलं प्रॅक्टिकल नव्हतं नाहीतर काही खैर नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषय ४०वर सुटण्याचेपण दोन प्रकार असतात. खरोखरच ४० मार्क असणे आणि ग्रेस मिळून ४० असणे. जर ४०च्या डोक्यावर एखादे चिन्ह (आमच्या विद्यापीठासाठी ते येशूच्या क्रॉससारखे होते) असेल तर तो ग्रेस असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग उतरताना फक्त माझ्या तेलकट ओवरऑलचा एक धक्का दिला- फटॅक. शर्ट वारला असणार त्याचा. म्हणे पास है क्या.

ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

बच्चन, तुषार कपूर, माधुरी! ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
तुम्ही लेखनातले किशोरकुमारच जनू! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0