अनेस्थेशिया

तू......अनेस्थेशिया सारखा
अंगभर पसरत जाणारा
आत आत खोलवर
सार्‍या जगाचा विसर
आणि पूर्णपणे स्तब्ध झालेला काळ
फक्त मी माझी
आणि तू बरोबर
माझ्याकडे बघत!
काही कळत नाही
भविष्य भूत सार रिकाम
वर्तमानाचा आभासही नाही
कुठेय मी कळत नाही..
... पण तू बरोबर
माझा हात हातात घेऊन
..अनेस्थेशिया!

शांत आहे मी
विचारच नाहीत
सगळ कोर...शांत...निश्चल
कशाशीच संबंध नाही
फक्त आपण दोघे.
....आणि तू...
चढलेल्या अनेस्थेशिया सारखा
..............गात्रभर......!!!!

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

आणि अ‍ॅनेस्थेशियाचे तेच ते साईड इफेक्ट

मळमळणे, उलट्या आणि कॉय कॉय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

= )) तिमा कसं सुचतं तुम्हाला हे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लोकल अ‍ॅनास्थेशिया असेल हो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.