तुकाराम होणे

आज तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन.
तुकाराम होणे

विठ्ठल होणे सोपे आहे
कठीण तुकाराम होणे
मंबाजीची काठी खाणे
त्याचे हात कुरवाळणे

कठीण दुष्काळ सोसणे
रोखे इंद्रायणी बुडविणे
गोदाम जनात लुटविणे
आपुले दिवाळे काढणे

कठीण भंडारी एकांत
सोयरे वनचरा होणे
अंगी वृक्षवल्ली हो‌ऊन
डो‌ई पाखरू बसणे

कठीण दैवासी हासणे
आ‌ई बाप गमावणे
पत्नी पुत्रा अग्नी देणे
विठो चरणी विसावणे

कठीण भजनाचा नाद
किर्तनी ब्रह्मीभूत काया
नाम धरुनिया कंठी
देवा ऋणी करुनी ठेणे

कठिण जनांसी उपदेश
नाठाळाचे माथी काठी
गाथा इंद्रायणी बुडविणे
जन गंगेत तारणे

कठीण पालखी त्यागणे
नजराणा माघारी झाडणे
इंद्रियांचा स्वामी होणे
गोसावीपण उपभोगणे

- देवदत्त परुळेकर मो.९४२२०५५२२१

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नाम धरुनिया कंठी
देवा ऋणी करुनी ठेणे

कविता आवडली. या २ ओळी विशेष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

सुंदर ! तुकाराम होणे किंवा एकंदरीच जगतात वंदनिय होणे सोपे नाही.
तुकाराम होण्याची पात्रता असणार्‍या बीजाला हवी अंगभूत चिकाटी. त्याचबरोबर प्रतिकूल माती, प्रतिकूल हवा. अशी बीजे प्रतिकूल परिस्थितीतच बहरतात.
मात्र बरीच तुकाराम बीजे पुरेसी चिवट नसल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत रुजतच नाहीत. जी रुजतात ती पुर्णपणे अंकुरतच नाहीत. जी अंकुरतात त्यावर इतर विचारांचे कलम केले जाते. शिवाजी जन्मावा पण दुसर्‍याच्या घरात अशी एक म्हण होती. पण आता ती देखील काळाच्या महिम्यात धुसर होत जाईल हळूहळू. त्यामुळे तुम्हाला (आणि आम्हाला) आवडणारा तुकाराम पुन्हा होणे नाही. भारतीय मन वर्तमानापेक्षा भुतकाळातच रमू पाहते ते बहुतेक याचमुळे.

टीप : कवीने उल्लेखिलेली तुकाराम बीज आणि मी उल्लेखीलेले बीज हे संपुर्णपणे वेगवेगळे आहेत याची जाणीव मला आहे. नाहितर उगीच याल 'ये पीएसपीओ जानता नही !' म्हणत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लासच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हम्म एकंदर सगळच कठीण आहे... असं कवीतेतिल ओळी म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

शीर्षक वाचून, 'पोपट होण्या'च्या धर्तीवरच्या एखाद्या नवीन वाक्प्रचाराची ओळख होईल, या आशेने कविता उघडली, पण कसचे काय नि कसचे काय? पोपट झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली!

आजच्या काळातही एखादा तुकाराम असेल ज्याचे महत्त्व लोकांना तो मेल्यावर कळेल. कोणी सांगावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0