'च' आणि 'ही' चे भाषांतर

खालिल वाक्यांचे इंग्रजीत अक्षरशः भाषांतर करून हवे आहे.
१. मी लातूरला गेलो.
२. मीच लातूरला गेलो.
३. मी लातूरलाच गेलो.
४. मी लातूरला गेलोच.
५. मी लातूरला गेलोच कि!
६. मीही लातूरला गेलो.
७. मी लातूरलाही गेलो.
८. मी लातूरला गेलोही.
९. मी लातूरला गेलोही कि !
१० मीही लातूरलाही गेलोही कि!
११. मीच लातूरला गेलोही.
१२. मीच लातूरलाही गेलोच.
१३. मीच लातूरलाच गेलोच.

व्यवस्थापकः या विषयाचा आवाका लक्षात घेता यावर स्वतंत्र चर्चा करता यावी (व लेखकाचेही तसेच मत असल्याने) धागा वेगळा करत आहोत. या निमित्ताने यावाक्यांसमवेत अशा भाषांतरांतील आव्हानांवर चर्चा करता येईल

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

1) I went to Latur
2) I myself went to Latur
3) I went to Latur itself/only
4) Finally I went to Latur
5) I had to get Latur
6) Mee too went to Latur
7) I also went to Latur
8 ) I went to Latur also
9) I went to Latur also isn't it ?
10) Mee too went to Latur also isn't it ?
11) Mee went Latur also
12) I went to Latur too
13) I Myself went to Latur itself.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अजोंनी कामाला लावल्याबद्दल अजोंचे अभिनंदन अन घोस्ट रायडर आका जॅकी चॅन यांनी काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

इंग्रजीत बारा काळ शिकण्यापूर्वी फार अडखळायला होई. या वरच्या वाक्यांत एक स्थानिक भारतीय सुर आहे जो जशास तसा इंग्रजीत "बोलणे" अवघड जाते.
------------------
बोलणे यासाठी तेच शब्द असलेले वाक्य स्ट्रेस असलेले शब्द बदलून दुसर्‍या अर्थाने वापरता येते.
--------------
कृपया "कामाला लावले" वैगेरे म्हणून प्रामाणिक उत्तरे द्यायची इच्छा असणारांस हतोत्साहित नका करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कृपया "कामाला लावले" वैगेरे म्हणून प्रामाणिक उत्तरे द्यायची इच्छा असणारांस हतोत्साहित नका करू.

खरय. सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

खरे आहे. हतोत्साहित करू नका. त्यापेक्षा, प्रोत्साहनार्थ पुढचा एक्सरसाइज़ द्या.

"अजो आणि जॅकी चॅन (उदाहरणादाखल) दोघेही गा**च्या गां*त गेले." करा पाहू इंग्रजीत भाषांतर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(उदाहरणादाखल) (Metaphore)
'न'वी बाजू started screaming out loud out of unbearable pain...

किंवा (उदाहरणादाखल)
तरीही 'न'वी बाजू च्या .......
(हे आफ्रिदीच्या आ.... च्या धरतीवर वाचावे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तरीही 'न'वी बाजू च्या .......

भारत-पाक म्याचच्या दरम्यानचे आफ्रिदीमातृसहस्रनाम आठवून हळवा झालो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

I myself went to Latur

म्हणजे मी स्वतः लातूरला गेलो. दुसर्‍याला पाठवले नाही. मीच गेलो म्हणजे मी एकटा गेलो आणि दुसरे गेले नाहीत.
---------------------------------
१३ वे विधान अर्थहिन आहे. कृपया दुर्लक्ष करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओन्ली आय वेन्ट टू लातूर हे कसे वाटते?

८. आय डिड गो टू लातूर - असे हवे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओन्ली आय वेन्ट टू लातूर हे कसे वाटते?

मी एकटा लातूरला गेलो आणि मीच लातूरला गेलो मधे फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग इट वॉज मी हू वेन्ट टू लातूर म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Only I went to Latur.
आणि
I only went to Latur.
हे दोन्ही व्याकरण दृष्ट्या व्हॅलिड आहे का?
असल्यास दोहोंचा अर्थ वेगळा आहे का?
असं असल्यास दुसरं वाक्य त्या अर्थी बसतं.
--------------------
शिवाय just का वापरता येत नाहीय कळत नैयय.
मी वटाणाच खाल्ला, (अजून काही खाल्लं नाही) म्हणताना - I ate just watana. असे म्हणता येते. पण या लातूरवाल्या वाक्यांत just वापरता येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मीच (मी स्वतः) लातूरला गेलो- आय मायसेल्फ वेन्ट टू लातूर
मीच (फक्त मी) लातूरला गेलो - ओन्ली आय वेन्ट टू लातूर
मीच (शेवटी मीच) लातूरला गेलो - इट वॉज मी हू वेन्ट टू लातूर

आणखी कोणते अर्थ आहेत "मीच" मध्ये?

जस्ट वापरायचे असेल तर इट वॉज जस्ट मी हू वेन्ट टू लातूर म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही ननि, अजो म्हणताहेत -
I ate just Vatana सारखं I went to Just Latur का म्हणता येत नाही?
पण येतय की. मी बेळ्गाव, मिरज्,कर्‍हाड, पुण्याला गेलो नाही मी फक्त लातूरला गेलो. म्हणता येतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अच्छा.. आय वेन्ट जस्ट टू लातूर म्हणता येतं की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मिनिट -
जस्ट टू लातूर कि टू जस्ट लातूर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्या मते जस्ट टू लातूर.
उदा.
एव्हरीबडी वेन्ट टू मल्टिपल प्लेसेस ड्युरिंग द हॉलिडेज बट आय वेन्ट जस्ट टू लातूर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीच चा अर्थ मी स्वतः किंवा शेवटी मी असा होत नसावा.
-------------------
मीच गेलो चा अर्थ 'फक्त मी गेलो' मधली सुद्धा एक स्पेसिफिक केस इतका लिमिटेड आहे. असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असं काही नाही. उदा. "अरुणला खूपवेळा सांगूनही तो गेला नाही. मग काल मीच लातूरला गेलो." असं म्हटल्यास "शेवटी मीच" असा अर्थ होत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल मीच आणि शेवटी मीच मधे काल ला शेवटी म्हटल्याने ते बरोबर वाटतंय. काल मीच च्या जागी काल शेवटी मी असे म्हणायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेवटी मी म्हटले काय आणि मीच म्हटले काय अर्थबोध तोच होतोय.
पण चालू द्या तुमचं नेति नेति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननिभौ,
शेवटी शब्दामधे एक टेम्पोरल सेन्स आहे. खालिल वाक्य पहा.
कुलकर्णीच नाही, पाटीलच नाही तर आख्खे गावच इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले. यातल्या गावच चा विचार करून 'गावच उभे राहिले' हे वाक्य घ्या.
Finally the village stood up हे चूक वाटतं. कारण सगळे एकदाच उभे राहिले.
फायनली हा ठिक पर्याय वाटत नाही.
----------------------------
नेति नेति म्हणजे हे नको, ते नाही, हे नै आवडलं म्हणत असमाधानी राहणं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नेति नेति म्हणजे हे नको, ते नाही, हे नै आवडलं म्हणत असमाधानी राहणं?

'नेति नेति'चा शब्दशः अर्थ. हे नाही हे नाही किंवा असं नाही असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I Only Went to Latur असे पाहीजे "मीच लातुर ला गेलो होतो" साठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील वाक्यात ते ओन्ली कसं उच्चारलं आहे यावरून -
फक्त मी (दुसरा नाही) लातूरला गेलो
किंवा
मी फक्त लातूरला गेलो ( मी पेढे खाल्ले नाहीत, गोट्या खेळल्या नाहीत.)
असे दोन दोन अर्थ काढता येतात.
--------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>मी फक्त लातूरला गेलो ( मी पेढे खाल्ले नाहीत, गोट्या खेळल्या नाहीत.)

यातून मी लातूरला फक्त गेलो असा अर्थ निघतो. Only thing I did was I 'went' to Latur. तिथे जाऊन पेढे खाल्ले नाहीत, गोट्या खेळल्या नाहीत. कोणाचा मर्डर केला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

I myself went to Latur हे चुकीचा अर्थ पोचवतय. मी स्वत: लातूरला गेलो असा काहिसा.

अरूण राव, I went to Latur, alone. हे बरोबर वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

When you say 'I went to Latur, alone' असं वाटतं कि लातूरला जाताना तुमच्यासोबत कोणी नव्हतं असं तुम्हाला सांगायचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मीच लातूरला गेलो यातून तुम्हाला तोच अर्थ ध्वनीत करायचाय ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अलोन म्हणजे एकटा व एकट्याने असे दोन्ही होतं. अगदी बसमधे ड्रायवर कंडक्टर सोडून कोणी नव्हतं असं.
----------------
१९८४ मधे भाजपला दोनच जागा मिळाल्या हे वाक्य घे. BJP won two Lok Sabha seats, alone. असं नै ना होणार? म्हणजे भाजपला दोन जागा मिळाल्या, बाकीच्यांना त्या ही नाही असं होतं. हे इंग्रजी वाक्य तर भाजपला सन्मानदर्शक आहे, पण वास्तवात त्यांची लज्जा गेलेली.
----------------
or BJP won two, alone, Lok Sabha seats. इथे तर व्याकरणच चूक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी बरोबर आहे. तुम्ही चूक आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी बरोबरच आहे. तुम्हीच चूक आहात. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमचं म्हण्णं बरोबर आहे. तुम्ही चुकलातच.
किंवा --
तुमचं म्हण्णं बरोबर आहे. तुम्हीच चुकलात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१३ वे विधान अर्थहिन आहे. कृपया दुर्लक्ष करा.

म्हणजे अजो, पहीली १२ विधाने अर्थपूर्ण आहेत असा तुमचा दावा आहे का? J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आंबा खातो चे बारा काळ करताना फ्यूचर पर्फेक्ट प्रोग्रेसिव चे "मी आंबा खात आलेलो असेन" असे विचित्र उदाहरण द्यावे लागते. पण सगळे future perfect progressive वाक्ये अर्थहीन आहेत का? मी तुलना करायला सोपे जावे म्हणून एकच वाक्य घेतले आहे. दुसर्‍या संदर्भांत अशी वाक्ये अर्थपूर्ण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी लातूरला गेलोच साठी Finally I went to Latur असमाधानकारक वाटत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी लातूरला गेलोच साठी

I went for Latur

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

I want for Latur मंजे अलेक्झांडर भारत जिंकायला निघाला तसे मी लातूर जिंकायला निघालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असा अर्थ अजो सोडून कोणीही घेणार नाही अन म्हणे भाषेचे दौर्बल्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१ सहमत आहे. माझ्याही मनात हाच अर्थ पहिल्या प्रथम आला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या प्रश्नाचं पोटेंशिअल पाहता संपादकांना हा "च आणि ही" चे भाषांतर असा नवा धागा काढायची विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मीच लातूरला गेलो.

यात "भेंडी, दहा जणांना विनंती केली पण मलाच जावं लागलं" असा टोन प्रकर्षाने जाणवतो. तसा "मी एकटाच गेलो-माझ्याबरोबर कोणी नव्हते" असा टोन जाणवत नाही.

त्यामुळे I myself went to Latur हे जास्त बरोबर वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

I myself went to Latur मधे मी स्वतः नक्की म्हणजे नक्की गेलो, इतर माझ्यासोबत आले नाही आले माहित नाही असा होतो. मीच गेलो म्हणजे बाकीचे आलेच नाहीत असे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आय मायसेल्फ गवि हियरविथ डिक्लेअर दॅट आय वेंट टु लातूर अँड नोबडी एल्स वेंट विथ मी टू लातूर अँड आय पुट माय हँड ओन होली गीता अँड से दॅट आय वेन्ट टू लातूर विथ बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड आय वॉज नॉट फोर्सड टू गो टू लातूर अँड आय वॉज नॉट अंडर इन्फ्लुएन्स ऑफ एनी सबस्टन्स व्हेन आय वेंट टू लातूर. आय प्रे टू व्हूमसोएव्हर इट मे कन्सर्न दॅट काईंडली ट्रस्ट दॅट नन अदर दॅन माय गुडसेल्फ वेंट टू नन अदर प्लेस दॅन लातूर इन नो लेस दॅन कम्प्लीट सर्टनिटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेलो. मेलोच. ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मला वाटते वरील वाक्यांची सन्दर्भाशिवायची भाषान्तरे दर वेळी मूळचे म्हणणे योग्य प्रकारे दर्शवतील असे वाटत नाही. सन्दर्भाने भाषान्तरे बदलू शकतील. एकाच उदाहरणाने हे स्पष्ट करतो.

'मी लातूरलाच गेलो होतो' हे वाक्य अनेक सन्दर्भांमध्ये येऊ शकेल आणि त्याची इंग्रजी भाषान्तरे दर वेळी तीच नसतील.
अ) एखादी व्यक्ति अनेक ठिकाणी भटकत अनावश्यक वेळ आणि पैसा खर्चत आहे असा सन्दर्भ असल्यास त्या व्यक्तीच्या उत्तराचे भाषान्तर -
I went only to Latur. (ह्यामागचे अध्याहृत and nowhere else हे बोलणे वा न बोलणे पर्यायी.)
ब) त्या व्यक्तीने काही विशिष्ट कामासाठी लातूरलाच जायला हवे होते आणि तेथे न जाण्याने त्या व्यक्तीने वेळ वाया घालवला आहे असा आरोप असल्यास भाषान्तर -
I did go to Latur.
क) एखादा मित्र लातूरला राहतो. त्याला भेटण्यासाठी मी लातूरला गेलो होतो पण तो तेथे भेटला नाही असे सुचविण्यासाठी भाषान्तर -
I went to Latur (ह्यामागचे अध्याहृत but he was not there हे बोलणे वा न बोलणे पर्यायी. येथे went मधील जोर लिखाणात इटॅलिक्स, अधोरेखन अशा मार्गांनी आणि बोलण्यात त्या शब्दावर जोर देण्याने कळेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीतल्या या च ला निश्चित अर्थ नसावाच असे वाटते. मागचा संदर्भ त्या च चा अर्थ काय आहे सांगण्यात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. अतिशय महत्त्वपूर्ण निरीक्षण.
---------------------------
एक उदाहरण घेऊ. यात हा च होकारार्थ, नकारार्थ आणि न्यूट्रल अर्थ ध्वनित करतो. बहुतेक च ला नक्की अर्थ नसावाच.
१. सगळे म्हणाले भारत विश्वचषक जिंकणार नाही. आणि भारतच जिंकला.
२. सगळे म्हणाले भारत विश्वचषक जिंकणार. आणि भारतच जिंकला.
३. मागच्या वेळी भारत विश्वचषक जिंकला. आणि यावेळेही भारतच जिंकला.
---------------------------------
१. सगळे म्हणाले भारत विश्वचषक जिंकणार नाही. आणि भारत जिंकला.
2. सगळे म्हणाले भारत विश्वचषक जिंकणार नाही. आणि भारत जिंकला.
यांच्यातला भाषांतराचा फरक नीट टिपता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

..विषय भाषांतराचा आहे म्हणून विचारतो.

.....कितवा ? आणि जितवा या नेमक्या अर्थाचे शब्द इन्ग्रजी आणि हिन्दी दोन्हीत सापडले नाहीत अद्याप.

.कितवा नंबर..

-तुझा जितवा नंबर असेल त्यावर एक माझा इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हॉट रँक डिड यु गेट?
व्हाय? व्हाय डु यु केअर?
वेल, बिकॉज आय अ‍ॅम श्युअर व्हॉटेव्हर रँक यु गॉट, माइन इज अहेड बाय वन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हम्म.. तसे व्हॉट वगैरे जेनेरिक आहे इंग्रजीत. पण कितवा अशा अर्थाचा वेगळा शब्द त्यासाठी नाही असं दिसतं. जितवा, तितवा ही कितवाचीच भावंडं असल्याने सेम लॉजिक.

हिंदीतही कौनसा नंबर आया वगैरे विचारलं जातंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू तुझ्या आई-वडिलांचे कितवे अपत्य?

ह्या प्रश्नाच्या भाषांतरात रँक हा शब्द योग्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो.. त्याचप्रमाणे रांगेत कितवा यालाही व्हॉट रँक हे जुळत नाही.

कितवा या शब्दाला स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. कोणत्या क्रमांकाचा अशा अर्थाने असला तरी.

th या प्रत्ययाने नेमका कितवा ते उत्तररुपात सांगण्याची सोय इंग्रजीत आहे (मराठी "सातवा", "दहावा" तल्या "वा"शी इक्विव्हॅलंट) पण कितवा हे जनरल विचारायची सोय नाही दिसली (अद्याप).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचप्रमाणे रांगेत कितवा यालाही व्हॉट रँक हे जुळत नाही. >> क्युमधे ऑर्डर असते ना? रँक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोक हाऊ मनिएथ असे बोलताना ऐकून आहे. पण त्याचे स्पेलिंग अजून सापडले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'कितवा-कितकावा' असे दोन समानार्थी शब्द मोरेश्वरशास्त्र्यांच्या शब्दकोशामध्ये दिसतात आणि त्यांनी त्यांचा अर्थ इंग्रजीमध्ये manyth असा दाखविला आहे. हा manyth शब्द बहुधा त्यांनी येथे मुद्दाम पाडला असावा कारण इंग्रजीमध्ये योग्य समानार्थी शब्द नाही असे दिसते. कोणत्याहि इंग्रजी शब्दकोशात हा शब्द नाही.

हा manyth शब्द गूगलमध्ये घातल्यास असे दिसते अनेकांना इंग्रजीमध्ये हा अर्थ योग्य दर्शविणारा शब्द नाही हे जाणवत आहे आणि अनेकांनी त्यासाठी manyth शब्द सुचविला आहे. 'How manyth president is Barak Obama?' असे त्याचे उदाहरणहि एका जागी दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'भाषा मराठी कितनी मधुर
अंग्रेजी भाषांतर लागे बेसूर,
प्रतिसाद पढने हम है आतुर
क्योंकी अजो हमारे चले लातूर!!'
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हमारा क्या है कुसुर,
जो आपका ये काव्य-सुरुर, (आमच्या शब्दकोषात, सुरुर = सुरसुरी ;))
हमे पढना पडा हुजूर!

आहाहा!!! कमाल केलीस वृन्दा, तू तो छा गई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

कसूर आपके हजारो यहांपर,
एक-दो क्या चुनके बतायें..
. नामका धागा निकालकर,
ऐसीवालोंकी तैसी करायें...
Smile

चलो, अब ये मुशायरा व्यनिमें लेतें है|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आप भी मियां कमाल करते,
धागा निकाले हम उपकार करते
जिसको पढना वोह है पढते
बाकी जलनेवाले जलते.
आपके जैसन तो हम नही,
ऊंहा जालीम जलाइलोवाली बीडी
यहां घुंघट वाली सहमी गोरी *
.

*संदर्भ - पिडां एकदा म्हणालेले की त्यांचा मिपावर "जलाईलो बीडी" अवतार आहे अन इथे "मै तुलसी तेरे आंगनकी" = ))
अरेरे त्यांच्याच विनोदास शरण जावे लागले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

होय होय आता फिट्टम फाट झाली. मुशायरा खतम. सब बच्चा लोग घर जाओ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

माझ्या शाळेत मुले "च"चे "ओन्ली" असे भाषांतर करून वापरत असत. पण ही इंग्रजीची स्थानिक बोली झाली.

भारतीय प्रमाण, किंवा अंतरराष्ट्रीय म्हणावे तर वेगवेगळ्या शब्दांनी भाषांतर करणे आवश्यक होते.

"ही"चे भाषांतर बहुतेक वेळा "ऑल्सो/टू/अ‍ॅझ वेल" असे ठीक होते.

मराठीचे हे वैशिष्ट्य आहे, की "च" आणि "ही" विवक्षित पदाला जोडल्यामुळे त्या पदाचा विशेष अर्थ प्रकट करते. इंग्रजीमध्ये कधीकधी वेगळे उपवाक्य करून त्याच पदाशी संबंध जोडणे, वा एका पदाला वाक्याचे लक्ष्यवेधक केंद्र बनवण्याची लकब आहे. ती लकब वापरून तीच अर्थछटा सांगता येते.

१. मी लातूरला गेलो.
I went to Latur.

२. मीच लातूरला गेलो.
It was I that went to Latur. (शब्दावर आघात करून, व वेगळे उपवाक्य असल्यामुळे "ओन्ली"चा अर्थ येतो.)
It was only I that went to Latur. (किंवा "ओन्ली" शब्द थेट योजला.)

३. मी लातूरलाच गेलो.
It was to Latur that I went.
I went only to Latur. (उच्चार प्रमाण करावा, तरच भाषांतर योग्य. माझी एक वर्गमैत्रीण I went-only to Latur. असा करे, तिला "मी लातूरला गेलेच" असे म्हणायचे असायचे, पण हे इंग्रजीत ऐकायला विचित्र वाटते.)

४. मी लातूरला गेलोच.
I did go to Latur. (वर्तमानकाळात होकारार्थी वाक्यांत "do" या सहायक क्रियापदाने मूळ क्रियापदाला "च"चा जोर मिळतो. नकारार्थी वाक्यांत वेगळी रूपे असतात.)

५. मी लातूरला गेलोच कि!
But I did go to Latur!

६. मीही लातूरला गेलो.
I too went to Latur.

७. मी लातूरलाही गेलो.
I also went to Latur.
I went to Latur as well.

८. मी लातूरला गेलोही.
I did also go to Latur.
In fact, I also went to Latur.

(पूढील वाक्ये कदाचित संदर्भासहित दिलीत तर ठीक वाटूही शकतील. परंतु सुटी वाक्ये मराठीतच मला खटकत आहेत. त्यामुळे भाषांतर करायला जमत नाही.)

९. मी लातूरला गेलोही कि !
१० मीही लातूरलाही गेलोही कि!
११. मीच लातूरला गेलोही.
१२. मीच लातूरलाही गेलोच.
१३. मीच लातूरलाच गेलोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार

मला १२ क्रमांकाचे वाक्य मराठीतही योग्य वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१२ मीच ।। लातूरलाही ।। गेलोच

अन्वयार्थ असा काही आहे काय? --
दुसरे कोणी नाही, फक्त मी ।। अन्य ठिकाणांसह लातूरला ।। गेलो, हे ऐकणाऱ्याला पटत नसले तरी खरे आहे.

मला तरी वाक्य बेढब वाटते आहे. माझ्या मते एका क्रियापदाच्या वाक्यात फारफारतर एक* "च" आणि फारफारतर एक* "ही" वापरणे बरे. नाहीतर वाक्य संदिग्ध होते.

*तांत्रिक दृष्ट्या "एक अधिकरण" म्हणायचे आहे. आणि-जोडणीच्या यादीतले शब्द एकाच अधिकरणात असतात. त्यांना प्रत्येकी "च" लागू शकतो. पण तेही क्वचित.
>>दोनच मुले आणि एकच मुलगी कार्यक्रमाला आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेढब वाटाते हे मान्य. याच्या शेवटी 'की' लावला की अधिक सुयोग्य वाटते

मीच लातूरलाही गेलोच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्याकडे च इंग्रजीत नाहीत आणि त्यांचे स्ट्रेसेस आपल्याकडे नाहीत, पण काम ते एकच करतात, असे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपल्याहीकडे मराठीत एखाद्या शब्दाच्या उच्चारावर जोर देण्याची लकब अस्तित्वात आहे. आणि इंग्रजीमध्येही "ओन्ली" आणि "इट वॉझ ___ दॅट" वगैरे प्रतिशब्द उपलब्ध आहेत. परंतु कुठली लकब कमी-अधिक वापरली जाते, त्याची निवड आणि वारंवारिता वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागच्या वर्षी माझ्या एक लक्षात आले. मी "च"चा नको इतका भुरभुरून वापर करतो. त्यानंतर मी एक प्रयत्न करायला लागलो आहे - "च"चा वापर मोजका पण हेतुपुरस्सर करावा.

मागच्या वर्षी हा परिच्छेद सवयीने पुढीलप्रमाणे लिहिला असता - अजूनही मोह होतो, तो जमल्यास टाळतो, पण नेहमी जमत नाही. ("नेहमी" हा वापर माझ्या मते या ठिकाणी अर्थपूर्ण आहे.)

मागच्या वर्षी माझ्या एक लक्षात आले. मी "च"चा नको इतका भुरभुरून वापर करतो. त्यानंतर मी एक प्रयत्न करायला लागलो आहे - "च"चा वापर मोजका पण हेतुपुरस्सर करावा.

वरील "च"प्रचुर वाक्यांत चूक असे काही नाही. पण अमुक या-या शब्दाला खूप प्राथमिकता द्यायचा माझा हेतू नाही. या "च"कारांमुळे उगाच पदोपदी! उद्गारचिन्हे! वापरल्यासारखे लेखन होते असे! त्यामुळे डोळे ठेचकाळतात पण एकूण परिच्छेदाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'भुरभुरून' वापर करणे ही खास तुमची शैली आहे का? अगोदर कधी पाहण्यात आली नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
आमटीचा भुरका मारणे
चल बाळा, भुsssर जाऊ यात
भुरे/भुरकट डोळे
हे शब्द परीचयाचे आहेत पण थोडी पीठीसाखर भुरभुरवा या व्यतिरीक्त भुरभुरुन हा शब्द कधी ऐकला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

पिठीसाखर (किंवा पीठ) चार बोटांवर घेऊन अंगठा फिरवत पिठी पदार्थावर पसरताना आमच्या घरगुती बोलीत "पिठी भुरभुरतो". त्याचे रूपक करून वापरतो, वाटते.

मुळात आमच्या घरगुती बोलीतलेही ते रूपकच असावे. कारण चार बोटांवर अंगठा हळूहळू घासत पिठी पाडल्यामुळे फुलपाखरू भुरभुरल्यासारखा दिसत असावा. (आनी "भुरभुर" हे "भुर्रकन्"चे द्वित्त लघुरूप - चिमणी भुर्रकन् उडाली.)

अधिक लोकांना समजावे असे रूपक म्हणून "असा 'च' शब्द पेरणे" म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीठ भुरभुरणे हे 'भुरभुर पाऊस' वरून आले असावे. अगदी बारीक थेंब असलेल्या पावसाला भुरभुर पाऊस म्हणतात. तशा प्रकारे पडणारे पीठ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ओह अच्छा, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी लातूरला गेल्तो. : हे वाक्य नसल्याने पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बसा. हामी कमसकम गेल्ताव तरी. वर किती मनून पुन्या-ममईच्या लोकैले धाडलाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंग्रजी भाषांतर करताना अगोदर तीनचार वाक्यात परिस्थिती मांडून मग योग्य वाक्य लिहायला हवे +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मी लातूरला गेलो.
I went to Latur.
२. मीच लातूरला गेलो.
I myself went to Latur.
३. मी लातूरलाच गेलो.
I went to Latur itself.
४. मी लातूरला गेलोच.
I did go to Latur.
५. मी लातूरला गेलोच कि!
???
६. मीही लातूरला गेलो.
I also went to Latur.
७. मी लातूरलाही गेलो.
I went to Latur as well.

इतर वाक्ये (अशी वाक्ये खरंच कुठे वापरली जात असल्यास) सन्दर्भासहित दिल्यास भाषांतर सुचवू शकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>५. मी लातूरला गेलोच कि!
???

लोक म्हणत होते मी लातूरला जाणार नाही/जाऊ शकणार नाही. पण गेलोच की नै? असा अर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

५. मी लातूरला गेलोच कि!
I did went to Latur.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

I did went to Latur?

I did go to Latur.

ह्यावरून एक चुटका आठवला. एका वकिलाचा मुलगा शाळेमध्ये गृहपाठ घेऊन गेला. शिक्षकांनी तो तपासला आणि एक चूक त्यांच्या ध्यानात आली. बाब्याला क्रियापदाचे past participle कसे वापरायचे हे अजिबात कळले नव्हते. त्याला ते चांगले रुळावे म्हणून शिक्षकांनी त्याला सांगितले, " हे पहा बाब्या, शाळा सुटल्यावर I have gone home हे वाक्य शंभरदा वहीत लिही आणि वही इथं माझ्या टेबलावर ठेवून मगच घरी जा." असे म्हणून शिक्षक बायकोने सांगितलेल्या भेंड्या आणण्यासाठी भाजी बाजाराकडे निघून गेले. इकडे बाब्याने I have gone home, I have gone home असे शंभरदा प्रामाणिकपणे लिहिले आणि शेवटी आपली पुस्ती जोडली: "Sir,
I have written the sentence 'I have gone home' one hundred times and have went home."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेलो करण्यासाठी went वापरले जसे मी लातुर्ला गेलो होतो म्हणून Did went to latur.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

"Sir,
I have written the sentence 'I have gone home' one hundred times and have went home."

निदान एका क्रियापदासाठी तरी कळले म्हणायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I did went to Latur?

I did go to Latur.

याविषयी आमची एक जुनी थियरी आहे. ती इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या इंग्रजी वापराच्या संस्थळावरील हे उत्तर आणि अन्य चर्चा पहा. (अवतरणचिह्ने अधिक स्पष्टीकरणासाठी मी घातली आहेत.) तेथे सर्वजण एकमुखाने हेच सांगत आहेत:

<<
Only one past marker is allowed within a single clause. The auxiliary takes the past marker, so the main verb cannot. The regular past marker is d, but some verbs are irregular, of course. The past marker for 'do' is 'did'. The past marker for 'go' is 'went'. Since you can't have more than one past marker in the same clause, you can't have both 'did' and 'went' in the same clause.

You can express the affirmative forms without an auxiliary, so there the main verb takes the past marker. It has to; it's the only verb in the sentence.

'He went.'

But if you express the affirmative with the auxiliary (the so-called "emphatic" form), did carries the past marker and so go cannot.

'He did go.' (Never 'He did went.')

The question and negative forms always use the auxiliary so the main verb can never take the past marker in those cases.

'He didn't go.' 'Did he go?' 'Didn't he go?'
>>

फाउलरने काही म्हटले आहे काय असा शोध घेत होतो पण तो ऑनलाइन उपलब्ध नाही. तोहि हेच सांगणार ह्याची खात्री आहे म्हणून त्याचेच अनुकरण करून

I did go is all right, I went is all right but I did went is all dead wrong.

(फाउलरचे मूळ वाक्य स्मृतीतून - 'Quite right' is all right, 'all right' is quite right but 'quite all right' is all quite wrong.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजीत अगं बाई कसे म्हणावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओह डियर!
मला वाटतं हा शब्द पुरुष उच्चारत नसावेत. असतील तर माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...