आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - २

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.

या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.

---

पुण्यात फ्रेंच शिकवणारी 'आलिऑन्स फ्रॉन्सेज' ही संस्था अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. फ्रेंच सिनेमे दाखवणारा त्यांचा 'सिने-क्लब' उपक्रम ह्या वर्षी जोमानं सुरू झाला आहे. मार्च महिन्यातल्या सिनेमांचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर इथे पाहायला मिळेल. काही सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शकांचे सिनेमे त्यात पाहायला मिळतील. सर्व खेळ फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असतील. सोमवार आणि गुरुवार ६:३० अशी वेळ आहे. प्रवेशमूल्य नाही.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

कट्टा २०१७ !!!!! आचरट राव आणि

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

(No subject)

काहीवेळा स्क्रीनशॅाट कमी

काहीवेळा स्क्रीनशॅाट कमी पिक्सेलसचे येतात ना म्हणून.अभ्या..चं इकडे लक्ष गेलं नसेल कारण सुशिलकुमार शिंदे यांच्या सत्काराला सोलापुरात बडी मंडळी येणार होती.

तुम्हाला अमेरिकेचं

तुम्हाला अमेरिकेचं अप्रूप!
कळीचं वाक्य!

*****
Test
Screen shot trial
फोटोत फरक वाटतो का?

आचरट राव , का हो , तुम्हाला

आचरट राव , का हो , तुम्हाला असं का वाटलं ? (चालला असता कि स्क्रीन शॉट )

मी हे काम परभारे केले असते -

मी हे काम परभारे केले असते - स्क्रीनशॅाटस घेऊन परत फ्लिकरवरून टाकले असते पण ते झिरझिरीत झाले असते.

मी टाकणार होते. खफवरचाच इमेज

मी टाकणार होते. खफवरचाच इमेज अ‍ॅड्रेस घेऊन. पण म्हटलं - मान ना मान मै तेरा मेहमान नको.

फोटो ! फोटो !!

अरे लेको , सगळे सगळे टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर वाले म्हणवता( मी सोडून ) , ते खरडफळ्यावरचे फोटो मूळ धाग्यावर चिकटवा कि जरा , ( गेल्या कट्ट्याचे बघा कसे झळकताहेत )

अण्णांसाठी कायपन

आदूबाळ कट्टा १

आदूबाळ कट्टा

आदूबाळ कट्टा

आदूबाळ कट्टा

आदूबाळ कट्टा

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आदिती ,,, धन्यवाद !! बघा लेको

आदिती ,,, धन्यवाद !! बघा लेको शेवटी मदत अमेरिकेहूनच मागवावी लागते ... ( मोगॅम्बो, गब्बर खुश हुआ !)

कोणाला कशाचं

तुम्हाला अमेरिकेचं अप्रूप! मी म्हटलं असतं, शेवटी बाईलाच असल्या म्हारक्या करायला लावता! (जीभ दाखवत)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती अक्का , जरा जपून गो

अदिती अक्का , जरा जपून गो बाये .तू जातेस ( बहुधा ) मराठी म्हणींचा उद्धार करायला ,पण गडबड होते काही शब्दांनी!!

Disclaimer

चिक्षिप्तबाईच्या 'कोणाला कशाचं तर बोडकीला केसांचं' ह्या म्हणीच्या वापरासंबंधाने मी जे वर लिहिले होते ते मला हा संवाद खेळकर मूडमध्ये चालला आहे अशी माझी समजूत झाल्यामुळे लिहिले होते. त्याला आता वितंडवादाचे स्वरूप येऊ लागले आहे असे मला वाटते. सबब माझी वरची प्रतिक्रिया मी मागे घेत आहे.

मूळ सापडलं.

मी बरेच दिवस हा धागा उघडला नव्हता. जातीयवादी कॉमेंटवरून खरडफळ्यावर काहीतरी चालू होतं ते दिसलं होतं, पण वेळ नव्हता म्हणून सोडून दिलं. ते मूळ इथे आहे होय!

कोल्हटकर, तुम्ही प्रतिसाद मागे घेण्याची गरज नाही. तुम्ही माझी टिंगल केलीत, मी त्यावर हसले किंवा आपण एकत्र हसलो, विषय संपला. ज्यांना विनोद समजत नाहीत त्यांचं नुकसान झालं तर ती आपली जबाबदारी नाही.

अण्णा बापट, मी तुमच्याशी मस्करीच करत होते. बाकीच्यांना जो वाद, गोंधळ, आणखी काही घालायचंय ते घालू दे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला खात्री आहे ते चुकून

मला खात्री आहे ते चुकून लिहीलयस. संपादित करुन टाक. हाकानाका.

तुम्हाला अमेरिकेचं अप्रूप! मी

तुम्हाला अमेरिकेचं अप्रूप! मी म्हटलं असतं, शेवटी बाईलाच असल्या म्हारक्या करायला लावता!

(सर्व प्रकारचा भेदभाव हा योग्य असतो असं मी मानतो. सिरियसली. पण ...)

डॉक्टर, तुम्ही सुद्धा !!!

अट्रॉसिटीज अ‍ॅक्ट वगैरे वगैरे...

हम्म

शेवटी बाईलाच असल्या म्हारक्या करायला लावता!

एरवी टोकदार फडतूसवादी अस्मिता असूनही खुश्शाल जातिवाचक शब्द वापरणे यातून छुपा मनुवादच दृग्गोचर होतोय खरा. लाज कोळून प्यालेल्यांना त्याचे काय म्हणा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

संतुलन शिरोमणी ऋषिकेश संपादक

संतुलन शिरोमणी ऋषिकेश संपादक राहीले नसल्यामुळे असेल कदाचित.
---
अदिती तै, तू काही चुकीचे लिहीले नाहियेस. लोक उगाचच जुने स्कोअर सेटल करतायत.

अदिती तै, तू काही चुकीचे

अदिती तै, तू काही चुकीचे लिहीले नाहियेस. लोक उगाचच जुने स्कोअर सेटल करतायत.

म्हणजे जातिवाचक आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे काही वाटत नाही तर तुम्हांला.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तो जातीवाचक शब्द नव्हता. ते

तो जातीवाचक शब्द नव्हता. ते कामाचे डीस्क्रीप्शन होते, जॉब प्रोफाइल सारखे (स्माईल)

त्या डिस्क्रिप्शनमध्ये

त्या डिस्क्रिप्शनमध्ये जातिवाचक शब्द आहे हे डोळ्यावर कातडे ओढले नसेल तर लगेच समजेल. (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

जातीमुळे त्या प्रकारच्या

जातीमुळे त्या प्रकारच्या कामाला ते नाव पडले असे नसुन त्या कामामुळे ते करणार्‍यांना ते नाव पडले.
केस कापणारा न्हावी मग तो कोणत्याका जार्तीचा असो.

जातीमुळे त्या प्रकारच्या

जातीमुळे त्या प्रकारच्या कामाला ते नाव पडले असे नसुन त्या कामामुळे ते करणार्‍यांना ते नाव पडले.
केस कापणारा न्हावी मग तो कोणत्याका जार्तीचा असो.

अनु राव ला थेट प्रश्न -

व्यक्ती ज्या कुटुंबात जन्मास येते त्या कुटुंबाचा व्यवसाय त्या व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय म्हणून स्वीकारलाच पाहिजे व स्वीकारत नसेल तर तिला बलपूर्वक तो तसा स्वीकारायला लावावा - हे अनु राव च्या मते योग्य की अयोग्य ?

( माझ्या मते अयोग्य. )

स्वतःचा व्यवसाय म्हणून

स्वतःचा व्यवसाय म्हणून स्वीकारलाच पाहिजे व स्वीकारत नसेल तर तिला बलपूर्वक तो तसा स्वीकारायला लावावा - हे अनु राव च्या मते योग्य की अयोग्य ?

माझ्या मते पण पूर्ण पणे अयोग्य.

I wish you were here ... we

I wish you were here ... we could have had a glass of Michelada !!!

लोलोलोलोलोल, काय ते अज्ञान.

लोलोलोलोलोल, काय ते अज्ञान. मान गये.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बॅटोबा, तू हा विषय का लाऊन

बॅटोबा, तू हा विषय का लाऊन धरतो आहेस? हे जरा सांग.

चुकीवर पांघरूण घालण्याचा

चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न रोचक (चिंज पद्धतीने रोचक) आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

रोचक हा नवीन तिरकस शब्द

रोचक हा नवीन तिरकस शब्द मुसुंनी काढला माझ्या आठवणीप्रमाणे. मला तो धागा आठवत नाही. पण क्षण आठवतो आहे जेव्हा मला त्या कल्पनेचे कौतुक वाटले होते (स्माईल) एखाद्याची चूक लक्षात आणुन द्यायचा प्रचंड पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह मार्ग (स्माईल)

भटजीगिरी

बॅटमॅन , मला असे वाटते कि केवळ वादाकरिता वाद वाढवू नयेत . संदर्भ बघा . 'त्यांच्या ' उर्वरीत लिखाणावरून त्या सरंजामशाही जातीय वादी प्रवृत्तीने मागासवर्गीयांच्या बाबतीत तुच्छता पूर्वक उल्लेख करत असतील असे वाटत नाही ( unless तुम्ही संपूर्ण पुरुष वर्गाला मागासवर्गीय मानत असलात..... ) , तेव्हा सोडा आता . फार तांत्रिक होऊ लागलंय
अवांतर : मी मात्र ' भटजीगिरी ' हा शब्द बऱ्याच वेळा तुच्छतेने वापरतो , माझ्या अनेक पूर्वजांनी उदर्निर्वाहाकरिता तेच केलेलं असणार . तरीही . तेव्हा संदर्भ बघणे महत्वाचे. कसें ?

बॅटमॅन , मला असे वाटते कि

बॅटमॅन , मला असे वाटते कि केवळ वादाकरिता वाद वाढवू नयेत . संदर्भ बघा .

बापटाण्णा, वादाकरिता वाद वाढवत नैये. बिनदिक्कतपणे असे शब्द वापरणार्‍यांना त्यामागची पार्श्वभूमी वगैरे जरातरी काही जाण आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित होते. आणि कायम मॉरल हाय ग्राउंडवरून इतरांना जज करू पाहणार्‍यांच्या इंटेग्रिटीबद्दल प्रश्न उत्पन्न होऊन त्यांच्या एकूणच मानसिक बैठकीबद्दल, वैचारिक अवस्थेबद्दल अतिशय काळजी वाटू लागते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

>>>> त्यामागची पार्श्वभूमी

>>>> त्यामागची पार्श्वभूमी वगैरे जरातरी काही जाण आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित होते.<<<<

हे जरी खरे वाटले/असले , तरी हा दोष आपल्या जवळ जवळ संपूर्ण समाजातच आहे असे मला वाटते . काहींच्या लेखणीत , तर बहुतेकांच्या मनात .
लिहिताना संवेदनशीलतेचा आणि तारतम्याचा अभाव या सदरात मी तरी हे टाकीन . संपूर्ण समाजाचे आपण काय करणार. का सापडला तो आणि फक्त तोच चोर.. नाही सापडला तो .... असे म्हणायचे आहे तुम्हाला

>>> कायम मॉरल हाय ग्राउंडवरून इतरांना जज करू पाहणार्‍यांच्या इंटेग्रिटीबद्दल प्रश्न उत्पन्न होऊन त्यांच्या एकूणच मानसिक बैठकीबद्दल, वैचारिक अवस्थेबद्दल अतिशय काळजी वाटू लागते.<<<<

या बद्दल मी काय बोलणार ? आख्खे पुणे ( आणि पुणेरी पणा बद्दल लिहिणारे इतर सर्व ) याच काळजीस लायक नाहीयेत का ?

>>> त्यांच्या ' उर्वरीत लिखाणावरून त्या सरंजामशाही जातीय वादी प्रवृत्तीने मागासवर्गीयांच्या बाबतीत तुच्छता पूर्वक उल्लेख करत असतील असे वाटत नाही ( unless तुम्ही संपूर्ण पुरुष वर्गाला मागासवर्गीय मानत असलात..... ) ,<<<<

याबद्दल काय म्हणता ?

ऐसीवरच्या घमासान चर्चा ज्याने

ऐसीवरच्या घमासान चर्चा ज्याने पाहिल्या नसतील त्याला असे वाटणे साहजिक आहे. असूदे.

शिवाय ज्या व्यक्तीने ही मुक्ताफळे ओरिजिनली उधळली त्याला आपण काहीतरी चुकीचे बोललो इतकेही कळत नसेल आणि कळूनही वळत नसेल तर अवघड आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ह्यात नवीन काहीच नाही....

ह्यात नवीन काहीच नाही. ह्याच लिबरल फेमिनिस्ट बाईंनी एकदा 'कोणाला कशाचं तर बोडकीला केसांचं' असे म्हणून जगातल्या सर्व बोडक्यांचा उद्धार केला होता. आम्ही ते विसरलो नाही आहोत.

1. अमेरिकेचं अप्रूप असे नसून

1. अमेरिकेचं अप्रूप असे नसून , देशी लोकांच्या तांत्रिक अस्मितेची तीव्र शब्दात निर्भत्सना होती ती . ( काय लिहिलंय मी हे ?) 2. जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल जाहीर निषेध। 3. मी निर्मळ मनाने आपणास धन्यवाद दिले ना ? मग ताडनं किं निमित्तम ?

तुम्ही कट्ट्याचा उल्लेख

तुम्ही कट्ट्याचा उल्लेख केल्यावर "अण्णा बरेच रिसॅार्सफुल आहेत" असा एकाने ( अभ्या..?)म्हटलं होतंच.दुसय्रा एका लेखात "जालावरचा कंटेंट'मध्ये एक मुद्दा मांडायचा राहिला तो म्हणजे गुगलशोध करताना मराठी/देवनागरी शब्दांनी काही शोधतात का लोक? तसं केल्यानेच मी मराठी संस्थळांवर पोहोचलो होतो.

म्हणजे गुगलशोध करताना

म्हणजे गुगलशोध करताना मराठी/देवनागरी शब्दांनी काही शोधतात का लोक ?

काही कल्पना नाही हो . (मी कसा इथे पोचलो हे मलाच माहित/आठवत नाहीये. त्यामुळे रॅन्डमली असे उत्तर दिले होते ते एक्दम गूढ वगैरे करून टाकले पब्लिक ने )

अण्णांना एक प्रश्न :तुमची

अण्णांना एक प्रश्न :तुमची शैली पाहता आणि फोटो पाहून तुम्हाला इतक्या वर्षांत मराठी संस्थळं कशी काय सापडली नाहीत?

>>> तुमची शैली पाहता आणि फोटो

>>> तुमची शैली पाहता आणि फोटो पाहून <<<< :::

फोटो आणि शैली यावरून हा प्रश्न का आला हे काही समजले नाही ,,

>>>> इतक्या वर्षांत मराठी संस्थळं कशी काय सापडली नाहीत? <<<<

शोधलीच नाहीत म्हणून सापडली नसावीत .

Actually " रॅन्डमली " असं उत्तर देणार होतो , पण ते उत्तर आदूबाळ यांनी ऑलरेडी ' गूढ ' वगैरे ठरवलंय , त्यामुळे ते उत्तर बाद झाले आहे

द नेशन इज डिमांडींग द आन्सर, वगैरे.

" रॅन्डमली " हे उत्तर गूढच आहे. नक्की काय शोधत होतात तेव्हा मराठी संस्थळं सापडली, ह्याचं ठोस, न्यूटोनियन, प्रेडिक्टेबल, वगैरे उत्तर हवंय.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रँडम हा शब्द व त्याचा अर्थ

रँडम हा शब्द व त्याचा अर्थ ठोस गणिती परिभाषेत बसायलाच हवा का ?

"पॉर्न" बद्दल काही सर्च मारला

"पॉर्न" बद्दल काही सर्च मारला "रँडमली" तर ऐसी चे नाव येण्याची शक्यता आहे ना अदिती तै.

एक वार चार पाच शिकार !!!!

एक वार चार पाच शिकार !!!!

गुरुमैय्या _/\_कसं सुचतं

गुरुमैय्या _/\_

कसं सुचतं ना म्हणजे.... क्म्म्माले!

कसं सुचतं ना म्हणजे रँडमली.

कसं सुचतं ना म्हणजे

रँडमली. ऑलवेज

मस्त वृत्तांत

आवडला.

>>आता रात्री अभ्या..ने फोटो

>>आता रात्री अभ्या..ने फोटो टाकल्यावर वृतान्ताकडे आलो.<<

कुठे आहेत फोटो?
मलाच दिसत नाहीत की अजून कोणाला दिसत नाहीत?

खरडफळ्यावर आहेत फोटो.

खरडफळ्यावर आहेत फोटो.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आता रात्री अभ्या..ने फोटो

आता रात्री अभ्या..ने फोटो टाकल्यावर वृतान्ताकडे आलो.सर्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या लिखाणशैलींतून प्रतित होणाय्रा अपेक्षित वयाप्रमाणेच आहे.पॅरडाइज नावही सार्थ आहे.
एकदा का समोरासमोर भेटलो की त्यानंतर त्या व्यक्तीच्या लेखन/विचारांवर टिका करण्याची धार कमी होते अथवा तसे करताना हात आखडतो असं मला वाटतं.मराठी आंजावरचा कुणीएक हे न राहता आपल्या सोसायटीत राहणारा एक मेंबर होतो आणि त्याच्याशी जसे जातायेता भेटल्यावर संयमित वागतो तसं होतं.

प्रतिसाद फार आवडला.

प्रतिसाद फार आवडला.

कट्ट्यांना मी नेहेमी लवकरच

कट्ट्यांना मी नेहेमी लवकरच पोचतो. कारण क्रमाक्रमाने येणार्‍या प्रत्येकाशी शेप्रेट गफ्फा मारता येतात.

मी पॅरेडाईजला पोचलो तेव्हा बाहेर चार लोक घोळका करून उभे होते. एकाच्या हातात पुस्तक, आणि त्याबद्दल तो पुस्तकधारी माणूस तावातावाने बोलत होता. बाकीचे लोक भक्तिभावाने ऐकत होते. ऐसीच्या कट्ट्याला पुस्तक असणे हा प्रंप्रेचा भाग असल्याने मला वाटलं हेच ते. पण आयडींची जी प्रतिमा बाळगत होतो त्याप्रमाणे काही वाटेनात. तरी रेंगाळलो, पण ते आपापल्या दुचाक्यांवरून लवकरच निघून गेले.

मग अ० बापटांना फोन लावला, तर ते आत मोक्याचं टेबल धरून बसले होते. त्यांच्यासमोर एक माणूस बसला होता. पण मी आल्यावर तो उठून, माझ्याकडे ढुंकूनही न पाहता चालता झाला. बॉडीगार्ड असावा.

अ० बापट मध्यमवयीन आहेत. त्यांच्या चेहर्‍यावरून आणि देहबोलीवरून त्यांनी भरपूर ग्रामारक्तीकरणलीळा केल्या असाव्यात असा माझा समज झाला, आणि पुढे तो खरा ठरला. माझ्या ओळखीच्या अन्य बापटांच्या पठडीत ते बसत नसल्याने त्या अर्थीही ते "अबापट" आहेत. ते काय व्यवसाय करतात ते त्यांनी समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला, पण ते मला नीटसं समजायला नाही. पण कॉर्पोरेट / कन्सल्टिंग क्षेत्रात कमावलेला सर्वज्ञ चेहरा करून मी मान डोलावली.

थोड्या वेळाने एक उंचसा माणूस आत येऊन शोधक नजरेने इकडेतिकडे पाहू लागला. अबापटांनी "कोणाला शोधताय?" असा खडा सवाल टाकल्यावर ते गम्बा निघाले. गम्बा धरून आता पुढील सर्व कट्टेकरी सॉफ्टवेअर / टेक्नॉलॉजी क्षेत्रातले आहेत. गम्बा मिपा आणि ऐसीवर बहुदा-वाचनमात्र-आणि-क्वचित-प्रतिसादमात्र असतात. एकदम शांत माणूस आहे. त्यांनी जास्त लिहायला हवं.

मग भाग मिल्खा भागमधल्या मिल्खासारखा दिसणारा एक माणूस आला. ते ढेरेशास्त्री आहेत हे कळल्यावर मला कैक रिश्टर स्केलचा धक्का बसला. माझ्या डोळ्यांसमोर ढेरेशास्त्रींची प्रतिमा ग्रंथांचे भारे वागवणार्‍या प्रकांड पंडिताची होती. मान तिरकी करून क्लासिक माईल्डसचा धूर इंजिनासारखा वर आणि मागे सोडून द्यायची त्यांची हातोटीही वाखाणण्यासारखी आहे.

एव्हाना गप्पांची गाडी "मराठी आंजाचा सुरस आणि चमत्कारिक इतिहास" या विषयाकडे वळली होती. तेव्हा ढेरेशास्त्रींनी त्यांच्या हपीसात अनेक लोक मआंजा उघडून बसतात अशी माहिती दिली. यातच अबापट तात्या अभ्यंकरांना ओळखतात असं त्यांनी सूचित केलं. "तुम्हाला ऐसीचा शोध कसा लागला" हा प्रश्न त्यांना विचारून घेतला, तेव्हा "रँडमली लागला" असं गूढ उत्तर मिळालं.

मनोबा आला तेव्हा नेमकी ढेरेशास्त्रींची इंजिनवेळ झाली होती. त्यामुळे त्यांना तो प्रथम दिसला. मनोबा बसने येणार होता, पण आयत्या वेळी दूरवरून मोटरसायकल हाणत आला. चर्चेचा रोख त्यानिमित्ताने मूळस्थानांकडे वळला, तेव्हा उपस्थितांपैकी बरेच लोक पुणे-३०च्या "वन स्क्वेअर माईल"मधले आजी किंवा माजी रहिवासी आहेत हे निष्पन्न झालं. त्यावरून आधीचा मआंजाचा धागा पकडून संस्थळांचा डावे-उजवेपणा यावर एक बारीक चर्चा झाली. त्यात "गब्बर इतक्या उजवीकडे आहे की जग डावीकडे दिसतं" वगैरे चर्चाही झाल्या.

मग थोड्या वेळाच्या अंतराने ऋ आणि घनु आले. ऋला मी आधी कट्टा-वृत्तांतात पाहिलं होतं, आणि त्याचा जालीय वावर आणि प्रत्यक्ष वावर यात काही फरक वाटला नाही. त्याने "बोभाटा डॉट कॉम" नावाच्या नव्या इन्फोमर्शियल संस्थळाची माहिती दिली. इन्फोमर्शियल हा शब्द ऐकल्यावर मी परत तो कॉर्पोरेट चेहरा करून मान डोलावली.

घनु या आयडीनामावरून आणि जालीय वावरावरून माझ्यासमोर स्वप्नील जोशी टैप चित्र उभं राहिलं होतं. पण प्रत्यक्षातला घनु कोणालाही बुक्कीत ठार करू शकेल. पण त्याला गणपतीची खरेदी करण्यासाठी हायर अ‍ॅथॉरिटीजनी रविवार पेठेत पिटाळलं आहे हे समजल्यावर तो बाऊन्सर नसून स्वप्नील जोशीत्व कायम आहे यावर विश्वास बसला.

या दोघांशी माझं जास्त बोलणं होऊ शकलं नाही, कारण दोघेही टेबलाच्या टोकाला बसले होते. फिर कभी...

मग थोड्या वेळाने चिंजं आले. चिंजं मोजकंच बोलतात. पूर्वी ते भरपूर लिहीत असत, पण हल्ली दोन्हीकडे लंघन करायचं ठरवलेलं दिसतंय. अबापटांनी त्यांना मालक मालक म्हणून लय त्रास दिला. त्यावर ऐसीचे मालक नक्की कोण असा परिसंवाद झडायला लागला, पण चिंजंनी "व्यवस्थापन अपौरुषेय असतं" वगैरे सांगून विषयाला कात्रज दाखवला. गम्बा यांनी ऐसीवर मोजकं लेखन होतं अशी तक्रार केली. त्यावर मनोबा, ढेरेशास्त्री यांनी अजो आणि राकु या मेगाबायटींच्या मक्तेदारांची आठवण काढली. मग त्याच अनुषंगाने बॅट्या (आणि त्याचं संशोधन), अनुराव, शुचि (आणि त्यांचे आयडी) वगैरे चर्चा निघाल्या.

बाकी मनोबाने चर्चांचे गोषवारे लिहिले आहेतच. (मनोबा उत्तम नोट्स काढतो असं निरीक्षण आहे. त्याने मागे बसच्या तिकिटावर लिहिलेल्या व्याख्यानाच्या नोट्सवरून आख्खा धागा काढला होता. कॉलेजमध्ये त्याच्या नोट्सवर पुढच्या पाचसहा पिढ्या पास झाल्या असणार.)

मध्येमध्ये चहाचं आचमन सुरू होतंच. मी आठेक कप तरी चहा प्याला असेल.

बाहेर एक फोटोसेशन झालं. त्यात क्यामेरा माझा आणि फोटोग्राफर पॅरेडाईजचा वेटर असल्याने गाडीच्या आरश्याचं रिफ्लेक्शन येणे वगैरे प्रकार झाले. ते गोड मानून घ्यावेत.

फोटोसेशननंतर माझ्या मनात सध्या असलेला एक प्रश्न विचारला - "ऐंशीच्या दशकात लोक नार्कोटिक्सची नशा कशी करत होते?". त्यावर माहितीचा अक्षरशः धबधबा कोसळला. त्याचं संगतवार संकलन केलं तर एक उत्तम लेख किंवा किमानपक्षी विकीपान तरी होईल. (कुठे आहेत माहीतगारमराठी?)

मला आणखी टायमपास करायची इच्छा होती, पण घरगुती शक्तींनी बोलावल्यामुळे नाईलाज होऊन मी निघालो.

जास्त भावुक होत नाही, पण मला मस्त मजा आली.

____________
Painting the town red
पण बुचडाविरहित
शब्द चुकला असेल कदाचित

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

आदुबाळ बघायचा कट्टा

मला आदुबाळ बघायचा होता. त्यामुळे कट्टा टाळणं सर्वस्वी अशक्य होतं. मराठी सारस्वतात (किती दिवसं लिहायचा होता हा शब्द) एकापेक्षा एक अनमोल रचना प्रसवणार्‍या हा बाळआदूला पुण्यात अवतरूनही न पाहणं म्हणजे साक्षात सरस्वती समोर 'चा चा चा' करत असताना कानात मराठी चित्रपट संगीत लाऊन डोळे मिटून बसण्यासारखंच होतं (कट्ट्याला न आलेल्यांचं हे वर्णन आहे बरं!..). आदुबाळ माझ्या अपेक्षेविरहीत अतिशयच न-पुणेकर वाटला. चक्क हसत वगैरे होता, एरवीही चेहर्‍यावर आठी नव्हती. त्यामुळे आवडूनच गेला. बाकी कोणताही एक विषय २ मिनिटांवर न टिकल्याने कट्टा रंगला असेच म्हणायला हवे. अर्थात कट्टोत्तर उभ्या गप्पा बर्‍याच 'नशील्या' असल्याने तेव्हाचं काही फारसं लक्षात नै. (जीभ दाखवत) (आणि होय ढेरेशास्त्रींची धुरावण्याची इष्टाईल खासच नजाकतभरी ए याच्याशी सहमती! प्यायची तर तशी नजाकत असेल तर! असं वाटून जावं इतकी!)

या विठोबासोबत पॅरेडाईजचंहं बर्‍याच वर्षांनी दर्शन झालं. बरंच माणसाळलंय पॅरेडाईज असं वाटलं. गिरण्या बंद पडल्यावर लालबाग-परळ भागात चिमण्या दिसायच्या पण धूर काही यायचा नाही. तसं काहीसं इथे फुकाडे दिसत तर होते पण हाटील धुरावलंय असं झालं नाही (पुर्वीचं पॅरेडाईज र्‍हायलं नाही)

एकुणात बर्‍याच दिवसांच्या तकातकीनंतर चार घटका मस्त मजेत गेल्या!

(टिपः बापटांना भेटाल तर पेनाने लिहायची प्रॅक्टिस करून ठेवा. मला पेन वगैरे इतक्या पुरातन आयुधांनी काही करायचं इतकं अप्रूप वाटलं म्हणून सांगू! (डोळा मारत) )

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>>टिपः बापटांना भेटाल तर

>>>टिपः बापटांना भेटाल तर पेनाने लिहायची प्रॅक्टिस करून ठेवा. मला पेन वगैरे इतक्या पुरातन आयुधांनी काही करायचं इतकं अप्रूप वाटलं म्हणून सांगू! <<<

च्यायला , मी तुमच्या आधीच्या पिढीतला वगैरे आहे हे ठीक आहे , पण पेन वापरणे हे इतके निअँडर्थल वगैरे काळातील होते हे ऐकून नवल वाटले ... आणि राव तुम्हीही अगदी काही फार भावी काळातले वगैरे वाटला नाहीत (डोळा मारत) , ( आणि हे उगाचच : मनोबा तर अगदी आमच्या पिढीतला वाटला , तश्याच ओझ्यांसकट ... @ मनोबा : सबुरी व थंडावा वगैरे )

>>>>चार घटका मस्त मजेत गेल्या! <<<<
हे महत्वाचें ,,, कसें ?

>>>>" साक्षात सरस्वती समोर

>>>>" साक्षात सरस्वती समोर 'चा चा चा' करत असताना" <<<<
अहाहा .... याचं ग्राफिक डिस्क्रिप्शन द्या हो कुणीतरी !!!

विषय सर्वथा आवडो

>>"ऐंशीच्या दशकात लोक नार्कोटिक्सची नशा कशी करत होते?". त्यावर माहितीचा अक्षरशः धबधबा कोसळला. त्याचं संगतवार संकलन केलं तर एक उत्तम लेख किंवा किमानपक्षी विकीपान तरी होईल. (कुठे आहेत माहीतगारमराठी?)<<

हा विषय निघाल्यावर मी मोजकंच बोललो की अधिक? - जस्ट क्यूरियस (डोळा मारत)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जे बोललात ते मी ज्यासाठी

जे बोललात ते मी ज्यासाठी विचारत होतो त्यासाठी रिलेव्हंट होतं. तुम्हाला सविस्तर व्यनि करणार आहे. (मी काही नावं चुकीची ऐकली असण्याची शक्यता आहे.)

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

वेलकम

>>आता एकदा मोजक्यापेक्षा अधिक बोलण्यासाठी तुमची सवडीची वेळ सांगावी , म्हणजे अधिक जानकारी प्राप्त कर सकेंगे , कसें ? <<

>>तुम्हाला सविस्तर व्यनि करणार आहे.<<

वेलकम!

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काळजी नसावी

" हा विषय निघाल्यावर मी मोजकंच बोललो की अधिक? - जस्ट क्यूरियस (डोळा मारत)"

आपण मोजकंच बोललात पण तेही अधिक होतं (स्माईल) आता एकदा मोजक्यापेक्षा अधिक बोलण्यासाठी तुमची सवडीची वेळ सांगावी , म्हणजे अधिक जानकारी प्राप्त कर सकेंगे , कसें ?

नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण.

नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण. फोटो सेशन नंतरच्या उत्तरार्धाची वाट बघतोय . अदिती आणि घासकडवीं यांच्या वरील मालकविषय तू न लिहिल्यामुळे तुझा वेलींगकर होणार बहुधा. (आणि ते dc चे बापट कोण ? ) मालक लोक ( जे कोण आहेत ते ) या विषयावर प्रकाश टाका. आदूबाळ , बॉडीगार्ड नि तुला नीट बघून ठेवला आहे....

dc चे बापट कोण मुक्तसुनीत.

dc चे बापट कोण

मुक्तसुनीत.

वृत्तांत एकदम आवडला. पेंटींग

वृत्तांत एकदम आवडला. पेंटींग टाऊन रेड काय बॉडीगार्ड काय (स्माईल)

सुरेख. जोरात झालाय

सुरेख. जोरात झालाय कट्टा.
सगळ्या पुणे तीसात एक सोलापूर चार लावायची फार इच्छा होती पण दैवगतीपुढे आणि दारातल्या गिर्‍हायकांपुढे विलाज नाही. मनोबा अगदीच शाळकरी दिसतोय फोटोत. मी त्याला दै. सकाळचा डीटीपी ऑपरेटर म्हणायला कमी केले नसते. चिजं मात्र अपेक्षेबरहुकुम. ऋ ची इमेज पण वेगळीच वाटली(फोटो पाहता) तो सकाळचाच सोलापूर निवासी संपादक म्हणून खपून जाईल. ढेरेशास्त्री जोरात. स्वीसआर्मीच्या अटेन्शनात एकदम. आन्ना बापट हे कुणी जुने मिपाकर निघताहेत की काय ही भीती होती. खोटी ठरवल्याबद्दल धन्यवाद. आदूबाळा हा साखरसम्राटाच्या ज्येष्ठ पुत्राप्रमाणे (जो स्वतः राजकारण करतो पण दिसत नसतो. बॅनरावर धाकटे राजे असतात. कार्यकर्ते मात्र बाळासाहेबाचा फोन आल्याशिवाय जागेवरुन हलत नसतात) वाटतोय. खिशात घातलेल्या हातात एकात दोन आयफोन आन दुसर्‍यात ग्लॉक पिस्टल असावे असा दाट संशय आहे. चर्चाविषय पाहता कट्ट्यात एखादा इंटेलिजन्सवाला असावा अशी पण शंकाय. घनुरावांशी परिचय नाही पण फोटोवरुन त्यांच्या बुक्कीचा अंदाज येतोय.

बर्‍याच वेळेला 'तरुण था मय'

बर्‍याच वेळेला 'तरुण था मय' म्हणणारे आदूबाळ हे ५५-६० वर्षांचे असतील असे मी समजत होते.. (जीभ दाखवत)

सुरेख. जोरात झालाय

सुरेख. जोरात झालाय कट्टा.
सगळ्या पुणे तीसात एक सोलापूर चार लावायची फार इच्छा होती पण दैवगतीपुढे आणि दारातल्या गिर्‍हायकांपुढे विलाज नाही. मनोबा अगदीच शाळकरी दिसतोय फोटोत. मी त्याला दै. सकाळचा डीटीपी ऑपरेटर म्हणायला कमी केले नसते. चिजं मात्र अपेक्षेबरहुकुम. ऋ ची इमेज पण वेगळीच वाटली(फोटो पाहता) तो सकाळचाच सोलापूर निवासी संपादक म्हणून खपून जाईल. ढेरेशास्त्री जोरात. स्वीसआर्मीच्या अटेन्शनात एकदम. आन्ना बापट हे कुणी जुने मिपाकर निघताहेत की काय ही भीती होती. खोटी ठरवल्याबद्दल धन्यवाद. आदूबाळा हा साखरसम्राटाच्या ज्येष्ठ पुत्राप्रमाणे (जो स्वतः राजकारण करतो पण दिसत नसतो. बॅनरावर धाकटे राजे असतात. कार्यकर्ते मात्र बाळासाहेबाचा फोन आल्याशिवाय जागेवरुन हलत नसतात) वाटतोय. खिशात घातलेल्या हातात एकात दोन आयफोन आन दुसर्‍यात ग्लॉक पिस्टल असावे असा दाट संशय आहे. चर्चाविषय पाहता कट्ट्यात एखादा इंटेलिजन्सवाला असावा अशी पण शंकाय. घनुरावांशी परिचय नाही पण फोटोवरुन त्यांच्या बुक्कीचा अंदाज येतोय.

कट्टा झकास झाला! बापटकाका,

कट्टा झकास झाला! बापटकाका, जंतू, मनोबा, आदूबाळ, घनू, ऋ होते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अति संक्षिप्त, लघु, सूक्ष्म वृत्तांत , आठवतय ते, आठवतय तसं

फारसं लक्षात काही नाही. गप्पा भरपूर झाल्या. मनसोक्त झाल्या. पण खूपदा ग्रुपमध्ये लै गप्पा झाल्या, टाळ्या दिल्या....भरपूर हसलो नि मग उथून आपल्या कामाला लागलो की मुळात नक्की काय आणी किती बोललो ते नेमकं लक्षात रहात नाही (निदान माझ्या तरी). तसं सध्या झालय. त्यामुळं अगदिच त्रोटक अति अति संक्षिप्त आठवतय ते दोन चार वाक्यात लिहितो.
मी गेलो तोवर लोक ऑलरेडी जमलेच होते. मी जॉइन केलं टेबल. माझ्या डावीकडे अण्णा बापट (काका ?) बसले होते. थोड्यावेळाने चष्मिश फ्रेंच दाढीवाले जंतू आले. ते उजवीकडे होते. माझ्या बरोब्बर समोर दाढीवाला,हॅण्डसम,दाट लांब केसांचा आदुबाळ. आदुबाळच्या डावीकडे गम्बा(काका ?) . आदुबाळच्या उजवीकडे दाढीवाला चश्मिश अनुप ढेरे. अनुप ढेरेच्या उजवीकडे ऋ (तोच तो संतुलितसम्राट ऋ) त्याच्या बरोब्बर समोर भरदार,धिप्पाड घनु. जंतू आल्यावर एकदम मंडळी उठून उभी राहिली. चिंजंना साइट वगैरे चालवायचे पैसे मिळत नाहित म्हणे.
अनुप ढेरे व अण्णा बापट फुके आहेत. सिगारेट पितात. आदुबाळ व ढेरे दोघे भरपूर दाढी वाढवून आलेले. आदुबाळ हॅण्डसम दिसतोच. बोलायची ढबही मस्तय. थेट्रात ट्राय करु शकेल. गब्बर, बॅट्या, अजो, पटाइत, शुचि , न वी बाजू ह्या सदस्यांची (आणी ऑफकोर्स अनुराव ह्या बॉट/कॉम्प्युटर प्रोग्रामची!) विविध कारणांनी आठवण निघाली. तेवढ्यात भरदार घनु आला.
चर्चेतले काही रॅण्डम मुद्दे/वाक्य --
युरोपही काही सगळा स्वच्छ स्वच्छ , भारी वगैरे नाहिये. तिथेही काही ठिकाणी घाण, अस्वच्छता आहे. युरोपातलाही मोठ्ठा समाज काही दशकांपूर्वीपर्यंत दारिद्र्यात होता.
काही दशकांपूर्वीचे "कट्टा" अनियतकालिक भारी आहे. त्याकाळातला तो टारगटपणा, वात्रटपणा आहे. थोडक्यात जालिय टवाळगिरीची छापील आवृत्ती. म्हटलं तर भंकस/टैम्पास. पण त्या भंकसमध्येही एक क्वालिटी. झक्कास आणी धम्माल प्रकार.
जंतूंना फ्रेंच शिकून दोनेक दशकं झालित. विशेष कारण ट्रिगर असा काही नाही शिकायचा. फक्त हौस्/आवड म्हणून.
राकु, अजो मस्त आय डी होते.
युरोप/पश्चिम जगत समृद्ध आहे म्हणून तिथे तुलनेने प्रगती वगैरेचा विचार होतो की मग प्रगती/उन्नतीसाठी ते प्रयत्न करतात म्हणून ते समृद्ध आहेत ?
उत्तम कांबळे ह्यांचा समलैंगिकांबद्दलचा ताजा लेख....
नारायण मूर्ती ह्यांचा तथाकथित साधेपणा.
कॉर्पोरेट कंपन्यांच्या गमतीजमती. पर्सिस्टंटचं आय पी ओ ऐनवेळी पुल आउट करावं लागणं.

.
.
निघताना ड्रग्ज, अफू, गांजा, हिप्पी, महेश योगी, बीटल्स , त्या काळातलं पश्चिमेतलं समाज जीवन, हिप्पीगिरी त्यांना परवडू शकण्याची कारणं, मुळात हिप्पीगिरीची ती मर्यादित का असेना पण ती क्रेझ निर्माण होण्याची संभाव्य कारणं वगैरे बाबींबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या.

बाकींच्यांना जे असं आठवतय त्यांनी अधिक भर घालावी. मला ऋ, घनु, ढेरे ह्यांच्या बाजूचं फारसं काही ऐकू येत नव्हतं. खुर्च्या सरकवण्याचा सतत आणी भरपूर आवाज होत होता.शिवाय ट्राफिकचे भोंगे वगैरे होत होते.
वृत्तांतातून वाटत्य तसं सगळं शिरेस वगैरे नव्हतं. गप्पा विंट्रेश्टिंग होत्या. शिवाय हसणं खिदळणं वगैरेही झालं. पण सविस्तर नेमकं आठवत नाहिये. मी जरा व्यग्र असेन. काही दिवस तरी लॉगिन होणार नाहिये सध्या.
.
.
कट्टेकर्‍यांनो, नारायण मूर्तीने जो लेख अझीम प्रेमजी ह्यांच्याबद्दल मोठ्या आदराने, कौतुकाने लिहिलाय , तो हा लेख --
http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/the-azim-premji-i-...
जरुर वाचा.

छान वृत्तांत

मुळात नक्की काय आणी किती बोललो ते नेमकं लक्षात रहात नाही

यापुढे कट्ट्यांना टंकनिका (की टंचनिका? (डोळा मारत)) ठेवावी अशी सूचना करते.
.

मी गेलो तोवर लोक ऑलरेडी जमलेच होते.

म्हणजे तू लेट्लतिफ होतास (डोळा मारत)
.

घनु. जंतू आल्यावर एकदम मंडळी उठून उभी राहिली.

हाहाहा
.

गब्बर, बॅट्या, अजो, पटाइत, शुचि , न वी बाजू ह्या सदस्यांची (आणी ऑफकोर्स अनुराव ह्या बॉट/कॉम्प्युटर प्रोग्रामची!) विविध कारणांनी आठवण निघाली

काय रे सांग की आमची काय काय बदनामी केलीस ते. Sad
.
बाकी वृत्तांताचे प्रत्येकाचे (अनसेन्सॉर्ड) व्हर्जन येऊ द्यात (डोळा मारत)

वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

+१

+१

मनोबाला

मनोबाला की मनो बाला ? त्यावर अवलंबून आहे.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

पुणे कट्टा २०१६ :

पुन्हा आठवण करून देतो उद्याच्या कट्ट्याची :

शनिवार ३ मे , सकाळी ९ वाजता कॅफे पॅराडाईज , कर्वे रोड , पुणे , सह्याद्री हॉस्पिटल च्या समोर .

ज्यांनी येणे कन्फर्म केले आहे असे सभासद :
आदूबाळ
अनुप ढेरे
मन
चिंतातुर जंतु
बापट
गंबा

अभ्या , अभिजित अष्टेकर , मधुमुक्त , बॅटमॅन .... चला लवकर यायचं ठरवा आणि या कट्ट्यावर ( आणि तसे कळवा इथे !!!)

उद्या एकमेकांना ओळखायचं कसं ? काही आयड्या आहेत का ?

चला अजून कोण कोण येणार ? सर्वांचे स्वागत !!!!

उद्या एकमेकांना ओळखायचं कसं?

>>उद्या एकमेकांना ओळखायचं कसं ? काही आयड्या आहेत का ?<<

मी मनोबाला ओळखतो. त्यामुळे तुम्हीही मनोबाला ओळखायला शिका, मग पुढचा मार्ग सुकर आहे (डोळा मारत)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्र

मी मनोबाला ओळखतो...

तो तुम्हाला ओळख दाखवणार का, हा प्रश्न कळीचा आहे.

असो; जंतूचं चित्र आहे की दिवाळी अंकात; तो सहज ओळखता येईल. (चित्रश्रेय : अमुक; संदर्भ )
जंतू

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये

भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लवकरच पर्शियन/फारसी भाषेचा वर्ग सुरु होत आहे.फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी शिकवणार आहेत
अधिक माहिती पुढीलप्रमाणे:
सुरुवात: दि. २४ सप्टेंबर २०१६ पासुन
कालावधी: ६ महिने
वेळ: दर शनिवार सकाळी ९.३० ते ११.३०
शुल्क: रु १०००/-
इच्छुकांनी ०२०-२४४७२५८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

येण्यासाठी काही क्रायटेरिया

येण्यासाठी काही क्रायटेरिया आहे का

अभिजित , तुमचा प्रश्न नक्की

अभिजित , तुमचा प्रश्न नक्की कळला नाही. . येण्यासाठी कोणताही citerion नाही. नक्की या. स्वागत .

अहो तसं नाही. म्हणजे काहीजण

अहो तसं नाही. म्हणजे काहीजण इथे अगोदरपासून एकमेकांना ओळखतात. केवळ त्यांचंच गेट टुगेदर आहे की सर्वांसाठी आहे इतकंच विचारायचं होतं.

तसं काही नाहीये . माझीही

तसं काही नाहीये . माझीही कोणाशीही अजून पर्सनल ओळख नाहीये.या तुम्ही ...

हम्म.........

हम्म.........

आबा तुम्ही पॉप्युलर आहात

आबा तुम्ही पॉप्युलर आहात बर्का (डोळा मारत)

त्यापेक्षा पॅरेडाईज ही

त्यापेक्षा पॅरेडाईज ही गूढरम्य जागा कशी आहे हे पाहण्याचा जास्त उत्साह आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

बेटिंग विसरू नका.

अण्णा बापट नाव बदलणार का, ह्याबद्दल लोकांना बेटिंग करायचं असेल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुडलकमध्ये इतकी गर्दी असते की

गुडलकमध्ये इतकी गर्दी असते की शांतपणे बसता येत नाही. मला पॅराडाइज चालेल.

हि काय चुकून कॉपी पेस्ट आहे

हि काय चुकून कॉपी पेस्ट आहे का आपण येणार आहात पॅराडाईज ला असे समजायचे ? ( cryptic message वरून काही नक्की लक्षात येत नाही हो , म्हणून हा प्रतिप्रश्न )

एवढे गोष्टीवेल्हाळ भेटल्यावर

एवढे गोष्टीवेल्हाळ भेटल्यावर काय होणार?
"नंतर कधीतरी" श्टोय्रा खूप जमा झाल्यात.

पुणे कट्टा २०१६

आदूबाळ पुण्यात येत आहेत . त्यानिमित्त कट्टा करूयात काय ? आदूबाळ यांनी त्यांच्या ३ तारीख ( शनिवार ) दुपार हि preferred date अँड time दिलेली आहे .

त्यांचा चॉईस : कॅफे paradise , कर्वे रोड ( मला OKK , पण इतरांनी बघा बुवा !!! ) किंवा गुडलक ( डेक्कन जिमखाना ) असे दिले आहेत .

चला ,कोणकोण येणार , अजून काही जागांचे चॉईस वगैरे लिवा पटापट !!!

बादवे , archives मधील २०१४ च्या कट्ट्याचे आद्य जनक ऋषिकेश हे हल्ली दिसत नाहीयेत , कुठे असतात ते ?

गुडलकमध्ये इतकी गर्दी असते की

गुडलकमध्ये इतकी गर्दी असते की शांतपणे बसता येत नाही. मला पॅराडाइज चालेल.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिं ज , बॉल तुमच्या कोर्टात

चिं ज , बॉल तुमच्या कोर्टात आहे आता

सात वाजता घराबाहेर?

>>चिं ज , बॉल तुमच्या कोर्टात आहे आता<<

सकाळी ७ला माझ्या कोर्टात (बोले तो अंगणात) पहाटदेखील झालेली नसते हो! ज्यांना शनिवारी सुटी नाही त्यांना सकाळी उशीरात उशीरा किती वाजता जमेल?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सोयीची वेळ सान्गा चिंतातुर

सोयीची वेळ सान्गा चिंतातुर जंतू , त्याप्रमाणे ठरवू . मी आणि अदूबाळाने preferred वेळ सांगितली . ढेरेंना पण ७ वाजता काकडआरती वेळ वाटत आहे. सांगा तुम्ही , तुमची preferred लवकारातली लवकर वेळ , मग सगळे मिळून ठरवू !!!