काय करावे? धंदा-उद्योग की?

नमस्ते मंडळी. माझ्या "नक्की किती पैसे पुरेसे?" या धाग्यावर ज्या
मन्डळीनी सल्ले दिले होते त्यांचे मनापासून आभार मानून आज एक नवीन
मुद्दा उपस्थित करत आहे. तर मंडळी सध्या मी कोकणातील घरी निवृत्त जीवन
जगत आहे. जोडीला एम्टीडीसी च्या न्याहरी निवास योजनेमध्ये सहभागी होवून
घरातील काही खोल्याचा वापर पर्यटकांसाठी देवून त्यातून महिन्याला काही
रक्कम उभी राहते. ज्याना या उन्हाळ्यात कोकणात यायचे असेल अशानी जरूर
संपर्क करावा!

तर आमच्याकडे वरील न्याहारी निवास योजने अन्तर्गत काही पाहुणे गेल्या आठवड्यात आले होते . त्यातील एक सुमारे चाळीशीचा दाढीधारी इसम होता . त्याच्याशी चांगलीच मैत्री झाली .त्याने आपली कहाणी सांगितली. सदरहू इसम मूळचा कोकणातील असून गेली 10 वर्षे आफ्रिकेत टेक्निशियन म्हणून कामाला होता. मात्र मागच्याच महिन्यात त्याच्या कंपनीने कामगार कपात केल्याने तो गावी परत आला. येताना सुमारे 15/20 लाख रुपये सेव्हिंग होते . त्याचे मुंबई किंवा अन्य शहरात घर नसून एकटाच आहे. गावी एक जुने घर आंब्याची दोनचार कलमे आहेत .
अशा परिस्थितीत पुढे काय करावे ? असा प्रश्न त्याला पडला होता . परत दुसरी नोकरी शोधून परदेशी जाण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता. पण हाताशी असलेल्या पैशात काय करावे ज्यायोगे पुढील आयूष्य चांगले जाईल? कारण तो तर वैतागून आध्यात्मिक संन्यास घेण्यासाठी हिमालयात जाण्याचा विचार करत होता !

चाळीशीत असल्याने लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता किंवा कदाचित आर्थिक परिस्थितिमुले शक्य झाले नसावे, त्याबाबतीत बोलायला फारसा उत्सुक नव्हता . निघताना त्याने त्याचा मोबाइल नंबर आणि पत्ता मला दिला आणि योग्य तो सल्ला द्यावा अशी विनंती केली .
तर मंडळी, त्याने पुढे काय करावे?
1. धंदा /उद्योग ? कोणता?
2. नोकरी ?
3. शेअर्स/इन्व्हेस्त्मेंट ?
4. लग्न करावे का? का करावे?
5. संन्यास /अध्यात्म की अन्य काही ?

आपल्या उत्तरांच्या प्रतीक्षेत ...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

लग्न करावं की. अजुन ४० वर्षे आयुष्य आहे की. अन सहवास महत्त्वाचा नाही वाटत?

ऐसीवरील शिरीष फडके यांचेच विचार उधृत करते -

विवाह करताना तरुण-तरुणींच्या मनात अनेक अपेक्षा असतात. केवळ जोडीदार किंवा सोबती मिळावा आणि शारीरिक गरजा भागवाव्यात एवढाच मर्यादीत हेतू कधीच लग्न करणार्या जोडप्यांमध्ये नसतो. आपले जीवन अधिक प्रगल्भ व्हावे, आपले जीवन अधिक नियमीत व्हावे, आपले वेगळे असे व्यक्तिमत्व असावे किंवा घडावे असे देखील लग्न करण्यामागे हेतू असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

वैतागून आध्यात्मिक संन्यास घेण्यासाठी हिमालयात जाण्याचा विचार करत होता

ROFL ROFL ROFL नाही....,आयुष्याला वैतागणे समजुन घेण्यासारखे आहे, पण वैतागला म्हणून सन्यास घेणे इज लाइक हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी Smile असो मी इतका अनुभवी नाही की काय करावे सल्ला देउ शकेन पण काही गोष्टी अवश्य शेअर करेन..

१) एक गोष्ट नक्कि पैसा वाढतच राहील अशा ठीकाणीच गुंतवणे आवश्यक. न वाढणारा पैसा हमखास संपुनच जातो.

२) अजुन तो १०-१५ वर्षे तर आरामात काम करु शकतो त्यामुळे सेवा निवृत्ती वगैरे अजिबात नको. काही ना काही करणे आवश्यक, त्याचे जे कौशल्य आहे त्यात नोकरी करावी, आफीक्रा तर अति उष्ण देश आहे मग इथल्या वातावरणाशी त्याला जुळवुन घेणे नक्किच अवघड नाही. अजुन १५ वर्षे नक्किच हातात आहेत. एखाद्या विधवेशी लग्न करावे, म्हणजे संसाराचा आर्थीक व मानसीक ताणही येणार नाही.

३) आता त्यानेच हा विषय गांभीर्याने काढला अहे असे समजुन... बदल म्हणून अधुन मधुन जरा भटकंती करत रहायला हरकत नाही पण जपुन. विषेशतः सन्यासी आयुष्याची भुरळ काही परिस्थीतीमधे लागु शकते, म्हणजे अध्यात्मीक उन्नती वगैरे नाही पण जर सुरेख सेटींग मिळणे जसे, शिशत्व पत्करायच्या ऑफर, सोबत राहण्याचा आग्रह वगैरे सुरु होउ शकते (जर तुमच्यातील X फॅक्टरचा त्यांना उपयोग होउ शकतो असे त्यांना वाटले असेल तर हमखास प्रेमाचा आग्रह होतोच). यापुस दुर राहा. तसेही बहुतांश संन्यासी जेवण बनवणे, उरकणे यामधेच दिवसातील ७५%+ वेळ घालवतात. मग यासाठी सन्यास हवा कशाला हा खरा प्रश्न आहे. २५% देवधर्म संसारात राहुनही सांभाळता येतो.

४) नवीन कौशल्ये शिकुन घ्या. इट्स द बेस्ट वे टु कीप गोइंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

१. कुठल्या ही पंथात सन्यास सहज सहजी मिळत नाही. पुष्कळ नियमांचे पालन करावे लागते. शिवाय त्या संप्रदायाचा 'संसार' ही करावाच लागतो. पण भगवे वस्त्र परिधान करून, भिक मागत आयुष्य कंठीत करता येते.
२. कोंकणात घर आणि छोटीसी बाग आहेत. थोडी जमीन आणखीन विकत घेऊन बाग फुलवित येते. किंवा थोडी शेती करता येते. आयुष्य आरामात निघून जाईल.
३. ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरु करता येतो. खादी ग्रामुद्योग किंवा आजकाल शिकलेला असेल तर पतंजलीतन जाऊन त्यांच्या ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण घेऊन कार्य सुरु करता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरु करता येतो. खादी ग्रामुद्योग किंवा आजकाल शिकलेला असेल तर पतंजलीतन जाऊन त्यांच्या ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण घेऊन कार्य सुरु करता येते

ग्रामोद्योग हा शब्द बहुधा अधिकृत आणि सर्वमान्य असला तरी, व्याकरणदृष्या ग्रामुद्योग (ग्राम + उद्योग) हा अधिक योग्य वाटतो. नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न + उत्तर = प्रश्नोत्तर...
निर् + उत्तर = निरुत्तर...

आधीच्या शब्दातले शेवटचे अक्षर अकार-पूर्ण असेल तर उ चा ओ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वोक्के!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0