फायरफॉक्स आता मराठीतून.

बेव ब्राउझिंगसाठी मराठी भाषेतून पर्यात उपलब्ध व्हावेत म्हणून बरेच जण झटत आहेत. बहुतेक त्याचंच फलित म्हणून आता फायरफॉक्स मराठीतून उपलब्ध झालेलं आहे. मराठी बरोबरच बंगाली, कानडी, हिंदी, गुजराती, मल्याळी, पंजाबी, उडीया आणि तेलगु अशा इतर भारतीय भाषांमध्येही फायरफॉक्स आता उपलब्ध आहे.

बर्‍याच लोकांना, विशेषत: जेष्ठ नागरीकांना संपूर्ण इंग्रजीतून असलेले वेब ब्राउझर वापरण्यापेक्षा मराठीतून असलेले ब्राउझर, सोप्या भाषांतरामुळे आणि थोड्या वापरामुळे,, वापरणे कदाचित सोपे जाईल. भाषांतरातील काही शब्द आता पुस्तकी वाटत आहेत तर काही शब्द कमी वापरामुळे अनोळखी. पण जसजसा वापर वाढेल तसतसे भाषांतरीत शब्द आपोआप रुळतील तरी किंवा बदलले जातील. काही तांत्रिक शब्द मात्र इंग्रजीच ठेवलेले दिसत आहे. एकंदरीत रूप पाहता मला फायरफॉक्स मराठी आवडलेलं आहे.

एकाच वेळी, एकाच संगणकावर इंग्रजी आणि मराठी फायरफॉक्स इन्स्टॉल करता येईल का हे पहावं लागेल. आता तरी तशी सोय दिसत नाही. (काही व्हर्चुअल इन्स्टॉलेशन्स वापरून तसे करता येणे शक्य व्हावे.)

खाली ब्राउझरचे काही फोटो:
 

इन्स्टॉलेशन
 

#

#

#

 

 

 

माझा वैयक्तिक आवडीचा ब्राउझर फायरफॉक्स आहे. फायरफॉक्सचा अ‍ॅड्रेसबार माझ्यामते इतर सर्व ब्राउझर्सपेक्षा 'स्मार्ट' आहे. त्याशिवाय इम्बेडेड गुगल शोध, मराठी रिझल्ट्स देण्यात फार उपयोगी पडेल.

 

#

#

#

#

#

#

 
 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी तसेच इतर भाषेतले फायरफॉक्स तुम्ही इथून डाउनलोड करू शकता: http://www.mozilla.org/en-US/firefox/all.html
 

विशेष सुचना: नविन फायरफॉक्स आल्यानंतर सुरुवातीला त्यात थोडे बग्स असण्याची शक्यता असते. विशेषत: अ‍ॅड-ऑन्सशी कंपॅटिबिलीटीचा प्रॉब्लेम होऊन फायरफॉक्स (पर्यायाने संगणक) हळू होऊ शकतो, तसेच क्रॅश (फक्त ब्राउझर) होऊ शकतो.

 

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

इन्टरेस्टींग आहे.धन्यवाद काका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी चांगली आहे, पण फायरफॉक्सला मराठीत लोकलाईझ करताना भाषेची फार तोडमोड केलेली दिसते आणि भाषा जरा कृत्रिमही वाटते आहे. असो. बातमीबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फायरफॉक्सचं हे मराठीतलं लेखन 'बिनतारी' यांनी केलं आहे का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

फार छान प्रयत्न आहे मोझीलाचा. बाकी फायरफॉक्ससाठी आपले देवकाका अग्नीकोल्हा म्हणायचे याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मी गेली दोनेक वर्षे फाफॉ मराठीतच वापरतो आहे. माझा अनुभव उत्तम आहे
फक्त भाषांतरीत सुचना बर्‍याचदा गमतीदार असतात. पहिल्यांदा 'आता अद्ययावत प्रतिष्ठापित करत आहे' हा त्यांचा मेसेज वाचल्यावर धो धो हसलो होतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Does it let typing in Nagari script? Gamabhana plugin doesn't work on higher versions of FF.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Does it let typing in Nagari script? Gamabhana plugin doesn't work on higher versions of FF.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीसुद्धा फायरफॉक्सच वापरते...पण इंग्रजीवालं. नविन मराठी व्हर्जन खुपच गमतीदार दिसतंय.
प्रतिष्ठापित काय, शिफारसीय काय, नीवडल्याबद्दल काय..असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निदान मोडकेतोडके का होईना प्रयत्न करतायत हे महत्त्वाचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रयत्न गेली कित्येक वर्षे चालू आहे आणि तो मोडकातोडकाच राहिला आहे हे महत्त्वाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोझीला फायरफॉक्स ब्राउझरची अस्सल भारतीय आवृत्ती डाऊनलोड करा
http://www.epicbrowser.com/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जयंत जोपळे

'अग्निकोल्हा'(फायरफॉक्स) मराठीतहि आल्याचा आनंद नोंदवतांनाच तेथील भयानक मराठीवरहि आक्षेप घ्यावासा वाटतो. इंग्रजी लिखाणात स्पेलिंगची आणि व्याकरणाची चूक झाली तर आपल्याला लोक अडाणी आणि अर्धशिक्षित मानतील ह्या भीतीने प्रत्येकजण स्पेलिंग आणि व्याकरणाची काळजी घेतो. मराठीच्या बाबतीत 'सब चलता है' अनास्था का असते हे मला समजत नाही. टीवी/चित्रपटांच्या श्रेयफलकांपासून सर्वत्र ही ढिलाई दिसते, कोणालाच त्याची लाज-लज्जा-शरम-हया वाटतांना दिसत नाही. भाषेच्या अभिमानाचे हे लक्षण मानायचे काय? मराठीचे स्वयंघोषित तारणहार झोपले आहेत काय?

मराठी फायरफॉक्सच्या वर दाखविलेल्या 'विंडोज'पैकी केवळ पहिल्या तिनातच मला शुद्धलेखनाचे खालील खून दिसले. त्याच्या पुढे गेलोच नाही. हे खून आणि तेथे काय हवे होते हे पुढे दाखवीत आहे.

सहाय्यक (सहायक).
प्रतिष्ठापनबाबत (प्रतिष्ठापनाबाबत).
पुन:सुरू (पुन: सुरू).
नीवडा (निवडा).
पसंतीजोगी मांडणीचा प्रकार नीवडा (पसंतीजोग्या मांडणीचा प्रकार निवडा)
प्रतिष्ठापीत (प्रतिष्ठापित).
तुम्ही प्रतिष्ठापनजोगी व्यक्तिगत पर्याय नीवडू शकता (तुम्ही प्रतिष्ठापनाजोगा व्यक्तिगत पर्याय निवडू शकता).
वापरकर्त्याकरीता (वापरकर्त्याकरिता).
प्रतिष्ठापनसह (प्रतिष्ठापनासह).
जाणयासाठी (जाण्यासाठी).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीचे स्वयंघोषित तारणहार झोपले आहेत काय?
या प्रतिसादातील 'सब चलता है', शरम, हया, टीवी वगैरे शब्द वाचून गंमत वाटली. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लोकलायझेशनच्या नावाखाली चाललेली मराठीची विटंबना बघवत नाही. हल्ली फायरफॉक्स नकोसा वाटतो. सध्या ऑपेरा हा न्याहाळक आवडतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजानुकर्णाचे स्वागत! Smile
बर्‍याच दिवसांनी ऑनलाईन दिसलास! चला आता तुझ्याकडून इथेही काहितरी सकस वाचायला मिळेल अशी अपेक्षा करतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठीच्या मुद्द्याशी सहमती आहे. माझा असा अंदाज आहे, भाषांतरातील मजकूर हा हास्यास्पदपणे भाषांतरीत केला गेलेला नाही. शब्दांची भाषांतरं करून नंतर ती बहुदा अल्गोरीदमने एकत्र आणून वाक्यांची भाषांतरं बनवली गेली आहेत. काही शब्दांची भाषांतरंही विचित्र, अ-प्रचलित किंव न-बोलीभाषेतील आहेत हे ही खरे.

आशा आहे हे चित्र सुखावह होईल. पण मला त्यापेक्षा तांत्रिक गोष्टींमध्ये जास्त रस आहे. ह्या फायरफॉक्सच्या डिफॉल्ट गुगल शोधाचा वापर केल्यास येणारे रिझल्ट्स जास्त 'रिलीव्हंट' आहेत. इंग्रजी फायरफॉक्स वर जाऊन तोच शोध घेतला असता हिंदी व इतर रिझल्ट्स जास्त येतात. अशा कारणांसाठी मला हा प्रयोग चांगला वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुगल शोधासंदर्भातलं निरीक्षण रोचक वाटलं. एकाच सिस्टमवर इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही फाफॉ चालतात का?

कोल्हटकरांनी दर्शवलेला शुद्धलेखनाचा मुद्दा मलातरी महत्त्वाचा वाटतो. अशुद्ध मराठी असो वा इंग्लिश, फार जास्त झालं की वाचवत नाही. ड्रुपॉलच्या मराठी भाषांतराचीही हीच किंवा यापेक्षा वाईट गत आहे. कोणाला मराठी नीट येतं यापेक्षा कोणाला उत्साह जास्त आहे त्यावरून बहुदा भाषांतरकार ठरवत असावेत. त्यापेक्षा इंग्लिशमधला फाफॉच आवडतो. थोडाबहुत सवयीचा परिणामही असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या धाग्यावरच्या बहुतेक प्रतिक्रिया : 'हं... ठीकेय... मराठीतून का? पण आम्हाला येतं नं इंग्लिश? मग ते असं अशुद्ध मराठी.. श्या.. काहीतरीच.. फायरफॉक्स वाल्यांना अक्कल नाही.. कैतरीच मराठी.. शी बई..' अश्या आहेत.

अन इथेच मराठीचा लोचा आहे.

तुम्ही समजा आसाममधे बदलून गेलात, किंवा डोनार्चला किंवा हँबर्गला किंवा अजून उरुग्वे मधे कुठे तरी.. तुमच्या त्या तिथल्या आसामी (किंवा अमुकतमुक) भाषेला ते किती हसतात? अन तुम्ही प्रयत्नाने शिकता नं तिथली भाषा? फायरफॉक्स मराठी होण्याचा प्रयत्न करतो आहे. मार्केटिंग म्हणा हवं तर. व्हाय नॉट? आपण युजर्स (उपभोगकर्ता : असा भीषण शब्द सद्ध्या टीव्हीने दिला आहे.) तिथे 'फीडबॅक' (उलट उत्तरे!? कसला प्रतिशब्द आहे फीडबॅकला) देऊन फाफॉ सुधारू शकतो. इथे लिहिण्या ऐवजी फायरफॉक्सला फीडबॅक लिहीणे जास्त उत्तम. गूगल झक मारून मराठी होईल मग Wink 'कॉम्पिटिशन' (स्पर्धा) म्हणून.

:ट्टॉक्कः (फाफॉ वरून फाफे आठवले)

अशुद्ध म्हणून त्यांना बेशुद्ध करू नका. लोकांना प्रयत्न करू द्या मराठी बोलायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फाफॉमधे किती बदल होतील माहित नाही.

ड्रूपॉलच्या संस्थळावर भाषांतरांत बदल सादर करता येतात. मी तो प्रयत्न केला. जेमतेम ५-१०% शुद्धलेखन वा भाषा-सुधारित भाषांतरं मान्य केली गेली. तिथे मराठी भाषांतराचं काम पहाणार्‍या अ‍ॅडमिनने केलेली भाषांतरं पाहिली आहेत. ते पहाता मला तो प्रकार एकूणच होपलेस वाटला (प्लीज, त्या होपलेस शब्दाचं भाषांतर करू नका; ती माझी अभिव्यक्ती आहे.) निवडा, नवीन, पूर्वी असे शब्दही जिथे चुकले आहेत आणि आपण अशुद्ध लिखाण करतो आहोत याचीही जाणीव नाही अशा लोकांच्या हातात किल्ल्या असण्याचा परिणाम. फाफॉ-मराठीच्या बाबतीतही हाच प्रकार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नविन, पुर्वदृष्य, असे शब्द, पंचमीचे ऊन-हून हे प्रत्यय र्‍हस्व लिहीणे असे प्रकार किती वेळ आणि का सहन करायचे? परकी भाषा बोलताना चुका झाल्या तर समजण्यासारखं आहे, पण आपली भाषा आहे म्हणून असं बरबट्ट लेखन का स्वीकारावं? किंबहूना ही माझी भाषा नव्हेच असं मला वाटत रहातं.

माझी व्यक्तीशः अडचण अशी होते की बर्‍याचदा कामाच्या निमित्ताने माझा कंप्यूटर इंग्लिश माध्यमात शिकलेले मराठी किंवा इतर भाषिकही वापरतात. कामाशी संबंधित गोष्टी शोधायला इंटरनेट लागतं. अशा वेळेस माझा (नसलेला) भाषाभिमान माझ्या कामाच्या आड येऊ शकतो. त्यापेक्षा मला सर्वांना समजेल अशा भाषा वापरणं सोयीचं वाटतं.
माझ्या ओळखीतले काही ज्येष्ठ लोकं घरी संगणक, आंतरजाल वापरतात त्यांना मराठी लोकलायजेशनचा फायदा होऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्हाला अन मला ठाउक आहे की ते चुका करताहेत. बाकीच्या नॉनमराठी दुनियेचं काय?
आपण प्रत्येकच वेळी चूक दाखवून दिली तर समोरच्याचा 'इगो' पण मधे तडमडतो. होईल हो हळू हळू. गूगलवर मराठी हवं म्हणून सह्यांची मोहिम काढणारे धागे पण वाचलेत मी इतर म.सं. वर.

लोक वाट्टेल तशी मराठी बोलतात. इंग्रजीचं मराठी काय वाट्टेल ते करतात. आपणही इतर भाषांचं करतो. उदाहरण सांगतो.
मराठी लोक्स ईमेल आयडी सांगतातः अमुक्तमुक अ‍ॅट द रेट ऑफ रेडीफ्मेल डॉट कॉम. (amuktamuk@redffmail.com)
आता तो @ पूर्वी टाईपरायटरवर अ‍ॅट द रेट असे वाचत. म्हणून मी इब्लिस अ‍ॅट याहू असतो, अ‍ॅट द रेट याहू नाही.
मग सगळे इंग्रज काय भांडण करायला येतात का आपल्याशी?

५% सुधारलेत ना? तुमच्या एकटीमुळे? फक्त २० आदिती हव्या आहेत Wink Out of 5 cror मराठी 'यूझर्स'. हो की नै?
१००% सुधरतील

~लैच पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूडात रमलेला~ आडकित्ता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फीडब्यॅक = अभिप्राय
बाकी आम्ही मदत म्हणून गेली दोनेक वर्षे मराठीच फाफॉ वापरतो आहेत. आता वापरतो म्हटल्यावर आम्ही नावं ठेवली तर काय चुक (न वापरता नावं ठेवण्यापेक्षा चांगलं) Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फीडब्यॅक = अभिप्राय
याच्याशी असहमत.

उदा. माझं कारटं इद्रिसपणा करतंय. त्याला मी कानाखाली मारली. त्याने भोकाड पसरलं.

त्याच्या इद्रिसपणाला मी कानाखाली देणे हा 'फीडबॅक'. अन त्याने भोकाड पसरणे हा त्या फीडबॅकला फीडबॅक. अर्थछटेत थोऽडा फरक वाटतो? रिअ‍ॅक्शन पेक्षा वेगळा, खोल, अन अभिप्रायापेक्षा उथळ, असा मधला शब्द सुचवा राव! तो बरूबर होनार फीडब्याकला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>एकाच सिस्टमवर इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही फाफॉ चालतात का?

हो. मी दोन वेगवेगळ्या भाषिक आवृत्त्या इन्स्टॉल केल्या आहेत. एका वेळी एकच चालवावी लागते. एकच प्रोफाईल दोन्हींमध्ये चालवता येते, पण मी दोन वेगवेगळ्या प्रोफाईल्स बनवल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मग वापरून बघायला हरकत नाही. वापरून थोडी नावं ठेवली तर बहुदा डॉक्टरसाहेब कमी नावं ठेवतील. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.