अदलाबदल

कथा अर्थातच काल्पनिक आहे पण मला हे असं घडावं असं प्रचंड वाटतं. त्यामुळे माझे नाव मुद्दाम गुंफले आहे. या विषयावर एक इंग्रजी सिनेमाही पाहील्याचे स्मरते. त्या सिनेमात अर्थातच काही सुंदर अन कुचक्या मुली वगैरे मसाला होता. तो काही आणता आलेला नाही. पण बाकी प्रयत्न केलेला आहे. कथा लिहीताना कल्पनाशक्तीचा तुटवडा जाणवला. वाचकांनी अजुन कोणते प्रसंग गुंफता आले असते ते सुचवले/ फुलवून मांडले तर मस्त सामुदायिक brain-workout होईल.
.
हे असं होईल असे जरी त्या जिप्सी बाईने सांगीतलेले असले तरी होईपर्यंत तिचा विश्वासच बसला नसता. कसं शक्य आहे? पण सकाळी ती ऊठली काय शरीर अगदी पिसासारखं हलकं झालं होतं. आरशापर्यंत जाईपर्यत तिला अगदी नीट जाणवली ती म्हणजे चपळता, spring in steps, सळसळता जोम. आह्हा! आज सकाळचा सुगंधच वेगळा होता, प्रकाशही वेगळा होता जणू काही सर्व इंद्रिये पहील्यांदा सकाळ अनुभवत होती. आरशासमोर ती गेली अन तिला आश्चर्याचा धक्का बसला. जिप्सी स्त्रीने वर्तवल्याप्रमाणे खरच ती २७ वर्षांनी लहान झाली तर होतीच पण तिला-शुचिला, रियाचे म्हणजे तिच्या मुलीचे शरीर मिळाले होते. अफाट तजेला, सुडौल अन सडपातळ शरीर, सतेज त्वचाच नाही तर आजूबाजूचे
vibrations शोषून घेणारा सतेज मेंदूही.
.
इतक्यात तिची मुलगी रियाही ऊठून आरशासमोर आली होती अन ती शुचिसारखी ४२ वर्षाची झाली होती. शुचिच्या शरीरात तिला एकदम जडजड अन म्हातारं वाटत होतं. Smile का नाही दोघींचे मन्/आत्मे तेच राहीले होते पण शरीरांची अदला-बदल झालेली होती.
.
इतके दिवस न चुकता दोघी एकमेकींना ऐकवत - "Just walk in my shoes one day & you'll know how hard it is".
हा हा! आज तो "one day" उगवला होता. (जिप्सी बाईची कृपा). आज एका दिवसाकरता दोघी एकमेकींचे विश्व अनुभवू शकणार होता. दोघी एकमेकींच्या भूमिका निभावण्यास सज्जच नाही तर आतुर होत्या. दोघींनी चूपचाप एकत्र नाश्ता केला अन एकमेकींची नजर चुकवत आवरुन निघाल्या. शुचिने बॅकपॅक घेतली अन पटकन घराबाहेर पडली. खरं तर अगदी उसनं अवसान आणलं होतं तिने. कॉलेजमध्ये नक्की काय होतं आजकाल कुठे माहीत होतं तिला? पण 'जो होगा वो देखा जायेगा" या तिच्या आत्मविश्वासाच्या जोरावर ती जग जिंकायला अन रियाचे विश्व पहायला निघाली होती.
.
आखूड स्कर्ट-टीन-एजी टॉप अन टेनिस शूज, पाठीवर बॅकपॅक. काय उधाणल्यासारखा उत्साह होता आज.... कॉफी न घेताही. Can you believe - कॉफी न घेता!!! Now that's something. चालत ती शाळेच्या आवारात पोचली तोच कीराने धावत येऊन मीठी मारली अन चॅसिडीही दोघींना येऊन मिळाली. किती भरभरुन बोलत होत्या मुली. कालच संध्याकाळी स्काइपवरती गप्पा मारुनही, रात्रभर जणू मोठ्ठी काही दिवसांची गॅप पडल्यासारख्या बोलत होत्या अन या तारुण्याच्या खळखळत्या झर्‍याचे उडणारे तुषार, शुचिला मनस्वी आनंद देत होते. संपूर्ण प्रांगणावर असेच उत्फुल्ल दृष्य होते. ह्म्म्म मग काय आहे रडण्यासारखं, छान आहे की हे आयुष्य तिने मनात हसत म्हटले अन कीराला चटट्दिशी एक कॉम्प्लिमेन्ट देऊन टाकली.
.
तीघी वर्गात आल्यावर काही वेळातच शिक्षीका आल्या. अन बरच जडव्यागळ, अवजड काहीबाही लेक्चर देऊ लागल्या. तास तसा गंभीर होता, मध्येमध्ये त्या प्रश्न विचारत होत्या. नशीब हिला काही विचारले नाही :). ह्म्म्म! सगळच काही hunky dory नव्हतं, अभ्यासाचा ताण होता. महत्त्वाकांक्षा अन स्पर्धाही होती.
.
मधल्या सुट्टीत कोणी मुलगा येऊन तिला चिठ्ठी देऊन गेला तो काही बोलणार तोच तिने चॅसिडी बोलावते आहे असे सांगून पळ काढला. चिठ्ठी उघडली अन इतकी सुंदर कॅलिग्राफी होती. तिचे अन त्याचे नाव मध्ये नक्षी, बाजूला नक्षी. सुं-द-र! तिने भांबावून चॅसिडीला ती चिठ्ठी दाखवली अन चॅसिडी हसत म्हणाली- आजही जोसाया नी तुला दिली ना चिठ्ठी? तो इतकी मस्त मस्त कॅलिग्राफी तुला भेट म्हणून देतो अन तू आहेस की ना त्याच्याबरोबर डबा खातेस. You never hang out with him. He is soon gonna give up on you.
Phew! हीचा जीव भांड्यात पडतो. मुलगी व्रात्यपणा करत नाही, हाताबाहेर गेलेली नाही. अरे मग!! आहेत आपले भारतीय संस्कार काय लेचेपेचे आहेत काय?
.
मधल्या सुट्टीत डबा खाताना गप्पांना परत ऊत येतो.चॅसिडीला कुकींग तर कीरा ला फ्रान्स मध्ये जाऊन फॅशन डिझायनिंग करायचे असते. ही म्हणते- ..मी IT जाईन म्हणते किंवा मग neurologist बनेन पण नक्की नाही. यावर चॅसिडी सहज उद्गारते "You asian kid's parents do a lot of savings for college unlike ours. We have to go for a student loan." त्या उद्गारात कसलीही काळजी किंवा कडवटपणा तिला जाणवत नाही. पण तिच्या पोटात मात्र गलबलतं. त्यात बोलता बोलता हेही कळतं की दोघींच्या आया single parents आहेत अन त्यांना boy-friends आहेत. कीरा सुट्टीत डोनट शॉप मध्ये काम करणार आहे, तिने नुकतेच work permit मिळवले आहे. चॅसिडीने learner's licence मिळवला आहे अन ती कार शिकणार आहे.
त्या दोघींना तिच्या हातची तूप-साखर-पोळी अत्यंत आवडते हे रियाने सांगीतले असल्याने ती दोघींना वीकेन्ड ला नाश्त्याकरता आमंत्रण देते.
.
दिवस संपून घरी जाताना, परत एक मस्त गप्पाटप्पांचा round होतो अन आज घरी कोणती कोणती गाणी ऐकून एन्जॉय करणार आहेत हे तिला कळते. नशीब रियाने काही गाणी सहज बोलता बोलता तिला सांगीतलेली असतात त्यामुळे तिलाही input देता येते.
.
घरी आल्यावर मात्र शुचिला मानसिक थकवा जाणवतो. रियाही घरी येते. खरं तर दोघींनाही एकमेकींना सांगण्यासारख्या खूपशा गोष्टी असतात पण जास्त गप्पगप्पच असतात. खरच एकमेकींचं जग त्यांना वाटतं तितकं rosey नसून, त्यात स्पर्धा आहे, असुरक्षितता आहे, अन अर्थात गोडवा आहे हे दोघींना पटलेलं असतं. दोघी झोपायला जातात - आपापल्या "known devil" आयुष्याला हसत हसत सामोरे जायला. Smile

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

या विषयावर एक इंग्रजी सिनेमाही पाहील्याचे स्मरते.

Freaky Friday !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

याच विषयावर एक मराठी विज्ञानकथाही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile छान

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कल्पना छान फुलवली आहे.

पण
साधारण समान वयोगटातल्या लोकांना अश्या अदलाबदलीमुळे दुसरयाच्या अडीअडचणींची कल्पना येउ शकेल पण अगदी आई-मुलीच्या नात्यात परकायप्रवेशाने "परदु:ख शीतल" नसल्याचा अनुभव एवढ्या सरधोपटपणे येइल असं वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ढोबळ, ठोकळेबाज मूळ जर्मकल्पना असल्याने चांगली फुलवूनही मजा नाही. परकायाप्रवेश ही आयडिया अ‍ॅज सच वाईट आहे असं नव्हे पण अजून खूप बारकाईने हाताळावे लागेल. फक्त मन बदललं की शरीरही. ? आईचं मन (तिच्या स्वतःच्या मेमरीजसकट) मुलीच्या शरीरात गेलं असेल तर मुलीच्या मेमरीतल्या मैत्रिणी, त्यांचे स्वभाव आणि तिच्या कॉलेजच्या बारीकसारीक गोष्टी आईला आधीच कशा माहीत होत्या, त्या माहीत असल्याखेरीज ती त्यांच्याशी इन्टरअ‍ॅक्ट कशी करु शकली? मैत्रिणींना काहीच फरक जाणवला नाही का? आई मुलीच्या शरीरात गेल्यावर (आणि व्हाईस व्हर्सा) त्या दोघींना आपल्या मूळ रुपाची जाणीव सतत कशी होती? (मी खरं म्हणजे आई आहे पण आज मुलीच्या रुपात आहे बरं का)

खरंतर फँटसी म्हणूनही अशी थीम घेताना हे समजलं पाहिजे की खरोखर असा बदल घडला तर त्या दोघींना एकतर आपल्या मूळ अस्तित्वाची जाणीव त्या दिवशी नसेल किंवा तशी असेल तर इतर संबंधितांना दोन्ही व्यक्तींमधे खूपच फरक अचानक जाणवला पाहिजे.

अत्यंत कॉम्प्लिकेटेड फँटसी मानून डेव्हलप करताना ट्रीटमेंट सरळसोट साधी सोपी गोष्ट असल्यासारखी करुन चालणार नाही असं व्यक्तिगत मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरोखर असा बदल घडला तर त्या दोघींना एकतर आपल्या मूळ अस्तित्वाची जाणीव त्या दिवशी नसेल किंवा तशी असेल तर इतर संबंधितांना दोन्ही व्यक्तींमधे खूपच फरक अचानक जाणवला पाहिजे.

होय. ही तर २ भिन्न कथानके/जर्म्स झाली.
जर आईचे मन (आईच्या स्मृतींसकट) मुलीच्या शरीरात गेले असेल तर (जे की वर घडलय) तर आईस खूप प्रचंड अ‍ॅडजस्ट्मेन्ट लागेल. व दोन्ही व्यक्तीत फरक जाणवेल.
जर आईचे मन(मुलीच्या मेंदू=स्मृतींसकट) मुलीच्या शरीरात गेले तर आईला संबंधित मैत्रीणी आदि पटापट कळो येतील पण आई त्यांना हँडल वेगळ्या प्रकारे करेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

शरलॉक फॅनफिकशन भाषांतर-कारीका मेघना भुस्कुटे यांनी या लिखाणात लक्ष घालायला पाहिजे होतं असं प्रकर्षाने वाटुन गेले. मस्त गोल गोल फिरवलं असतं अन्यथा गेला बाजार प्रणवही कामी आले असते...

बाकी शुचीच्या बूटात पाय घालुन रिया मात्र नक्किच वैतागली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

नाही ना पण जॅकी चॅन यांच्या दुर्दैवाने ना मेघनाने ना प्रणव ने यात लक्ष घातलं. शुचि ने च काहीतरी आपलं नेहमीसारखं माथी मारलं Wink

शुचीच्या बूटात पाय घालुन रिया मात्र नक्किच वैतागली असावी.

हे बाकी १००% पटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

तसं म्हणजे तुमीच लक्ष घाला असंच आड मार्गाने सुचवल होतं... जरा वरील लेखकांचे लेटेस्ट धागे धुंडाळले असते तर प्रकरण अजुन रोचक करता आले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

खरय Smile
_____
मलाही आपल्या प्रतिसादाचा राग अज्जिबात आला नव्हता पण कोणी टपली मारल्यावर कांगावा करायचा इवलासा प्रयत्न तर करुन पाहू म्हणून केला Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ही गोष्ट वाचताना, खरोखरंच मला हसू आले. काल जीनची पेंट घालून कार्यालयात गेलो. खरोखरच आपण १०-१५ वर्षे लहान झालो आहे, असे वाटले. अर्थातच बरेचशे ताशोरे ऐकायला मिळाले. पण मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile मस्त मस्त!!! मला आवडली ही प्रतिक्रिया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

छान आहे. हलकंफुलकं कथानक आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0