असा मी तसा मी

असा मी तसा मी
कधी असेन निर्मळ ब्रम्ह्कमळ
तर कधी गलिच्छ बोतरा
नदीकिनारी विसर्जित निर्माल्य मी
वा गौरीपुजनासाठी वाहिलेला फ़ुलोरा मी
नववधूने गृह्प्रवेश करताना ओलंडलेले माप मी
वा शॄंगारच्या परमोच्च क्षणांचा सर्वेसर्वा मी
असा मी तसा मी
अळवावरुन घसरणारा दवबिंदू मी
वा गवतातून हेलकावे घेणारे पर्णओहोळही मी
काटेरी झूडपातील आंबट बोर मी
वा काटेरी बाळसदार फ़ुलणारा एक सायाळ मी
असा मी तसा मी
तहानल्याची तृष्णा मी
जीविताचा प्राणवायू मी
देहाला शिरशीरी आणणारी एक मधाळ झूळूक मी
वा वाऱ्याचे झंझावते नृत्य वादळ मी
जिथे आभाळही ठेंगण होत ते क्षितीज मी
असा मी तसा मी
वर्षा ऋतुत न्हाऊन निघालेला पहाड मी
पश्चिमेला सप्तरंगाची उधळण करणारे एक इंद्र्धनुष्य मी
वा वसंत ऋतुची चाहूल देणारी कोकिळा मी
ग्रीष्मातील गुलाबी शीतलहरी मी
असा मी तसा मी
चिरेबंदी वाड्याच्या कौलातून येणारी प्रकाशाची तिरीप मी
देवघरात दरवळणारा प्रांजळ धूप मी
पहाटेच्या दवांत उमललेला एक प्राजक्त मी
वा अंगणातील पावित्र्य तुलसी वॄंदावन मी
सात्विकतेने गॄहिणीने केलेली रंगांची उधळण रांगोळी मी
असा मी तसा मी
वेशीवर वर्षानुवर्षे तपश्चर्येत मग्न असलेला वट्वॄक्ष मी
गावकूसाबाहेर ओसाड पडलेला पाण्याचा एक आड मी
निर्जन टेकडीवरील निशांत एकांत मी
वा नदीकिनारी पूरातून वाहुन आलेला
एखादा निर्वासित देह मी
असा मी तसा मी
>> मी मात्र >>राजर्वधन

field_vote: 
0
No votes yet