काही नाती, काही रात्री (भाग पहिला)

मागच्या एका तासात कॉफी पिता पिता त्याने तीन वेगवेगळ्या कॅटलाॅग मधल्या किमान शंभर मुलींचे फोटो नजरेसमोरून घातले होते. फोटो, त्यापुढे नाव , त्याखाली वय , खाली उंची, त्याखाली पगार. अगदी ते लहानपणी W W E चे कार्ड्स कसे यायचे त्यावर कसे ते फोटो आणि मग त्या खाली बाकी आकडेवारी अगदी तसंच. अर्थात त्या खाली ज्या आकडेवाऱ्या द्यायचे, चेस्ट, बायसेप्स वगैरे त्या इथे दिल्या तर… असा एक तद्दन अॅडल्ट विचार त्याच्या मनात आलाच. कॉफी संपली, त्याने आळस दिला आणि सुट्टा मारायला म्हणून निघाला. एकंदरच हे लग्नासाठी मुलगी शोधणे प्रकरण फारच डोक्यात जायला लागलं होतं. सिगरेटच्या धुरासोबत त्याचे विचार हलके हलके होत भूतकाळात जायला लागले. आपले क्रश, प्रेम , आकर्षण असे वेगवेगळे ‘tags’ दिलेल्या मुली त्याला आठवू लागल्या. आज इतक्या वर्षांत मुलगी निवडण्यासाठीचे आपले निकष बदललेत याची त्याला जाणीव झाली.

तो घरी आला. घरात आल्या आल्या आईने नवीन एका वधू-वर सूचक संस्थेचा फॉर्म त्याच्याकडे दिला. सवयीने त्याने फॉर्म भरायला सुरुवात केली. एका प्रश्नापाशी येउन तो थांबला. “Did you have any past relationship?” “Are you virgin ?” चायला इतके प्रश्न तर जनगणनावाले, आधारवाले , गेला बाजार रेशन कार्डवाले सुद्धा विचारत नाहीत. बरं हे दोन्ही प्रश्न एकमेकांना लागून. म्हणजे relationship आणि virginity यांचा इतका जवळचा संबंध आहे असं वाटतं कि काय ह्यांना.

त्या प्रशानंभोवती तो फिरत राहिला. तिचे निरोपाचे काही शब्द आठवले त्याला. ती म्हणालेली “कसंय सुजय, There is a difference in liking someone, loving someone and marrying someone. तुला हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर आपण एकमेकांतून मोकळे होऊ.” बस्स. इतकंच बोलून आणि MS करण्यासाठी USA ला जाण्याचा निर्णय सांगून तिची आवडती कॉफी तशीच अर्धवट सोडून ती निघून गेली होती. इतक्या सहज?? इतक्या सहज निघून जावं तिने? तो एकटाच कॉफी शॉप मध्ये बसून राहिला. त्याला आठवलं बरोब्बर एक वर्षापूर्वी ह्याच मुलीसोबत त्याने आयुष्यातलं पहिलं स्मूच केलं होतं. त्याला नेहमी वाटायचं की स्मूच म्हणजे फटाक्यांच्या लडीतल्या सगळ्यात पहिल्या फटाक्यासारखं आहे. एकदा तो पेटला कि मग अक्खी लड धगधगत फुटते. ‘uncontrolled events’ सारखी. त्या रात्री ते त्याला पटलं. काही रात्रींमध्ये अख्खं नातं घडवण्याची ताकद असते. पण मग एक वर्षात सारेच अंदाज आणि प्रत्येक हिशोब चुकत गेला. एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या शपथा हवेत विरल्या आणि ती US ला निघून गेली.
त्या गोष्टीलाही आता ४ वर्षं होतील. या चार वर्षांत तो सेटल झाला. २ ‘onsite’ ट्रीप, ७ आकडी पगार आणि नुकताच बुक केलेला नवीन flat. आणि आता लग्नासाठी मुली शोधायची गडबड. ती गेल्यानंतर काय बदललं काय नाही याचा धांडोळा त्याने कधी घेतला नाही. पण तिच्यासोबतच्या त्या पॅशनेट रात्रीनंतर त्या दोन प्रश्नांची उत्तरं त्याच्यासाठी कायमची बदलली होती.
“Did you have any past relationship?” – YES
“Are you virgin ?” – NO
त्याने फॉर्म पूर्ण भरून लिफाफ्यात बंद केला. लिफाफा आईला देत म्हणाला,,”हे घे, उद्या जाउन त्या वधू-वर सूचक केंद्रात देऊन ये.”

(क्रमशः)

-अभिषेक राऊत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा! मझा आ रहा है. और आने दो Smile
Bring it on.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

चांगली उत्कंठावर्धक सुरूवात आहे.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मागच्या एका तासात कॉफी पिता पिता त्याने तीन वेगवेगळ्या कॅटलाॅग मधल्या किमान शंभर मुलींचे फोटो नजरेसमोरून घातले होते. फोटो, त्यापुढे नाव , त्याखाली वय , खाली उंची, त्याखाली पगार. अगदी ते लहानपणी W W E चे कार्ड्स कसे यायचे त्यावर कसे ते फोटो आणि मग त्या खाली बाकी आकडेवारी अगदी तसंच. अर्थात त्या खाली ज्या आकडेवाऱ्या द्यायचे, चेस्ट, बायसेप्स वगैरे त्या इथे दिल्या तर… असा एक तद्दन अॅडल्ट विचार त्याच्या मनात आलाच.

खल्लास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्या “कुणीच नाही.” धाग्याचे रेफरन्स यात आलेत असं वाटतयं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

'आनंद' चित्रपटांत नाही का, 'सफर' चित्रपटाचे रेफरन्स आल्यासारखे वाटले होते! तसंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेफ्र्न्सेस Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत

Smile त्याच मुलीशी लग्न करताव काय वधु-वर मंडळाकडुन ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हाहाहा कुनीच नाही आनि ह्या धाग्यामध्ये तितकाच फरक आहे जितका फरक 'ऐसी' वरील धागे आनि धाग्यान्वरील प्रतिक्रियान्मध्ये असतो. Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत