निसर्गाची भाषा


५ वर्षापूर्वी अन्यत्र प्रकाशित झालेली कविता.
.
.
आई फक्त माणूसच बोलू शकतो का?
नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते.
____
चंद्राची भाषा शुभ्र चांदणे,
सूर्याची भाषा रवीकिरणे
वार्‍याची भाषा झुळकेची,
समुद्राची अलवार गाजेची ||१||
पिंपळाची घनगंभीर सळसळ,
नदीनाल्यांची अविरत खळखळ
सार्‍यांचे मन उमगेल तुला,
स्तब्ध शांत करशील मना||२||
कमळ बोलतसे उमलण्यामधुनी,
मधमाशी ती कष्टांमधुनी
पहाड बोले अचलपणांतुनी,
नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३||
मौन होउनी संवाद साध बघ,
आकळेल निसर्ग तुला
सार्‍यांचे मन उमगेल तुला,
स्तब्ध शांत करशील मना||४||

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

अहा! पिंपळाची सळसळ फार छान

अहा! पिंपळाची सळसळ फार छान वाटते. मला फार आवडतो तो आवाज. लहानपणी आत्याकडे कुडाळजवळच्या गावी जायचे तेव्हा व्हाळाचा आवाज खुप आवडायचा.(हो असंच म्हणायचे, झरा बिरा नाही.) त्याला "उगाच भर दुपारच्याक एकटी जावं नुको हां व्हाळावर." या ताकिदीची गुढ सोबत.

छान छोट्यांसाठी ही कविता आहे,

छान
छोट्यांसाठी ही कविता आहे, पण छोट्यांना मात्र बोअर होईलसे वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!