Skip to main content

Half girlfriend अर्थात अर्धी प्रेयसी

Five point someone,Three mistakes of my life,2 states यासरख्या मनोरंजक कादांबर्‍या वाचल्यानंतर प्रकाशना पुर्वीपासुन गाजत असलेले आणि प्रकाशनानंतर best seller असलेले Half girlfriend कसे असेल याबद्दल उत्सुकता होती.चेतन भगतच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे तो गोष्ट सांगतो ती तुमच्या आमच्या सारख्याच एखाद्या मुलाची,म्हणजे त्याच्या कथेतील नायक हा काही फार मोठा तीर मारणाराही नसतो आणि दुखः,दैन्य,दारिद्र्याने ग्रासलेला-अन्याय सहन करणारा बिचारा वैगेरे ही नसतो.म्ह्णुनच त्याच्या गोष्टींशी आपण सहजपणे जोडले जातो. आपल्यात आणि या कथांतील नायकांत असलेला मुलभुत फरक हाच की याच्या नायकाला फार लवकर अगदी परी वाटावी अशी नयिका सापडते.अशी परी सापडणे आणि तिच्या सोबत सह्जतेने मैत्री करत तिला लगेच पटवणे हे चेतनचा नायकच करू जाणे. :)
Half girlfriend ही गोष्ट आहे माधव झा नावाच्या बिहारी मुलाची.इंग्लिश न येणारा हा भैय्या रीया सोमाणी या high class मुलीला भेटतो आणि गोष्ट सुरु होते. BMW तुन येणारी,फाडफाड इंन्ग्लीश बोलणारी रीया स्पोर्ट कोट्यातुन प्रवेश घ्यायला येते तेव्हा माधव ने दिलेल्या टिप्स मुळे तिचा खेळ सुधारतो आणि दोघांतील संवाद सुरु होतो.माधव स्वता:बद्दल सगळ काही सांगणारा मो़कळा ढाकळा,तर रीया स्वता:बद्दल कमी बोलणारी,बंदीस्त,लाजाळु...दोघांच्या भेटीगाठी वाढत जातात आणि दोघं एकमेकांना आवडायला लागतात.रीयाला फक्त मैत्री हवी असते,म्ह्णजे ती तसे दाखवत तरी असते.(कथा असो वा खरे आयुष्य सगळीकडे सारखेच),माधव मात्र तिच्या प्रेमात पडलेला असतो.
यादरम्यान कथा काहीशी रटाळवाणी होत जाते.माधवच्या प्रत्येक पानावर येणर्‍या मागणीवरुन माधवने प.पु.इमरान हाष्मीला गुरु मानुन दी़क्षा तर घेतली नाही ना? लेखकाला माधव प्रेम व्यक्त करतोय हे दाखवण्याचे इतर कोणतेच मार्ग उपलब्द नव्हते का??असा प्रश्न पडतो. दरम्यानच्या प्रसंगातुन बिहार मधील मोडकळीस आलेल्या राजेशाहीचा उरलेला थाट आणि रीयाच्या कुटुंबाच्या रुपाने आधुनिक श्रीमंतीचे दिखावी स्वरुप इ. चे दर्शन घडत जाते...असेच चालु असतांना कडाक्याच्या भांडणानंतर रीया माधवशी अबोला धरते आणि नंतर लग्न करून गायब होते.माधव आपले शि़क्षण संपवुन प्रतिष्ठीत बँकेची ६ लाख पॅकेज देणारी नोकरी नाकारतो(आशाप्रकारे शिक्षण पुर्ण केल्यावर नोकरीत काय बोंब पाडणार म्हणा!)आणि आपल्या गावात शाळेत शिकवण्यासाठी निघुन जातो.
पुढील काही पानांत बिहार मधील शाळा,तिथले स्थानिक राजकारण याचे वर्णन चालु होते आणि पुस्तक बंद करुन ठेवुन द्यावेसे वाटते.पाच अतिशय मनोरंजक कदांबर्‍या लिहिल्यानंतर लेखकची ही निरस कादांबरी फसली असे वाटु लागते.तेवढ्यात माधवची आणि रीया ची पुन्हा एकदा भेट होते,माधवला एका महत्वपुर्ण कामात मदत करू लागते आणि कथा वेग पकडते.
एका नाट्यमय वळणावर लेखक एका पाठोपाठ दोन महाधक्के (रिश्टर स्केलवर मोजल्यास ज्यांची तिव्रता १२ पेक्षा जास्त असती)देतो आणि चेतन भगत is still in form हे दाखवुन देतो.रीयाच्या सापडलेल्या डायरीतुन रीया अशी का वागत होती ते समजते.वाचक वाचनात दगुंन जातो आणि कथेचा गोड शेवट होतो.
संपुर्ण कादांबरीत होणारी माधवची मानसिक घालमेल पाहाता सरळ सरळ शिक्षण मग नोकरी आणि ठरवुन लग्न असे साधेसुधे जिवन जगुन माधव आयुष्यात जास्त सुखी,आनंदी झाला नसता काय? असा प्रश्न पडतो. पण मग विचार येतो....
.
.
.
.
.
.
.
.
.
रीया घरच्यांच्या आनंदासाठी तसेच आयुष्य जगली होती ती तरी कुठे सुखी झाली...

समीक्षेचा विषय निवडा

ऋषिकेश Fri, 24/04/2015 - 13:30

ऐसी अक्षरेवर स्वागत! आणखी लेखन येऊ द्या!

--
चेतन भगतचे हे पुस्तक वाचलेले नाही. नि वाचेन असे वाटतही नाही.

अंतराआनंद Fri, 24/04/2015 - 15:29

काही महीन्यांपूर्वीच माझी एक सहकारी किंडलबद्द्ल विचारत होती. धनादेशपुस्तिका आणि पासबुक याखेरीज कोणतं पुस्तक तिला माहीती असणं म्हणजे नवलच म्हणून जरा खोलात चौकशी केली असता मजेशीर माहिती कळली. तिच्या नवरोबांच्या साहेबाची मुलगी लिहीते वैगेरे. ती चेतन भगतची सेक्रेटरी म्हणून काम करायला लागली आणि तिच्या अपेक्षेपेक्षा बराच जास्त पगार लेखक महाशयांनी देउ केला. हे ऐकून या आमच्या सहकारिणीला (लिखाण,) वाचन ही (माझ्यासारख्या) वाया गेलेल्यांचीच मिरासदारी नसून त्यातून एवढा पैसाही कमावता येतो हे कळलं आणि म्हणून तिच्या मुलाला भेट देण्यासाठी तिला किंडल हवय. :D

बाकी डीडी बद्द्ल आदर वाटायला काहीच हरकत नाही. मला तर बरेचदा मालिका वैगेरेंपैक्षा त्यांचे एकसूरी पण माहितीपर कार्यक्रम आवडतात. कचर्‍याच्या समस्येवर दोनेक महिन्यांपूर्वी एवढा छान कार्यक्रम होता . पण यु ट्युब वर शोधला तर मिळालाच नाही.

आदूबाळ Fri, 24/04/2015 - 15:53

In reply to by अंतराआनंद

बाकी डीडी बद्द्ल आदर वाटायला काहीच हरकत नाही. मला तर बरेचदा मालिका वैगेरेंपैक्षा त्यांचे एकसूरी पण माहितीपर कार्यक्रम आवडतात. कचर्‍याच्या समस्येवर दोनेक महिन्यांपूर्वी एवढा छान कार्यक्रम होता . पण यु ट्युब वर शोधला तर मिळालाच नाही.

त्यासर्वांबद्दल आदर आहेच. पण चेतणभगतचं इतकं अचूक मूल्यमापन आणि वर खवचट तिरकसपणा ट्विटरच्या १४० अक्षरांत जमणे याबाबत आदर वाटला.

अंतराआनंद Fri, 24/04/2015 - 16:12

In reply to by आदूबाळ

चेतणभगतचं इतकं अचूक मूल्यमापन आणि वर खवचट तिरकसपणा ट्विटरच्या १४० अक्षरांत जमणे याबाबत आदर वाटला.

सहमत आहे.

'न'वी बाजू Sat, 25/04/2015 - 10:00

In reply to by आदूबाळ

दुसरे म्हणजे, दूरदर्शनला असे ट्वीट करावेसे वाटण्यामागे जे काही कारण असेल ते असो, पण एकदा दूरदर्शनने असे ट्वीट केले म्हटल्यावर, त्याला स्वतःच अशा प्रकारे प्रसिद्धी द्यावीशी चेतन भगतला वाटावी हे अंमळ गमतीदार वाटते.

अरविंद कोल्हटकर Fri, 24/04/2015 - 20:26

In reply to by अंतराआनंद

पुणे मनप कचरा कामगारांच्या संघटनेचा 'कचराकोंडी' हा तर तो नाही? तसे असल्यास तो युट्यूबवर https://www.youtube.com/watch?v=FXjq0JPPOWc येथे पहा.

अंतराआनंद Fri, 24/04/2015 - 16:07

सरळ सरळ शिक्षण मग नोकरी आणि ठरवुन लग्न असे साधेसुधे जिवन जगुन माधव आयुष्यात जास्त सुखी,आनंदी झाला नसता काय? असा प्रश्न पडतो. पण मग विचार येतो...

.
.
.
.
.
.
.
.
चेतन भगतने काय बिहारच्या राजकारणावर लिहीलं असतं? ;)

आपल्यात आणि या कथांतील नायकांत असलेला मुलभुत फरक हाच की याच्या नायकाला फार लवकर अगदी परी वाटावी अशी नयिका सापडते.

अस्स काय? तुम्हाला सापडेल ती ( किंवा सापडलेली) नायिका परीच आहे असं समजा म्हणजे तोही फरक रहाणार नाही ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/04/2015 - 23:33

In reply to by अंतराआनंद

चेतन भगतने खेळाबद्दल जे काही लिहिलंय ते किती वास्तववादी असेल अशी शंका येते. बिहारचं राजकारण फारच लांबची गोष्ट.

तुम्हाला सापडेल ती ( किंवा सापडलेली) नायिका परीच आहे असं समजा म्हणजे तोही फरक रहाणार नाही

फिस्सकन हसले हे वाचून.

गीतम Sat, 25/04/2015 - 17:46

In reply to by अंतराआनंद

तुम्हाला सापडेल ती ( किंवा सापडलेली) नायिका परीच आहे असं समजा म्हणजे तोही फरक रहाणार नाही

त्या शिवाय दुसरा पर्यायही नाही म्हणा...:)

तिरशिंगराव Fri, 24/04/2015 - 18:20

बिहारी तरुणाचे नांव 'माधव' असू शकते, हे वाचूनच धक्का बसला.

'न'वी बाजू Sat, 25/04/2015 - 09:30

In reply to by सिद्धि

चेतन भगत हा या सहस्रकातला सर्वात विनोदी लेखक आहे. (हं, अभावितपणेही असेल कदाचित; तो भाग वेगळा.)

(पण म्हणण्यात एका अर्थी तथ्य आहे. ते झाड इतकी वर्षे वाढले, ते कशासाठी? चेतन भगतचे पुस्तक बनण्यासाठी? मग त्या झाडाचे आयुष्य व्यर्थच म्हणायचे. त्यापेक्षा टॉयलेटपेपर बनते, तर निदान मानवजातीच्या काही उपयोगी पडते, नि आयुष्य सार्थकी तरी लागते!)

ॲमी Sat, 25/04/2015 - 10:38

चेतन न आवडणार्यांना थ्री इडियट्स आवडला की नाही?
बाकी मासचे मनोरंजन करणे वाटते तितके सोपे नसणार. जर त्याची पुस्तकं सतत बेस्टसेलर बनत असतील तर असेल काहीतरी रोचक आणि उद्बोधक त्यात. मीदेखील चार पुस्तक वाचली आहेत, सहजच मिळाली म्हणून. स्वतःहून शोधून वाचेन असे वाटत नाही.

आदूबाळ Sat, 25/04/2015 - 11:05

In reply to by ॲमी

थ्री इडियट्स काय, मला फाइव पॉइंट समवन पण आवडलं होतं. पहिल्याच यशाने काय डोकं सटकलं त्याचं....दुसऱ्यात डायरेक गॉड से बातां! हिर्रर्रर..

ॲमी Sat, 25/04/2015 - 11:42

In reply to by आदूबाळ

हा हा हा :-D. मला नव्हता आवडला थ्री इडियट्स.

कंफेशन मोड> मी दुसरं पुस्तकच आधी वाचलं होतं आणि ते बरं वाटलं. त्यानंतर फाइव पॉइंट, थ्री मिस्टेक्स, टू स्टेट्स इक्वली किंवा एकसेएक बोर झाली. पण तरीही मी ती पुस्तकं पुर्ण वाचली आहेत हा फ्याक्ट आहेच.

गीतम Sat, 25/04/2015 - 11:48

मी प्रतिक्रीयेला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतोय पण नवीन असल्यामुळे मला नीट जमतं नहीये.प्रतिक्रीयेतील प्रतिसादावर click केल्यावर टाइप केल्यावर प्रतिक्रीयेतच लिहीले जाते आहे.

ॲमी Sat, 25/04/2015 - 12:54

In reply to by गीतम

तुमचे प्रतिसाद उपप्रतिसाद म्हणूनच येतायत. पण बहुतेक तुम्ही Comment viewing options मधे Display: flat ठेवला आहे. त्याऐवजी threaded करा म्हणजे नीट दिसेल.

गीतम Sat, 25/04/2015 - 11:55

चेतनच्या पुस्तकांचे साहित्यमुल्य काहीही नसले तरीही ती पुस्तके टाईमपास करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.उदा.रेल्वेतील १२-१८-१४ तासांचा कंटाळवाणा प्रवास वैगेरे...

बिटकॉइनजी बाळा Mon, 27/04/2015 - 14:42

हे पुस्तक चांगले आहे. चेतन भगत भरपूर आवडतो. हँगोव्हर उतरायला बेस्ट. फाइव्ह पॉईंट सर्वात जास्त आवडले. टु स्टेट्स सुद्धा आवडले. मधली पुस्तके मूर्ख आहेत. थ्री इडियट्स मात्र आवडला नाही. तो काही काळाने स्वतः लिहिलेली भरताडे वाचून एखादा मॅग्नम ओपस प्रसवेल असं मात्र वाटतं.

'न'वी बाजू Mon, 27/04/2015 - 15:52

In reply to by बिटकॉइनजी बाळा

हँगोव्हर उतरायला बेस्ट.

आम्ही बाटलीभर सोडा बर्फ टाकून, लिंबू पिळून नि थोडे मीठ टाकून वापरायचो. (सॉरी, फोटो तूर्तास उपलब्ध नाही.)

हँगोव्हरकरिता त्रिभुवनात त्यासारखे दुसरे काही नाही. ही चेतन भगत वगैरे सगळी आजकालची फ्याडे आहेत. गिमिक्स नुसती. ओल्ड इज़ गोल्ड. (थेरडेशाहीचा विजय असो.)

....................

Le Roi Est Mort, Vive Le Roi!

बॅटमॅन Mon, 27/04/2015 - 18:08

In reply to by बिटकॉइनजी बाळा

आम्ही संध्याकाळी ग्रेस घेतो कधी कधी, तेव्हा लागतो मग नंतर चेतन भगत किंवा गोविंदा!

आम्ही कधी एक आर्या मोरोपंत, तर दोन श्लोक रघुनाथपंडित घेतो. त्यापुढे नवनीताची क्वार्टर मारली की मग संपलंच म्हणून समजा.

घाटावरचे भट Tue, 28/04/2015 - 09:14

In reply to by बॅटमॅन

म्हणजे जसे खूप हृदयनाथ (किंवा भीमसेन/मन्सूर/किशोरी) वगैरे ऐकल्यानंतर उतारा म्हणून थोडा अल्ताफ राजा लागतो तसा... बादवे, परवा अल्ताफ राजाचं आधी न ऐकलेलं गाणं ऐकायला मिळालं? रिक्षात बसून म्हणत असतो ते... आता शब्द आठवत नाहीत.