कोंबडी म्हणाली कोंबड्याला (चार चारोळ्या)

'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-'
कोंबडी म्हणाली कोंबड्याला,
'ऐकावी लागणार दिवसभर
नंतर पक् पक् माझी तुला !'

मांजर निघाले घाईघाईत
शिकार उंदराची करायला -
आडवा आला माणूस नेमका
परतावे लागले मांजराला !

मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप
निघाला तुरुतुरु खायला -
मधेच एक माशी शिंकली
माणसाच्या पायाखाली आला !

एक खेकडा सकाळी उठला
पूर्वेकडून पश्चिमेला निघाला -
संध्याकाळ होईपर्यंत
उत्तरेला नेमका पोहोचला !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चारोळ्या मजेशीर आहेत. माणूस आडवं जाणं आणि कोंबडीची पकपक या कल्पना फारच आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.