Skip to main content

सावल्यांच्या जगाची कल्पना 2D

उन्हाळ्यातल्या
काखांना सुखावणार्‍या
थंड लेण्यांच्या
मध्यावर पहूडलेल्या
रेखीव काळ्या पुतळ्यांना
कशी स्वप्ने पडत असतील?

ऊबदार प्रतिमा
अनुभवांच्या वेशीवर
आपल्या शरीरापलिकडच्या
चमकदार ठीपक्यांच्या पडद्यावर
वास्तव शोधतांना
केव्हातरी स्वतःच्या
कृष्णविवरात
हरवू नये म्हणून
रिमोट कंट्रोलच्या बटणांवर
चाचपडण्या इतपतच
कातेप्रमाणे कोरडा
एस्कॉन्स्ड पेशींच्या समूहाचे
वास्तव कसे असणार?

तिरशिंगराव Sat, 02/05/2015 - 10:38

अशा कविता कळण्यासाठी, आधी सत्यकथेचे सर्व अंक मिळवून त्याची पारायणे करावीत. ग्रेसचीही पारायणे करावीत, त्यानंतर समजेल हळुहळू.