मेरी क्युरीची कथा

(वि.सू. ही गोष्ट वाचल्यानंतर मुलं कदाचित पालकांना प्रश्न विचारतील. - विकीरण म्हणजे काय, क्षय म्हणजे काय, पारतंत्र्य म्हणजे काय इ.इ. - पालकांनी त्या प्रश्नांना उत्तरं देण्याची तयारी ठेवावी)
.
.
.

मेरी स्क्लोडोस्का या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाचा जन्म 1867 साली झाला.
ती पोलंड या देशाची. त्याकाळी पोलंडवर परकीय आक्रमण झाल्यामुळे तिचा देश पारतंत्र्यात होता.

.
.

.
.

मेरीला अगदी लहानपणापासूनच पुस्तक वाचण्याचे वेड होते. केव्हाही ती पुस्तकं वाचत बसलेली असायची.
.
.

.
.

त्या पारतंत्र्याच्या काळात तेथील मुला-मुलींना पोलिश भाषेत शिकण्यावर बंदी होती.
तरीसुद्धा मेरीच्या शिक्षिका चोरून पोलिश भाषेत विषय शिकवत होते.

.
.


.
.

कुणीतरी बाहेरचा अधिकारी आल्यावर सर्व मुली पोलिश
भाषेतील पुस्तकं लपवून ठेवायचे व दुसरी पुस्तकं उघडून ठेवायचे.

.
.

.
.
तिला तिच्या शेजाऱ्या - पाजाऱ्याशी गप्पा मारण्यात,
त्यांच्याशी मैत्री करण्यात रुची होती.

.
.

.
.
तिच्या आईला क्षय रोग झालेला होता.
मेरीला मात्र आपली आई तिला जवळ का घेत नाही,
इतर मुलींच्या आईसारखे मुका का घेत नाही याचे दुःख वाटत होते.

.
.

.
.
त्याच काळात तिच्या वडिलांची नोकरी गेली.
पुढे काय याचाच ती विचार करत असे. फार फार शिकून मोठे व्हायचे
तिची इच्छा होती.

.
.

.
.
याच अडचणीच्या काळात तिच्या आईचा मृत्यृ झाला.
मेरीला फार वाईट वाटत होते.

.
.

.
.
तिच्या थोरल्या बहिणीला डॉक्टर व्हायचे होते.
परंतु घरातल्या परिस्थितीमुळे तिला दुसऱ्यांच्या घरी घरकाम करावे लागले.

.
.

.
.
परंतु मेरी फार जिद्दीची मुलगी होती. तिने इतर मुला-मुलींची शिकवणी घेवून
बहिणीला डॉक्टर होण्यासाठी पैसे पाठवू लागली.

.
.

.
.
त्याच वेळी तिला स्वतःच्या अभ्यासाचीही काळजी वाटत होती.
रात्रीच्या वेळी जागून ती अभ्यास करत होती.

.
.

.
.
तिची बहिण आता डॉक्टर झाली होती. तिनेच तिला पुढच्या अभ्यासासाठी
फ्रान्स येथील पॅरिसला बोलावून घेतले.
शेवटी तिने तिचा ग्रॅज्युएट अभ्यास पूर्ण केला.

.
.

.
.
ती एका छोट्या लॅबमध्ये काम करू लागली.
,
.

.
.
काही काळानंतर फ्रान्स येथील सोरेबान विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला.
तेथे तिला पियरे क्युरी भेटला.
गणित व रसायनशास्त्र हे त्याच्या संशोधनाचे विषय होते.

.
.

.
.
त्या दोघांची चांगली दोस्ती जमली.
एकमेकाच्या अभ्यास विषयात ते मदत करत होते.
तिने त्याच्याशी लग्न केले.

.
.

.
.
तिने या संशोधनाच्या कालखंडात एका नवीन मूळधातूचा शोध लावला.
तिच्या देशाची आठवण म्हणून तिने त्याचे नाव पोलोनियम असे ठेवले.
ती यानंतर रेडियम या धातूच्या गुणधर्मावर संशोधन करू लागली.

.
.

.
.
1903 साली तिच्या या अभूतपूर्व संशोधनाला
पियरे क्युरी व बेकेरेल या वैज्ञानिकाबरोबर नोबेल पारितोषक मिळाले.
नोबेल पारितोषक मिळवणारी ती प्रथम महिला होती.
यानंतर 1911 साली रसायनशास्त्रातील संशोधनासाठी
पुन्हा एकदा तिला नोबेल पारितोषक मिळाले.
(तिच्या कुटुंबात 5 नोबेल पारितोषक विजेते होते.)

.
.

.
.
तिला सर्व प्रकारचे मान- सन्मान मिळाले.
ती जगप्रसिद्ध महिला झाली.

.
.

.
.
तरीसुद्धा तिने तिचे अध्ययन व अध्यापन तसेच चालू ठेवले.
.
.

.
.
एका जीवघेण्या अपघातात पियरे क्युरीचा मृत्यु झाला.
तरीही मेरी डगमडली नाही.
तिने तिचे संशोधन तसेच चालू ठेवले.

.
.

.
.
वैद्यक शास्त्रातील क्ष – किरणावरील आणि विकीरण प्रक्रियेवरील
तिचा अभ्यास हजारो लोकांचे प्राण वाचवू शकले.

'
'

.
.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिचा अभ्यास चालू होता.
संशोधन काळात ती वापरत असलेल्या रेडियम धातूतील
विकीरणामुळे वयाच्या 67 व्या वर्षी ती मरण पावली.

.
.

.
.
आता फक्त तिच्या आठवणी मागे राहिल्या.
.
.

.
.
संदर्भः 1. brains picking weekly, 2. muffinsongs.com

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सुंदर
ही रेखाटने/चित्रे कोणी काढलीयेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही रेखाटने/चित्रे कोणी काढलीयेत?

अगदी!

व्याप्त पोलंडमधील शाळांच्या वर्गांतील भरपूर मोकळी जागा, उत्कृष्ट ष्टूडण्ट-टीचर रेशो वगैरे पाहून डोळे दिपले, त्या मुलांचा हेवा वाटला, इ.इ. झालेच तर त्या देशातील औटसाइझ पेन्सिलींबद्दल मौजदेखील वाटली. शिवाय, यातून स्फूर्ती घेऊन मनात आणले तर एके दिवशी आपणही उत्कृष्ट चित्रकार बनू शकू, असा आत्मविश्वासदेखील बळावला. याबद्दल त्या थोर चित्रकर्त्याचे उपकार मानावेत तेवढे कमीच आहेत, इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ८ व्या इयत्तेच्या मराठीच्या पाठयपुस्तकामध्ये मेरी क्यूरीने किती हालअपेष्टा सोसून फ्रान्समधले आपले शिक्षण पुरे केले असा एक धडा होता त्याची आठवण झाली. अपुरा पैसा आणि पोलिश असल्यामुळे इतरांकडून मिळणारी उपेक्षा असा लेखाचा विषय होता आणि त्याला 'कुतो विद्यार्थिनः सुखम्' असे नाव होते असेहि आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चुकून तोच प्रतिसाद दोनदा दिला गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेरी क्यूरी यांच्या कर्तूत्वाबद्दल अतोनात आदर आहे. दोन नोबेल मिळवायची, ती ही शास्त्रीय संशोधनाबद्दल, हे काही खायचे काम नाही....
पण ह्या विषयावरील सदर धाग्याचे एकंदर प्रकटीकरण हे अत्यंत बालिश आणि फालतू वाटले....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण ह्या विषयावरील सदर धाग्याचे एकंदर प्रकटीकरण हे अत्यंत बालिश आणि फालतू वाटले.

आपल्याला असे वाटले या बद्दल मला सखेद आश्चर्य वाटले. एकदा गोविंद तळवलकरांनी मटाचे संपादक असताना कुठल्यातरी साहित्याला बाल साहित्य असे हिणवले होते. त्यावेळी अनेक साहित्यिकांनी बाल साहित्याला कमी दर्जाचे लेखल्याबद्दल निषेध व्यक्त केला होता. त्याची आठवण झाली.
नानावटींनी त्यांचा हा धागा त्यांच्या नेहमीच्या शैलीत व्यक्त न करता वेगळ्या पद्धतीने सादर केल्याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला त्यांचे कौतुक वाटले

तुम्हाला कौतुक वाटले याबद्दल तुमच्या मताचा आदर आहे.
आणि हो, बालसाहित्याबद्द्लही आदर आहे. अनेक श्रेष्ठ बालसाहित्यिकांनी विविध कठीण विषय लहान मुलांसाठी सोपे करून सांगितले आहेत...

पण मेरी क्यूरीचा एक फेलो रसायनशास्त्रज्ञ या नात्याने मला प्रस्तुत लेखन हे बालिश आणि फालतू वाटले हे तितकंच खरं आहे.
प्रस्तुत लेखकाच्या इतर लेखनाचा मी फॅन आहे. पण हा धागा त्यात मी मोजू शकत नाही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0