Skip to main content

रंगू

खरं तर कवितेत शेवटी मिळमिळीत प्रेमापेक्षा रंगूच्या हृदयावरचा savage assault दाखवायचा होता. पण तेवढे सशक्त भाषाप्रभुत्व नसल्याने कविता गोड मानून घ्यावी ;)
.
मोठी झोक्यात चाल तुझी,नखर्‍याची चाल तुझी,
नको अशी तोर्‍यात चालू
.
कोणी अडवल गं वाट, धरल पदराचा शेव
जरा सांभाळ पोरी तुझा शालू
.
वय अजुन कोवळं तुझं, खेळायचं दिस तुझं,
नको अशी ठीणगीशी खेळू
.
कोणी करल धीटाई, जर आला हातघाई,
कशी वाचेल सांग तुझी आबरु?
.
अरं लहान मिर्ची जरी, डोळ्यात पाणी आणी,
नकोस कमी तिला लेखू,
.
जर केली धीटाई, कोणी आला हातघाई,
त्याच्या नाकी मी आणेन नऊ.
.
मोठा असल तालेवार,कोण्या गावचा दरकार,
नाही चालायची रंगूवर जादू,
.
जर करेल मनमानी,जर केली छेडछाडी
त्याला दाखवल इंगा ही रंगू.
.
ज्याच्या मनगटात जोर,ज्याचं वाघाचं जिगर,
तोच करेल माझ्यावर जादू,
.
मन हरवून माझं, काळीज लुटून खास,
तोच जिंकून नेईल ही रंगू.

शुचि. Tue, 05/05/2015 - 14:34

In reply to by ऋषिकेश

नाही ऋ, उलट यावेळी मला ठेक्यात कविता सुचली. थांबा सांगते-

मोठी झोक्या"त्त" चाल तुझी,नखर्‍या"च्ची" चाल तुझी,
नको अशी तोर्‍यात चालू
.
कोणी अडवल गं वा"ट्ट", धरल पदरा"च्चा" शेव
जरा सांभाळ पोरी तुझा शालू
.
वय अज्जुन कोवळ्ळं तुझं, खेळायच्चं दिस्स तुझं,
नको अशी ठीणगीशी खेळू
.
कोणी करल धीटाईई, जर आल्ला हातघाई,
कशी वाचेल सांग तुझी आबरु?

वरील अधोरेखित शब्दांवर जोर देत म्हणा.

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 14:45

In reply to by शुचि.

नै जमते

नै जमते म्हणजे, एकच चाल सगळ्या कडव्यांना लावायला नै जमते
काही कडव्यांना बदल करावा लागतोय.

---

चाल एक्सपेक्टेड आहे हे आधीच वाटलं होतं

आदूबाळ Tue, 05/05/2015 - 15:03

In reply to by शुचि.

मोठी झोक्या"त्त" चाल तुझी,नखर्‍या"च्ची" चाल तुझी,
नको अशी तोर्‍यात चालू

ही ओळ चालीत कशी बसवायची ते समजलं नाही.