ही बातमी समजली का? - ७३
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=======================
अरेच्चा!!
दाऊ टू मोदीसरकार?
>>ताजमहाल एटले बिजनेस
>>ताजमहाल एटले बिजनेस अपार्चुनिटी छे
ताजमहाल पाडून तिथे शिवमंदिर बांधायचं नाहीच्चै. आधीचे शिवमंदिर पाडून तिथे ताजमहाल बांधला किंवा तेजोमहालयाचं ताजमहाल केलं एवढंच एस्टॅब्लिश करायचंय. (बाबरी मशीदसुद्धा पाडायची नव्हतीच. पण अंदाज चुकला आणि प्रकरण हाताबाहेर गेलं). :)
सिद्ध झालं तर मंत्रीपद
युपीए-२च्या वेळी आरोप झाले असताना कित्येक मंत्र्यांना असेच दबावतंत्र (कामकाज चालु न देणे) वापरून भाजपाने राजीनामा द्यायला लावला होता. तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाचे काम मोठे चोख बजावले होते.
कायदेमंत्री, रेल्वे मंत्री यांच्यावर आरोप झाले असता त्यांना राजीनामा देणे भाग पाडणारा (आणि म्हणूनच एक ठाम संदेश लोकांमध्ये पोचवणारा) भा.ज.पा. आता सत्ता मिळताच आपल्या मंत्र्यांवर असे आरोप इतर पक्षांनी नाही तर कॅगने केल्यावरही राजीनामा घेत नसेल तर ते विपरीत संदेश देणारे आहे.
आता विरोधकांनी सदन चालु दिले नाही तरीही बोलायला भाजपाकडे मुद्दा नाही कारण संसदीय शस्त्रांप्रमाणेच काम होऊ न देणे हि सुद्धा एक रणनिती आहे, एक शस्त्र असल्याचे तेव्हा भाजपाचे खासदार तावातावाने सांगत असत व एका अर्थाने ते खरेही होते. आता काँग्रेस कामकाज चालु देत नाही तेव्हा त्यांना दोष देणे दुटप्पी ठरेल!
अबोटाबाद रेडसंबंधी उघड
अबोटाबाद रेडसंबंधी उघड झालेल्या नव्या माहितीबाबत आजचा लोकसत्ताचा अग्रलेख
राहुल गांधींचे भाषण
सुटाबुटातले सरकार वरून आता सुटाबुटातले चोर असे संबोधन वापरून आपल्यालाही प्रकाशझोतात राहणे अवघड नसल्याने राहुल गांधींनी दाखवून दिले आहे.
त्यांच्या या छोटेखानी भाषणातील मुद्दे (लोकसभेच्या मिनिट्समधून साभार):
-- आम्हाला जे विधेयक तयार करायला दोन वर्ष लागली एन्डीएसरकारने त्याची काही दिवसांतच हत्या केली आहे.
-- पहिली कुर्हाड सरकारने (विधेयकाच्या) गळ्यावरच मारली - कन्सेन्ट क्लॉज. आम्ही म्हटले होते की जर लोकांची जमिन सरकर घेणार असेल तर त्याला विचारून ती घेतली जाईल. पण तुम्ही म्हणता (म्हणजे आताचे सरकार म्हणते) की आम्ही विचारणार नाही, आम्ही न विचारता जमीन घेणार, म्हणजे आम्ही जमिन हडपणार! जमिन कोणाची असा आम्हाला फरक पडत नाही आम्हाला हवी तर नी हवी ती जमिन आम्ही हडपणार
-- हा गळा कापल्यावर धड खाली पडले मग त्यांनी दुसर्यांदा कुर्हाड मारली की 'सोशल इंपॅक्ट असेसमेंट' नाही होणार. आम्ही म्हणत होतो हे व्हायला हवे. कोणाचे नुकसान झाले आहे? या अधिग्रहणाचा कोणावर किती परिणाम होणार आहे हे बघणे गरजेचे आहे. तुम्ही म्हणता अजिबात गरजेचे नाही. शेतकरी, कामगारांवर होणारे परिणाम समजून घ्यायची तुम्हाला अजिबात गरज नाही. आम्ही म्हटलं या परिणामाचा सहा महिन्यात शोध घेतला पाहिजे (जांच होनी चाहिये). तुम्ही म्हणता याचीही गरज नाही
-- तिसरी कुर्हाड - आम्ही म्हटलं समजा एखादी जमिन घेतली आणि तीन वर्षात प्रोजेक्ट सुरू नाही होऊ शकले तर जमिन पुन्हा मूळ मालकाला देणार. तुम्हला हे ही नको. नुसती जमिन पडून राहिली तरी चालेल ती शेतकर्याला वा कामगारांना मिळता कामा नये
-- एक आरटीआय होती ज्यात फायनान्स मिनिस्ट्रीला विचारले होते की 'जमिन उपलब्ध नसल्याने अशी किती प्रोजेक्ट बंद आहेत वा रखडली आहेत? आम्हाला वाटले चांगली ७०-८०% प्रोजेक्ट्स जमिनीवाचून खोळंबली असतील. पण मिनिस्ट्रीने सांगितले केवळ ८% प्रोजेक्ट्स जमिनिवाचून खोळंबली आहेत.
-- केंद्र सरकारकडे जमिन आहे, राज्य सरकारकडे जमिन आहे. एसीझेडसाठी घेतलेल्या जमिनीपैकी ४०% जमिन नुसतीच पडून आहे. पण या सरकारला शेतकर्यांचीच जमिन हवीय!
-- जमिन बुंदेखण्ड किंवा राजस्थानातली नकोय तर गुडगाव, नॉएडा किंवा पुण्यासारख्या शहरांजवळची शेतजमिन हवीय कारण तिथे खूप "भाव" आहे. भारतीय शेतकर्यांनो, तुमच्या पायाखाली सोने आहे आणि हे सरकार तेच लुबाडू पाहते आहे.
-- शेतकर्यांची जमिन आज काही लाखात्स जातेय १०-२० वर्शांत काही कोटींत जाईत तर तुमच्या मुलांना ५०-१०० करोड रुपयेही मिळतील. पण हे सरकर तुम्हाला तसे करू देत नाहीये. त्यांना ही जमिन त्यांच्या उद्योजक मित्रांनाच द्यायचीये.
-- मला आठवतंय की हे बिल मंजूर झालं तेव्हा समोर आडवाणी बसले होते, सुषमाजी होत्या, राजनाथ सिंहजी होते. तेव्हा हे विधेयक त्यांच्या सुचनांसह मंजूर झाले तेव्हा त्यंनीही बाके वाजवली होती, टाळ्या वाजवल्या होत्या. मग वर्षभरात असे काय झाले?
-- मला वाटलं होतं की चोर रात्री येतात, गपचूप येतात, पण हे चोर दिवसाढवळ्या येताहेत आणि सुटबूट घालून येताहेत.
==========
यावर प्रतिवाद येणार नाही याची खात्री आहे. फारतर फक्त स्वतः काँग्रेसपक्षाने आपल्या कार्यकाळाक्लडे बघावे, जावई वद्रा यांची जमिन असे निरर्थक व इथे गैरलागू मुद्दे निघतील!
पण श्री गांधी यांची लोकसभेत मांडलेल्या या मुद्द्यांचे जोवर सरकार योग्य ते निराकरण करत नाही तोवर सरकारच्या भुमिकेबाबत संभ्रम कायम राहणार आहे हे खरेच!
सॉल्लिड.--------------तिसरी
सॉल्लिड.
--------------
तिसरी कुर्हाड - आम्ही म्हटलं समजा एखादी जमिन घेतली आणि तीन वर्षात प्रोजेक्ट सुरू नाही होऊ शकले तर जमिन पुन्हा मूळ मालकाला देणार.
हा मुद्दा व ते सोशल इंपॅक्ट असेसमेंट सोडून बाकी मुद्दे सॉल्लिड. विशेषतः किती कामे जमिनीवाचून खळंबल्येत त्याबद्दल.
--------------
ते सोशल इंपॅक्ट असेसमेंट चे कलम बकवास आहे. कैच्याकै.
ते सोशल इंपॅक्ट असेसमेंट चे
ते सोशल इंपॅक्ट असेसमेंट चे कलम बकवास आहे. कैच्याकै.
नाही कळले. अशी असेसमेंट का नको? (असेसमेंटला टाईम बाउंड्ट्री आहे.)
समजा एखादी खारजमिन विकली जातेय. मूळ मालकाला हरकत नाही. मात्र ती गेल्याने काही माशांना प्रजनन शक्य होणार नाही. त्यामुळे कित्येक मासेमारांवर परिणाम होणार आहे. अशावेळी जमिनीच्या मालकापेक्षा कितीतरी मोठा 'सोशल इंपॅक्ट' आहे. त्याचा विचार उद्योगधंद्यांनी करू नये हे मान्य पण सरकारने केला पाहिजे. ज्या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहीत होणार आहे त्या उद्योगाने मारेमारांना भरपाई द्यावी असे म्हणणे नाही मात्र सरकारने ही माहितीच करून घेऊ नये असे म्हणणे अतिशय मग्रूरीचे आहे.
हे एक उदाहरण झाले, काही जमिनी गेल्याने लोकांच्या वहिवाटीवर फरक पडणार असेल तर काही जमिनी अशा प्रकल्पांना गेल्याने भूजलपातळीत घट होऊन शेतीपासून पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार असेल तर 'सरकारने' त्याची माहिती करून घ्यायला का नको?
समजा एखादी खारजमिन विकली
समजा एखादी खारजमिन विकली जातेय. मूळ मालकाला हरकत नाही. मात्र ती गेल्याने काही माशांना प्रजनन शक्य होणार नाही. त्यामुळे कित्येक मासेमारांवर परिणाम होणार आहे.
तसे असेल तर मासेमारांना ती खारजमिन विकत घ्यावी ना. आम्ही काही करणार नाही, आमचे जे उत्पादन आहे ( इथे मासे ) ते सुरक्षीत ठेवण्यासाठी आम्ही काही झळ सोसणार नाही. पण दुसर्याला पण काही करु देणार नाही.
भिकार विचारसरणी आहे.
सोशल इंपॅक्ट मधे प्रदुषण वगैरे ठीक आहे, आणि त्यासाठी सध्या कायदे आणि न्यायालये आहेतच.
पण माझे दुकान चालू रहावे म्हणुन दुसर्यांना दुकान उघडण्यास बंदी ही चूक विचार सरणी आहे.
सोशल इंपॅक्ट मधे प्रदुषण
सोशल इंपॅक्ट मधे प्रदुषण वगैरे ठीक आहे
त्यात काय हवे हा वेगळा मुद्दा झाला. सोशल इंम्पॅक्ट बघुच नये, त्याची गरजच नाही असे नवा बदल म्हणतो.
पण माझे दुकान चालू रहावे म्हणुन दुसर्यांना दुकान उघडण्यास बंदी ही चूक विचार सरणी आहे.
युपीए कायद्यानुसार सोशल इंपॅक्ट असेसमेंट करावी असे आहे, त्यानुसार काय निर्णय घ्यावा/ अधिग्रहण रोखावेच वगैरे बंधने नाहीत. नवीन बदल अशी असेसमेंटच नको म्हणतो.
त्यासाठी सध्या कायदे आणि न्यायालये आहेतच.
बहुदा नवीन कायद्यात न्यायालयांत जाण्याचा क्लॉजही काढलाय बहुधा. काही बदल केले त्यात तो पुन्हा घातलाय का एकदा बघावे लागेल.
बहुदा नवीन कायद्यात
बहुदा नवीन कायद्यात न्यायालयांत जाण्याचा क्लॉजही काढलाय बहुधा. काही बदल केले त्यात तो पुन्हा घातलाय का एकदा बघावे लागेल.
मी प्रदुषणा च्या बाबतीत न्यायालये आणि सध्याचे कायदे आहेतच असे म्हणत होते.
युपीए कायद्यानुसार सोशल इंपॅक्ट असेसमेंट करावी असे आहे, त्यानुसार काय निर्णय घ्यावा/ अधिग्रहण रोखावेच वगैरे बंधने नाहीत. नवीन बदल अशी असेसमेंटच नको म्हणतो.
व्यक्तीने कायद्याच्या कक्षेत राहुन काय करावे हे आजुबाजुच्या समाजानी का ठरवावे? ह्यात त्या आजुबाजुच्या समाजाचे व्हेस्टेड इंटरेस्ट नसणार का? उद्या मी कार घ्यावी की नाही, मुल जन्माला घालावे की नाही ह्या साठी पण सोशल इंपॅक्ट असेस्मेंट व्हावी का? कार : प्रदुषण वाढवेल म्हणुन नको. मुल : एक खायचे तोंड वाढेल म्हणुन नको, जरी समाज त्या मुलाला खायला घालणार नसला तरी.
हे सरळसरळ अति डाव्या समाजवादा कडे जाणे नाहीये का?
महत्वाचे म्हणजे समाजवाद फक्त सध्याच्या प्रस्थापितांना सोयीचा असतो म्हणुन हवासा असतो.
मी कार घ्यावी की नाही, मुल
मी कार घ्यावी की नाही, मुल जन्माला घालावे की नाही ह्या साठी पण सोशल इंपॅक्ट असेस्मेंट व्हावी का?
ही असेसमेंटही होतच असते.
कार्सने किती प्रदुषण करावे याची मानके सरकार ठरवते (अगदी भांडवलशाहीवादी पाश्चात्य देशांतही!). केवळ पहिल्या दोनच मुलांना फि-सवलती वगैरे सरकार देते म्हणजे किती मुलं जन्माला घाणण्याला प्रोत्साहन द्यावे हे ही सरकार ठरवते.
ही असेसमेंटही होतच असते.
ही असेसमेंटही होतच असते.
कार्सने किती प्रदुषण करावे याची मानके सरकार ठरवते (अगदी भांडवलशाहीवादी पाश्चात्य देशांतही!). केवळ पहिल्या दोनच मुलांना फि-सवलती वगैरे सरकार देते म्हणजे किती मुलं जन्माला घाणण्याला प्रोत्साहन द्यावे हे ही सरकार ठरवते.
सरकार बंदी नाही घालत. इंन्सेंटीव्ह देत नसेल कदाचित पण बंदी नाही घालत.
तुमच्याच उदाहरणात खारजमिनी साठी मासेमारांनी विरोध केला तर विकत घेता येणार नाही. ह्या केस मधे सरकार असे नाही म्हणत की ७०-८० टक्के कंसेंट आली नाही तर दुप्पट रेट नी जमिन विकत घ्यायला लागेल आणि तो जास्तीचा पैसा सरकार जमा करायला लागेल. इथे सरळसरळ बंदी आहे.
मासेमार्यांच्या "दुकानात"
मासेमार्यांच्या "दुकानात" जाऊन कोणीही मासेमारी करु शकतो. तुमच्या दुकानात जाऊन कोणीही उत्पादन घेऊ शकतं का?
"सगळ्यांची" आणि "माझी" यातलं फक्त "माझी" एवढंच कळतं काही लोकांना. हा एक सिरियस मानसिक विकार मोठ्या प्रमाणात पसरला असून जगात एक प्रकारचे "झॉम्बी वॉर" चालू आहे आणि बहुतेकांना त्यातले गांभीर्य कळलेले नाहीय.
"सगळ्यांची" आणि "माझी" यातलं
"सगळ्यांची" आणि "माझी" यातलं फक्त "माझी" एवढंच कळतं काही लोकांना. हा एक सिरियस मानसिक विकार मोठ्या प्रमाणात पसरला असून जगात एक प्रकारचे "झॉम्बी वॉर" चालू आहे आणि बहुतेकांना त्यातले गांभीर्य कळलेले नाहीय.
मासेमार्यांचे दुकान जे काही आहे ते एक तर सीपीआर (कम्युनिटी प्रॉपर्टी रिसोर्स) आहे किंवा पब्लिक रिसोर्स आहे.
प्रश्न हा आहे की त्या "बहुतेकांना" मधे मासेमार येतात का ?
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Public_good
ऋ, यात ४ प्रकारांच्या गुड्स चा एक मेट्रिक आहे टॅब्युलर फॉर्मेट मधे. तो बघ.
४ प्रकार खालीलप्रमाणे -
Private goods
Club goods
Common pool resources
Public goods
कोणतीही जमिन ही जमिनमालकाची
कोणतीही जमिन ही जमिनमालकाची मोनोपोली असायला पायजे. Owner must have veto power over that land. शेतकरी इन्क्लुडेड. वापर/व्यवहार करताना negative and positive externalities चा विचार अवश्य व्हावा. Analysis of externaities is done in order to internalize the externalities.
सोशल इंपॅक्ट असेसमेंट होऊच नये असे माझे म्हणणे नाही.
सोशल इंपॅक्ट असेसमेंट सरकारने करू नये असे माझे म्हणणे आहे. खरंतर सरकारवर अशी असेसमेंट करण्यापासून प्रतिबंध करण्याचा कायदा केला पाहिजे.
सोशल इंपॅक्ट हा लोकल च असतो व - it is always about negative or positive externalities of the property.
-----
एक्स्टरनॅलिटीज चा विचार करणे गरजेचे आहे. तो खाली देतो आहे ....
समजा एखादी खारजमिन विकली जातेय. मूळ मालकाला हरकत नाही. मात्र ती गेल्याने काही माशांना प्रजनन शक्य होणार नाही. त्यामुळे कित्येक मासेमारांवर परिणाम होणार आहे.
ती विकली जाण्यापूर्वी त्या जमिनी च्या त्या स्पेसिफिक जागेवर असण्याचे फायदे त्या जमिनीबाहेरच्या मासेमारांनी घेतले तेव्हा त्यांचा शेअर त्या जमिनीच्या मालकाला दिला का ?
१) नसेल तर विकली जाताना जमिन मालकाने त्या मासेमारांचे म्हणणे विचारात का घ्यावे ?
२) खारजमिनीची विक्री होणार आहे. मासेमार हे निर्धन, गरीब आहेत (नेहमीचे गृहितक) म्हणून या खारजमिनीच्या विक्रीमुळे त्या त्यांच्यावर होणार्या निगेटिव्ह एक्सटरनॅलिटीचा अभ्यास सरकारने करणे म्हंजे एकाची कॉस्ट दुसर्याकडे थेट संक्रमित करणे आहे. If the fishermen will have to face issues then they have to do an analysis themselves (you can call it social) and ask for the remuneration from either the land owner खारजमिन मालक (seller) or land buyer (supposedly the industrialist) or jointly from both.
३) आता मासेमारांना बार्गेनिंग पॉवर नसल्यामुळे the industrialist किंवा खारजमिन मालक हे दोघे ही त्यांना उडवून लावतील.
४) व म्हणून सरकारने मधे पडून हा अभ्यास करावा त्यातून नुकसानभरपाई मासेमारांना दिली जावी - असा काँग्रेस सरकारचा डाव आहे. What that literally means is - (indirectly) taxpayor will have to pay for the "impact assessment". Which means a bureaucrat ( s ) do(es) it. Bureaucrats have no incentive to keep the costs low. And then at the end of this analysis Bureaucrats determine what the remuneration is and WHO should pay it. So that is imposed on the land owner (seller) or land buyer (supposedly the industrialist). मासेमार (व अनेकदा खारजमिन मालक) निर्धन नसण्याची शक्यताच नसल्याने हे त्या उद्योजकाच्या डोक्यावर थोपले जाणार.
ती विकली जाण्यापूर्वी त्या
ती विकली जाण्यापूर्वी त्या जमिनी च्या त्या स्पेसिफिक जागेवर असण्याचे फायदे त्या जमिनीबाहेरच्या मासेमारांनी घेतले तेव्हा त्यांचा शेअर त्या जमिनीच्या मालकाला दिला का ?
हा मुद्दा रोचक आहे. विचार करतो पुन्हा!
Owner must have veto power over that land. शेतकरी इन्क्लुडेड.
सहमत आहे.
ह्म्म... जुन्या कायद्याचा
ह्म्म... जुन्या कायद्याचा आधार घेऊन सगळे फायदे उपटायचे आणि स्वत:ची जमीन जायची वेळ आली की संमति वगैरे बोंबाबोंब करणारे हे शेतकरी आणि त्यांचे नेते फार डांबिस आहेत. आधी ज्याला सपोर्ट केलं ते चूक आहे असं मान्य करून त्यात सुधारणा करणं मला तरी वावगं वाटत नाही.
आधीच्या ब्रिटीशकालीन कायद्यात
आधीच्या ब्रिटीशकालीन कायद्यात कन्सेन्ट क्लॉज नव्हता, सरकारला हवे तेव्हा भारतीय जमिनीचा वापर करता यावा असा ब्रिटीशांचा उद्देश!
त्यात "सुधारणा" म्हणून तो संसदेत 'एकमताने' घालण्यात आला. आता त्यातला तो क्लॉज पुन्हा काढणे - ते ही संसदेत एकमत नसताना - ही "सुधारणा" कशी?
ॠषिकेश - बाकी काहीही असले तरी
ॠषिकेश - बाकी काहीही असले तरी ह्या विधेयकाची अजिबात गरज नव्हती, सरकार कडे भरपूर जमीन पडुन आहे. MIDC रिकाम्या पडल्या आहेत. कंपन्यानी मिळालेल्या जागांचा सुद्धा पूर्ण उपयोग केला नाहीये.
मोदींचे हे चुकलेच आहे आणि विधेयक आणायचेच होते तर इतकी जगण्या-मरण्याची प्राधान्यता द्यायची गरज नव्हती.
हे विधेयक आणि जीएसटी शेवटी
हे विधेयक आणि जीएसटी शेवटी समित्यांकडे जाण्यावरून लोकसत्तातील हा अग्रलेख
त्यातील पुढील परिच्छेद मोठा मार्मिक आहे:
कारण काँग्रेसने आणलेल्या जमीन अधिग्रहण विधेयकास मुदलात भाजपने पािठबा दिला होता आणि जे वस्तू व सेवा कर विधेयक आता केंद्र सरकार मंजूर करू पाहते त्यास नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता. किंबहुना गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी केलेल्या सततच्या विरोधामुळेच देशात हा कायदा अमलात येऊ शकला नाही. आता ते त्यासाठी आग्रह धरीत असताना काँग्रेस त्याच्या विरोधात आहे. त्याच वेळी एकेकाळी वस्तू व सेवा कर विधेयकावर जी भूमिका मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने घेतली तीच भूमिका आता जयललिता घेत आहेत. त्यामुळे मोदी कोणत्या तोंडाने जयललिता यांना उपदेश करणार? खेरीज, काँग्रेसच्या ज्या जमीन विधेयकास भाजपने पािठबा दिला होता, त्याच विधेयकावर भाजपने घूमजाव केल्यानंतर काँग्रेसही त्याच मार्गाने जात असेल तर भाजप त्या पक्षास कसा रोखणार?
एनजीओज आणि सरकारे
आशिया खंडात सरकारांनी एनजीओजवर घातलेल्या वाढीव निर्बंधांविषयी अर्थबोधन करणारा लेख 'इकॉनॉमिस्ट'मध्ये आला आहे.
One official grumble is that
One official grumble is that charities are often proselytisers of unwelcome religions. In India, Hindu nationalist outfits, notably the giant Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), rage at Christian charities. The boss of the RSS insists that the late Mother Teresa cared more about converting Kolkata’s poor than helping them. The Indian home ministry says that $13 billion in foreign money has gone to local charities over the past decade. Of the top 15 donors, 13 were Christian outfits. Who is to say they were not saving souls rather than improving lives? It is common to hear such claims in India.
सॉल्लिड.
१३ बिलियन डॉलर्स या सगळ्या व्यवहारांमधे ओतले गेले. ठीकाय. ते खरे आहे असे मानू. आरेसेस ला प्रॉब्लेम काय आहे ?? If I offer money to someone and in return that someone changes his/her religion - why should RSS have a locus standi on the matter unless I am using force on that someone or causing direct damages to RSS ?
पश्चिम बंगाल सरकारवर २.७४ लाख कोटी चे कर्ज आहे. ते पैसे पण लोकांचा विकास करण्यात खर्च केले गेले. शून्य भ्रष्टाचार झाला असे मानू. आता काय ? विकास झालाय का ?? केंद्र सरकारकडे कर्जमाफी मागायला जावे लागतेयच ना ?? केंद्र सरकार देईलच असे नाही. पण इतका आटापिटा करूनही - पश्चिम बंगाल चा विकास झालाय का ??? नाही ना ?? आणि त्याउप्पर भागवतबुवा "We will not rest until last person in the last line enjoys the fruits of development" असं कंठशोष करून सांगतायत ना ?? मग १३ बिलियन डॉलर्स (सुमारे ६५ हजार कोटी रुपये) आणखी मिळाले (कोलकात्याच्या) विकासासाठी असे समजा व आणखी जो काय तो विकास घडवून आणा. विकास झाल्यावर - एकम सत विप्रा: बहुदा वदन्ति - असे म्हणले की झाले ?? आरेसेस ची समस्या काय आहे ?
-----------------
Those now advocating tighter scrutiny of activist outfits may come to regret it. In India, for example, Hindu nationalists in the RSS often claim to run the world’s biggest NGO. It has strong foreign links, draws on an Indian diaspora in America and elsewhere for support, and dishes out help across borders, such as in Nepal following last month’s earthquake.
हे वाक्य अतिमहामार्मिक. आरेसेस हे स्वतः एक मोठ्ठे एन्जीओ आहे व त्याला फंडिंग एनाराय लोकांकडून मिळते - त्याचे काय ???
---------
आता लगेच गब्बर हिंदुद्वेष्टा आहे असा आरोप होईलच.
मिशनरीज
पहिल्यांनी काही म्हणजे किती ते सांगा.
१. ४-५ लोक ते २. ४-५ लोक सोडून अन्य सर्व लोक
या विशाल रेंज मधले नक्की किती?
===============================================
Note that there is peculiar difference between separatist movement of J&K and Nagaland. While peace is supreme desperation of the typical Kashmiri for the time being, freedom being next; all what Nagas want from India is independence. Kashmiris are blunt and would tell you upfront that Indians are foreigners, Nagas would wait for you to leave.
==============================================
Now why such sharp reaction? Hindu majority Indian state is never going to approbate the missionary propaganda there, if not in official, in personal capacity. So missionaries think it is better oppose the state itself. The conditions are conducive. And also, the missionaries don't have to lie. They have to tell a truth to the locals - that the Indian state has ignored you* - to turn them against the state in a little more vicious words.
=============================================
@गब्बर-
आता मला प्रामुख्याने गब्बरला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याने "जोपावतो आर एस एस ला थेट इजा होत नाही" अशी भाषा केली आहे म्हणून...
भारताचे विभाजन होणे ही आर एस एस ला थेट इजा आहे काय? ऐकायला नवल वाटेल पण हिमाचल प्रदेश नागालँडपेक्षा भारतापेक्षा वेगळा आहे. फक्त स्थानिकांकडे पाहिल्यास. पण तिथे ख्रिश्चन नाहीत आणि स्वातंत्र्याची मागणीही नाही. हा अबायोजेनेसिस आणि त्यापुढील उत्क्रांती याप्रमाणे एक योगायोग आहे काय?
==============================================
माझा अजून एक प्रश्न आहे. बहुतेक न्या. रानडे आणि रे. टिळक हे पूर्वीचे हिंदू ख्रिश्चन झाले होते. आर्थिक, सांस्कृतिक देवाणघेवाणीतून धर्म एकत्र येतात आणि लोकांवर प्रभाव पडतो हे ही सामान्यच आहे. यातून काही धर्म पसरणे, काही संकोचणे हे ही इष्टच आणि खेळीमेळीने घ्यायचे मानू यात. पण फक्त आदिवासींनाच ख्रश्चन धर्म आवडतो याचं लॉजिक काय असावं? शहरांत कितीतरी मुले काँव्हेंटांत शिकतात ती त्या धर्माच्या निकट जातात. त्याचं तत्त्वज्ञान शिकतात. पण कुण्णी तो स्वीकारत नाही. (माझ्या व्यक्तिगत मते शहरी राष्ट्रवादी प्रगत हिंदू मुस्लिम लोकांनी बर्याच प्रमाणात ख्रिश्चन झालं पाहिजे. इट इज क्लोजर टू दिअर रियल लाइफ.). आदिवासी मिशनरीज कामाने प्रभावित कमी आणि उपकृत जास्त होतात. आणि अधिकृत उद्देशच साम दाम दंड भेद वापरून क्न्वर्ट करणे असेल तर? लॉजिकली आदिवास्यांनी आर्थिक फायदा करून घेतला पाहिजे आणि धार्मिक प्रभाव कमी पडला पाहिजे कारण आदिवास्यांवर प्रथांचा पगडा जबर्या असतो**. मोकळ्या मनाच्या संबंधित शहरी लोकांमधे जास्त धर्मांतर न होता आदिवास्यांमधे होते आहे म्हणजे ...कोअर्शन आहे.
भारतात मिशनरी फसवून धर्मांतर करतात असे म्हणणे हे केवळ सनातनी कट्टर इ इ लोकांचे काम आहे असे मानले जाते. त्यांच्या मताला व्हॅल्यू नाही. तथाकथित प्रतिमाप्रिय पुरोगामी हे सत्य मुखातून आल्यास ते भ्रष्ट होते असे मानतात.
==================================================
ज्या व्यक्तिला हिंदू धर्मात आस्था आहे त्याची मिशनरीवर रिअॅक्ट करताना गोची होते.
(हिंदू?) सरकार आदिवासींसाठी काही करत नाही. हिंदू संघटना करत नाहीत. करत असल्यातरी त्यांच्याकडे पैशाची बोंबाबोंब आहे आणि विकास ह्या फ्रंटवर काही काम नाही. फार तर फार अंधश्रद्धा, शिक्षण. मिशनरीवाले मात्र गडगंज असतात. महाराष्ट्रात पुणे- औरंगाबाद रस्त्यावरून कुठेही गाडी आत घातली, ५०-६० किमी गावाकडच्या भागात कि जी गावे नि घरे लागतात ती पाहून एकच शब्द सुचतो - अवकळा. आणि म्हणे हे सर्वात प्रगत राज्य!!! नागालँड मधे असं नाही. अख्ख्या राज्यात कुठेही गाडी घुसवा, सगळी घरे त्याच्च दर्जाची!! आणि अवकळा शब्द नक्कीच सुचणार नाही. गडगंज ची कल्पना यावी.
मिशनरींना मदत करू नाही दिली तर या लोकांची हालत माय खाऊ घालीना आन मावशी भीक मागू देईना टाइपची होईल. म्हणून गोची होईल म्हणायचं आहे.
पण यातही अजून अंगे, उपांगे आहेत -
१. विथ ऑर विदौट मिशनरीज - या लोकांची सामाजिक आणि सांपत्तिक स्थिती देशातल्या टिपिकल मागास भागांपेक्षा प्रचंडच चांगली आहे. आता तुम्ही प्रगत नाहीत म्हणून द्रोह करा हे कसं वाटतं?
२. भारत सरकारनं लक्ष दिलं नाही यालाही दुसरी बाजू आहे. गाजियाबाद आणि कानपुरची या "प्रत्येक" जिल्ह्याची लोकसंख्या अख्ख्या नागालँडपेक्षा जास्त आहे. आपण कधी "गाजियाबादच्या समस्या" म्हणून चर्चा करतो का?
====================================================================================
@गब्बर
असो. मला थेट इजा होत नाही तोपर्यंत ...माझ्या देशात कुणीही काहीही करो ..हे कै फार सु़ज्ञ वाटत नाही.
*The fact that Indian state has ignored everybody need not be made explicit here.
**नसतो म्हणाल तर गतकालाचा विजय असो.
***व्यक्तिशः मला १००० प्रकारची फुले तोडून सर्वत्र झंडूची फूलं लावायला आवडत नाही.
गब्बर रिअॅक्टच करणार
गब्बर रिअॅक्टच करणार नाही.
चांगलेच ओळखलेत. मी जनरली तुम्हास उत्तर द्यायचे टाळतो. मला तुमची भीती वाटते. (जो डर गया सो मर गया.)
---------
तुमचा आरेसेस बद्दलचा प्रश्न उचित शब्दयोजनायुक्त आहे.
आरेसेस कोणत्याही प्रश्नात ला लोकस स्टँडी नसावी असे मला म्हणायचे नाही. ते एक स्वतंत्र संगठन आहे. व त्यांना अभिव्यक्ती आहेच. पण लोकस स्टँडी ही - in order to seek justice असते. निदान असा माझा समज आहे.
मी वर उल्लेखलेला मुद्दा - जर मदर तेरेसा यांनी पैसे देऊन कोलकात्यातील अतिगरीब हिंदूंचे धर्मांतर करवले तर ते आक्षेपार्ह आहे का ? असल्यास कसे ? व should RSS be considered the entity having locus standi on that matter ? म्हंजे न्यायप्रक्रियेत त्या हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून आरेसेस ने न्याय मागणे हे सुयोग्य कसे ? Has RSS been appointed by those poor ex-Hindus-who-became-Christians ?
आता तुम्ही म्हणाल की - एक सुजाण नागरिकांचे संगठन म्हणून आरेसेस ला आवाज उठवायचा हक्क आहे. म्हंजे अभिव्यक्ती + संघटन स्वातंत्र्य + Right to petition the Govt. - हे तिन्ही मिळून.
इथपर्यंत ठीक आहे.
पण पुढे समस्या आहे.
आता - मदर तेरेसा ने त्या लोकांना पैसे दिले व धर्मांतर करवले. १२ बिलियन डॉलर्स ओतले गेले.
१) १३ बिलियन डॉलर्स मुळे त्या लोकांची गरिबी काही प्रमाणावर दूर झाली.
२) भागवत बुवा म्हणतात - We will not rest until the last person in the last row is given the benefits of development.
३) आरेसेस तर म्हणते की - "एकम सत विप्रा: बहुदा वदन्ति". मग जर परमेश्वराकडे जाण्याचे विविध मार्ग आहेत. व हिंदु व ख्रिश्चन हे भिन्न मार्ग तिकडे जाणार असतीलच.
आता गरिबी काही प्रमाणावर दूर झाली - हे निदान काही प्रमाणावर तरी आरेसेस चे उद्दिष्ट आहे व साध्य केले गेले.
त्या कोलकात्यातील त्या गरीब एक्स हिंदूज चा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग हा फक्त बदलला - तो हिंदू होता आता तो ख्रिश्चन मार्ग झाला.
आता समस्या काय आहे ???
व should RSS be considered
व should RSS be considered the entity having locus standi on that matter ? म्हंजे न्यायप्रक्रियेत त्या हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून आरेसेस ने न्याय मागणे हे सुयोग्य कसे ? Has RSS been appointed by those poor ex-Hindus-who-became-Christians ?
आपला प्रश्न आर एस एस ला न्यायिक अधिकार आहे काय असा आहे. मी एक प्रश्न विचारतो. समजा मी उद्या तुमच्या मुलाला पैसे देऊन गुंड बनवले. त्या मुलाला तो गुंड बनला असल्याचे दु:ख नाहीच, कदाचित अभिमानच आहे. क्ष या सेवाभावी संस्थेला गुंडाचे पुनर्वसन करायचे आहे. तुम्ही तिथे "अरे क्ष, तुला माझ्या मुलाने पुनर्वसन करावयास अपोइंट केले आहे का?" असे म्हणाल का?
======================================================
आरेसेस हिंदुची प्रतिनिधी आहे कि नाही, सुयोग्य प्रतिनिधी आहे कि नाही, हा भाग वेगळा. त्यांची भूमिका सुयोग्य आहे कि नाही हे मान्य करावे.
मदर टेरेसा
जर मदर तेरेसा यांनी पैसे देऊन कोलकात्यातील अतिगरीब हिंदूंचे धर्मांतर करवले तर ते आक्षेपार्ह आहे का ? असल्यास कसे ?
आक्षेपार्ह आहे.
------------------------------------------------
मदर टेरेसाचा मूळ उद्देश धर्मप्रचार असेल आणि जनसेवा हे त्याचे हत्यार असेल तर प्रचंड आक्षेपार्ह आहे. असं म्हणताना स्यूडो काय म्हणतील म्हणून किंचितही घाबरू नये. अगदी परिणामांचे कौतुक केले तरी विरोधाभासाने मदरवर टिका करावी.
असल्यास कसे?
तुमचे प्रत्येक प्रकारचे तत्त्वज्ञान त्यागायचे तुम्ही किती पैसे घ्याल?
प्रत्येक संस्कार त्यागायचे किती पैसे घ्याल?
मूळात पैसे देऊण विचार बदलवणे जेव्हा कि विचार बदलण्याला काही क्लालिटेटीव कारण नाही हे पटते का?
पटत असेल निवडणूकित अमाप पैसा अधिकृतरित्या वाटू द्यावा काय? प्रत्येक मतदाराने कोणत्या पक्षाकडे विचार अॅडजस्ट करायला किती रेट पडेल ते सांगावे काय?
------------------------------------------------
मात्र मदर टेरेसाचा मूळ उद्देश जनसेवा होता आणि ते धर्म(प्रचार) नि जनसेवा यात फरक मानत नसत असे असेल तर आक्षेपार्ह नाही.
सत्य काय त्याबद्दल मतभिन्नता असेल तर त्याचा आदर व्हावा. लगेच सिडोंच्या प्रेशरमधे येऊ नये.
आता गरिबी काही प्रमाणावर दूर
आता गरिबी काही प्रमाणावर दूर झाली - हे निदान काही प्रमाणावर तरी आरेसेस चे उद्दिष्ट आहे व साध्य केले गेले.
त्या कोलकात्यातील त्या गरीब एक्स हिंदूज चा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग हा फक्त बदलला - तो हिंदू होता आता तो ख्रिश्चन मार्ग झाला.
आता समस्या काय आहे ???
भाऊसाहेब, यातलं काय आरेसेस्नं अमान्य केलं आहे?
सेवेच्या नावाने धर्मप्रचार केल्यास त्या सेवेचं अवमूल्यन होतं असं म्हटलं आहे.
धर्मांतरितांना देव भेटणारच नाही म्हटलं?
मदरने सेवा केलीच नाही म्हटलं?
जे भाष्य केलं आहे ते सत्य आहे कि नाही हा भाग वेगळा, ते सत्यच नाही म्हणा, पण ते भाष्यच इन्व्हॅलिड आहे म्हणणं मंजे वैचारिक भयग्रस्तता दाखवते.
नागालँडमधे एन एच ३७ कि एन एच
नागालँडमधे एन एच ३७ कि एन एच ३९ वर क्रॉसवर टांगलेला "Indian dogs go back" फलक पाहण्याचे कधी नशीबी आले आहे काय?
मेघालयात ५० दिवस राहिलो त्यावेळी 'इंडिया से आये हो क्या?' असा प्रश्न अनेकवेळा विचारण्यात आलेला. १५ ऑगस्ट रोजी नेहमीच्या उत्साहाऐवजी भयाण शांतताही पाहिलीय. 'करुणा-शांती-प्रेम' ही केवळ उर्वरित ठिकाणी प्रोजेक्ट करायची गोष्ट आहे की काय असा प्रश्न कोणालाही पडेल अशा कारवाया उघड-उघड चालू असलेल्या दिसल्या.
आहे शांत तरीही..
अहो, सिक्किम आणि मेघालय ही तर शांतीत असलेली राज्ये आहेत!!!
होय. मी गेलो त्यावेळी तिथल्या फुटीरवादी- हिंसक पर्याय अवलंबण्यास मागेपुढे न पाहणार्या संघटना आणि लष्कर यांच्यात 'सिजफायर' (हाच शब्द तिथे वापरायचे)चालू होते. त्यामुळे या संघटनांचे नेते सहा महिने दिल्लीत पंचतारांकित सरकारी पाहुणचार घेत होते आणि राज्यात चकमकी बंद होत्या. जवळ्-जवळ पूर्णपणे धर्मांतरित झालेली गारो ही आदिवासी जमात आणि साम्-दाम्-दंड्-भेदांना चिवटपणे तोंड देत अजुनही ख्रिश्चन न झालेल्या कोच, हजोंग ह्या निसर्गपूजक जमाती (यांतील कांहीजण स्वतःला हिंदू मानत नाहीत)यांच्या सामाजिक,आर्थिक स्थितीतील तसेच त्यांच्या राजकारण, प्रशासन व एकूणच संसाधनांवरील अधिकारातील फरक पाहील्याबरोबर गब्बर यांच्या इनोसंट प्रश्नाचे बर्यापैकी उत्तर मिळते.
Those now advocating tighter
Those now advocating tighter scrutiny of activist outfits may come to regret it. In India, for example, Hindu nationalists in the RSS often claim to run the world’s biggest NGO. It has strong foreign links, draws on an Indian diaspora in America and elsewhere for support, and dishes out help across borders, such as in Nepal following last month’s earthquake.
हे वाक्य अतिमहामार्मिक.
यात अतिमहामार्मिक काय? सामान्य ज्ञान आहे. परदेशी वृत्तसंस्थेला आपल्याकडची "इतकी मोठ्ठी" गोष्ट माहित असणे कौतुकास्पद? असो, परदेशी म्हटलं कि ते कौतुकघट भडाभडा वाहवणारच न्यूनगंडी भारतीय.
---------------------------------------------------------------
आणि आर एस एस वाल्यांना फार चालू म्हणा नैतर फार मूर्ख म्हणा. लेख लिहिणारा तेव्हढा बुद्धिमान, बाकी मूर्ख असं गृहित धरलं तर बरीच कंक्ल्यूजन्स काढता येतात.
दहा वर्षातील उच्चांक काय
दहा वर्षातील उच्चांक काय असतं? आधीच्या एकच पक्ष पूर्ण बहुमतात असलेल्या एकपक्षीय सरकारांशी कंपॅरिझन हवे!
असो. अशा वार्तांकनात काय नवे नाही :)
===
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत व्हिसल ब्लोअर विधेयक मंजूर करण्यात आले.
या सरकारचे काही कळतच नाही. हे विधेयक नुसते डायल्युट नाही केलेय तर पंतप्रधानांकडे अधिकाधिक अधिकार सोपवणारे केलेय. नंतर जरा सविस्तर लिहितो.
अण्णा आंदोलनातील मागण्यांपैकी लोकपाल, ज्युडिशियल अकांटिबिलीटी आणि व्हिसलब्लोअर ही तीन महत्त्वपूर्ण विधेयके होती. (व तीन्हीला भाजपाने पाठिंबा दिला होता)
आता गेल्या पाच वर्षात भाजपाने पाठिंबा दिलेले प्रत्येकच विधेयक बदलले जाणार आहे की काय? भाजपाने किती वेळा तथाकथित "चुका" केल्या आणि त्या पंतप्रधान मंजूर करणारेत?
मोदींनी वेगवेगळ्या टोप्या
मोदींनी वेगवेगळ्या टोप्या घातल्या त्यांच्या फोटोंचे संकलन द हिंदूमध्ये प्रकाशित झाले आहे.
१० फोटोंपैकी ९ फोटोंमध्ये त्यांनी घातलेल्या विविध प्रांतातील टोप्या आपल्या देशातील विविधता दाखवून देतात.
थत्तेकाका - माझ्या साधी एकच
थत्तेकाका - माझ्या साधी एकच अपेक्षा होती. वरच्या लेव्हलच्या भ्रष्ट लोकांना तरी ( अगदी भाजपतल्या सुद्धा ) मोदी खटल्यात अडकवतील, त्या केसेस साठी जलदगती टाइम बाउंड कोर्ट चालू करतील. एक वर्षात वड्रावर पण काही कारवाई केली नाही.
पैसे खाणे बंद केले तर तळागाळातल्या आणि सर्वच लोकांचा विकास सहज होईल.
जीसटी नाही म्हणुन काही फरक पडत नाही.
अजुन एक पण अपेक्षा होती, पण ती ऐसीवर लिहीण्यात अर्थ नाही.
दोन्ही बाबतीत टोटल फेल्युअर. सुरुवात पण कुठे दिसत नाही.
तिने हनुवटीवर बोट ठेवलं कि
तिने हनुवटीवर बोट ठेवलं कि "गांधीवादी हिंदू धर्मीय" ते " दत्त्-राजदेसाई-घोषवादी स्युडोसिक्यूलर धर्मीय" हे धर्मांतर कसं कधी झालं हे कळतच नाही माझं. सुंदर बायका माझे विचार बाटवू शकत नाहीत, पण असं गोग्गोड हनुवटीवर बोट ठेवणं भूरळी नि अनैतिक धर्मप्रचार आहे.
आणि त्या स्त्रीचा अपमान
आणि त्या स्त्रीचा अपमान पण.
इथे द्वंद्व आहे.
१) माझी बायको म्हणते की - सुंदर आहे म्हणून त्या स्त्री च्या म्हणण्याकडे लक्ष कमी देणे हा तिचा अपमान आहे.
२) तुम्ही म्हणता की सुंदरतेकडे लक्ष न देता तिच्या बोलण्याकडे लक्ष जाणे हा तिचा अपमान आहे. रंग बिरंगी मधला रवी कपूर पण "अजय, एक खूबसूरत लडकी की तरफ आंख उठाकर ना देखना ... उसका अपमान करने के बराबर है." असे अमोल पालेकर ला सुनावतो.
आता दोन फेमिनिष्ठ स्त्रियांच्या मधे पुरुषांचे सँडविच होतेय.
@गब्बर - It hurts more if a
@गब्बर - It hurts more if a woman is NOT Objectified than if she is.
सुंदर स्त्री जे काही म्हणेल त्याला "हो, बरोबर आहे" असे म्हणणे हाच एक तिला मान देण्याचा मार्ग आहे.
आणि गब्बर - तुमची बायको तुम्हाला असे सांगणारच. नाहीतर तुम्ही बायकांकडे बघत बसाल आणि तिला सांगाल की मी त्यांना मान देतोय म्हणुन. स्वताच्या मुळावर येइल असा सल्ला द्यायला बायका मूर्ख नसतात. ह्या बाबतीत दुसर्याची बायको काय म्हणते ते ऐका.
सुंदर आहे म्हणून त्या स्त्री
सुंदर आहे म्हणून त्या स्त्री च्या म्हणण्याकडे लक्ष कमी देणे हा तिचा अपमान आहे.
मूर्ख पुरुषांत जर कोणी अजागळ महामूर्ख पुरुष असतील तर ते "स्त्रीच्या बोलण्याकडे कमी लक्ष देणारे." हे समजून कि त्यांना अक्कल कमी असते आणि आपल्याला जास्त. त्यातही महामहो अजागळ मूर्ख म्हणजे बायकांचा मेंदू लहान असतो म्हणून त्यांना अक्कल कमी असते असे म्हणणारे. चीप साईज आणि प्रोसेसिंग पावरचे डायरेक्ट कोरीलेशन लावणारे. पुरुषाच्या मेंदूचा सुजलेला भाग नक्की कशासाठी आहे हे माहित नसताना (किंवा स्पेशल ओरियंटेशनसाठी आहे असा अंदाज असताना) एकूणातच as a biological device स्त्री ही inferior product आहे हे अति झालं.
आपल्या जीवनातल्या स्त्रीयांना प्रत्यक्ष बुद्धिमान वा पोटेंशियली बुद्धिमान (किमान स्वतःइतके) असणारे लोक जास्त सुखी असतात असं व्यक्तिगत निरीक्षण आहे.
------------------------------------------------------------------------
पण तरीही सुंदर स्त्रीच्या बोलण्याकडे कमी लक्ष देणे तिचा (बौद्धिक) अपमान नाही. पुरुषाच्या मेंदूतल्या प्रोसेसरची मेमरी दोन अप्प्लीकेशन्स रन करू लागते - सौंदर्यपान आणि ऐकणे. मग लक्ष एरवीपेक्षा कमीच जाणार. त्यात कोणता अपमान नाही.
पटलं तर बघा.
एक अतिशय सिरीयस प्रतिसाद देतोय, कोणतेही वाक्य तिरके लिहित नाहीये. आशा आहे योग्य त्या स्पिरीटमध्ये घ्याल.
प्रतिसाद बॅटमॅनला संबोधून असला तरी इतरही काहिंना कमी-अधिक प्रमाणात लागू आहे.
आंधळा नमो आणि भाजपविरोध जो दिसतो त्याला विरोध केला
यात गंमत अशी होतेय की तुम्ही म्हणताय त्या विरोध करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही अनेकदा चांगला डोळस, मुद्देसूद विरोध असेल तरीही त्याला विरोध करता.
म्हणजे कधीकधी अख्ख्या बाबीला विरोध करता असे नाही पण उदा. एखाद्या मोदी विरोधी बातमीच्या गाभ्याला सोडून त्यातले एखादेच (कधीकधी टोकाचे - कधी कोणतेही) वाक्य घेऊन झोडपायला निघता. मग होतं काय की ते वाक्य सोडून उर्वरीत मुद्द्यांवर तुम्ही सहमत आहात की नाही हे समजत नाही. दिसतो फक्त विरोध. मग असा समज झाला की तुम्ही मोदी/सरकारविरोधी प्रत्येकच बातमीला आंधळा विरोध करता, तर तसा समज करून घेणारा चुकीचा आहे असे म्हणायला मी तरी धजावणार नाही.
आता बघा, मी कित्येकदा सरकारने केलेल्या चांगल्या कामांच्याही बातम्या देतो त्याचे जाहिर कौतुकही करतो. तरीही इमेज पुसली जाणे इतके सोपे नसते (आणि खरंतर ते गरजेचेही नाही - मलाच असे नाही कोणालाही ते गरजेचे नाही.)
असो. पटलं तर बघा. नैतर द्या सोडून. मी थांबतो.
==
तुम्हाला मी काय म्हणतोय त्याची उदाहरणे वगैरे हवी असतील तर खरडीत बोलुया.
===
मौजमजा: "मी" हे आत्मवाचक सर्वनाम खास मेघनासाठी बोल्ड! ;)
इथे आंधळा शब्दाचे दोन अर्थ
इथे आंधळा शब्दाचे दोन अर्थ आहेत.
१. रेटून एकच बोलणे.
२. व्यवस्थित अर्थ न लावू शकणे, म्हणून चूक भूमिका घेणे, पण मूळ इच्छा चांगली भूमिका घ्यायची असणे.
ऋषिकेश सहसा बरोबर असतो, पण कधी मधी २ मधे येतो (१ मधे कधीच नाही.) असं माझं मत.
================================================================================
उदा.
कालपरवा राहुल गांधीनं भाषण ठोकलं लँड बिलावर. ऋषिदांनी टाळ्या वाजवल्या. मग तुझं मत असं झालं असणार. त्यातला मी एक मुद्दा पाहिला. सोशोइकॉनॉमिक इंपॅक्ट असेसमेंट रद्द. अन्यायी सरकार. इ इ
तर प्रकल्पाच्या पातळीवर ही असेसमेंट सर्वव्यापकरित्या करायची असतेच. ती कुठे गेली नाही. प्रकल्पासाठी जमिन घेणे हाच एक वेगळा प्रकल्प नसतो. म्हणून असा एस ई ए कॅन्सल केला ते बरंच झालं. इट वॉज सो स्टूपिड.
पण राहुल गांधीला सरकारपेक्षा जास्त अक्कल असू शकते (त्याचा सपोर्ट स्टाफ लैच बेक्कार असणार!!! बिचार्याला काहीही सांगत असतात. यापेक्षा तर त्या व्हाइट हाउस वाल्या सिरियल मधे स्थिती बरी होती.) हे क्रॉसचेक न करता गृहित धरलं कि असं होतं.
--------------------------------------------------------------------
भाजप, काँग मधे वाचाळ, चाटू, खोटारडे, इ इ बरेच प्रवक्ते आहेत. काही फार सज्जन पण आहेत. पण हे जे चाटू आहेत त्यांच्या विपक्षावरच्या सर्वच टिकेला रिलायेबल म्हणता येत नाही. केली टिका म्हणजे मानली सत्य असा प्रकार करू नये.
वेटिंग लिस्ट
तूर्तास फक्त दोनच जागा आहेत. या खिताबासाठी प्रतीक्षायादी आहे.
यातला एक परिवर्तनाच्या मार्गावर आहे. त्याचे पूर्णपणे परिवर्तन होऊन तो इंटरनेट अ-हिंदू झाला की मग इतरांची वर्णी लागेल.
तरीही निराश होण्याचे कारण नाही. हल्ली 'ऐसी'वर अशी परिवर्तने झटपट होऊ लागली आहेत असे म्हणतात. किबहुना त्यामुळेच 'ऐसी'चा परिवर्तनशील असा लौकिक वाढू लागला आहे असेही म्हणतात. किंबहुना जो 'ऐसी'वर येतो तो इंटर्नेट अहिंदूच असतो, (पुन्हा किंबहुना )इंटर्नेट अहिंदूच 'ऐसी'वर येतात असे म्हणतात.
उदा. मासे पाण्यात राहातात. पाण्यात राहाणारे सगळे प्राणी मासे असतात. इतर कोणी पाण्यात शिरला तर त्याला माश्याची श्वसनक्रिया अनुसरावी लागते वगैरे. पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला?
'गांधी मला भेटला' खटला मिटला
प्रकाशकांनी माफी मागितल्यामुळे कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला...' कवितेवरचा खटला मिटला आहे. ही कविता अश्लील आणि बीभत्स आहे, त्यामुळे गांधींची बदनामी होते आणि समाजात तेढ पसरेल असा दावा पतित पावन संघटनेनं केला होता.
"मी कवितेत जे काही म्हटलेय ते गांधींसंदर्भात नाही, तर गांधींच्या पश्चात सगळ्याच पातळ्यांवर भारताचं जे अवमूल्यन झालेय, त्यावर टीका करणारी ही कविता आहे. गांधींच्या पश्चात माजलेली ही अराजकता असल्यामुळेच, ही कविता ज्या पोस्टरवर छापून आली होती, त्या पोस्टरवर गांधीजींचे पाठमोरे रेखाचित्र छापण्यात आले होते. पण कवीला अपेक्षित असलेला व्यंग्यार्थ, कवितेवर खटला दाखल करणाऱ्यांना कळलाच नाही, ही अभिव्यक्तीची शोकांतिका आहेच, पण त्यांना गांधी कळला नाही, याचेही हे उत्तम उदाहरण आहे." - वसंत गुर्जर
तुलना
म.टा.मधल्या बातमीपेक्षा लोकसत्तामधली बातमी अधिक सनसनाटी वाटली. मुळात आधीच्या हाय कोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या प्रकाशकानं स्वतःहूनच माफी मागितली असल्यामुळे खटला मिटला आहे.
तुळजापूरकर यांनी याप्रकरणी आपले म्हणणे सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी मांडावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, संबंधित गृहमासिकाचे मुद्रक आणि प्रकाशक यांनी या प्रकाराबद्दल विनाअट माफी मागितल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधातील गुन्हेगारी कारवाई रद्द केली आहे.
प्रकाशकानं आपलं म्हणणं मांडावं असं कोर्ट म्हणालं, पण त्यानं त्याऐवजी माफीच मागून सुटका करून घेतली; मग कोर्टानं त्याला दणका दिला असं म्हणता येईल का?
फली नरिमन चं करियर खरंच
फली नरिमन चं करियर खरंच डोळ्यात भरतं. काय काय केसेस लढवल्यात माणसानं! उगाच का पद्म भूषण, पद्म विभूषण, राज्यसभान् कायकाय! भोपाळ गॅस प्रकरणात डाव केमिकल्स च्या बाजूने, जयललिता, नर्मदा आंदोलनाविरुद्ध गुजरात सरकार ची बाजू... आता गांधींच्या बदनामीचा पवित्रा या महान वकीलाने घेतला. वावा. ग्रेट माणूस. पहा कवितेचा अर्थ, आणि आपल्या संविधाना अर्थ सुद्धा त्यांनी कसा नेमका हेरला आहे:
Submission of Mr. Nariman, learned amicus curiae is that
the words that have been used in various stanzas of the poem,
if they are spoken in the voice of an ordinary man or by any
other person, it may not come under the ambit and sweep of
Section 292 IPC, but the moment there is established identity
pertaining to Mahatma Gandhi, the character of the words
change and they assume the position of obscenity. To put it
differently, the poem might not have been obscene otherwise
had the name of Mahatma Gandhi, a highly respected historical
personality of this country, would not have been used. Mr.
Nariman would emphatically submit that the poem distinctly
refers to Mahatma Gandhi because the sketch of Gandhiji is
there figuratively across the entire page in his customary garb,
stature and gait. According to him, the poem does not subserve
any artistic purpose and is loathsome and vulgar and hence, it
comes within the sweep of Section 292 IPC. The learned
amicus curiae would submit that the use of the name of
Mahatma Gandhi enhances the conceptual perception of
obscenity as is understood by this Court.
मटा मधील अग्रलेख पश्चिमेकडे
पश्चिमेकडे पाकिस्तान आणि पूर्वेकडे बांग्लादेश या एकेकाळी आपला भाग असणाऱ्या देशांत जी अमानुष असहिष्णुता धिंगाणा घालते आहे, तिचा शिरकाव आपल्याकडेही दाभोलकर तसेच पानसरे यांच्या हत्यांनी झालाच आहे. बांग्लादेशातील या भीषण हत्येचा शोक करताना आपणही त्याच वाटेवर तर जाणार नाहीना, ही शंका थरकाप उडविते.
खरंय!
जर त्यांच्या वैचारांमुळे
जर त्यांच्या वैचारांमुळे काहिंचे आर्थिक नुकसान झाले असेल वा होत असेल. अशावेळी कारण आर्थिक वाटले तरी मुळाशी विचारच असतो नै का?
कौटुंबिक / वैयक्तीक कारणे
ती असती तर ती एव्हाना पोलिसांनी नक्कीच शोधून काढली असती. आपले पोलिस तितके सक्षम आहेत.
तसाही त्या दोघांच्या वैचारीकतेचा कोणाला काही त्रास नव्हता.
ओ मावशी! हे मात्र अगदीच विनोदी वाक्यंय हा! =))
तसाही त्या दोघांच्या
तसाही त्या दोघांच्या वैचारीकतेचा कोणाला काही त्रास नव्हता.
ओ मावशी! हे मात्र अगदीच विनोदी वाक्यंय हा!
तुम्हाला सर्व अगदी उलगडुन सांगायला लागते.
दाभोळकर होते त्याच काळात १९७०-२०१० मधे बाबा बुवा, माता, ज्योतिषी ह्यांचे प्रस्थ प्रचंड वाढले. कोणाला काही त्रास झाला नाही, कोणाचे काही नुकसान झाले नाही. ज्या कायद्याची मागणी दाभोळकर करत होते त्या कायद्या खाली कोणाला सुद्धा शिक्षा झाली नाही. दाभोळकरांची न्युसेंस व्हॅल्यु शुन्य होती. त्यांचा खून वगैरे करायला ( त्यात सुद्धा पैसे वगैरे खर्च करुन ) मोटीव्ह तरी पाहीजे ना.
पानसरेंच्या आयुष्यातच कोल्हापूर ची वाट लागत गेली, सर्व सत्ता गावगुंडांच्या आणि भ्रष्टांच्या हाती गेली. पानसरे ह्या सर्वांबरोबर मजेत होते. कोणालाच विरोध न करता सर्वांशी मिळुन राहीले की आरामात रहाता येते, आपले मौनीबाबा नाही का १० वर्ष पंप्र राहीले. कोण त्यांना मारण्यासाठी खर्च वगैरे करेल हो. खून वगैरे करायला ( त्यात सुद्धा पैसे वगैरे खर्च करुन ) मोटीव्ह तरी पाहीजे ना.
दाभोळकरांमुळे धर्म बुडेल असे
दाभोळकरांमुळे धर्म बुडेल असे मानायला चालू करणारा धर्मपिसाट नसेलच असे म्हणता येत नाही. शक्यता बरीच आहे.
(पण तरीही मला खास करून त्यांच्याबद्दल शक्यता कमी वाटते. माणूस प्रचंडच सज्जन आणि मृदू होता. भाषा खूप मर्यादित. फालतू चीड आणणारा पुरोगामीपणा पण नाही. कोणता दुराग्रह नाही. सुधारक कसा असावा त्याचं आदर्श उदाहण. विशेष मंजे संघर्ष टाळणार. आस्ते आस्ते प्रेमाने घेणारा. मी देव मानो न मानो, तुम्ही मानायला हरकत नाही, असा लिबरल. "रुढींमधला क्रिमिनल पार्ट" इतका त्यांचा पेट विषय होता, जो डोळे झाकून कोणीही मान्य करावा.)
=============================================================================================
त्यामानाने पानसरे वॉज पोलिटिकल फिगर. क्वाइट लाइक अदर्स.
ओ मावशी! हे मात्र अगदीच
ओ मावशी! हे मात्र अगदीच विनोदी वाक्यंय हा!
ऋ,
१) ज्या कोणाला त्या दोघांच्या वैचारिकतेचा त्रास होता ते लोक कोण होते ? व तो त्रास किती प्रमाणावर व कसा होता ??
२) प्रमाण एवढ्यासाठी विचारतो की - त्यावर आधारित - आपण हे ठरवू शकतो की त्रास होत असल्यामुळे ते लोक त्यांचे जे काही कार्य होते त्या कार्यात किती प्रमाणावर बाधा/रुकावट येत होती ?
तसे पाहिल्यास भारतात
तसे पाहिल्यास भारतात पूर्वापार धार्मिक अमानुषता आहे. कधीकधी ती उफाळून येते. ती केवळ दाभोळकर आणि पानसरे मेले तेव्हाच उत्पन्न झाली असे वाटावे हे प्रचंड विचित्र आहे.
------------------------------------------------------------------
शिवाय या अग्रलेखकाला जाहिरपणे मारणे आणि मारून पळून जाणे यातला फरक दिसत नाही का? अमानुष लोक पळून जातात का? ते "जबाबदारी घेतील" ना? ते अल्-कायदा वाले, इ इ नेहमी घेतात तसे. या आमच्या डोंगरांत आणि दाखवा मारून म्हणतात अमानुष लोक. लंपटांसारखे पळून नै जात. जे मृत्यू धार्मिकच कारणांवरून झाले हे सुद्धा नीट म्हणता येत नाही ते "अमानुष धार्मिकता उफाळून आणणारे" कसे?
----------------------------------------------------------------
धार्मिक अमानुषतेचे समर्पक उदाहरण धर्म वि धर्म असेल तर द्यायची गरज आहे का?
धर्म वि पुरोगामी असेल तर ...... तर .... अत्यंत मागास आणि क्रूर आणि कर्मठ अशा जुन्या काळात जेव्हा धार्मिक, सेमी-धार्मिक आणि अधार्मिक लोकांनी समाजातील अनिष्ट प्रथा निवारण करण्यासाठी काम केले तेव्हा देखिल ..."अमानुष धार्मिक" हत्या झाल्या नाहीत. आज लोक सुधरले आहेत तर मग अशी भिती का?
हे मास स्केलवर होईल अशी खरेच भिती असेल तर.... अन्यत्र आजचे दिवस बरे असे म्हणू नका.
थोडेसे स्पष्टीकरण
>>शिवाय या अग्रलेखकाला जाहिरपणे मारणे आणि मारून पळून जाणे यातला फरक दिसत नाही का? अमानुष लोक पळून जातात का? ते "जबाबदारी घेतील" ना? ते अल्-कायदा वाले, इ इ नेहमी घेतात तसे. या आमच्या डोंगरांत आणि दाखवा मारून म्हणतात अमानुष लोक.
ते अमानुष लोक जबाबदारी घेतात. आणि आम्ही असेच आहोत आणि आम्हाला असंच हवं आहे असं ते म्हणतात. उलट दाभोलकर खुनाविषयी ज्यांच्यावर* संशय आहे ते तोंडाने आम्ही प्रागतिक आणि सेक्युलर आहोत असे म्हणत असतात. [आणि आम्हाला जे हवे आहे ते उघड सांगण्यासारखे नाही असेही हळूच म्हणतात].
*खून त्यांनी केला आहे असा माझा दावा नाही.
फेसबुकवर दोन तीन दिवसांपूर्वी संजय सोनावणी यांना उघड धमक्या दिल्याचे दिसले. [अर्थात त्या धमक्या पुरोगामी वि सनातन या संघर्षातल्या नव्हत्या].
उलट दाभोलकर खुनाविषयी
उलट दाभोलकर खुनाविषयी ज्यांच्यावर* संशय आहे ते तोंडाने आम्ही प्रागतिक आणि सेक्युलर आहोत असे म्हणत असतात.
हे वेगळं
[आणि आम्हाला जे हवे आहे ते उघड सांगण्यासारखे नाही असेही हळूच म्हणतात].
हे वेगळं
आणि
लपूनच बसणं वेगळं. लपून धार्मिक उन्माद करता येत नाही.
====================================================================================
भांडारकरवरचा हल्ला चूक असेल तर तो 'उघड जातीय उन्माद' म्हणता येईल.
=====================================================================================
तोंडाने जगजाहिरपणे स्वतःला पुरोगामी म्हणत म्हणत कोणी खर्या पुरोगाम्यांना संपवू लागला तरी त्याला मास स्केल धार्मिक उन्मादाचा आरंभ म्हणता येणार नाही.
भारत आणि बांग्लादेशमधले सगळेच
भारत आणि बांग्लादेशमधले सगळेच फरक विसरले तरी मटाच्या अग्रलेखककारांचे सामान्य ज्ञान कमी आणि थरकापाचा हव्यास जास्त अशी दोन प्रकारे गोची आहे.
बांग्लादेशात टिपले गेलेले झाडून सगळे "नास्तिक सुधारक" एका राजकीय, सामाजिक चळवळीचा भाग आहेत. १९७१ मधे लाखोनी झालेल्या हत्या नि बलात्कारांना जबाबदार असलेल्या जमाते इस्लामीच्या अगदी वरीष्ठतम नेत्यांना फाशी द्या अशी उघड मोहीम हे लोक चालवत असत. म्हणून हा शुद्ध नास्तिकता विरोध नाही.
बांग्ला लोक तसे सहिष्णू आहेत, पण नास्तिकांची इस्लामवर टिका करण्याची शैली अनेकदा पातळी सोडून झालेली आहे. म्हणून सामान्यतः जमाते इस्लामी वाल्यांना फाशी द्यावी अशी व्यापक असलेली जनभावना त्या मोहिमेचे नेतृत्व टोकाच्या नास्तिकांनी हायजॅक केली आहे म्हणून नष्ट झाली आहे, उलट लाखोच्या संख्येने लोक जमून स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके तोडत आहेत.
नास्तिक्स हॅव रियली मेस्ड इट अप.
नास्तिकेराये करविले
१. आजपासून मला अल्ला करा.
२. मोहम्मद इंपोटेंट होते.
३. ढाक्याच्या सगळ्या मशिदीचे टॉयलेट बनवा.
ही कसली भाषा आहे?
लक्षात घे कि अस्तिकांचे लेखी नास्तिकता हा सुद्धा एक धर्मच आहे. म्हणजे वास्तवात नाही, पण त्यांच्या लेखी आहे. लोक हळूहळू नास्तिक होणं हे ते आपला धर्म आटत आहे असं मानतात आणि विषण्ण होतात. आता असे परधर्मी लोक गुपचुप परधर्मात राहिले तरी अस्तिक फार काही करत नाहीत, पण अशा परधर्मातून स्वतःच्या धर्मावर अद्वातद्वा टिका? ती नसावी. धर्म हा संवेदनेचा विषय आहे, त्याला टॅकल करायचा एक तरीका आहे, ते सोडून विक्षिप्त आततायीपणा करू नये.
==========================================================
आणि इस्लाम शांतिपूर्ण नाही असं म्हणायला मुसलमानांची काहीही हरकत नाही. बिचार्यांना "इस्लामिक टेररिझम" शब्दाची सवय होऊन गेलीय. कोणाकोणाला समजावणार? जगात दिडशे कोटी मुस्लिम आहेत ते शस्त्रे घेऊन पिसाट सुटले आहेत असं आहे का? इस्लाममधे सर्व धर्मांपेक्षा सर्वात जास्त अतिरेकी आहेत हे विधान योग्य आहे पण इस्लामच अतिरेकी आहे म्हणून प्रत्येक सामान्य मुसलमानात एक न्यूनगंड निर्माण करणे फॅशन नाही का आजकाल?
जाऊ दे, मी काही मुसलमान नाही आणि मला इस्लाम फार जास्त डिफेंड करायचा नाही. कदाचित इतिहास, तुम्ही, इ इ सिद्धच कराल कि शांतीपूर्ण हा शब्द इस्लामसोबत बर्याच क्वालिफिकेशन्स के साथ येतो. हरकत नाही. चल, मी मानतो कि प्रकरण फार काही म्हणावंसं शांतिपूर्ण नाही.
पण त्याच्या अर्थ असा होतो का सरळ इस्लामच्या देवाला, ग्रंथाला कधीही काहीही म्हणावं? मुस्लिमांना ते आवडत नाही, तो त्यांचा देव आहे तेव्हा जरा शिष्टाचार पाळावा. मी आणि माझा मित्र अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तुझ्या भावनिकतेला अत्यंत प्रिय व्यक्तिला 'काहीही' म्हणू लागलो तर ते सहन होईल काय? संवेदना, भावना दुखवू नयेत अशी काळजी घेऊ नये काय? नास्तिक झाला म्हणून लोकभावनांना कशाही शिव्या घालायचं लायसन्स मिळतं का?
कट्टर लोकांनी कृत्ये मूळीच समर्थनीय नाही आणि त्यांना योग्य शासन होईलच. पण नास्तिकांनी देखिल समाजसुधारणा दाभोळकर पद्धतीने करावी. निरुपद्रवी गोष्टींत नाक न खुपसणे, प्राधान्ये व्यवस्थित ठरवणे, इ इ.
आणि हो, बांग्लादेश जगातली नास्तिकता बॅकफायर झालेली क्लासिक केस आहे. अतिच क्लासिक.
१. आजपासून मला अल्ला करा. २.
१. आजपासून मला अल्ला करा.
२. मोहम्मद इंपोटेंट होते.
३. ढाक्याच्या सगळ्या मशिदीचे टॉयलेट बनवा.
भाषा चुकीची आहेच, पण त्याकरिता मारण्याला तुमचे समर्थन आहे हे रोचक आहे. इस्लामला टीकेची सवयच नाहीये- खासकरके विदिन इस्लाम टीकेची वट्ट सवय नाही. त्यामुळे त्रास तर होणारच, पण म्हणून ठार मारणे? क्या बात है अजो, मलेशियापासून मोरोक्कोपर्यंत अखिल मुल्ला जमातीच्या मू की बात छीन ली तुम्ही तर.
बाकी बोलणे आततायी, तर कृती मात्र रॅशनल का? बरं बरं. म्हणजे मुहम्मदावर टीका करणार्या कवयित्रीच्या छातीत भाले भोसकून तिला ठार मारण्याचा आदेश देणे हे योग्यच असावे, नै?
आणि इस्लाम शांतिपूर्ण नाही असं म्हणायला मुसलमानांची काहीही हरकत नाही.
च्यायला, ते सूडोसेकुलर परवडले तुमच्यापेक्षा. =))
नास्तिक झाला म्हणून लोकभावनांना कशाही शिव्या घालायचं लायसन्स मिळतं का?
कट्टर लोकांनी कृत्ये मूळीच समर्थनीय नाही आणि त्यांना योग्य शासन होईलच. पण नास्तिकांनी देखिल समाजसुधारणा दाभोळकर पद्धतीने करावी. निरुपद्रवी गोष्टींत नाक न खुपसणे, प्राधान्ये व्यवस्थित ठरवणे, इ इ.
येडझव्या लोकभावनांना शिव्या घातल्यामुळेच समाजसुधारणा होत असते. बाकी मुस्लिमेतर असण्याच्या आणि ईक्वल स्टेटस राखण्याच्या हक्काबद्दल काय लिहिलंय ते बघा जरा.
दीडशे कोट लोकं तलवार घेऊन उठायची कधीच गरज नसते. तसे थोडेच लोक असतात, आणि त्यांचे क्रिटिकल मास असते. त्यांना कंट्रोल करण्यासाठी अशी भाषा वापरणे गरजेचेच आहे. इस्लामवर काही झाले तरी टीकेकडे दुर्लक्ष करण्याचीच फॅशन आहे. त्यामुळे लक्ष वेधून घ्यावेच लागते. इस्लामला यांची कधी ना कधी शांततापूर्ण मार्गाने दखल ही घ्यावीच लागेल. मतभेद हा प्रकारच जिथे मान्य केला जात नाही तिथे अशा कठोर टीकेवाचून पर्याय नाही.
बाकी नास्तिकिझम कसा वायझेड आहे वगैरे नेहमीच्या वाईड बॉलला ४ लेगबाईज़ दिलेल्या आहेत.
पण त्याकरिता मारण्याला तुमचे
पण त्याकरिता मारण्याला तुमचे समर्थन आहे हे रोचक आहे.
असं नाही. मारण्याचा निषेध जास्त आहे. खूपच जास्त आहे. त्यामानानं बरळण्याचा विरोध खूपच कमी आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
इस्लाम शांतिपूर्ण नाही असं म्हणायला मुसलमानांची काहीही हरकत नाही.
पुनरुच्चार. फाळणी, दंगे, काश्मिर, बाँबस्फॉट, इ इ मधे कोण असतं याचं उत्तर मुसलमान काय देतात? हे चंद लोक आम्हाला बदनाम करताहेत असं देतात.
आतून सगळे मुसलमान त्यांना सपोर्ट करत असतात असं म्हणायचं आहे का?
तसं देखिल बर्यापैकी होतं. व्यक्तिगत मते बाबरी प्रकारापर्यंत. आता राष्ट्रीयता दाखवण्याची अहमहमिका आहे. काश्मिर अपवाद.
समोआ ते टोंगा (उलट दिशेने) फिरून कुठे कुठे इस्लाम कसा आहे ते किचकट होईल. भारत-पाक्-बांगलादेश इ बोलू. भारतात इस्लाम कट्टर आहे हे प्रत्येक मुसलमानास मान्य असावे. (भारतात मान्य असावे असे वाचावे).
---------------------------------------------------------------------------------------------------
दीडशे कोट लोकं तलवार घेऊन उठायची कधीच गरज नसते.
राजेशाही होती तेव्हा असं म्हणता येईल. लोकशाहीत बहुमत पाहिजेच.
-------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी नास्तिकिझम कसा वायझेड आहे
असं मी कधी म्हणालो? ती तात्विक चर्चा नै काढली इथे. नास्तिकिझम लै शाणा असल्या वायझेड नास्तिक कसा खेळखंडोबा करतात त्याची बांग्लादेश क्लासी केस आहे असं म्हणालो.
पुनरुच्चार. फाळणी, दंगे,
पुनरुच्चार. फाळणी, दंगे, काश्मिर, बाँबस्फॉट, इ इ मधे कोण असतं याचं उत्तर मुसलमान काय देतात? हे चंद लोक आम्हाला बदनाम करताहेत असं देतात.
आतून सगळे मुसलमान त्यांना सपोर्ट करत असतात असं म्हणायचं आहे का?
हिंदू धर्मातील आक्षेपार्ह गोष्टींना कंठरवाने शिव्या घालणारी एक पॉवरफुल जमात अस्तित्वात आहे. त्यांचा जोर इतका जास्त आहे की त्यांना हिंदूद्वेष्टे असेही म्हटले जाते. (त्यांच्यातील काहीजण खरेच तसे आहेत हा भाग वेगळा.) तीच गोष्ट ख्रिश्चन धर्माबद्दलही खरी आहे. पण मुसलमानांत असे फार कमी लोक आहेत. हा लेख पहा.
http://www.thehindu.com/opinion/lead/the-silence-of-the-liberal-muslim/…
आपल्या धर्माची जराही चिकित्सा करायला यांपैकी अनेक लोकांचा सरळ सरळ नकारच असतो, किंवा ज्यांची तयारी असते असे फार कमी लोक आहेत. मग "चंद लोक बदनाम करताहेत" या गुळमुळीत सफाईला कोण कशाला हिंगलेल? अहो तुमच्या दिल्लीतच मध्यंतरी अहमदिया नामक इस्लामी उपपंथाचे कायतरी प्रदर्शन भरणार होते, तर ते उधळून लावल्या गेले किंवा ते प्रदर्शन होऊच दिले नाही. का तर म्हणे अहमदिया लोक मुसलमानच नाहीत. अन हे बोलणारा कोण तर तो जामा मशिदीचा इमाम बुखारी. त्याच्याविरुद्ध किती लोकांनी आवाज उठवला? किती लोकांनी काय केलं? अहमदिया लोक मुसलमान असोत किंवा नसोत, प्रदर्शन न होऊ देण्याचा अधिकार या बुखारीला किंवा बाकी कुणालाही कोण दिला? हे फक्त एक उदा. आहे, अशी अनेक उदा. देता येतील.
हेच जर अशा पद्धतीचं कायतर शंकराचार्य किंवा कुणा बाबाने काही केलं असतं तर? साईबाबांची आराधना हिंदूंनी करू नये इ. विधानावरचा गदारोळ आठवून पहा.
असं मी कधी म्हणालो? ती तात्विक चर्चा नै काढली इथे. नास्तिकिझम लै शाणा असल्या वायझेड नास्तिक कसा खेळखंडोबा करतात त्याची बांग्लादेश क्लासी केस आहे असं म्हणालो.
शेवटी तेच हो. नास्तिकांची हत्या झाली म्हणून नास्तिक दोषी (बलात्कार झाला म्हणून बलात्कारित दोषी या चालीवर), सबब नास्तिकिझम वायझेड असे इम्प्लिकेशन सरळ जाणवतेय.
आतून सगळे मुसलमान त्यांना
आतून सगळे मुसलमान त्यांना सपोर्ट करत असतात असं म्हणायचं आहे का?
चं उत्तर हो आहे असं मानतो. तसं नसल्यास तसं लिहा.
---------------------------------------------------------------------------
मला मुस्लिम जास्त कट्टर आहेत हे मान्यच आहे.
-------------------------------------------------------------------------------
लिबरल मुस्लिम गप्प असतात? मान्य करतो.
लिबरल हिंदू गप्प नसतात, हिंदू धर्माला आरामात झोडू शकतात. मान्य करतो.
पण लिबरल हिंदू (हो हो तेच ते सेक्यूलर, पुरोगामी, इ इ इ ) का म्हणे मुस्लिम कट्टरवादासमोर गप्प असतात? शेवटी त्यांच्यासाठी सगळे धर्म समान ना? आणि इस्लाम जर हिंदू धर्मापेक्षा इतका कट्टर, वाईट असेल तर त्यांच्याकडून सर्वत्र इस्लामवरच जास्त टिका झाली पाहिजे. पण ते तर साले फक्त संघ एक्कं संघ करतात. का म्हणे? इस्लाम त्यांच्या देशातला धर्म (वा समस्या, जे काय त्यांचे मत) नाही? मुस्लिम लोक त्यांचे कोणी लागत नाहीत? सहदेशवासी? हमवतन?
जर बाहेरून टिका करायला इतकं अवघड पडत असेल तर आतून अजून जास्त पडत असेल ना? तुम्हाला कुराण न आवडणं वेगळं आणि कोण्या अब्दुलला न आवडणं वेगळं!!
पुरोगामी हिंदू इस्लामवर का टिका करत नसावेत ते सांगा म्हणजे पुरोगामी मुसलमान का करत नसतील त्याबद्दल बोलू.
(यानिमित्ताने - हुसेनांनी हिंदू संवेदनास्थलांची नग्न चित्र काढली म्हणून मी त्यांचा तिरस्कार करतो. पण मला त्यांचं मत आवडून गेलं. हिंदूच देव का? तर म्हणे ज्या लोकांना कॅलिग्राफीची स्वच्छंदता देखिल ब्लास्फेमी वाटायची शक्यता आहे तिथे का रिस्क घेऊ. त्यामानाने हिंदू आपलेच आहेत, समजूतदार नि सहिष्णू.)
------------------------------------------------
नास्तिकिझम वायझेड असे इम्प्लिकेशन सरळ जाणवतेय.
ना ना. मी असं नाही म्हणालो. उतावीळ नास्तिकांनी अदरवाईज लिबरल बांग्लादेश कसा कट्टर बनवून टाकला ते पहा असं म्हणालो.
आतून सगळे मुसलमान त्यांना
आतून सगळे मुसलमान त्यांना सपोर्ट करत असतात असं म्हणायचं आहे का?
चं उत्तर हो आहे असं मानतो. तसं नसल्यास तसं लिहा.
व्हावा तितका विरोध होत नसेल तर तसा संशय येणं चुकीचं आहे असं वाटत नाही. आचरणही तपासायचं नाही आणि वर बेनेफिट ऑफ डौटही द्यायचा, काय खाऊ आहे का?
पण लिबरल हिंदू (हो हो तेच ते सेक्यूलर, पुरोगामी, इ इ इ ) का म्हणे मुस्लिम कट्टरवादासमोर गप्प असतात? शेवटी त्यांच्यासाठी सगळे धर्म समान ना? आणि इस्लाम जर हिंदू धर्मापेक्षा इतका कट्टर, वाईट असेल तर त्यांच्याकडून सर्वत्र इस्लामवरच जास्त टिका झाली पाहिजे. पण ते तर साले फक्त संघ एक्कं संघ करतात. का म्हणे? इस्लाम त्यांच्या देशातला धर्म (वा समस्या, जे काय त्यांचे मत) नाही? मुस्लिम लोक त्यांचे कोणी लागत नाहीत? सहदेशवासी? हमवतन?
जर बाहेरून टिका करायला इतकं अवघड पडत असेल तर आतून अजून जास्त पडत असेल ना? तुम्हाला कुराण न आवडणं वेगळं आणि कोण्या अब्दुलला न आवडणं वेगळं!!
पुरोगामी हिंदू इस्लामवर का टिका करत नसावेत ते सांगा म्हणजे पुरोगामी मुसलमान का करत नसतील त्याबद्दल बोलू.
(यानिमित्ताने - हुसेनांनी हिंदू संवेदनास्थलांची नग्न चित्र काढली म्हणून मी त्यांचा तिरस्कार करतो. पण मला त्यांचं मत आवडून गेलं. हिंदूच देव का? तर म्हणे ज्या लोकांना कॅलिग्राफीची स्वच्छंदता देखिल ब्लास्फेमी वाटायची शक्यता आहे तिथे का रिस्क घेऊ. त्यामानाने हिंदू आपलेच आहेत, समजूतदार नि सहिष्णू.)
तुफान वायझेड आणि विनोदी मुद्दा आहे. हा मुद्दा मध्ये आणून मेन मुद्दा डायव्हर्ट करताहात. सूडोसेकुलर किंवा खरेच लिबरल लोक काय करतात याचा संबंध येतोच कुठे? मुसलमान समाजातून मुसलमान कट्टरतावादाचा व्हावा तितका निषेध डोळ्यासमोर कधी येत नाही. आणि हे महत्त्वाचे आहे कारण शेवटी खरी सुधारणा आतूनच होते, बाहेरून नाही. विषय हिंदू धर्माचा असेल, तर अवश्य या हिंदू सेकुलरांना मध्ये आणा. पण इस्लामचा विषय असताना हिंदूंना मध्ये आणून मुसलमान समाजाला अकाउंटॅबिलिटीतून मुक्तच करताहात एकहाती. स्वतःच्या धर्माच्या नावाखाली चालणारे गैरप्रकारादि गोष्टींचा, त्यांना जबाबदार प्रवृत्तींचा निषेध करणे ही त्या धर्मपालकांची जबाबदारी नव्हे? की सर्व सुधारणेचा मक्ता या सेकुलरांनी घेतलाय?
पुरोगामी हिंदू इस्लामवर का टिका करत नसावेत ते सांगा म्हणजे पुरोगामी मुसलमान का करत नसतील त्याबद्दल बोलू.
घराबाहेरचे लोक घरातल्यांबद्दल काही बोलत नाहीत, मग घरातले कसे बोलतील असेच ना? इस्लाम ही हिंदूंची जबाबदारी नव्हे. त्याबद्दल बोलण्याचं कंत्राट प्रथम मुसलमानांना आहे. हे समजूनही तुम्ही जाणूनबुजून मुद्दा भरकटवता आहात कारण तुम्हांला आरूनफिरून नास्तिकतेची कशी मारता येईल याचीच पडलीये. धर्मांधांनी रेप केला तरी चालेल, पण नास्तिकांनी काही बोललं की ते प्रव्होकेशन टु रेप. आणि शेवटी चूक ही रेप व्हिक्टिमचीच असते, नाही का? म्हणे उतावीळ नास्तिकांनी देश धर्मांध केला. चार कत्तली केल्या म्हणून तो मेलेल्यांचाच दोष? विदा, कारणमीमांसा न इग्नोर करता सांगा काय ते. असे बेफाट विधान करायला विदा काय आहे तुमच्याकडे?
आतून टीका करणं इतकं अवघड आहे की ते अशक्य आहे, सबब सर्वांनी अळीमिळी गुपचिळी करा आणि काही बोलू नका असेच ना? किती मजेशीर आणि मुद्देफिरवू प्रकार आहे हा? एखाद्या घरात कुणी कर्दनकाळ असेल तर त्याला बाकीचे कुणी काही बोलू शकत नाहीत, पण आपणही त्याच घरात राहत असू तर त्याला चार शब्द सुनावणे ही आपली जबाबदारी आहे की नाही? की बाकीचे गप्प बसतात म्हणून आपणही गप्प बसायचं? याच लॉजिकने गुंडांवरही कुणी कारवाईच करू नये मग.
बाकी हुसेनचं असं मत असेल तर तो एक नंबरचा डरपोक होता असेच म्हणावे लागेल. स्वतःच्या धर्माबद्दल काही भाष्य करण्याचा दम नाही सबब अन्य धर्मीयांच्या भावना दुखावा. उत्तम धंदा आहे. असले नग आणि तुमच्यासारख्यांची समर्थने पाहिली म्हणजे चार्ली हेब्दो आणि तत्सम गोष्टींना सपोर्ट का मिळतो हे लगेच कळते. इस्लामचे अपॉलॉजिस्ट म्हणून झकिर नाईकांच्या पंगतीस तुम्ही खचितच बसू शकता.
राममंदिरावर त्यांचा फोकस आहे
राममंदिरावर त्यांचा फोकस आहे आणि शिवाय ताजमहाल एटले बिजनेस अपार्चुनिटी छे. त्यामुळे का करतील ते असं?