स्कॅमर्स बिझनेस लॉजिक..

वाचनात आलेल्या काही लेखांमुळे एक प्रश्न आणि त्याचं उत्तर एकदमच समोर आलं. ते रोचक वाटल्याने इथे नोंदवतोय.

आपण सर्वांनीच स्पॅम ईमेल्सचे असंख्य प्रकार झेलले आहेत. जगातल्या एकूण ईमेल्सपैकी ९० टक्क्याहून जास्त ईमेल्स स्पॅम असतात असं वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेलं आंतरजालावर दिसलं. म्हणजे मुळात जेन्युईन ईमेल्सच कमी आहेत असं म्हणता येईल.

स्पॅम, त्यातही नुसत्या जाहिरातीपेक्षा फिशिंग, लुटणे, फ्रॉड, स्कॅम अशा उद्देशांनी पाठवलेल्या ईमेल्स / फोरम मेसेजेस वगैरेही पुष्कळ असतात. या सर्वांचं ध्येय एकच. तुमचा खिसा हलका करणं. त्यासाठी काहीही करुन तुम्हाला कुठेतरी क्लिक करायला भाग पाडणं आणि तुमच्याशी जास्तीतजास्त संवाद प्रस्थापित करत टप्प्याटप्प्याने फोन, फॅक्स, बँक अकाउंट नंबर, पोस्टल पत्ता वगैरे मिळवणं. याचा उपयोग तुमचा विश्वास संपादन करायला आणि पुढे तुम्हाला घोळात घ्यायला.

हे बहुतांशी सर्वांनाच माहीत आहे. यापुढचा प्रश्न असा की या ईमेल्स नेहमी कच्च्या, चुकीच्या इंग्रजीत लिहिलेल्या असतात.. स्पेलिंग मिस्टेक्स, कॅज्युअल वाक्यरचना, कॅपिटलायझेशनच्या चुका असं सगळं असतं. भले ती व्यक्ती कोण्या बँकचा मॅनेजर किंवा अगदी गव्हर्नर म्हणून का लिहीत असेना.

यामागे सरळ दिसणारी कारणं अशी:

१. स्पॅम फिल्टर्समधून सुटण्यासाठी काही शब्दांची स्पेलिंग बदलणे
२. खरोखर एक व्यक्ती ईमेल लिहिते आहे, प्रोग्रॅममधून आपोआप निघालेली ईमेल नाही असे भासवण्यासाठी काही मानवी चुकांचे अंश मुद्दाम दाखवणे.
३. ते ज्या भागातून लिहीत असल्याचं म्हणतात (आफ्रिका वगैरे) तिथे खरोखरच उत्तम प्रोफेशनल इंग्रजी लिहिलं तर कदाचित वाचणार्‍याला संशय येईल म्हणून कच्चेपणा दाखवणे

पण ही सर्व कारणं म्हणावी तशी पटत नाहीत. आपल्यासारखे अनेक लोक केवळ त्या गबाळ्या इंग्रजीमुळे या ईमेल्सकडे बनावट समजून पाठ फिरवतात. मग तरीही हे स्कॅमर्स असं का करतात? इंटरनेटवर चांगला निर्दोष इंग्रजी ड्राफ्ट लिहिणं अशक्य आहे का? अवघड आहे का? तसं नक्कीच नाही. तरीही मग अशी फालतू लेव्हलची इंग्रजी का वापरली जाते?

तर म्हणे की हे मुद्दाम, हेतुपुरस्सर केलं जातं. का? तर त्याचं असं आहे की या प्रकारच्या स्कॅम्समधे सुरुवातीची ईमेल हजारो टार्गेट्सना एकदम पाठवणं सोपं आणि बिनखर्चिक असतं. पण जे काही लोक त्यात गळाला लागतील (रिप्लाय करतील) त्यांना फॉलोअप करायला व्यक्तिशः पूर्णपणे डेडिकेटेड संवाद सुरु करावा लागतो. विश्वास संपादन करणं, अधिक माहिती मिळवणं, शंकांना उत्तरं देणं, फाईल्स शेअर करणं वगैरे हे सर्व अत्यंत लेबर सेंट्रिक आहे.

या पर्सनलाईज्ड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर संभाव्य बळी गळत जातात. त्यांना संशय येतो आणि ते विथड्रॉ होतात.

अशा गळलेल्या प्रत्येक बळीमागे (म्हणजे आता सावध होऊन वाचलेल्या) स्कॅमरचा भरपूर वेळ आणि माफक का होईना पण विश्वाससंपादनाचा खर्च, वाया गेलेला असतो.

सुरुवातीला समजा १००० ईमेल्स पाठवल्या. त्यातल्या ५० जणांनी पहिला रिप्लाय केला. त्या सर्वांना फॉलोअप करता करता त्यातले चाळीसजण सावध होऊन किंवा घाबरुन पळाले. आता उरले फक्त १०.

त्यांना उल्लू बनवून त्यातल्या २ लोकांकडून प्रत्यक्ष पैसे उकळता आले.. तर अशा केसमधे ४८ लोकांवरचे श्रम वाया गेले.

म्हणून मुळात ईमेलची भाषा आणि रचना ठराविक मर्यादेत ढिसाळ ठेवून हे स्कॅमर्स सर्वात जास्त मूर्ख किंवा बेसावध लोकच आपल्या ईमेल्सना रिप्लाय करतील असं बघतात.

यामुळे स्मार्टपणाच्या बहुतांश रास्त पातळ्यांवरचे लोक ईमेल बघताक्षणीच ती डिलीट तरी करतात किंवा इग्नोर तरी मारतात..

सर्वात तळाचे दोनतीन टक्केच लोक रिप्लाय करतात. पण या लेयरमधे "यिल्ड" सर्वात जास्त असतं आणि वाया जाणारे श्रम सर्वात कमी.

अर्थात यात काही प्रचंड नवीन लॉजिक मांडतोय असं नव्हे, पण रोचक वाटलं म्हणून नोंदवलं.

तुम्हाला आलेले स्पॅम आणि स्कॅमचे प्रकार इथे सांगितलेत तर मजा येईल. या लोकांच्या आयडिया भन्नाट असतात.. अगदी सारासार विवेक असलेला मनुष्यही काहीवेळा क्लिक करण्यासाठी अगदी सरसावतो.. असं काही बघितलंय का?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

स्पॅमला कोण फसू शकतं याची एक झलक.

ग्राहक हक्क आणि शिक्षणात आयुष्य वेचलेला माणूस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ढिसाळ भाषा आणि मूर्खपणाचा लावलेला संबंध पटला नाही. उत्कृष्ट इंग्लिश बोलणारी अन लिहिणारी लोकंदेखिल अशा मेल्सना बळी पडताना पाहिली आहेत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगल्या प्रोफेशनल इंग्रजी भाषेत ईमेल ड्राफ्ट बनवणं हे खास अशा प्रकारची स्कॅम करणार्‍या डोकेबाज धंदेवाईक लोकांना अवघड आहे का? इथे इंग्रजी चांगलं असण्याचा संबंध नसून अश्या ऑफर मेल्स इतक्या चुकीच्या इंग्रजीत कशा? असा विचार / शंका / संशय मनात न येण्यातल्या "ढ" गटाशी आहे. त्यातलेच लोक सॉफ्ट टार्गेट्स असल्याने परतावा जास्त प्रमाणात मिळतो.

स्कॅमर्सना केवळ जास्तीतजास्त संख्येने लोकांचे रिप्लाय येण्यापेक्षा नेमके व्हल्नरेबल लोकच सापडावेत अशी इच्छा असणार आणि म्हणून त्यांनी हुशार मासे, जे पुढच्या टप्प्यांवर नक्कीच निसटणार ते आधीच निसटावेत इतपत आकाराचे जाळे ठेवलेले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक सर्वांनाच असले मेल येतात! ईंग्रजी कसे आहे, किंवा रिसिव्हर कोणत्या शैक्षणिक- आर्थिक गटातील आहे, याचा अभ्यास करून ते पाठविले जात असावेत असे वाटत नाही. गळाला लागतील तेव्हढे सही म्हणून मोहीम चालू ठेवत असावेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

ईंग्रजी कसे आहे, किंवा रिसिव्हर कोणत्या शैक्षणिक- आर्थिक गटातील आहे, याचा अभ्यास करून ते पाठविले जात असावेत असे वाटत नाही.

छे छे.. असा अभ्यास करणं स्पॅमर्स आणि स्कॅमर्सना अशक्य आहे किंवा अनावश्यकरित्या कष्टाचं आणि खर्चिक आहे. इनफॅक्ट असा अभ्यास नसल्यानेच एकूण फॉलोअपचा मॅन्युअल एफर्ट कमीतकमी वाया जावा म्हणून एक कटऑफ ठेवण्यासाठी अशी अजागळ भाषा ठेवली जाते असं मी काही लेखांमधे वाचलं होतं. सापडले की दुवे देण्याचा प्रयत्न करतो. काही लेखांमधे प्रत्यक्ष आफ्रिकन देशांमधे जाऊन तिथल्या अशा स्कॅमर्सशी थेट संवाद करुनही माहिती घेतली आहे. त्यात एकूण व्यवसायाची व्याप्ती, उलाढाल वगैरे असेही सर्व कव्हर केले गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर आठ दहा दिवसांनी एक तरी असा मेल येतोच. यांत सर्वांत गंमतीशीर असतात ते युरोपातील 'विधवांकडून' आलेले- माझ्या दिवंगत नवर्‍याने 'मागे ठेवलेले' कांही लक्ष युरो मला एखाद्या 'दयाळू' माणसाला दान करायचेत. तुमचा पत्ता, इमेल द्या वगैरे!! किंवा मग थेट आरबीआय गव्हर्नर च्या सही-फोटो सहीत आलेले पत्र-नुकसान भरपाई म्हणूनचे कांही लाख रुपये तुमच्या खात्यात जमा करायचे आहेत, तुमचा बँक खाते क्रमांक द्या! लॉटरी लागल्याचा फोन आलाय, मला फोन करणार्‍याच्या खात्यात आत्ताच्या आत्ता ५००० रु. जमा करायचेत म्हणून पळणार्‍या एकाला खूप प्रयत्नांतीही थांबवता आले नव्हते! *** बनलेली माझ्या बघण्यातील तेव्हढी एकच केस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

अगदी अगदी..

किंवा उदा. "फिशिंग" मधे "OMG, what are you doing in this video?" किंवा "I am shocked to see your images" वगैरे असे काहीतरी लिहून उत्सुकतेच्या धोतराला हात घालायचा.

थोडक्यात कायबी करुन 'इथे क्लिक करा' हे महत्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा बॅकग्राउंड चेक कोणीतरी केलाय.. कोणी ते पाहण्यासाठी..
कोणीतरी तुमच्याशी भेटायला फारच उत्सुक आहे (तुमच्याच शहरातलं) कोण ते पाहण्यासाठी..
तुमचा क्रेडिट स्कोअर चेंज झालाय.. कसा ते पाहण्यासाठी ...
इइइ
इथे क्लिक करा.. आणि ही संतोषीमाता पत्रांची साखळी चालू ठेवण्यास मदत करा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा भाऊ एका फ्रॉडला बळी पडला होता.
नुकताच विंजिनेर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होता. एक इंटरव्हयूसाठी इमेल आला. फ्रेशर्सचे इंटरव्ह्यू तसेही फार टेक्निकल नसतात. एका बाईने इंटरव्ह्यू फोनवरून घेतला. नंतर सिलेक्ट झाल्याचे मेल आले आणि सांगितले की दिल्लीला फायनल फेस टू फेस इंटरव्ह्यूसाठी यावे लागेल. उद्या सकाळचेच फ्लाईट आहे. खर्च तुम्हालाच करावा लागेल पण नोकरी मिळाल्यावर - मिळाली तर खर्च रिएम्बर्स करू.
तुमचे नाव आमच्याकडे आहेच, विमान तिकीट धाडत आहोत. त्या तिकीटाचे पैसे म्हणून दोन हजार आणि काहितरी (ऑड आकडा) या या अकाउंटला पाठवा.

--

तेव्हा भाऊ होस्टेलवर होता. मला तसा फोन केल्यावर मला शंका आली, मी म्हटले मला तो इमेल फॉर्वर्ड कर - अशी कोणती कंपनी विमानखर्चाचे पैसे मागत नाही - एकतर सरळ तिकीट धाडते नैतर तुमचं तुम्ही काढून या म्हणेल

माझ्या ऑफिसच्या कामात पुढला तासभर मला लक्ष द्यायला वेळ झाला नाही. माझा फोनही स्विच्ड ऑफ होता. तोवर त्या लोकांनी भावाला दोनदा फोन केले. आता अजून अर्ध्यातासात पैसे नाहि भरलेत तर तिकीट मिळणार नाही नी तुमची संधी जाईल असेही सांगितले.

मी भावाला पुन्हा फोन करेपर्यंत भावाने पॅनिक होऊन पैसे ट्रान्स्फर केले होते.

आम्ही पुढे तासभर तिकीटाची वाट पाहिली. पुन्हा फोन केला तर १५ मिनिटांत पाथवतो असे सांगण्यात आले. नंतर फोन केला तर स्वीच्ड ऑफ.
नंतर तो नंबर कधीच लागला नाही. महिनाभरातच ये नंबर मौजुद नही है येऊ लागलं

बँकेत चौकशी केली असता. ते अकाउंट त्याच दिवशी संध्याकाळी क्लोज केले गेले होते.

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतलीही असती पण भाऊ पोलिसांत जायला तयार झाला नाही (एवढ्याशा रकमेसाठी कुठे पोलिस वगैरे करा असे त्याचे म्हणणे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे देवा.. चांगलाच सोफिस्टिकेटेड भासवत गंडा घातला की.

इंटरनेटचा संबंध नसला तरी लुटले गेल्याची घटना माझ्या बाबतीत घडली ती अशी, की ऑफिसकडे कार ड्राईव्ह करत जाताना रस्त्यात एक थोडासा रिकामा सेक्शन होता. तिथे एक माणूस रस्त्याकडेला उभा राहून माझ्या कारच्या पुढच्या भागाकडे (रेडिएटर एरिया) बघून हाताने निर्देश करायला लागला. तेवढ्यात मी पुढे गेलो तर वीसपंचवीस मीटर्सवरच दुसरा एक मनुष्य तसाच इशारा आणि दचकल्यासारखे करुन हात दाखवू लागला. त्याने माझी कार थांबवलीच.

थोडक्यात असं की माझ्या कारच्या पुढच्या (अर्थात मला न दिसणार्‍या) भागातून ठिणग्या ऊर्फ स्पार्क्स उडताना दिसत होते. गाडी ताबडतोब बंद करा असं त्याने सांगितलं.

मी पुढे जाऊन पाहिलं तर काहीच नाही.

त्याने म्हटलं की गाडी आत बसून चालू करा आणि मग पाहू.

मी आत बसून इंजिन चालू करताच तो भयंकर दचकून हातवारे करत "बंद करा.. बंद करा" असं म्हणू लागला. क्षणभरही इंजिन चालू ठेवून पुढे बघायला आलो तर स्फोटच होईल असा अविर्भाव त्याने केला.

त्या ठिकाणी जवळपास कुठेही गॅरेज नसल्याने आणि अशी ठिणग्या ओकणारी गाडी घेऊन पुढे जाणे अशक्य असल्याने त्या व्यक्तीने शोधून आणलेल्या मेकॅनिकला गाडी जागीच दाखवणे, त्याने दोन हजार रुपयाचा एक पार्ट बदलणे आवश्यक असल्याचे सांगणे, गाडीचे इंजिन ऑन करणे अत्यंत धोक्याचे असणे, माझ्या खिशात त्यावेळी असलेल्या हजार रुपयांत सेकंडहँड पार्ट आणून सध्या नुसताच वरवर बसवून गाडी चालू करुन देण्याचं त्याचं आश्वासन. मी मोठा शहाणपणा दाखवून घेतलेला त्याचा मोबाईल नंबर. उद्या गॅरेजमधे (इथे पुलाखालीच आहे, पण आत्ता बंद आहे असं म्हणत पूर्व दिशेत हात फेकून दाखवलेला गॅरेजचा रस्ता) गाडी घेऊन येऊन उरलेले पैसे देणे आणि पार्ट नीट फिट करणे अशी तडजोड. त्या निर्जन ठिकाणी आलेल्या देवदूताने पंधरावीस मिनिटांनी एक अ‍ॅल्युमिनियमचा दोन वायरी असलेला पार्ट आणला आणि पाच मिनिटात तो कुठेतरी जोडून माझी सुटका केली.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी तो पार्ट नीट बसवायला त्याच्या गॅरेजमधे जायचं आणि उरलेले हजार रुपये प्रामाणिकपणे (अर्थात!!) द्यायचे म्हणून फोन केला असता कायमचा बंद असलेला तो मोबाईल नंबर पंचवीसवेळा डायल करुन सोडला.

मग शोधू जाता न सापडणारं त्याचं गॅरेज, आणि सर्व उमजल्यावर मी बॉनेट उघडल्यावर त्याच्या पोकळीत कुठेही न जोडता नुसता अडकवून ठेवलेला तो अ‍ॅल्युमिनियमचा डबासदृश भंगार पार्ट स्वहस्ते उचलून घेणं वगैरे सर्व घडून आलं. तो पार्ट माझ्याच नव्हे तर अन्यही कोणत्या कारचा पार्टच नव्हता मुळी हे दुसर्‍या एका मेकॅनिककडून ऐकून स्वतःच्या अडाणीपणाबद्दल अपार सुखही जाणवलं.

त्यातही त्या दोन व्यक्तींपैकी एकाने दुसर्‍याला इंटर्नल गंडा घातला असावा, कारण मला माझा मूर्खपणा पूर्ण कळण्यापूर्वी संध्याकाळी एक पीसीओवरुन केलेला फोन आला होता. त्यावर एक अज्ञात व्यक्ती मी नेमके किती पैसे दिले वगैरे अत्यंत डेस्परेटली विचारत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवातीचा भाग वाचून शोर इन द सिटी चित्रपट आठवला. तुषार कपुर एका चेतन भगत टाइप लेखकाला किडन्याप करताना हीच टेकनीक वापरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशीब फक्त फसवले गेलात... लूटले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

माझ्या भावाला अशीच जॉब ऑफर लंडन वरून आली होती. कंपनीने अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट वगैरे कागदपत्रं पाठवली, ती परत पाठवल्यावर (इमेल) आता इंटरव्ह्यू आहे वगैरे काहीतरी कारण देऊन पैसे भरायला सांगितले होते. भावाला संशय आला आणि त्याने मला सांगितलं मी लंडनच्या नंबरावर फोन केला पण संपर्क झाला नाही. मराठी संस्थळावरील एका लंडनस्थ मित्राला अशी कंपनी दिलेल्या पत्त्यावर आहे का हे विचारले होते. बहुतेक नव्हती आणि मग पुढे आम्हीच विषय सोडून दिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

भाऊ पोलिसांत जायला तयार झाला नाही (एवढ्याशा रकमेसाठी कुठे पोलिस वगैरे करा असे त्याचे म्हणणे)

अशामुळे त्या लोकांचे अजून फावते. आपण तर फसलो, पण किमान पोलिसांना सांगितल्याने कदाचित इतरांना तरी फायदा होऊ शकेल, असा विचार करायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लॉजिक पटण्यासारखं आहे.

सेल्स/मार्केटिंगमध्ये कधी "कोल्ड कॉलिंग" केलं असेल तर नक्की पटेल. "वेष असावा बावळा" हा कोल्ड कॉल करणार्‍या सेल्समनसाठी ड्रेसकोड आहे. (बावळा म्हणजे गबाळा किंवा घाणेरडा या अर्थी नव्हे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

टाईमशेअर स्कॅम आहे का? पूर्वी निमंत्रण आले होते व काय आहे ते पाहू या उद्देशाने, गेलो होतो. नवरा काही केल्या त्यांना बधत नव्हता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा त्यांच्यापैकी एक खेळाडू अधिकाधिक अमिषे गळास लावू लागला तर दुसरा एक होस्टाइल होऊ लागला म्हणजे माझ्या अफाट इंग्रजीत मी म्हटलेलं की - मला ही स्कीम आवडते आहे परंतु I am little shaky abt it Blum 3 त्या shaky शब्दावरुन त्याने लागट अन फालतू पण व्हेज्च जोक मारला. मला जाम राग आला. अन त्याचा प्रयत्न तडीस गेला, हेतू साध्य झाला. मग मी चेवाने नवर्‍याला सांगू लागले की "घेऊ च यात विकत ही स्किम, हे आपल्याला "नालायक" = पात्रता नसलेले = फडतूस समजताहेत."
पण नवरा काही बधला नाही अन शेवटी आम्ही फुकटची भेट = लंच बॉक्स घेऊन बाहेर पडलो. त्या प्रकाराला जाण्याचा अत्यंत पश्चात्ताप झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लोक गिफ्ट घ्यायला एकटाच येतो असं म्हटलं तर मानत नाहीत. बायकोसहच यावे लागेल असे सांगतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ह्म्म. अन फोन करुन घरी विचारतो म्हटलं तरी ऐकत नाहीत. या खोलीत काय तो निर्णय घ्या असा दबाव घालतात. मोडस ऑपरंडी (कार्यपद्धती) फार दबाव घालणारी अन माणसाला "बेट" करुन , संपर्क तोडणारी असते. बरं आमच्या जवळपासच्या अनेक लोकांची नावे त्यांनी यादीत दाखविली. हे लोक डॉक्टर वगैरे बुद्धीसंपन्न होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे. सर/मॅडम, तुम्हाला आत्ताच डिसीजन घ्यावा लागेल कारण ही ऑफर फक्त आत्तापुरतीच /आजपुरतीच आहे असे वारंवार सांगून दबाव टाकला जातो. हे केवळ स्कॅमपुरतेच मर्यादित नाही तर बर्‍याच धंद्यांमधे होते.
अशावेळी मी माझा पेटंट डॉयलॉग ऐकवतो. 'अरे सर / मॅडम, तुम्ही लग्न करण्यसाठी मुलगा / मुलगी पाहिला गेले की लगेच ऑन द स्पॉट डिसीजन घेऊन लगेच कोर्टात / मंदिरात जाऊन लग्न करता काय ?' ९०% वेळा एवढ्या एका वाक्याने काम झाले आहे. बाकी उरलेल्या १०% लोचट केसमधे स्पष्ट नाही म्हणून सांगावेच लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची जुनी (दोनदा) फसवणूक .

http://www.misalpav.com/node/12297

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पहील्या वेळी फसवणूक होती, दुसर्‍या वेळेला तुम्ही भावनाविवश होऊन ५०० रुपये दिले. दुसर्‍या वेळी फसवणूक नव्हती. पण एकंदर किस्सा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवदर्शनाला आलो होतो, बॅग + पैसे चोरीला गेले.. आता इथे परक्या शहरात आमचे कोणी नाही.. ही मोडस ऑपरंडी खूपच पसरली आहे आणि जुनीही झाली आहे.

जवळजवळ प्रत्येक गावात आणि असंख्य चौकांमधे असे लोक आता भेटतात. किमान दोन प्रसंगी तीच व्यक्ती मोठ्या शहराच्या एका चौकात भेटल्यावर महिन्याभराने दुसर्‍या लांबच्या चौकात भेटणे असंही घडलं आहे. बिचारे महिनाभर त्याच शहरात अडकून पडले असणार. Wink

"साहेब, जरा एक मिनिट ऐकता का?" हे वाक्य ट्रेडमार्क आहे

यात खालील गोष्टी अनिवार्यः

१. देवदर्शनाचा उद्देश. इतर व्यावहारिक उद्देशाने कोणी कधी आलेले नसते.
२. सर्व सामान आणि सर्व पैसे एकाचवेळी एकत्रित लुटले जाणे..पण तरीही हातात एखादी बॅग किंवा गाठोडे असणे..ते लुटले गेले नाही, फक्त पैसे असलेली बॅगच गेली.
३. सोबत पत्नी आणि किमान एक लहान मूल असणे
४. कॅश सोडून अन्य कोणत्याही प्रकारची मदत नाकारणे ("चला, मीच तिकीट काढून देतो" वगैरे अशी मदत नको असणे)
५. मोठ्यामोठ्या शहरातही दूरवरचेही कोणी ओळखीचे नसणे
६. जेवायला पैसे हवे असणे. कधीकधी औषधालाही.

अर्थात दयेवर उपाय नाही हेही खरंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रकार इंग्लंडात पण ट्रेन स्टेशन च्या बाहेर अनुभवला आहे, फक्त इथे बायको, मुल असे कोणी नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ मीपण. फक्त इथे लोक अकोला/कर्‍हाड/धुळेचे नसून पोलिश होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अजुनही चालू आहेत का हे प्रकार? मी टिळक रोड, कोथरुड, सेनापती बापट रोडवर अशी कुटुंब पाहिली आहेत पण किमान ८+ वर्षांपुर्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी इथे अ‍ॅम्वेवाले पुष्कळ पिडायचे. हल्ली दिसत नाहीत.

तसेच पोलीस फ्रॅटर्निटी लॉज / फायर्मेन्स बेनेवोलंट असोशिएशन-छाप मंडळीपण फोनवरून खंडणी गोळा करायची. बर्‍याच वर्षांत त्यांचाही काही संपर्क नाही.

त्याचप्रमाणे हेही स्क्याम बंद झाले असण्याची अपेक्षा करणे रास्तच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोकरीच्या मुलाखतीला असे सांगून ‍ॅम्वेवाल्याने पुण्यात जंगली महाराज रोड्वर त्याचा पीपीटी नि प्रचार चालू केला. त्यांचा ३ तासांचा प्रोग्राम होता. ३० मिनिटांनी अंदाज आल्यावर मी संपूर्ण सभा उधळून लावली. टोटल मजा घेतली. लोकांना रिकामटेकडे समजतात कि काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हल्ली अ‍ॅम्वेवाले दिसले नाहीत कित्येक वर्षात. मी असं ऐकलय की ते आत क्विकस्टार नावाने "बिझनेस" करतात, खरं-खोटं माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे; पण ज्यांच्यात स्मार्टपणाचा अंश आहे ते सबजेक्टवरुनच त्यातली ९०% इमेल्स डिलीट करतात. उघडलेली १०% पहिली एक-दोन वाक्यं वाचली की डिलीट करतात. त्यामुळे इतका विचार त्यामागे असेल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही तर हे लॉजिकच फुल्ल सपोर्ट करताहात. स्मार्टपणाचा अंश असलेले लोक त्यांना तसेही नकोच आहेत. कारण समजा जास्तच जेन्युइन आणि अचूक अशी पहिली ईमेल लिहिली तर काही एरवीचे स्मार्ट लोक पहिला रिप्लाय करण्याच्या स्टेपपर्यंत येतीलही.. आणि तसे ते आले तरी शेवटी ते स्मार्ट असल्याने फसवणुकीच्या पुढच्या स्टेप्स त्यांना यथावकाश जाणवून आणि ते बॅकआउट होतील (होतात). तेव्हा त्या स्टेजपर्यंतचे स्कॅमरचे पर व्हिक्टिम श्रम वाया जातात. म्हणून पूर्ण ईमेल वाचणारे, इतकेच नव्हे तर त्यातला भोंगळपणा न जाणवून त्यावर विश्वास ठेवणारे अत्यंत कमी स्मार्ट लोक तेवढेच जाळ्यात यावेत हाच तर मुद्दा आहे.

उन्हाळ्यात विहीर खणण्यामागचं लॉजिक असतं तसा एक्झॅक्टली नव्हे पण तशासारखा काहीसा प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंचित फरक आहे. स्मार्ट लोक नको आहेत म्हणून मुद्दाम चुका करणे वेगळे आणि स्मार्ट लोक कन्टेन्ट पाहूनच फसत नाहीत हे माहित असल्याने ग्रामर/स्पेलिंगची पर्वा न करणे यात फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे पुण्यात बाणेर-पाषाण लिंक रोडवर एक माणूस त्याच्या मुलाला (साधारण ७-८ वर्ष वय) घेउन फिरत असतो. कुठल्याही सोसायटी च्या गेटजवळ त्याच्या मुलाला फिट आल्याचं भासवत त्याला स्वतःच्या मांडीवर झोपवतो आणि लोकांकडून पैसे काढतो. पहिल्या वेळेला पाहिलं तेव्हा अगदी पुढे गेलेली माझी गाडी पुन्हा मागे वळवली आणि त्या बाप-लेका समोर थांबवली. फिट बद्दल त्या बापाकडून ऐकलं आणि फार वाईट वाटलं. म्हंटलं चला लगेच जाऊ दवाखान्यात, तर बापाने नकार दिला, म्हणाला औंधच्या सरकारी दवाखान्यातच जायचयं, पण खूप उन्ह आहे आणि मुलगा चालू शकत नाही. म्हंटलं रिक्षा करुन देऊ का? तर म्हणाला ठिक आहे, रिक्षा पहायला गेलो तर थांबवलं मला आणि म्हणाला की - राहू द्या, पैसे द्या तुम्ही मी बोलावतो रिक्षा आणि जातो. तेव्हा मग लक्षात आलं की काही तरी झोल आहे. तोपर्यंत तो मुलगाही उठून बसला होता. मी फार पुढे काही बोललो नाही. राग आला ह्या सगळ्या प्रकाराचा पण त्या मुला कडे पाहून कितीही नाही म्हंटलं तरी जरा हळहळायला झालं. वाईट वाटलं कसला बाप आहे ह्याच्या नशीबात आणि त्यात ह्याची काय चूक तर केवळ 'नशीब'? तो मुलगा हे सगळं अगदी बाप म्हणेल तसं करत होता, खूपच इनोसंटली. स्वतःचं समाधान आणि गिल्ट वाटू नये म्हणून पिशवीतलं एक सफरचंद टेकवलं त्या मुलाच्या हातावर आणि गेलो तिथून.

ते सफरचंद ही नको होतं द्यायला, असं करुन त्या लहान मुलाला पुढेही हे असलं खोटं नाटक करायला प्रोत्साहनच दिलं मी नकळतपणे पण फार प्रॅक्टीकल विचार करण्याच्या मनःस्थितीत नव्हतो तेव्हा. अजून ही बर्‍याचदा ते बाप-लेक दिसतात त्याच भागात हे असलं 'पथनाट्य' करतांना, अता फार काही वाटत नाही त्या मुलाबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून हे आठवलं.

http://jaisejyachekarm.blogspot.in/2013/12/blog-post_11.html

हा संपूर्ण ब्लॉगच भयंकर आहे. हा माणूस खरोखर अफाट जिद्दीचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

होय यांचे फेसबुकवरचे मेसेजेस वाचले आहेत. गर्दच्या व्यसनाबद्दल आहे बरोबर? वाचवत नसे. पण ब्लॉग आहे हे माहीत नव्हते. येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो तेच. मिपावरच्या मुक्तविहारींनी हा ब्लॉग सुचवला. ज्याची लिंक दिलीय तो भाग वाचून फार अस्वस्थता आली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ह्या धाग्यात अजून 'नायजेरियन ४१० स्कॅम'चा उल्लेख कसा आलेला नाही? जवळजवळ प्रत्येकाला असली एखादीतरी मेल आलेली असतेच.

साधारण प्रकार असा असतो. कोणी तथाकथित नायजेरियन उच्चपदस्थ मेला असून मी त्याचा वारसदार आहे. मेलेल्या उच्चपदस्थाने पैसे खाऊन युरोपामध्ये बँकेत काही मिलियन डॉलर्स ठेवले असून ते बाहेर काढायला मला मदत हवी आहे. ती तुम्ही केली तर एकूण रकमेपैकी अमुक पर्सेंट मी तुम्हाला द्यायला तयार आहे. सध्या तातडीच्या खर्चासाठी मला अमुक हजार पाठवावेत अशा ह्या मेल्सना 'नायजेरियन ४१० स्कॅम' म्हणतात.

ह्या प्रकाराला ४१० स्कॅम असे नाव पडण्याचे कारण असे की आपल्या ४२०व्या कलमाप्रमाणे नायजेरिअन क्रिमिनल कोडमध्ये ४१० हे कलम फसवाफसवीचे आहे. दोन्हीकडॅ कायदे बनविणारे राज्यकर्ते इंग्रजच असल्यामुळे नायजेरियन कोड त्यांनी हिंदुस्तानाच्या कोडपासूनच बनवले. देशानुसार कलमे पुढेमागे झाल्यामुळे ४२०व्या कलमाचा नंबर ४१०व्या जागी आला.

आत्तापर्यंत तीनदा माझ्या जवळच्या मित्रांकडून अथवा नातेवाइकाकडून त्यांचा ईमेल अकाउंट हॅक करून त्यावरून'मी कामासाठी येथे लंडनला आलो आहे आणि माझा पासपोर्ट, पाकीट सर्व काही चोरीस गेले आहे. मी मोठया अडचणीत असून अमुक पत्त्यावर मला इंटनॅशनल मनीऑर्डरने २००० डॉलर्स पाठवा' अशा मजकुराच्या मेल्स आलेल्या आहेत.

बँकेकडूनच आलेली वाटावी अशी मेल येते आणि सांगते की तुमच्या खात्यामध्ये कोणीतरी ढवळाढवळ करीत आहे आणि त्याची शहानिशा करण्यासाठी अमुक लिंकवर क्लिक करून पुढच्या सूचनाप्रमाणे करा. असल्या मेल्स पूर्णपणे डिलीटच केलेल्या बर्‍या कारण असे खरेच झाले असले तर बँक तात्काळ तुमचे खाते बंद करून पोस्टाने त्याची खबर देईल, ईमेल पाठवणार नाही.

माझ्या क्रेडिट कार्ड कंपनीच्या सॉफ्टवेअरने योग्य काम करून वरकरणी अगदी सरळसाधा वाटणारा पण माझा नंबर पळवून केला जाणारा एक व्यवहार तो पूर्ण होण्यापूर्वीच पकडला असाहि चांगला अनुभव मला आलेला आहे. कसले फिल्टर्स लावून सॉफ्टवेअर तुमच्या कार्डावर होणार्‍या व्यवहारांची पडताळणी करीत असते कोणास ठाऊक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..रोचक प्रतिसाद..
.बादवे ते ४१९ आहे माझ्यामते..४१० सुद्धा असेल तर ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मूळ पोस्टच्या कलाने :

/* मग तरीही हे स्कॅमर्स असं का करतात? इंटरनेटवर चांगला निर्दोष इंग्रजी ड्राफ्ट लिहिणं अशक्य आहे का? अवघड आहे का? तसं नक्कीच नाही. तरीही मग अशी फालतू लेव्हलची इंग्रजी का वापरली जाते? */

साधारणत: जी माणसं या स्कॅम्सना बळी पडू शकतात त्याच विचारतीव्रतेची माणसं स्कॅम्स पाठवत असावीत. ही जमात चेन मार्केटिंग, अ‍ॅम्वे, इबिज, किंवा तत्सम प्रोपोगंडिश स्कीमांमध्ये रस घेणार्‍या जमातीला जवळची आहे. बाबा-बिबाचे लॉकेट घालणार्‍या जातीला अजुन जवळ. (यांची एक वेगळीच स्पेसीज करायला हवी च्यायला. होमो सेपियन्स नव्हेतच हे). यापैकी काहींकडे पैसा असतो, त्यामुळे स्कॅमर्सचा सक्सेस रेशो नगण्य राहत नाही. फिशींग ही वेगळ्या स्कीलसेटची गोष्ट आहे. पण तिथेही वरील जमातीतली काही इवॉल्व्ड मंडळी घुसु लागली आहेत.

/* विश्वास संपादन करणं, अधिक माहिती मिळवणं, शंकांना उत्तरं देणं, फाईल्स शेअर करणं वगैरे हे सर्व अत्यंत लेबर सेंट्रिक आहे */

ब्रेनवाश्ड मंडळी हे विनातक्रार करतात. त्या धर्तीवर स्कॅमर्स मधली वरील जमातीतली मंडळी असली कामे नेटाने करत असावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

फसवणूक झालेली व्यक्ती नामांकित लॉ कॉलेजातील पाहुणी (स्त्री) लेक्चरर.

पहिला एमेल. नमस्कार मी सद्दाम हुसेनचा लांबचा (निर्दोष व सभ्य) नातेवाइक आहे. इथे युध्द सुरु असल्यामुळे मला देशाबाहेर पलायन करायचे असुन माझी संपत्ती बाहेर नेण्यास अनंत अडचणी येत आहेत. कृपया आपण मला आपला बँक अकाउंट वापरुन पैसा बाहेर काढण्यास मदत केली तर आपल्या उपकराची परतफेड म्हणून त्यातुन आपल्याला $१००००० देइन. सदरील व्यवहार हा पुर्णपणे हिशोबी मालमत्तेबबत असुन व दोघांच्या वकिलाच्या सल्याने आपल्या देशाचे कायदेशीर सोपस्कार पार पाडुनच केला जाइल.

व्यक्ति स्वतःच कायदेतज्ञ असल्याने गंमत वाटुन तिने रिप्लाय दिला की ती तयार आहे आपल्या वकीलाशी संपर्क साधायचा आहे.

दुसरा एमेल. नमस्कार आपल्या सहकार्यसाठी अतिशय धन्यवाद. हा माझ्या वकिलाचा पत्ता ( ब्रिटनमधील नाव व पत्ता).

त्या वकिलासोबत (ओनलाइन) कायदेशीर करार केला गेला की जि रक्कम खात्यावर जमा केली जाइल त्यातुन $१००००० सोडुन उरलेली रक्कम अमुक अमुक दिवसात फलाना फलाना बँकेमधे ट्रान्सफर करायची आहे. ते अकाउंट आमच्या आशीलाचे आहे.

पुढचा एमेल.
अमुक अमुक खात्यातुन फलाना फलाना रक्कम आपल्या खात्यात ट्रान्स्फर करायची प्रक्रीया सुरु झाली आहे. यासाठी बँकेला आपल्या विषेश परवानगीची आवश्यकता आहे. रुपये १०,००० आमच्या मुंबै येथील एजंटाकडे चेकने भरुन सदरील प्रक्रीया सुरु करावी.

१०००० अर्थातच छोटी रक्कम असल्याने बगु तरी काय होते या विचाराने त्यांनी भारतातील एजंटकडे संपर्क साधला. त्याने विषीष्ट दिवशी भेटायला बोलावले व भेट व्हायच्या एक तास आधी अचानक काही कामामुळे त्याला भेटणे शक्य नसल्याचा मेसेज आला सोबत खाते क्रमांक देउन तेथे रु १०००० भरावयास सांगीतले. तसेच आपले नाव खातेक्रमांक व वकिलाकडून सदरील फंड ट्रन्सफरची प्रोसेस सुरु करण्याबाबत करारची प्रत व अफेडेवीट एनोसी वगैरे वगैरे स्कॅन करुन एमेल करावयास सांगीतले.

झालं. वरील गोष्टींची पुर्तता झाल्याच्या दुसर्‍या दिवशी बँकेचा (दिसणारा) इमेल आला पैसा इराक मधील खात्यामधुन सोडण्यात आलेला असुन लवकरच आपल्या भारतातील खात्यात जमा होइल. धन्यवाद.

पुढचा एमेल. आपली रक्कम भारतात पोचली असुन आपल्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे तरी करन्सी एक्सचेंजसाठी आपणास रुपये ५००००० कमीशन आपण संपर्क साधलेल्या आमच्या एजंटने सांगितलेल्या खात्यात चेकने आगाउ भरावे लागेल. दोन दिवसात रिप्लाय न दिल्यास ट्रांजेक्शन रद्द केले जाइल.

झालं यांनी अत्यानंदाने मिळालेल्या खातेक्रमांकावर पैसा चेकने भरला.

पुढचा एमेल. आपला चेक मिळाला. आपल्या सहकार्यासाठी अतिशय धन्यवाद काही सेकंदातच सर्व रक्कम आपल्या खात्यात जमा होइल. नंतर लगेच आमच्या वकिलासोबत ट्रान्जेक्शन कन्फर्म करा.

वेल.. अजुन यांचेकडून सदरील ट्रान्जेक्शन कन्फर्म व्हायची त्यांचा वकिल नक्किच वाट बघत असावा Smile नाही का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मनुभाई देसाई अशाच मेलना बळी पडले असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा किस्सा ज्यावेळी घडला त्यावेळी इ-कॉमर्स तुलनेत नवीन व हाय स्टेट्स सिंम्बॉल होते त्यामुळे तज्ञ व्यक्तीच्या मदतीशिवाय एखादा मेल फ्रॉड असु शकतो याचा सामान्य लोकांना अंदाजच येत नसावा. तसेच ब्रिटन मधील वकील भारतातील (न भेटलेला) एजंट, बँकांचे इमेल अपडेट अशा बाबी बर्‍याच वास्तववादी वाटल्या असणार. त्यामुळेच चुक घडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खरंच लोक असं बळी पडतात हे असं सांगूनही खरं वाटत नाही! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशाच ट्रिकांची फ्रेंच आवृत्ती - http://www.huffingtonpost.com/budget-travel/4-scams-to-watch-out-for_b_4...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कुठेतरी वाचलं होतं की युरोपमध्ये अनोळखी ठिकाणी (विशेषतः ब्रॉथेलमध्ये), लिफ्टने वर किंवा खाली जाताना मध्येच लिफ्ट बंद करतात आणि मग तुमची सुटका करायला खिशातले सगळे पैसे द्यावे लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0