Skip to main content

शिक्काशीर्षक

पताका
ध्वनिक्षेपेकांचे आवाज
चमकणारे दिवे

गदारोळात
जमलेले बांधव

तिथ्यांच्या संकटात
सापडलेल्या
मुर्त्या
चौकाचौकात

संस्कृतीने पसरलेल्या
कचर्‍यास
अडगळ म्हणतांना
परंपरा
भौतिक सांडलेल्या

माणसांइतके पुतळे
चौरंगांवर मांडून
स्वप्नातले जागरण

तिरशिंगराव Sat, 23/05/2015 - 09:57

माणसांइतके पुतळे

तुम्हाला मोदींच्या टेराकोटाच्या भेटीबद्दल बोलायचे आहे का ?

तोतया Sat, 23/05/2015 - 10:04

In reply to by तिरशिंगराव

माहीत नाही. प्रस्तुत कविता मला भेटलेल्या सर्व लोकांच्या वैयक्तिक अवकाशाचे उल्लंघन आहे. मोदी, ऐश्वर्या, सलमान खान, राज ठाकरे या सगळ्यांविषयी किंवा लोकांच्या घोळक्यांविषयी बोलण्याइतपत सामाजिक मी नाही.

बॅटमॅन Mon, 25/05/2015 - 19:56

In reply to by आदूबाळ

हे मावंदं घालणं काय असतं? अंतू बर्व्याने जावयबापूला सांगितले ते शंभू जोगळेकरानं घातलेलं मावंदं वगळता दुसरीकडे कधीच हा शब्द वाचला नाही कधी.

आदूबाळ Mon, 25/05/2015 - 20:12

In reply to by बॅटमॅन

म्हंजे दूर फिरून धडधाकट परत आलो म्हणून इष्टमित्रांना दिलेली पार्टी रे. पुढे कधीतरी याला "यात्रा-पुण्य-पासऑन-मेक्यानिझम" असं कायसं रूप आलं. माझ्या आज्जीच्या मैत्रिणींनी काशीयात्रेनिमित्त घातलेल्या मावंदात भाजणीचे वडे, मोतीचुराचे लाडू वगैरे तेरावी-बेत होता. आणि जवळच्या मैत्रिणींना आतल्या कक्षात नेऊन गंगाजलाचा गडू.

(त्याकाळच्या चौधरी यात्रा कंपनी टैप यात्रेतून हातीपायी धड निसटलो तर मी गावजेवण घालीन असं आजोबा म्हणत असत! ते यात्रेबित्रेला जायची शक्यता शून्य होती.)

तिरशिंगराव Sat, 23/05/2015 - 15:13

In reply to by तोतया

पहिल्या प्रतिसादात माझी शंका विचारण्याच्या नादात, कविता आवडली हे लिहायचं राहून गेलं.
तोतया, तुम्ही लिहीत रहा.

बिटकॉइनजी बाळा Sat, 23/05/2015 - 11:16

काव्य तितकेसे दुर्बद्ध नाही पण शीर्षकाचा शिक्का दुसर्‍या कोणत्यातरी कवितेऐवजी इथे पडला आहे का?
आणि "स्वप्नातले जागरण" पर्यंत एक फ्लो आहे तो खंडित होऊन नेमकं काहीतरी असंबद्ध असल्यागत वाटते. स्वप्नातले जागरण??? जागरण ठीक आहे, स्वप्नातले म्हणजे?